Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<मग आई आज्जीला माहीत आहे का,
<मग आई आज्जीला माहीत आहे का, कि श्री ने मी अकौंटट आहे अस जान्हवीला सांगितलेल.>
सांगेल हं लवकरच. बघत रहा.
थोडक्यात काय, तर आपल्याला
थोडक्यात काय, तर आपल्याला आवडणारी मालिका असली, की बचाव करायचा. नाही आवडली की हल्लाबोल. ह्याला सिलेक्टिव्ह म्हणा किंवा शॉर्ट किंवा काहीही.
त्या दोघांच्या पहिल्या भेटीत
त्या दोघांच्या पहिल्या भेटीत काय झाले यात त्याचेही उत्तर दिले गेले असेल. मला तो प्रसंग आठवत नाही. >>>>>>> श्री ने सायलीला भाव दिला नाही आणि तो तिला ऑफीसमध्ये बसवून मिटिंगला गेला. त्यामुळे सायलीला कळून चुकल कि इधर अपनी दाल नही गलनेवाली. सो तिने सहा जणींना सांगितलेल कि आमच्याबाबत श्री शी काही बोलू नका.
सांगेल हं लवकरच. बघत
सांगेल हं लवकरच. बघत रहा.
>>>>>> अहो ते तर होणारच
पण आइआज्जींना आपटेनी सांगितल कि जान्हवी तुमच्या अकौंटटबरोबर फिरते त्याच काय झाल पुढे ??
<थोडक्यात काय, तर आपल्याला
<थोडक्यात काय, तर आपल्याला आवडणारी मालिका असली, की बचाव करायचा. नाही आवडली की हल्लाबोल.>
ठरवून आवडून किंवा नावडून घेता येत नाही. यात बचाव कसला आलाय? इतरांना खटकलेल्या गोष्टी मला ज्या कारणांसाठी खटकत नाहीत ती कारणे सांगितली. पुढे हीच मालिका नाही आवडली तर हल्लाबोल करेनच. बघत रहा
दुसर्यांनीही त्यांना एखादी मालिका का आवडते याची कारणे दिली, तर माझी काहीही हरकत नाही. पण मालिका आवडून घ्याच किंवा आम्हाला आवडतेय हो, प्लीज टीका करू नका हे कशाला? ही मालिका मला आवडतेय, मग इतरांनाच का आवडत नाही असे प्रश्न मला पडत नाहीत.
<पण आइआज्जींना आपटेनी सांगितल
<पण आइआज्जींना आपटेनी सांगितल कि जान्हवी तुमच्या अकौंटटबरोबर फिरते त्याच काय झाल पुढे ?? >
याबद्दल श्रीशी बोलायला हवं असं आईआजी म्हणाल्या. पण बोलायला मुहूर्त अर्थातच मिळाला नाही.
मी कुठे म्हटले ठरवून आवडून
मी कुठे म्हटले ठरवून आवडून घेतली? उलट आवडली असे ठरले की मगच आपल्याला ती का आवडते ते शोधले असेल की तुम्ही. मग त्याला दुसर्यांनी नावे ठेवली की आपण काय म्हणायचे हेदेखील येतेच. तुम्ही दुसर्यांना ही आवडून घ्याच असे म्हटलेले नाही हे मला माहीत आहे. पण दिग्दर्शकाचा हेतू वगैरे आपल्याला आवडलेल्या मालिकेतच दिसतो हे सिलेक्टिव्ह आहे असे म्हणू फार तर. खटकणारे प्रश्न पडतच नाहीत किंवा पडले तरी चांगल्या बाबींपुढे मग ते प्रसंग आठवत नाहीत. त्यात चुकीचे काही असे आहे असेही मी म्हणत नाही. पण हे असे होताना दिसते एवढेच काय ते मत.
अॅग्रीड. खटकणार्या आणि
अॅग्रीड. खटकणार्या आणि आवडणार्या गोष्टींपैकी कोणते पारडे जड आहे, हे पाहूनच दुसरे पारडे दृष्टीआड केले जाते.
आईआजी आणि तिच्या तिन्ही
आईआजी आणि तिच्या तिन्ही सुनांना नद्यांची नावे आहेत. > आणि होणार्या नातसुनेला देखील. (?)
याबद्दल श्रीशी बोलायला हवं
याबद्दल श्रीशी बोलायला हवं असं आईआजी म्हणाल्या. पण बोलायला मुहूर्त अर्थातच मिळाला नाही.
>>>>>>> ओके.
हो पण बांगड्यांचा घोळ, अशक्त
हो पण बांगड्यांचा घोळ, अशक्त कथानक, एपिसोडमध्ये पाणी घालणे वगैरे पारड्यामध्ये टाकले होते का तुम्ही? प्रतिसादात दिसत नाहिये.
ते इतरांच्या प्रतिसादांत आले
ते इतरांच्या प्रतिसादांत आले असेलच ना. मी त्याचे समर्थन केल्याचे दिसतेय का?
कथानक नसण्याचपेक्षा किमान अशक्त कथानक चालेल ना? (आतापर्यंत दिसलेले कथानक मला तरी अशक्त वाटले नाही. पटकथेत एक दोन कच्चे दुवे आहेत, पण फारच कमी)
दुसर्या जड पारड्यात टाकायला : बघायला आलेल्या मुलांना जान्हवीने लग्नानंतर मी माझ्या घरची आर्थिक जबाबदारी उचलत राहणार असे सांगणे.
बरं. आज मालिकेचा एपिसोड नसेल, तर इथलाही एपिसोड माझ्या बाजूने आवरता घेतोय.
वाद आणि प्रतिवाद होत राहाणे
वाद आणि प्रतिवाद होत राहाणे ही सीरिअल्सच्या दृष्टीने हिताची गोष्ट असते असे खुद्द निर्माते-दिग्दर्शकदेखील मानत असतील [हल्लीच्या नेटजगतात ही मंडळी मतांचा कानोसा नक्कीच घेत असणार] त्यामुळे वरील चर्चा चांगलीच उद्भोधक वाटेल अशीच आहे.
गोखले उद्योगगृहाची उभारणी करण्यात भागीरथीबाईंचा वाटा मोठा असल्याने त्यांचा प्रभाव घरातील [श्री सह] समस्त मंडळीवर असणे साहजिकच आहे. प्रत्येक सूनबाईंच्या जीवनात तसेच मुलीच्याही {बेबी} प्रापंचिक जीवनात व्यक्तिगत पातळीवर नैराश्य आल्याने त्या त्यातल्यात्यात एकत्रित पातळीवर आनंदी राहाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. श्री चे वडील त्याना सोडून विदेशी गेले आहेत....दुसर्या सुनेचा नवरा व मुलगा अपघातात दगावले आहेत....तिसर्या सुनेच्या नवर्याला घरातून हाकलले गेले आहे....तर बेबी स्वतःच आपल्या नवर्याला सोडून आईकडे कायमची आली आहे....आणखीन् एक मुलीने अत्यानंद महाराजांच्या चरणी आपले आयुष्य झोकून दिलेली आहे....या सर्व गदारोळात धडावर डोके शाबूत ठेवलेला मुलगा म्हणजे श्री...आणि या श्री वर आपली भिस्त ठेवणारी आजी....अशावेळी हा श्री एका अशा मुलीच्या प्रेमात आहे की जिच्याविषयी या सहाही स्त्रियांच्या मनी प्रचंड गैरसमज [जो चुकीचाच आहे] उत्पन्न झालेला असल्याने तिच्यामुळे आपल्या श्री ची जीवननौका भरकाटून जायला नको अशीच सार्यांची भावना असणे आणि ती तशी दाखविणे उचितच आहे. केवळ शरयू हीच काही प्रमाणात जान्हवीच्या बाजूने दाखविली आहे, पण ती देखील "जान्हवी विवाहीत असूनही विबासं ठेवणारी मुलगी आहे' या बातमीवर नाही म्हटले तरी विश्वास ठेवणारी दाखविली असल्याने सार्याच बाजूने जान्हवीची कोंडी होत आहे.....त्यातच जान्हवीला अद्यापि हे माहीत नाही की अनिल आपटे या गोखले बंगल्यात येऊन तिच्याविषयी वादळ उठवून गेला आहे.
आता कस लागेल तो श्री च्या क्षमतेचा....कारण त्याला एकट्याला दोन्ही तळावरून या कठीण परिस्थितीशी सामना करायचा आहे. एकीकडे आईआजी + अन्य पाच स्त्रिया, तर दुसरीकडे जान्हवीला तिच्या प्रतिमेवर उमटलेल्या डागाविषयी सविस्तर सांगून लग्नाविषयीची धूळ पुसून टाकणे.
मंदार देवस्थळी हा सारा गडबडगुंडा कौशल्याने हाताळतील यात शंका नाही....फक्त विषय किती ताणायचे हे त्यांच्या व लेखिकेच्या हाती असल्याने आपण फक्त नियमितपणे जान्हवी व श्री साठी मालिका बघत राहायचे इतकेच....सध्यातरी अशी अवस्था आहे की एखाद्या एपिसोडविषयी संताप जरी मनी दाटला तरी मालिका पाहणेच अपरिहार्य झाले आहे.
अशोक पाटील
ए.ल.दु.गो. शतपटीने चांगली
ए.ल.दु.गो. शतपटीने चांगली होती >>>>>+११११११
(जरी शेवटी ती पाणीदार झाली तरी)!>>>>>पण खरतर ती मालिका शेवटाकडे आल्यावरच त्यांनी संपवली. फार लवकर संपवली.
फार लवकर संपवली. >>>>> इकडे
फार लवकर संपवली. >>>>> इकडे एका धाग्याची मर्यादा संपुन दुसरा उघडावा लागला
हल्लीच्या नेटजगतात ही मंडळी
हल्लीच्या नेटजगतात ही मंडळी मतांचा कानोसा नक्कीच घेत असणार]>>> I really hope so!
आपण ह्या मालिका का पाहतो? कारण त्यात काहीतरी नाट्य असतं. तुमच्या माझ्या घरातलं रोजचं जगणं दाखवू लागले तर कोण पाहील? ही मालिका चांगली आहे (म्हणूनच तर पाहिली जाते) पण त्यात नाट्य कमी पडतंय! एक अख्खा एपिसोड काय घडलं? काहीच नाही! आणि अजून मालिका नवी नवी आहे!
मला वाटतं की चांगल्या डेली सोप साठी multiple tracks असणं फार फायद्याचं असतं. म्हणजे ए.ल.दु.गो. मध्ये कुहू ची स्टोरी, आत्या आणि तिचा भूतपूर्व नवरा, मानव, सोन्या (!) आणि मुनमुन! किंवा असंभव मध्ये प्रियाची गोष्ट,सुनील बर्वे ची स्टोरी, मोठ्या भावाची स्टोरी वै. वै. ह्या मालिकेत तसं काहीच नाहीये! म्हणजे जर असं असतं की side by side जान्हवीचा भाऊ एक व्यवसाय सुरु करण्याच्या मागे आहे, अत्यानंद महाराजांच्या मठात त्या मावशीला कुणीतरी prospect भेटलाय, मोठ्या आईला आपल्या नवऱ्याच एक पत्र सापडतं.आत्याला तिच्या वैवाहिक आयुष्यातल्या गोष्टी आठवतात, वै. वै. (मला अतुल परचुरे ची स्टोरी पाहायला खूप आवडेल पण काही सुचत नाहीये!) मग एका एपिसोड मध्ये अवघडलेली जान्हवी, गैरसमज दूर होईल अशी वाक्य/प्रश्न टाळत चाललेला श्री आणि आई आजीचा वाद आणि उरलेल्या पाची आयांचे काळजीवाहू संवाद ह्याच्या मध्ये मध्ये side tracks मध्ये चालणाऱ्या गोष्टी दाखवून एपिसोड happening बनवता आला असता! आणि main track मध्ये काहीच घडलं नाही तरी प्रेक्षकांसाठी नवीन घडल्याचा भास निर्माण झाला असता!
इतके कसलेले कलाकार आहेत, नवीन असून छान काम करणारे हिरो हिरोईन आहेत आणि एक चांगला दिग्दर्शक (जो निर्माता देखील )आहे मग दोन महिन्यात मालिका अधिक interesting होण्याऐवजी bore का होते?
जिज्ञासा..... मतात फरक पडू
जिज्ञासा.....
मतात फरक पडू शकतो. मालिका पाहिल्या जातात त्यात नाट्य असते...असू शकते...म्हणूनही. म्हणजे परत आपण दिग्दर्शकाच्या हाती मालिका देऊन त्याला उमजेल, समजेल अशाच रितीने तो गाडी हाकणार असे म्हणत राहणार. मग त्याची ती कृती नाट्याच्या दृष्टीने कमी पडली तर आपणच मालिका रसभंग करीत आहे असा अर्थ काढणार. नाट्य वाढविण्यासाठी तुम्ही दिलेले ए.ल.दु.गो. चे उदाहरण नेमके आहे कारण त्यात झालेली पात्रांची भाऊगर्दी आणि प्रत्येकाची नस त्या पात्रांनी पकडली होती. 'होणार सून मी....' मध्ये तुम्ही व्याख्या केलेले नाट्य नसेलही कदाचित पण हे नक्की की मालिका आपली वाटत आहे त्याला कारण दिग्दर्शकाने केवळ दोनच पात्रावर आपले लक्ष केन्द्रीत केले आहे....त्या दोघांच्या सुखदु:खात आशानिराशेतच कथानक घुमते आहे... [ही बाब खुद्द दिग्दर्शक मंदार देवस्थळी यानीच झी मुलाखतीत सांगितली होती....]. आतापर्यंतचा कथानकाचा प्रवास पाहाता इथून पुढेही काही नाट्यपूर्ण घडेल याची शक्यता अंधूक वाटते, अन् जरी घडायचे असलेच तर जान्हवीने पुढाकार घेऊन आपल्या सासवांचे बिघडलेले संसार मार्गी लावण्यासाठी काही नामी शक्कला काढणे....हे होऊ शकते.
जान्हवीचे लग्न दाखविले तर आजीच्या धाकाने तिला माहेरची नाळ तोडावी लागेल, अन् तसे झाले तर मग धाकट्या भावाला व्यवसाय सुरू करून देणे, तसेच सासू नणंद आदींच्या सौख्यासाठी प्रयत्न करणे काहीसे जडच जाणार आहे. मात्र श्री तिला मनापासून साथ देईल आणि त्या दोघात कसलेही गैरसमज पसरणार नाहीत [जे अन्य मालिकातून दाखविले जाते].
बाकी जान्हवी व श्री चे काम करणारे तुलनेने नवे असूनही अभिनयामध्ये जी परिपक्वता दाखवित आहेत त्यामुळेच त्यांच्या प्रेमात तमाम प्रेक्षकवर्ग पडल्याचे चित्र दिसत आहे....अभिनयाचे महत्व यामुळेच जास्त ठसते.
शेवटी...मालिका बोअर न होता जास्त इंटरेस्टिंग होत आहे असे किमान मी तरी म्हणेन.
<आपण ह्या मालिका का पाहतो?
<आपण ह्या मालिका का पाहतो? कारण त्यात काहीतरी नाट्य असतं. तुमच्या माझ्या घरातलं रोजचं जगणं दाखवू लागले तर कोण पाहील? ही मालिका चांगली आहे >
इथेच अन्य मालिकांवरचेही बरेच धागे आहेत. त्य मालिकांत तुम्ही म्हणता ते नाट्य भरपूर असावे. पण तिथे बहुसंख्यांच्या नापसंतीचाच सूर उमटलाय. 'असं कुठे होतं का?' असेही प्रतिसाद आहेत. असो. पसंद अपनी अपनी.
<मालिका बोअर न होता जास्त इंटरेस्टिंग होत आहे असे किमान मी तरी म्हणेन>+१
त्या मालिकांत तुम्ही म्हणता
त्या मालिकांत तुम्ही म्हणता ते नाट्य भरपूर असावे.>> बाकीच्या सिरियल्स मी आता पाहत नाही. सुरुवातीला पाहात होते. पण त्यांत जे दाखवतात त्याला मी नाट्य न म्हणता अवास्तव आणि अतिरंजित चित्रीकरण म्हणीन. नाट्य म्हणजे अशक्य योगायोगांची मालिका नव्हे. नाट्य म्हणजे एक X factor! काहीतरी नाविन्य. नेहमीच्या घटनांना दिलेला असा twist जो पाहताना मजा वाटेल. May be I am not able to convey it right. असो.
ही सिरीयल interesting आहे पण predictable देखील आहे. अशावेळी उगीच ताणल्यासारखे सीन/एपिसोड आले की रसभंग होतो. दोन दिवस नाही पहिले तरी काही फरक पडत नाही (कारण कथानक पुढे सरकत नाही आणि सीन देखील predictable आहेत) असं झालं की हळूहळू दोनाचे चार दिवस होतात आणि मालिकेचा प्रेक्षकवर्ग दुरावतो. अजून असं झालेलं नाही या मालिकेत पण असं होईल की काय असं वाटायला लागलं आहे. तसं होऊ नये हीच इच्छा आहे म्हणून जे वाटते ते लिहिले. एकतरी बरी मराठी मालिका असावी जी बघून मनोरंजन होईल!
आजी आणि नातू एकमेकांशी
आजी आणि नातू एकमेकांशी कोड्यात का बोलतात, आजी पण नाव घेऊन सांगत नाही कि अमुक माणूस आपल्याकडे आला होता आणि माझ्या बायकोशी तुमच्या accountantचे अफेअर आहे असे सांगत होता त्याचे नाव अनिल आपटे, हे आजीने सांगितले असते तर सर्व सोक्ष-मोक्ष झाला असता.
श्रीपण सांगत नाही कि जान्हवीचे लग्न ठरले होते पण झाले नाही आणि कारण सांगितले असते तर मालिका जरा लवकर पुढे गेली असती आता सर्व निस्तरायला किती एपिसोड घेणार?
जिज्ञासा म्हणते ते बरोबर आहे
जिज्ञासा म्हणते ते बरोबर आहे हि मालिका दोन दिवस नाही पहिली तरी फरक पडत नाही, जास्त slow होतेय असे वाटतेय.
जिज्ञासा +१ ... एकेका भागात
जिज्ञासा +१ ... एकेका भागात कंटेंट फार कमी आहे, प्रेडिक्टेबल आहे. परंतु प्रेक्षकवर्ग असा दुरावणार नाही ... एलदुगो चे ही शेवटी हेच होते. एकदा उत्सुकता निर्माण झाली की स्वतःहून कार्यक्रम बघणे थांबवणारे फार कमी लोक असतात.
रच्याकने, श्री चे काम करणारा अॅक्टर सुबोध भावेची (अजाणतेपणी?) नक्कल करतो असे कुणाला वाटते काय? दाढीमधला लूक आणि चेहर्यावरचे भाव तसेच वाटतात.
कालच्या भागात जान्हवी ला
कालच्या भागात जान्हवी ला माहिती नसते ना की श्री तिला त्याच्या घरी घेउन जाणार आहे.तिला हा धक्काच असतो ना? मग ती एकटीच श्रीच्या हॉल मधे बसलेलि असताना पिंट्या आणि आई तिला फोन करुन घरचे कसे आहेत, घर मोठे आहे ना वगैरे प्रशन कसे विचारतात? त्यांना कसे कळले ती श्री च्या घरि आहे ते? का मी मध्ले काही सीन्स miss वगैरे केले?
<<त्यांना कसे कळले ती श्री
<<त्यांना कसे कळले ती श्री च्या घरि आहे ते? >>
तो सशक्त कथानकाचाच एक अशक्त भाग समजून सोडून ध्यावा; जसा पिढीजात बांगड्यांच्या बाबतीतला हलगर्जीपणा आपण दुर्लक्षीत केला तसा…
खालील फोटो हा सब टिव्ही वरील
खालील फोटो हा सब टिव्ही वरील 'तारक मेहता का उलटा चश्मा' मधील आहे. त्यात अंजली मेहताने घातलेला कॉश्च्यूम आणि जनव्हीचा कॉश्च्यूम सारखाच आहे ना.
हिंदीतून वापरलेले (तुडवलेले)
हिंदीतून वापरलेले (तुडवलेले) कपडे मराठी कपडेपटात येतात असे माझ्या एका ह्याच क्षेत्रात काम करणार्या मैत्रीणीकडून समजले. मराठी सिरेलीतल्या लग्नाकर्यातल्या साड्या व पुरुषांच्या शेरवान्या पण हिंदी सिरेलीत आपण पहिलेल्या असतात. मराठी सिरिअलवाल्यांचा कपडेपट गरीब असतो म्हणे.
१९ तारखेच्या भागात दाखविले
१९ तारखेच्या भागात दाखविले गेले की.... श्री ला भेटायला निघालेली जान्हवी नवरीसारखी नटलेली पाहून तिची आई दृष्ट काढते तर वडील तिच्या हातातील जेवणाचा डबा पाहून विचारतात, "नारळीभात सर्वांना पुरेल इतका घेतला आहेस ना ?" त्याला जान्हवी होकारार्थी उत्तर देते. शिवाय आई 'तिथे गेल्यावर मला फोनही कर" अशीही सूचना करते.
यावरून माहेरच्या मंडळींना जान्हवी श्री च्या बंगल्यावर गेली आहे हे माहीत असते असे अनुमान काढायला हरकत नाही.... वेळ झाला असल्याने त्यानी फोन करून मुलीची चौकशी करणे हेदेखील साहजिकच.
नाही अशोक ती त्याच्याबरोबर
नाही अशोक ती त्याच्याबरोबर देवळात जाणार असते. आणि घरचे लोक उशीर झाला म्हणून फोन करत नाहीत तर काय झाले, त्याच्या घरचे लोक कसे आहेत हे विचारायल फोन करतात.
रच्याकने, श्री चे काम करणारा
रच्याकने, श्री चे काम करणारा अॅक्टर सुबोध भावेची (अजाणतेपणी?) नक्कल करतो असे कुणाला वाटते काय? दाढीमधला लूक आणि चेहर्यावरचे भाव तसेच वाटतात.>>>> म्हणूनच मला तो आवडतो ( सुबोध भावे मला खुप आवडतो
नताशा.... आय थिंक देअर इज अ
नताशा.... आय थिंक देअर इज अ पॉईन्ट इन यूवर से. मी त्या दिवसाच्या एपिसोडमधील संवादाच्या आधारे तसे अनुमान काढले.....विशेषत: वडील "नारळीभात सर्वांना पुरेल इतका घेतलास ना ?" हा प्रश्न विचारतात म्हणून.
बाकी माहेरच्या लोकांना ती नेमकी आता कुठे आहे याची उत्सुकता लागली असणार हे तर नैसर्गिकच आहे.
Pages