Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज मंगळवार दि.२४ सप्टेंबरचे
आज मंगळवार दि.२४ सप्टेंबरचे अपडेट
~ जान्हवीचा समजुतदारपणा खूपच प्रभावित करणारा दाखविला आहे. श्री तिला तिच्या घरी सोडविण्यासाठी निघाला आहे. तो मनातून काहीसा खजील आहे कारण त्याला सहाही आयांनी [शरयू सोडून] जान्हवीला जी वागणूक दिली त्याबद्दल त्याला वाईट वाटते.....रस्त्यातून बोलत जात असताना तो आजीच्या वर्तनाबद्दल थेट जान्हवीची माफी मागतो शिवाय 'आजीला बी.पी.चा त्रास होतो असे जे मी म्हणालो ते खोटे होते...' ही कबुली देतो. जान्हवी त्याला आपल्याला ही गोष्ट माहीत होती असे शांतपणे सांगते. रस्त्यातून जाताना जान्हवी अजिबात रडत नाही किंवा मिळालेल्या वर्तणूकीबद्दल चिडतही नाही....समजून घेते ती परिस्थिती.
इकडे आजी आई अन् बेबीआत्या 'जान्हवी श्री च्या आयुष्यातून निघून जावी यासाठी काय योजना बनवावी लागेल' यावर खल घालतात....बोलताबोलता जान्हवीने आणलेला डबा उघडून बघतात तर त्यात नारळीभात. तो पाहिल्यावर जणू काही गोखल्यांवर आभाळच कोसळले असा आई आविर्भाव करतात....आजीही साथ देतात....[हा प्रकार सारा हास्यास्पदच.....अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचाच प्रकार].
जान्हवी आपल्या चाळीत परतते तर तिचा मित्र मनिष तिथे खाली मान घालून मैत्रिणीला मोबाईल लावत असल्याचे पाहते....तो अतिशय नर्व्हस दाखविला आहे. जान्हवी त्याला चीअर अप करते. दोघेही आपापल्या भावी आयुष्याविषयी बोलतात....समजून घेतात. तोपर्यंत जान्हवीच्या घरी आईला अनिल आपटेचा फोन येतो तो घेतला जात नाही म्हणून आपटे एक धमकीचा एसएमएस पाठवितो....तो मेसेज जान्हवीचा भाऊ पिंट्या वाचतो आणि धमकी पाहून "ह्याला धडा शिकविला पाहिजे...' असे बडबडत संतापून घरातून बाहेर जातो.
दुसरीकडे श्री आपल्या घरी येतो आणि जान्हवीबाबत सहाही आयांच्यासमवेत मीटिंगला बसतो. आजीला चेक प्रकरणाबाबत जान्हवीने माफी मागितली आहे असे सांगूनही आजी तिला क्षमा करायला तयार नाहीत. ते चेक प्रकरण म्हणजे नेमके काय होते हे जान्हवीने त्याला रस्त्यात सांगितले असल्याने श्री समजून चुकतो की अकाऊंट्न्ट म्हणजे तो स्वत:च आणि त्याला नोकरीवरून काढून टाकले जाऊ नये म्हणून जान्हवी खोटे बोललेली असते. या गोष्टीचा तो आता साग्रसंगीत खुलासा करणार आहे.
कालच्या भागात ती सगळ्यांच्या
कालच्या भागात ती सगळ्यांच्या डायरेक्ट.. न विचारता पाया पडते आणि बेबीआत्यालाच का विचारले म्हणे पाया पडायच्या आधी?
न विचारता पाया पडते आणि
न विचारता पाया पडते आणि बेबीआत्यालाच का विचारले म्हणे पाया पडायच्या आधी? >>>>>> तिला तो भोचक डायलॉग दिला होता ना म्हणायला
पण नमस्कार मात्र सुरेख
पण नमस्कार मात्र सुरेख केला. आगदी आप ल्या पद्धतीचा. गोडच मुलगी आहे.
तो पाहिल्यावर जणू काही
तो पाहिल्यावर जणू काही गोखल्यांवर आभाळच कोसळले असा आई आविर्भाव करतात>>> हो ना जस काही डब्यामधे बाँबच ठेवलाय
"...पण नमस्कार मात्र सुरेख
"...पण नमस्कार मात्र सुरेख केला. आगदी आप ल्या पद्धतीचा. गोडच मुलगी आहे....." >> अगदी अगदी. खूप प्रभावित केले तिच्या नमस्कार पद्धतीने आणि त्याचवेळी संतापही यासाठी येत होता की एकटी शरयू सोडली तर तिला मनापासून कुणी आशीर्वादही दिल्याचे दाखविले गेले नाही..... तिला सून म्हणून स्वीकारा वा नकार द्या, परंतु तुमच्या घरी आलेली एक शालीन मुलगी तुम्हाला वाकून नमस्कार करते तेव्हा हिंदू धर्माच्या रितीनुसार ज्येष्ठत्वाच्या नात्याने तोंडभरला आशीर्वाद द्यायला आजीची परवानगी घ्यायला लागते ?
दॅट्स रिडिक्यूलस.
@ अशोकजी, त्या सहा आयांच्या
@ अशोकजी,
त्या सहा आयांच्या मते ती शालिन नाहीये नं. त्यांना अजून वाटतेय की हिच लग्न झालेय आणी अफेयर आहे बाहेर. म्हणून पण राग आहे त्यांचा.
आज हा बीबी बघितला (वाचला
आज हा बीबी बघितला (वाचला नाही, फक्त बघितला).
अशक्य आहे सगळे!
तत्त्वज्ञानी शब्दांची बुडबुडे
तत्त्वज्ञानी शब्दांची बुडबुडे सोडण्यापेक्षा ही सगळी मंडळी सगळे मुद्दे सरळपणे, स्पष्ट का बोलत नाहीत? आजच्या भागातही, "तिला शिक्षा करायच्या आधी मला कर" हे तीनदा सांगून मग तो श्री सगळं सांगणार आहे. ते म्हणायच्या अगोदर किती मिनिटं खातील ती वेगळीच. शिवाय, कुणाशी लग्न झालंय तिचं हा साधा सरळ प्रश्न विचारायचा सोडून "माझं जजमेंट बरोबर की आजीचा अनुभव बरोबर" या गोंधळात अजून वेळ घालवला!
प्रज्ञा.... मालिकेच्या लेखिका
प्रज्ञा....
मालिकेच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी ह्या प्रसिद्ध दिग्दर्शक परेश मोकाशी {"हरिश्चंद्राची फॅक्टरी} यांच्या पत्नी आणि साहित्यिक दि.बा.मोकाशी यांच्या सूनबाई असून साहित्यक्षेत्राशी त्या स्वतःही चांगल्याच निगडित आहेत....त्यामुळेच मालिका लिखाणातही देवस्थळी यानी त्यांच्या 'तत्वज्ञानी' विचारसरणीला भरपूर रान मोकळे करून दिल्याचे दिसत्येच.....शिवाय टीआरपी वाढत चालला आहे हे स्पष्ट झाल्याने झी मराठी मॅनेजेमेन्टनेही मालिकेच्या एपिसोड संख्येकडे दुर्लक्ष करा असा व्यवहारी सल्ला दिला असणारच.
अशोक पाटील
तो पाहिल्यावर जणू काही
तो पाहिल्यावर जणू काही गोखल्यांवर आभाळच कोसळले असा आई आविर्भाव करतात>>> हो ना जस काही डब्यामधे बाँबच ठेवलाय>>>> नताशा बाँब ठेवला असता तर बोंबाबोंब तरी केली असती. यांचा चेहरा असा होता जस काही गोखल्यांच्या घरात डबा भरुन तंदुरी चिकन किंवा फिश करी दिली आहे जान्हवीने.....
>>>गोखल्यांच्या घरात डबा भरुन
>>>गोखल्यांच्या घरात डबा भरुन तंदुरी चिकन किंवा फिश करी दिली आहे जान्हवीने..
तुटून पडल्या असत्या डब्यावर !
सर्वच गोखल्यांकडे चिकन फिश करी वर्ज्य नसते
मामा, अपडेटबद्द्ल धन्यवाद.
मामा, अपडेटबद्द्ल धन्यवाद. मला शेवट मिळाला फक्त पाहायला.
बाप रे, ही मालिका किती
बाप रे, ही मालिका किती तन्मयतेनं बघता तुम्ही सगळे! भाग बघायचा, शिवाय त्यावर चर्चा आणि मंथन पण कौतुकास्पद!
सई.... अगं इथले सारे सदस्य
सई.... अगं इथले सारे सदस्य [मी टू] खूप प्रेमात पडले आहेत या मालिकेच्या....डीसेन्ट आहेच, जरी मांडणी आणि सादरीकरणात काही न पटणार्या गोष्टी समोर येत असतात....लेकिन चलता है ! तितके स्वातंत्र्य दिले पाहिजेच टीमला.
अर्थात ऑल क्रेडिट गोज टु बोथ श्री अॅण्ड जान्हवी.
सर्वच गोखल्यांकडे चिकन फिश
सर्वच गोखल्यांकडे चिकन फिश करी वर्ज्य नसते>>>> इथे नक्की असणार कारण सगळे तत्त्ववादी ना? टिश्यु वापरत नाही कारण झाडं वाचवायला हवीत, लेदर वापरायच नाही कारण प्राण्यांना धोका (खरतर हे चांगलच आहे. यातुन त्यांनी चांगलाच संदेश दिला आहे) तसच मांसाहार करायचा नाही कारण प्राण्यांना धोका म्हणुन म्हटल हो......
tyaa 6 aayaaMnaa Dachchoo
tyaa 6 aayaaMnaa Dachchoo dilaa paahije maaliketoon itakyaa bor karataat naa kee baas
चला आजच्या भागात आजीचा गैरसमज
चला आजच्या भागात आजीचा गैरसमज दूर करेल श्री असे वाटते, तसे झाले तर ठीक लवकर लग्न मार्गी लागेल.
आता जास्त घोळ घालू नका, गैरसमज निस्तरा.
दक्षिणा तुमच्या किबोर्डाला
दक्षिणा तुमच्या किबोर्डाला काय झालय आज? मराठी का टायपत नाहीये?
दक्षिणा, त्या सहा जणींना
दक्षिणा, त्या सहा जणींना डच्चू द्यायच्याऐवजी आता त्याच उलट जास्त दाखवतील लग्नानंतर आणि त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स प्रकर्षाने दाखवतील. जान्हवी तारणहार होईल त्यांची.
Mugdha not sure what is the
Mugdha not sure what is the problem. on some BBs i am able to write in Devnagari. on few i am not.
किती बायका हो, किती बायका..
किती बायका हो, किती बायका.. उद्या ती जान्हवी ही लग्न करून तिथे जाणार.. खरं तर या मलिकेचं नाव, 'बायकांत पुरुष (श्री) लांबोडा वगैरे असायला हवं..
Ashok.... Pratisadabaddal
Ashok....
Pratisadabaddal dhanyavad. Pan georestriction mule baghata yet nahiyet.
Mazya tab cha setting badalayala lagel ka.
Dhanyavad
Mala tar tya sagalya bayaka
Mala tar tya sagalya bayaka moorkha vatata. Itka kadhi sarvanamanmadhe bolto ka apan ti, tila, tivha etc. Vakyat kadhitari ekda naav yeta na. Ugach sagale ter marat sutalyat.
Tyaani poorna episod kabij kela tar doka uthata.
Mala tya Janhavichya aaichi acting jam awadali. Ekdam natural. Typical chalitali vatate.
Guntata hrudaya he madhe pan zakkas hoti. Aaplya navryala department mhata aste. Me malika baghatana baghoon vaitagalelya navaryala me suddha kadhitari amacha department vaitagalay mhanun chidavate.
inshort tichi acting zakkas!,
धानी... अशी अडचण येण्याचे
धानी...
अशी अडचण येण्याचे काही कारण नाही.... डेलीमोशन ही लिंक अगदी इकडील कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही व्यवस्थित चालते. तुमच्या नेटकनेक्शनमुळे काही प्रॉब्लेम येत असेल...
एनी वे.... खालील लिंक ट्राय करा.....तुमच्याकडे बीएसएनएल चे नेट असेल तर ह्या लिंकला स्पीड छान मिळते :
http://www.youtube.com/watch?v=BCUulDVrpeg
ही लिन्क
ही लिन्क बघा.
http://www.iBollyTv.com/ तिथे iMarathi वर टिचकी मारा.
इतके मोठे उद्योगधंदे करणारी
इतके मोठे उद्योगधंदे करणारी माणसं कम्युनिकेशनात इतकी शून्य >>> त्यांच्या उद्योगधंदेत कॉर्पोरेट कम्युनिकेशन असणार ! घरी नाही.
त्या बाई दुर्दैवान का म्हणाल्या ? ती सायली त्यांची कोण नातलग का? गृह उद्योगी माणसाला निदान घरात तरी काम करायला दाखवायला हवं होतं...
पी. एस. जान्हवी आणि श्री परवा ठाण्यात हरिनिवासला होते. आईसक्रीम खात.
<<पण नमस्कार मात्र सुरेख
<<पण नमस्कार मात्र सुरेख केला. आगदी आप ल्या पद्धतीचा. गोडच मुलगी आहे.>> +१११
घरच्या लेडीज बायका तुडुंब प्रसन्न..
ही मालिका तशी इतरांपेक्षा
ही मालिका तशी इतरांपेक्षा आवडली.
अभिनय पण सर्वांचा ठीकठाक आहे.
फक्त एक तांत्रिक चुक दुसर्यांदा झाली आहे म्हणुन लिहिते.
श्री जेंव्हा जान्हवीबरोबर घरी जायला निघतो तेंव्हा रस्त्यावर काळोख असतो पण तो घरी पोहोचतो आणि दार उघडले जाते तेंव्हा एकदम दुपारसारखा प्रकाश बाहेर रस्त्यावर दिसतो.
हे मागे पण एका भागात झाले होते आणि त्यामुळे खटकते. शुटिंग वेगवेगळ्या वेळी होत असेल तर मग दारात उभे असल्याचे शुटींग उलट दिशेने करावे.
बाकी सर्व उत्तम.
आजच्या भागात काय झाले
आजच्या भागात काय झाले
Pages