मायबोली दिवाळी अंक २०१३ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. अंकासाठी साधारण दिड-दोन महीने आठवड्यातले काही तास इतका वेळ द्यावा लागेल.
दिवाळी अंकात काम करणार्या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.
तसेच संपादक मंडळात सहभागी झाल्यावर सगळ्या संपादकांनी इथे नियमित हजेरी लावणे (काही कारणास्तव गैरहजर रहाणार असल्यास मुख्य संपादकांना तसे आधी कळवणे), चर्चांमध्ये सक्रीय सहभागी होणे, अधुन मधुन होणार्या स्काइप मिटींगांना हजेरी लावणे, मुख्य संपादकांनी दिलेल्या जबाबदार्या वेळेवर पार पाडणे अपेक्षित आहे.
दिवाळी अंकासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत लागते, खालील पैकी कुठल्या विभागात आपल्याला काम करायला आवडेल ते कळवा. प्रत्येक विभागात काय काम करणे अपेक्षित आहे हे थोडक्यात दिले आहे.
१. दिवाळी अंक संपादन
दिवाळी अंकासाठी एखादी संकल्पना, मुखपृष्ठ निवडण्यापासून ते आलेल्या साहित्यातून अंकासाठी योग्य साहित्य निवडणे, गरज पडेल तसे त्यावर संस्कार करणे, तसेच इतर टीम्स (रेखाटन, सजावट, मुद्रितशोधन, टेम्प्लेट इ.) सोबत लागेल तसे काम करुन शेवटी दिवाळी अंक पूर्ण करणे व वेळेत प्रकाशित करणे.
२. दिवाळी अंक रेखाटन
दिवाळी अंकासाठी निवड केलेल्या साहित्याला साजेशी रेखाचित्रे (वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून) काढणे.
३. दिवाळी अंक साचा (Template)
One should have experience in designing website templates/themes in Drupal. Good graphic skills are must.
४.दिवाळी अंक सजावट (Page layout)
Webpage design and page layout skills using HTML and good graphic skills are necessary. Page layout includes color scheme, page making, fonts, presentation, background images for diwali ank template.
Page layout team and template team would be working together.
५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)
दिवाळी अंकासाठी निवड केलेल्या साहित्याचे मुद्रितशोधन वेळेत करून संपादक मंडळाकडे सोपवणे.
६. दृक श्राव्य विभाग (Audio/Video editing)
Improving clarity of the audio recordings through reducing noise and other techniques, editing videos to remove redundant content.
संपादक मंडळात समावेश केलेल्या सर्व मायबोलीकरांना उपक्रमाच्या कालावधीत आपली खरी नावे स्वतःच्या मायबोलीच्या प्रोफाईल मधे लिहीणे तसेच आपला संपर्क क्रमांक प्रशासनाला कळवणे बंधनकारक आहे.
मंजूडी आणि टीम, मनःपूर्वक
मंजूडी आणि टीम, मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
संपादक मंडळाचं अभिनंदन आणि
संपादक मंडळाचं अभिनंदन आणि शुभेच्छा! आयला माझा २०१२ चा अंक वाचून झाला नाही आजून! तर एव्हढ्यात या वर्षीचा येऊ घातला पण! अनुशेष भरून काढतोच आता.
गा.पै.
संपादकमंडळाचं अभिनंदन! रूनी,
संपादकमंडळाचं अभिनंदन!
रूनी, 'संपादकमंडळ' वरच्या लेखात नमूद कर ना.
अरे वा! आलं का मंडळ? छान,
अरे वा! आलं का मंडळ? छान, छान.
सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा.
गजानन +१
दिवाळी अंकासाठी साहित्य
दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवायचे असल्यास कोणत्या ईमेल आयडी वर पाठवायचे?
निमिष, संपादक मंडळ लवकरच
निमिष,
संपादक मंडळ लवकरच त्याबद्दल घोषणा करतील.
अरे वा, संपादक मंडळाचे
अरे वा, संपादक मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा
संपादक मंडळाचे अभिनंदन आणि
संपादक मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा...
काही मदत लागली तर जरूर कळवा..(लेख वगैरे लिहायला सांगितल्यास मदत शक्य नाही, बाकी सटरफटर सांगा) नक्की प्रयत्न करु...
अरे वा! दणदणीत टीम! संपादक
अरे वा! दणदणीत टीम! संपादक मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा !!! मस्त होऊन जाऊद्या अंक
लेख वगैरे लिहायला सांगितल्यास
लेख वगैरे लिहायला सांगितल्यास मदत शक्य नाही >>>
'बाकी'ला सटरफटर म्हणू नकोस रे, ते देखील लेखनाइतकंच महत्त्वाचं !!
Pages