Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अशोककाका, धन्य'वादचवाद...
अशोककाका, धन्य'वादचवाद...
काही भाग बघितले त्या डेलीमोशनवर.
पण इथे येऊन तुम्ही लिहिलेला अपडेट वाचणे मस्टच आहे... मस्तच आहे.
शशांकचा अभिनय अधिक सहज आहे असं माझं घट्टं मत झालय.
दाद.... "डेली मोशन" ही साईट
दाद....
"डेली मोशन" ही साईट तशी चांगलीच आहे; पण माझ्याकडे नेटच्या ज्या स्पीडने तिची कार्यवाही होणे अपेक्षित आहे तितकी होत नाही असे दिसत्ये, म्हणून मग मी नाईलाजाने का होईना प्रत्यक्ष झी मराठीवर सोईच्या वेळेला जेव्हा प्रसारित होते त्यावेळी जरूर पाहतो. अपडेटही रात्री ८ [भा.प्र.वे.] चा कार्यक्रम पाहिल्यावरच देणे सोपे पडते.
बाकी शशांकच्या अभिनयाबद्दल तुम्ही व्यक्त केलेल्या मताशी सहमत आहेच आहे. कदाचित ही पहिलीच मालिका अशी आहे [मी ही एकच पाहतोय....] की जिथे नायक आणि नायिका दोघेही अतिशय संतुलित आणि उजव्या रंगाचा अभिनय करताना दिसतात. प्रेक्षक दोघांच्याही प्रेमात पडले आहेत ही एक आगळीच बाब.
मामा ओ मामा, कितीवेळा थँक्यू
मामा ओ मामा, कितीवेळा थँक्यू म्हणू!
जिथे नायक आणि नायिका दोघेही
जिथे नायक आणि नायिका दोघेही अतिशय संतुलित आणि उजव्या रंगाचा अभिनय करताना दिसतात. << हो हो
जिथे नायक आणि नायिका दोघेही
जिथे नायक आणि नायिका दोघेही अतिशय संतुलित आणि उजव्या रंगाचा अभिनय करताना दिसतात. << हो हो>>>=१००००००
अशोक मामांना ते म्हणतील तितके
अशोक मामांना ते म्हणतील तितके % अनुमोदन.... बाकीच्या मालिकेतल्या या दोघांच्या वयाच्या लोकांनी अभिनय म्हणजे काय हे तरी कमीत कमी जाणुन घ्याव या दोघांकडुन
मामा ओ मामा, कितीवेळा थँक्यू
मामा ओ मामा, कितीवेळा थँक्यू म्हणू!>>>>>>>> +११११११११
मला तर आता फक्त अप्डेट वाचला तरी पुरे असं वाटतय, मालिका नाही बघायला मिळाली तरी चालेल
मंजूडी..... अगं खरं तर
मंजूडी..... अगं खरं तर भाच्यांनी मामाला कधीच थॅन्कू म्हणायचे नसते....तो तर हक्काचाच असतो. तुला आवडले ना ? मग बस्स....उतना काफी है |
अदिति, परन, मुग्धा आणी चिमुरी.... तुम्हाला मात्र खास धन्यवाद. मी घाबरत घाबरतच श्री आणि जान्हवीच्या अभिनयाबद्दल लिहिले.....कारण मला वाटले इथल्या किती सदस्यांना ते आवडतात ऑर अदरवाईज. पण दिसत्ये असे की सार्याच प्रेक्षकवर्गांनी त्याना मनापासून दाद दिली आहे.
हा संतुलीत अभिनय्...फक्त कथा
हा संतुलीत अभिनय्...फक्त कथा संतुलीत आहे तोवर बघायला मिळणार आहे. श्रीजानूविवाहानंतर कथा ६ आयांच्या ताब्यात जाईल तेव्हा अभिनयाचा कस लागेल बिचार्यांच्या
सुमेधा.... अभिनयाच्या तसेच
सुमेधा....
अभिनयाच्या तसेच कथानकाच्या पातळीबद्दल खुद्द मंदार देवस्थळी [दिग्दर्शक] यानीच एका मुलाखतीत थेटच सांगितले की "मी ही मालिका बनविताना विचार केला आहे की पठडीतील पात्रांची तितकीच ठरलेली दुश्मनी न दाखविता सारे काही अगदी चारचौघांच्या घरात जे चालते तसेच दाखविणार आहे. कथानक "ओव्हर" वाटेल असा विचार मी केलेला नाही...."
होप.... दॅट विल कॅरी इनफ. तसे पाहिल्यास सहाही आया प्रेमळच दाखविल्या आहेत. इंदू काही प्रमाणात आक्रमक वाटते, नो डाऊट. पण आईआजी कंट्रोल करू शकतात....शरयूदेखील जान्हवीच्या बाजूनेच बोलत असत्ये.
ही झाली आपली सदिच्छा.... त्या पलिकडे जाऊन जर मधुगंधा आणि मंदार जोडीने दंगा घातलाच तर त्याला तुम्ही आम्ही तरी काय करणार ?
अशोकजी, सगळ्या सिरिअली नंतर
अशोकजी, सगळ्या सिरिअली नंतर एकाच वाटेने जातात असा अनुभव असल्यामुळे माझ्या माबोवरच्या भाबड्या मित्र मैत्रीणींना सावध केले आपले
आजवर अश्या अनेक सिरिअल्स ची उदाहरणे आहेत. खुद्द मंदारच्याही काही सिरिअल्स आहेत तश्या....अपेक्षाच नसल्या म्हणजे अपेक्षाभंगही नाही होणार ना.
नक्की सुमेधा..... एकदा का
नक्की सुमेधा..... एकदा का प्रेक्षक 'अ' मालिकेच्या प्रेमात पडला की मग दिग्दर्शकापेक्षाही निर्माता त्या 'अ' ला 'ज्ञ' पर्यंत कसा खेचत नेतो ती कहाणी आपल्याला माहीत असतेच. मराठीच नव्हे तर हिंदी मालिकाही त्याला अपवाद नाहीत. पूर्वी दूरदर्शनच्या जमान्यात प्रत्येक मालिका ही केवळ १३ एपिसोड्समध्येच संपवावी लागत असल्याने सारे कथानक खूपच बंदिस्त असायचे. उगाच आमटीत पाणी घालून ढवळणे प्रकार नव्हताच. तो सुरू झाला अनेक चॅनेल्सची भाऊगर्दी झाल्यावर.
मंदारच्या 'आभाळमाया', 'वादळवाट' ने चांगल्या अपेक्षा निर्माण केल्या होत्या....पण त्याच्या बाकीच्या काही फरफटत गेल्याच्या वार्ता अन्य दर्शकाकडून कळतातच....मात्र आशा आहे की श्री जान्हवींचा प्रवास ठराविक भागात आटोपता घेतला जाईल....आपण तरी दुसरं काय म्हणणार ?
अशोक मामा, आवडतेय ना
अशोक मामा,
आवडतेय ना तुम्हाला हि मालिका? तुमचे अपडेट्स पाहून समजले ते!! अपडेट देत रहा!!!
येप्प्प....मधुरा.... मी
येप्प्प....मधुरा.... मी सुरुवातीलाच लिहिले होते की माझ्या एका भाचीने अगदी आग्रहपूर्वक ही [हीच] मालिका बघायला मला आग्रह केला होता....जो मी प्रामाणिकपणे पाळला....आता त्या दोघांसमवेत मीही त्यांचा प्रवासाचा मागोवा घेत आहे....अपडेट्स त्यामुळेच द्यायला भावते.
अल्फा होते तोपर्यंत मालिकांचा
अल्फा होते तोपर्यंत मालिकांचा दर्जा एकंदरीत चांगला होता... अल्फा चे झी झाले तेंव्हापासून नुसता चकचकाट वाढला आणि मालिंकांमधला जीव हरवला
खरच आहे की सध्या सगळयांच्याच
खरच आहे की सध्या सगळयांच्याच आवडीची ही मालिका आहे त्याचे श्रेय गोड नायक आणि नायिकेला व त्यांच्या अभिनयाला जाते.......
दि. २१ सप्टेम्बर
दि. २१ सप्टेम्बर २०१३....अपडेट
~ आज अक्षरशः दया आली जान्हवीबाबत.....सहा आया तिच्याकडे "ही कोण पिडा आमच्या घरी घेऊन आला आहे श्री..." अशा नजरेने तिच्याकडे पाहात आहेत....आईआजी श्री ला घेऊन आपल्या रूममध्ये....त्याची झडती त्या घेतात; आणि "तू इतका भोळा कसा काय झाला आहेस पत्नी निवडीच्याबाबतीत ?" यावर श्री स्तंभच. त्याला आजी नेमक्या कशाबद्दल बोलतेय हेच कळत नाही. मुळात जान्हवीला एकटीला खाली सोडून त्याला वर येऊन आजीशी बोलायचे हेच पसंद नाही...तसे तो सांगतोही....सायलीचा मुद्दा तो निष्ठेने खोडून काढण्यात यशस्वी होतो पण जान्हवीबाबत आजी "तिचे अगोदरच लग्न झाले आहे....' या मुद्द्याशी चिकटून राहतात. या बातमीला शक्य तितका तो विरोध करतो....दोघेही हट्टाला पेटले आहेत. शेवटी आजीच निर्णय घेतात की मी म्हणते ते खरे की श्री म्हणतो ते खरे हे अगोदर स्पष्ट करून घेऊ या....याला श्री संमती देतो आणि निदान एक रीतिरिवाज म्हणून तरी किमान जान्हवीशी तुम्ही खाली येऊन घरी स्वागत करा अशी विनंती करतो....त्याला आजी संमती देतात.
दरम्यान बाकीच्या पाच स्त्रिया....अपवाद शरयू.... जान्हवीला दिवाणखाण्यात उभी करून आतल्या खोलीत जाऊन आपल्या नशिबाला बोल लावत बसतात...इंदू जरा जास्तच कठोर बोलते....जान्हवीने 'घर छान आहे...' असा शेरा दिल्यावर.....एकटी शरयू तिच्याजवळ जाऊन तिच्याशी मृदू बोलते पण तीही नंतर बाकींच्यासोबत आतल्या खोलीत जाते.....मग सोफ्यावर एकटी जान्हवी....तिच्या वडिलांचा फोन येतो....तर फोनवर ही हुंदका दाबून कशीबशी वेळ मारून नेते.
आता थेट सोमवारी.
मस्त अपडेट मामा आता रोज भाग
मस्त अपडेट मामा
आता रोज भाग बघितल्यावर मामान्च्या अपडेट ची ऊत्सुकता असते
जान्हवीचं लग्न झालंय आणि मी
जान्हवीचं लग्न झालंय आणि मी तिच्या नवऱ्याला भेटल्येय असं म्हणाल्यावर "कोण तिचा नवरा?" हा next logical प्रश्न का येत नाही?
देवा! इतकं illogical कसं वागते ही आई आजी? हे सगळं misunderstanding एकट्या आई आजीच्या फालतू approach मुळे झालंय! श्री ला काही विचारू नका! म्हणजे श्री साठी तुम्ही मुलगी पसंत केलीत. तुम्ही त्या मुलीला सगळं विचारता आणि तिच्यावर विश्वास ठेवता पण स्वतःच्या मुलाला एकाही प्रश्न विचारत नाही?
केवळ श्री आणि जान्हवी natural आणि सुंदर अभिनय करत आहेत म्हणून सिरीयल बघणेबल आहे. बाकी ना स्टोरीत काही दम (नाविन्य) आहे, ना इतर पात्र interesting आहेत! मला तर त्या सहाही जणी खूप miserable वाटतात!
ए.ल.दु.गो. शतपटीने चांगली होती (जरी शेवटी ती पाणीदार झाली तरी)!
असो, ही बोअर व्हायला लागेल तोवर ए.ल.ति.गो. सुरु होईल!
जान्हवीचं लग्न झालंय आणि मी
जान्हवीचं लग्न झालंय आणि मी तिच्या नवऱ्याला भेटल्येय असं म्हणाल्यावर "कोण तिचा नवरा?" हा next logical प्रश्न का येत नाही?>>>>>++++११११
केवळ श्री आणि जान्हवी natural
केवळ श्री आणि जान्हवी natural आणि सुंदर अभिनय करत आहेत म्हणून सिरीयल बघणेबल आहे. बाकी ना स्टोरीत काही दम (नाविन्य) आहे, ना इतर पात्र interesting आहेत! मला तर त्या सहाही जणी खूप miserable वाटतात!
>>>> +१
मुळात त्या सहाजणी एक्दाही श्री समोर सायलि हे नाव घेत नाहीत आणि श्री पण जन्हवी चे नाव घेत नाही dating ला जाताना हेच काही पटन्या सारखे नाही. गैरसमजाचं हे कारणच फार तकलादु वाटते.
"वासरात लंगडी ..." झालय का या सिरियल्च?
महाराष्ट्र सरकारने(?) आता एक
महाराष्ट्र सरकारने(?) आता एक असा कायदा करायची वेळ आली आहे कि - सगळ्या सिरियल्स १३ भागातच संपवल्या जाव्यात. कायदा मोडणार्यास तुरुंगात टाकलं जावं.
हाच एक उपाय आहे, पटणार्या कथानकावरील दर्जेदार कार्यक्रम निर्मितीचा...
आज्जी आणि श्री दोघे एकमेकांशी
आज्जी आणि श्री दोघे एकमेकांशी बोलताना बरेचदा इंग्लीशमधे बोलतात. आजी एवढी मॉड आणि मग बाकी सुना कशा काय एवढ्या मंद आहेत देव जाणे..त्यांना येत नसलेल्या इंग्लीश वरून केवढे विनोद झालेत आजवर.
मला पण काल जान्हवीबद्दल खूप
मला पण काल जान्हवीबद्दल खूप वाइट वाटले. घरी आलेल्या पाव्हण्या मुलीला असे कसे वागवू शकतात?
पण श्रिमंत घरा तले तौर तरीके वेगळेच असतात हे त्या बाळीला कसे समजणार? बेबी वन्स फार तिखत्ट बोलतात. ते ही साहजिक वाटते. तिला आईचा भक्कम आधार आहे. श्रीचे पात्र अगदी समजुतदार दाखवले आहे. पुरुषीपणाने हीच मुलगी जिच्यासी मी लग्न करणार असा अल्फा मेल पवित्रा घेतला तर सहाच काय साहशे सासवा चट कंट्रोल मध्ये येतील. पन त्याला आपल्या पॉवरचा अहसास नाही आहे.
आई आजी अगदी मा झ्या सासु बाईंसारख्या दिसतात त्यामुळे एक अवचित भय आपसूकच दाटून येते. बॉडी लँग्वेज अगदी बरोबर पकडली आहे. त्यांच्या ओठा च्या सूक्ष्म थर थरीवरून मूड/ खरेतर किती राग आला आहे हे जाणून घ्यायचे दिवस एकेकाळी असत त्याची फार आठवण आली. त्या पण अश्याच एकदा मत बनवले की आजिबात दुसृयाचे ऐकत नसत. अजूनही नाही. हे बरोबर पकडले आहे.
श्रीच्या आईला खरेतर सून आवडली आहे पण जिथे तिची पसंती हवी तिथे अजून सासूच निर्णय घेत आहे त्यामुळे ती हतबल झालेली दाखविली आहे. काल आईबरोबर बघत होते आई म्हणे ते शीर्षक गीतात तिचे लग्न झालेले दाखवले आहे ना मग होणार लग्न फार घाबरायचे कारण नाही. आणि मला मम्मी इज ऑलवेज राइट ह्याचा परत साक्षात्कार झाला.
जान्हवी साडीत सुरेख आणि नाजूक दिसत होती.फोनवर बाबांना लगेच कळले काहीतरी गडबड आहे ते. ते ही बरोबर घेतले आहे.
कथानकाबद्दल प्रच्चंड
कथानकाबद्दल प्रच्चंड अनुमोदन.
एक आईआजी सोडल्यास उरलेल्या पाचही इतक्या "यडचाप" काय म्हणून दाखवल्यात कुणास ठाऊक. त्यांच्यावर आलेल्या अकाली एकटेपणामुळे सगळ्याच "विमनस्क", विचित्र, भरकटलेल्या म्हणायचय बहुतेक.
श्री, जान्हवीचा अभिनय, जान्हवीच्या बाबांचा अभिनय ह्या तीनच गोष्टी जमेच्या का काय?
श्रीची आत्या, श्रीची सावत्र आई... त्यातल्यात्यात बरा अभिनय.
पण कथा? अगदी न पटणार्या कारणमिमांसेमधून मालिका पुढे सरकतेय... पण श्री-जान्हवीच्या अभिनयापोटी बघतोय आपण (मी तरी).
(वासरात लंगडी गाय हेच बरोबर... कदाचित )
ह्म्म्म्म्.....आणि टायटल
ह्म्म्म्म्.....आणि टायटल साँन्ग मधे जान्ह्वीला तिच्या मैत्रीणी सांगतात्....जा बाई सासुरा...आणि पुढे......कोणी काही बोलले तरी मनावर घेवू नकोस, रुसु नकोस आणि माघारी येऊ नकोस वगैरे वगैरे. अगदी यायचेच म्हटले तरी ती तिच्या माहेरी येऊ शकेल अशी परिस्थितीच नाहीये..गप रहावं लागणार आहे तिला सासुरीच (अनील आपटे आठवतोय ना ;))
श्री, जानू, बाबा, पिंट्या, जानुची कजाग आई, हत्तंगडीबाई, अनील हे सगळे लै भारी अभिनय करत आहेत. हत्तंगडीबाई इतक्या कसलेल्या आहेत की आधी प्रत्येकाला त्यांचा रोल करून दाखवत अस्तील व मग करून घेत असतील म्हणून मग सगळ्या टीमचा अभिनय सुधारला असेल.
ही सहा सास्वांची सर्कस लेखकाला तरी किती दिवस रेटता येणारे देव जाणे. त्यांच्या बाबतीतली विनोदनिर्मिती जरा अतीच केवीलवाणी होत चालली आहे सध्या...
अमा, काल श्रीने पुरुषीपणा दाखवून आईआज्जीला लाईनवर आणलेच आहे....तिचा आवाज कसला खाली गेला होता नंतर्...आता ह्या दोघांनी हिरवे निशाण दिल्यावर बाकी पाच जणी लगेच फेर धरतीलच भोवती.
श्रीची आत्या, श्रीची सावत्र
श्रीची आत्या, श्रीची सावत्र आई>>>>> जान्हवीची सावत्र आई आहे श्रीची नाही
केवळ श्री आणि जान्हवी natural
केवळ श्री आणि जान्हवी natural आणि सुंदर अभिनय करत आहेत म्हणून सिरीयल बघणेबल आहे. >>> अगदी, अगदी !
त्या पाच बायका 'खायला काळ, भुईला भार' असल्यासारख्या का दाखवल्या आहेत. बरं, गृहउद्योगच आहे तर आर्थिक बाजू नाही तर पदार्थांच्या क्वालिटी कंट्रोलवर तरी देखरेख करताना दाखवावे.कुणी काही छंदही जोपासताना दिसत नाही. सगळ्या आपल्या एकजात श्री च्या मागे !
लीना भागवत काम सुरेख करते पण तिचे पात्रच गंडले आहे. एखादी बाई अशा प्रकारे वागायला लागली तर तिला सिरियसली उपचारांची गरज आहे. बेबीआत्या एवढी स्मार्ट दाखवली आहे तरी कुचाळक्या करण्यात वेळ का घालवते कोण जाणे. इंदूला ( विधवा दाखवल्या आहेत त्या इंदूच ना ? ) बरेचदा फक्त आधीच्या बाईचा संवाद रिपीट करायचे काम असते. त्या पाच लेकी-सुनांत नर्मदावहिनीचे पात्र ( श्री ची आई ) तेवढे नॉर्मल वाटते.
कालच्या भागातही श्री च्या वाट्याला मस्त संवाद होते. पण मालिका वर्षानुवर्षं चालवायची म्हणजे लगेच लॉजिकल प्रश्न विचारुन कसे चालेल
<घरी आलेल्या पाव्हण्या मुलीला
<घरी आलेल्या पाव्हण्या मुलीला असे कसे वागवू शकतात?>
ती खोटारडी आहे. तिचे लग्न झालेले आहे. तरीही तिचा किमान एक विबासं आहे, तोही आपल्याच गोखले गृह-उद्योगातील विवाहित आणि मूल असलेल्या अकाउंटंटशी. तिची आई महाभांडकुदळ आहे. नवर्याबद्दल तर काही बोलायची सोय नाही. अशा मुलीबद्दल त्या सहा बायकांचे मत काय असेल?
अशा मुलीला आपला श्री (ज्याने दुसर्या एका मुलीला चक्क फसवले आहे, असे काही क्षणांपूर्वीच त्यांना कळले आहे) जोडीदार म्हणून घेऊन येतो. कशी रिअॅक्शन असायला हवी? इज पब्लिक मेमरी रिअली शॉर्ट ऑर सिलेक्टिव्ह?
आईआजींच्या सुना बावळट-घाबरट का आहेत?-- आपल्या मुलाचे वर्तन न आवडल्याने त्याला घराबाहेर काढणारी आणि त्याचे नावही उच्चारू न देणारी बाई कशा सुना निवडेल? त्या बाईच्या(रिंगमास्टर) तालमीत वाढलेल्या सुना कशा असतील?
इतक्या कडक आजीसमोर श्री काल ठामपणे, शांतपणे उभा राहिला . हे सगळं बोलायची ही वेळ नाही. घरात आलेल्य पाहुणीचे स्वागत केले पाहिजे.इ.इ. त्याचा हा ठाम शांतपणा मालिकेच्या सुरुवातीपासून व्यवस्थित एस्टॅब्लिश झालेला आहे. तो कधीही गोंधळलेला, चिडलेला दिसला नाही.
लॅक ऑफ क्लिअर कम्युनिकेशन हा या मालिकेचा आतापर्यंतचा अंडरकरंट होता. पण जोपर्यंत काही पक्के नाही तोवर त्याने मुलीचे नाव घरी सांगायलाच हवे का? सायलीशी त्याचे लग्न जुळवायचा आयांनी घाट घातला आहे याची त्याला जराही कल्पना नाही. सायलीबद्दल आयांनी त्याला सांगितले तेव्हा तो फोनवर बोलत होता. फोनवर हो हो म्हणत होता. त्यामुळे आयांच्या मते त्यांनी श्रीला जान्हवीबद्दल सांगितले आहे. तर त्याला काहीच माहीत नाही.
सायलीला श्रीला घरी न भेटता ऑफिसात भेटायला सांगितले गेले. आता एक अनोळखी मुलगी वेळी-अवेळी आपल्या ऑफिसात येऊन गळ्यात का पडतेय असे प्रश्न त्याला का पडले नाहीत हा एक प्रश्न उरतो. त्या दोघांच्या पहिल्या भेटीत काय झाले यात त्याचेही उत्तर दिले गेले असेल. मला तो प्रसंग आठवत नाही. (कदाचित ते दोघे एकमेकांना आधीपासून ओळखत असतील). लग्न जुळवण्यासाठी प्रथेप्रमाणे दोघांच्या कुटुंबांसकट एक भेट का ठरवली गेली नाही, याचेही उत्तर आठवत नाही. सायली सहा आयांना भेटायला पहिल्यांदा घरी येते, त्या प्रसंगात याचे उत्तर होते का?
शरयू, नर्मदा आणि मावशी ही पात्रे विनोदनिर्मितीसाठी आहेत. त्यांच्यामुळे कथानकाचा वेग मंदावला की श्री-जान्हवी-आजी-आपटे-जान्हवीची आई या सेन्सिबल पात्रांच्या पुढच्या कृतींबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढीस लागते. वरच्या सगळ्या प्रतिसादांतून हेच सिद्ध होतेय. दिग्दर्शकाचा प्लान यशस्वी होतोय.
आईआजी आणि तिच्या तिन्ही सुनांना नद्यांची नावे आहेत.
काल श्री जान्हवीला घेऊन घरी
काल श्री जान्हवीला घेऊन घरी आला तेव्हा आई आज्जीला आठवत कि आपटे म्हणतात तुमच्या अकौंटटबरोबर माझी बायको फिरते (अस काहीतरी, नक्की आठवत नाही). त्यावेळी आई आज्जी काय बोलल्या होत्या?
मग आई आज्जीला माहीत आहे का, कि श्री ने मी अकौंटट आहे अस जान्हवीला सांगितलेल.
Pages