Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हिंदीतून वापरलेले (तुडवलेले)
हिंदीतून वापरलेले (तुडवलेले) कपडे मराठी कपडेपटात येतात असे माझ्या एका ह्याच क्षेत्रात काम करणार्या मैत्रीणीकडून समजले. मराठी सिरेलीतल्या लग्नाकर्यातल्या साड्या व पुरुषांच्या शेरवान्या पण हिंदी सिरेलीत आपण पहिलेल्या असतात. मराठी सिरिअलवाल्यांचा कपडेपट गरीब असतो म्हणे. >> सुमेधा
जाह्नवी दुसर्या दिवशी फक्त
जाह्नवी दुसर्या दिवशी फक्त श्री ला भेटायला जाणार असते आणि तो तिला सरप्राईझ देणार असतो. ती जास्त नर्व्हस होते-सरप्राईझ या शब्दाने-आधी मिळालेल्या धक्कादायक अनुभवामुळे, त्यामुळे तो तिला एकच हिंट देतो, की तो तिला एका मंदिरात नेणार आहे.. तो तिला आपल्या घरी नेणार आहे, हे तिलाच माहिती नसतं, तर तिच्या घरच्यांना कसं कळतं? तिच्या कजाग आईला नारळीभात खायची हुक्की येते आणि ती जाह्नवीला तो करायला सांगते. तेंव्हा त्याच्या घरच्यांसाठी घेऊन जा, हे जेंव्हा सांगते, तेंव्हाच ते खटकतं.. कारण जाह्नवी फक्त श्री ला च भेटायला जात असते. मग श्री साठी घेऊन जा, इतकंच म्हणायला हवं होतं ना? माझा एकही भाग मिस नाही झालेला, त्यामुळे जाह्नवीला त्याच्या घरी जाईपर्यंत ती तिथे जातेय, हे माहितंच नसतं, मात्र तिच्या घरचे हेच गृहित धरुन चाललेले असतात. तिचे वडिल त्याच्या घरच्यांना नारळीभात पुरेल का हे विचारतात, तेंव्हाही जाह्नवी त्यांचा गैरसमज दूर करत नाहीच.. इथे कथानक फारच गंडलंय.. हा प्रसंग पाहतांना बरंच खटकत होतं..
दुसरी खुपदा खटकणारी गोष्ट म्हणजे सायली श्री च्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा जाते, तेंव्हापासूनच त्याच्याशी वाकड्यातच शिरलेली असते. तिला जर त्याच्याशी लग्न करायचं असतं, तर ती त्याच्याशी कधीच नीट बोलतांना का दाखवलेली नाही? श्री पण तिला तू कोणाच्या संदर्भाने, ओळखीने मला भेटायला आलीस? तुझं माझ्या ऑफिसात काय काम आहे? तू मला कसे काय ओळखतेस, हे अनोळखी लोकांना सहाजिकच विचारायचे प्रश्न तिला कधीही विचारत नाही. एकाही भागात त्याने ते विचारलेले नाहीत.
तिसरी खटकणारी गोष्ट म्हणजे जान्हवी घरी येते, तेंव्हा आई आज्जी श्री ला सायलीविषयी विचारते, तेंव्हा सगळ्यात आधी श्री ला धक्का बसलेला दाखवायला हवा होता, की आज्जी तिला कशी काय ओळखते? आणि मग त्याची ट्युब पेटायला हवी होती, की अरे, ही मुलगी आपल्या घरच्यांच्या सांगण्यावरुनच आपल्याला इतके दिवस भेटत होती तर.. असा संवाद तिथे असायला हवा होता.
शिवाय जाह्नवीचं लग्न झालेलं आहे, असं आज्जी म्हणते, तेंव्हाच त्याने म्हणायला हवं होतं.. अच्छा! तर तुम्हाला अनिल आपटे प्रकरणाविषयी कुठूनतरी चुकीची माहिती मिळाली आहे. मी जाह्नवीच्या घरीही जाऊन आलोय आणि त्या म्हातार्या माणसाशी तिचं लग्न ठरता ठरता मोडलेलं आहे, पण ती ती सगळी स्टोरी मी तुला नंतर सांगतो..
एकूणच परवाचा- महत्त्वाचा भाग, ज्याची इतकी हवा झाली, तो फारच गंडलेला निघाला. भरपूरच लूपहोल्स होती त्यात.. अपेक्षाभंग झाला अगदीच..
सानी + १. हल्ली कथा बरीच गंडत
सानी + १. हल्ली कथा बरीच गंडत चालली आहे या मालिकेची.
पण तरीही एखादाही भाग चुकवावासा वाटत नाही कारण दोन्ही प्रमुख अभिनेत्यांचा सुंदर अभिनय आणि त्यांचे पडद्यावरचे रसायनशास्त्र!
सानी अगदी अगदी. रागच आला मला
सानी अगदी अगदी. रागच आला मला तर. तोंड उघडुन स्पष्ट काय ते बोलत का नाहीत.
सानी एकदम पटेश. मला हेच सगळ
सानी एकदम पटेश. मला हेच सगळ वाटत पण लिहायचा कंटाळा येतो
मला हेच सगळ वाटत पण लिहायचा
मला हेच सगळ वाटत पण लिहायचा कंटाळा येतो>>> +1 ....
सानी, टु गुड. हे सगळे
सानी, टु गुड. हे सगळे पर्फेक्ट खटकणारे पॉइंट्स मांडलेस,
सानी बरोबर आहे, मुळात
सानी बरोबर आहे, मुळात गोखलेंच्या घरातली माणसे एकमेकांशी कोड्यातच बोलतात, ते खटकते, कोणीही स्पष्टपणे एकमेकांशी बोलत नाही, जान्हवीकडेपण तेच चाललंय, नारळी-भाताचा भाग खरंच गंडलाय.
एकमेकांशी सविस्तर बोलायचे नाही हा पण केलेला दिसतोय, लग्न त्यामुळे लांबणार असे वाटते.
लग्नानंतर सिरीयल वाढवायला खूप वाव आहे, सहा जणींच्या वेगवेगळ्या कथा आणि तो गुंता जान्हवी सोडवेल आणि तिचे कुटुंबातील महत्व वाढेल असे दाखवणार असे वाटते म्हणून निदान आधीतरी जास्त न ताणता आता लग्न दाखवा दोघांचे, त्यासाठी किती वेळ घालवतात, बरेच एपिसोड फुकट गेलेत.
कधी कधी फारच ताणतात. इतके
कधी कधी फारच ताणतात.
इतके मोठे उद्योगधंदे करणारी माणसं कम्युनिकेशनात इतकी शून्य दाखवताना शिरेल वाल्यांना जरा तरी काहीतरी वाटायला हवं.
वर चर्चिला गेलेला सारा उणेपणा
वर चर्चिला गेलेला सारा उणेपणा लक्षात घेऊन....मान्य करूनही....असेच म्हणावे लागेल की तरीही मालिकेने आपला प्रेक्षकवर्ग आजही गमावलेला नाही. त्याला कारण म्हणजे नायक आणि नायिकेविषयी मनी निर्माण झालेली आस्था. दोघांचे चांगले तर होणारच यात संदेह नाही, फक्त आणखीन् किती ट्विस्ट्सना त्याना भेदावे लागेल हेच पाहणे आले.
आजचा एपिसोड : २३ सप्टेम्बर.....सार
~ आज एकट्या शरयूचा अपवाद वगळता बाकीच्या पाचही सासवांनी "जान्हवी म्हणजे गोखले घराण्यावर आलेले गंडांतर...' असाच आविर्भाव घेतल्याचे दाखविले. श्री आजीच्या खोलीतून खाली येतो आणि जान्हवीला हॉलमध्ये एकटी बसलेले पाहून काहीसा संतापतो....तर किचनमध्ये शरयू तिच्यासाठी चहा करत असलेले पाहतो....निदान त्यामुळे तो काहीसा शांत होतो.... "आजीला बीपीचा त्रास होत होता आणि तिने गोळ्या घेतल्या नाहीत, त्या देण्यासाठी मी वर गेलो होतो..." अशी सारवासारव तो जान्हवीपुढे करतो. जान्हवी ते स्वीकारते. श्री तिथून आईच्या खोलीत जाऊन तिथे जमा असलेल्या चौघींना त्यांच्या तशा वर्तनाबाबत बोल लावतो...जवळपास चिडतोच. मग त्याही आपली चूक झाली असे समजून हॉलमध्ये परततात.
जान्हवी आपल्या घरी जाण्याबाबत श्री ची परवानगी मागते....आजी तिला जेवून जा असे म्हणतात. पण अर्थातच जान्हवीला तिथे थांबावे अस वाटत नाही, इतका तिचा अपमान झालेला असतो. शेवटी श्री त्या सार्यांची जान्हवीशी ओळख करून देतो....
इथे मात्र दिग्दर्शकाने अगदीच बालिशपण दाखविला आहे....म्हणजे जान्हवी नमस्कार करायला खाली वाकली की ती स्त्री "मी आता काय आशीर्वाद देवू ?" अशी विचारणा हॉलमध्ये उभ्या असलेल्या आजींला विचारते....मग आजीने तिला काहीतरी सांगायचे....जड मनाने त्या स्त्रीने काहीतरी पुटपुटायचे... साराच पोरखेळ होता....त्यातल्यात्यात बेबीआत्याने जान्हवीचा नमस्कार स्वीकारला नाही अन् तो का स्वीकारला नाही याचे कारणही दिले. केवळ शरयू हिनेच जान्हवीचे मनापासून स्वागत केले आणि तिला जवळ घेऊन हसतमुखाने आशीर्वादही दिले.
जान्हवी व श्री बाहेर पडले आहेत आणि इकडे आईआजीने जान्हवीने आणलेला डबा उघडला...तर त्यात नारळीभात पाहून आपल्यावर आकाश कोसळले असा आविर्भाव केला आणि आता "हे लग्न कसे होणार नाही, ही योजना आपल्याला आखली पाहिजे....' असा निर्णय घेतला.
....म्हणजे परत सारे निसरडे होऊन जाणार हे तर नक्कीच.
मला पण पाच बायका कणाहीन
मला पण पाच बायका कणाहीन वाटल्या. आज्जेसासू फेरॉशिअस. सासू मुळमुळीत. मोठी आई दु:खी. बेबीआत्या उगीच खुन्नस देउन. लीना भागवत मंजे अगदीच पात्र. अत्यानंद बाई एकू न्ण गॉन केस. बेबी आत्याला तिथ ल्या तिथे उत्तर देउन फाट्यावर मारायला हवे होते. पण सगळा गोड प्रकार नारळी भात मंजे कैतरी विषारी अणुबाँब असल्यासारख्या सर्व बायका बघत होत्या. श्रीची कीव येऊन त्याच्याशी लग्न करणार ही.
अश्विनीमामी +१. आपल्या हिंदू
अश्विनीमामी +१.
आपल्या हिंदू संस्कृतीत हे वारंवार म्हटले गेले आहे, लिहिलेही आहे की घरी आलेल्या पाहुण्याचे अगदी साग्रसंगीत आदरातिथ्य नाही केले तरी चालेल, पण किमानपक्षी तिच्याशी सौम्यपणे वागून तिला योग्य तो दर्जा तरी द्यावा. ते राहिले बाजूलाच, उलट जान्हवी खाली वाकून नमस्कार करीत आहे आणि ह्या साळकाया आज्जीच्या चेहर्याकडे पाहतात.....आजी तरी निदान काहीशी खूण करून "द्या काहीतरी आशीर्वाद' असे म्हणेल असे वाटले....तर त्याही "कधी संपतो हा प्रकार आणि कधी जाते ही घराबाहेर" असाच पवित्रा घेऊन पिंपळाचे झाड होऊन उभ्या.
छे....हे वागणे अगदी हद्द सोडून होते.
आजचा एपीसोड बघितला नसता तरी
आजचा एपीसोड बघितला नसता तरी चालल असत !
अदिति....अगदी मनातील लिहिले
अदिति....अगदी मनातील लिहिले आहे तुम्ही. काल तर माझा मलाच संताप येत होता की एवढ्या मोठ्या औद्योगिक घराण्यातील ज्याना सर्वार्थाने सीनिअर म्हटले जाईल अशा वयातील संसारी स्त्रिया ह्या....आणि घरी आलेल्या व होऊ घातलेल्या सूनेला आशीर्वाद काय देवू असा मूर्खपणाची हद्द ओलांडणारा प्रश्न आजीला विचारीत बसतात....आणि तेही मोठ्याने....काय वाटेल त्या सूनेला ? याचा जराही विचार नाही.
बरे....या सहाही बायकांचे संसार तसे उद्ध्वस्तच झालेले आहेत....एकीचा नवरा घर सोडून गेलाय, दुसरीचा अपघातात मुलासह परलोकवासी झाला आहे...तिसरीच्या नवर्याला हाकलले गेले आहे....चौथी स्वतः नवर्याला त्यागून माहेरी आली आहे,...पाचवी पन्नाशीला आली असून महाराजांच्या नादी लागली आहे....तर सहावी आजी....हा सारा गाडा चालविते.....आणि या सार्यांची भिस्त आहे ती श्रीरंग गोखले या युवकावर....मग किमानपक्षी ह्या श्री साठी तर त्या मुलीशी निदान तोंडदेखले तरी यानी नीट वागविल्याचे दाखविणे फार गरजेचे होते..... उलट त्या बेबीआत्याची नमस्कारावेळेची मग्रुरी संतापजनकच होती.
असो....मालिका बरबाद होत जातात त्या अशा बालिश हाताळणीमुळेच.
जान्हवी ची आधी एक सीरियल
जान्हवी ची आधी एक सीरियल यायची स्टार प्रवाह वर मला वाटतंय....तिचे नाव होते ... ' लेक लाडकी या घरची '
आता या सिरीयल च नाव आहे ' होणार सुन मी या घरची '
मला लीना भागवत आवडते
मला लीना भागवत आवडते
कालचा भाग सुपरफ्लॉप. श्री
कालचा भाग सुपरफ्लॉप. श्री रागावला म्हणून जान्हवीचा(कथित) पूर्वेतिहास लगेच विसरल्या का त्या आया? अगदी जेवून जायचा आग्रह करायचा? ती पाया पडत असतानाच काय आशीर्वाद देऊ असं उघडपणे विचारायचं?(नर्मदा आणि इंदू - श्रीची आई आणि मोठी आई या गरीब गायीपेक्षा शेळी वाटल्या)
श्री आपल्याला घरी घेऊन जाणार आहे हे जान्हवीला का कळू नये? कसलेही स्पष्ट नाव घ्यायचे नाही, ही थीम घराला देऊळ म्हणताना फारच ताणलीय.
त्यातल्या त्यात मावशी व शरयूच्या(लीना भागवत) प्रतिक्रिया ठीक होत्या.
त्यांच्या फेसबूक पेजवर
त्यांच्या फेसबूक पेजवर टाकायला हवे.
अश्विनी.... तो 'फेसबुक'
अश्विनी....
तो 'फेसबुक' प्रकार मला तरी सपशेल ढोंग वाटतोय..... आहे उगाच सोय म्हणून मालिकाची वाटचाल दाखविण्यासाठी त्या जोडीचे भरमसाठ फोटोज् टाकून फेसबुक पेज तयार केले आहे. तिथे अक्षरशः हजारोंच्या संख्येने नोट्स येत असल्याचे दिसत्ये, मात्र एकाही चौकशीला कुणीही जबाबदार व्यक्तीने [पडद्यावरील वा पडद्यामागील] साधी पोचही दिल्याचे दिसत नाही. कित्येक प्रेक्षकांनी आता चिडून अशीही प्रतिक्रिया दिली आहे की..."हे फेसबुक हजेरी प्रकरण म्हणजे खोटाच प्रकार असून कलाकारांपैकी यातील नोंदी कधी वाचत नाहीत असेच दिसत्ये..."
त्यामुळे "होसुमी..." च्या चर्चेसाठी फेसबुक....नो कॉन्क्रिट ऑप्शन.
या सिरीयल मधल्या त्या
या सिरीयल मधल्या त्या सासवांची नावे नद्यांची आहेत का? भागीरथी, नर्मदा, शरयू.. बाकीच्यांची नावे माहीत नाहीत. बेबी हे टोपणनाव असावे. खरे नाव माहित नाही.
हिरोईनचे नाव पण जान्हवी(गंगा) आहे.
जान्हवी म्हणजे तर सीता ना?
जान्हवी म्हणजे तर सीता ना?
रिये जानकी म्ह्णजे सीता.
रिये जानकी म्ह्णजे सीता.
बेबी कसली बेबा आहे तो. फारच
बेबी कसली बेबा आहे तो. फारच इरिटेटिंग पात्र आहे ते.
लीना काकू खूप वेळा बालिश वागतात. आजी ओरडल्या की शाळ्करी मुलीचा आव आणतात.
डोक्यात जातं ते.
दक्षुतै आणि जान्हवी म्हणजे
दक्षुतै आणि जान्हवी म्हणजे गंगाच का?
अर्र्र्र्र्र्र्र्र मी उगाच इतके दिवस जान्हवी म्हणजे सीता समजत होते
लीना काकू खूप वेळा बालिश
लीना काकू खूप वेळा बालिश वागतात. आजी ओरडल्या की शाळ्करी मुलीचा आव आणतात.
डोक्यात जातं ते.>>>>>+१ पण तीच्या पेक्षा बेबी बरीये. रोखठोक.
अर्र्र्र्र्र्र्र्र मी उगाच इतके दिवस जान्हवी म्हणजे सीता समजत होते >>>>>>>>> जाउदे बाळ आता ठीक समज हं
मंगलाष्टकांच्या टेक्स्ट
मंगलाष्टकांच्या टेक्स्ट मध्ये ह्या नद्यांची नावे आहेत जान्हवी पुण्य तोयः फक्त आठवले.
हां मी अजुन मंगलाष्टका न
हां मी अजुन मंगलाष्टका न ऐकल्याने मला माहित नसेल
स्मिते
मला नाही आवडत ते लीनाच कॅरेक्टर... मेंटल वाटते ती
Ya serial che episodes online
Ya serial che episodes online baghanyachi link dya na kunitari magacha akkha tahavada miss zaliye
Ya serial che episodes online
Ya serial che episodes online baghanyachi link dya na kunitari magacha akkha tahavada miss zaliye
धानी.... http://www.dailymoti
धानी....
http://www.dailymotion.com/video/x14dmyb_honar-soon-me-hya-gharchi-7th-s...
या लिंकवर तुम्हाला मालिकेचे भाग पाहायला मिळतील. अर्थात पहिल्या महिन्यातील [जुलै] भाग आता गायब झाले आहेत.
Pages