भाद्रपद महिना उजाडला की पाउस आपला जोर कमी करुन रिपरिप गान सुरु करतो...
गणपतीच्या आगमनासाठी निसर्गाची तयारी झालेली असते... साहाजिकच चोहीकडे भातशेतीचे हिरवे किनारे दिसू लागतात.. रानफुलांचा मेळावा भरलेला असतो..
- -
घराकडे जीथे श्रींची स्थापना होणार असते त्या जागेच्या मागील भिंतीवर सुंदर चित्र रेखाटून झालेले असते..
छताला पडदा लावला जातो.. पण पारंपारिक पताके असतील तर त्यांचा रुबाब बघण्यासारखा..
तिकडे गावातला मुर्तिकार अगदी फार नाही पण जवळपासच्या घरांसाठी सात- आठ मुर्त्या बनवून तयार असतो.. शाडूच्या मातीची मुर्ती.. शहरी मुर्त्यांप्रमाणे फिनीशींग नसली तरी कुठलाही साचा न वापरता केवळ हातच्या कलाकुसरीने हे मुर्तीकाम करायचे म्हणजे निव्वळ संयम व कष्ट हवेत.. शिवाय नेहमीची शेतीची कामे असतातच.. तेव्हा ह्यांची मेहनत खरच कौतुकास्पद.. तरीसुद्धा ह्या मेहनतीचा मोबदला शहरीमुर्त्यांच्या मानाने अगदी कवडीमोलच असतो.. कारण इथे व्यवहारिकपणा नसतो तर श्रद्धेला मान दिला जातो..
- -
ठरलेल्या मुर्तीसमोर नारळ, अगरबत्ती वगैरे लावून नमन केले जाते नि मुर्ती घरी आणण्याची लगबग सुरु होते.. मातीची मुर्ती त्यात थोडी मोठी असेल तर वजन चांगलेच वाढते.. पुर्वीसारखे डोईवर मुर्ती बसवून नेणारे गावकरी आता कमीच भेटतात... बरेचशे आता वयाने थकलेले नि पुढची पिढी शहराकडे वळालेली !
अश्या मुर्ती उचलून आणताना खरीच कसोटी असते.. पावसाने निसरडी झालेल्या शेतमळ्यातल्या वाटेतून चालताना जरा जपूनच घ्यावे लागते..
माटीचे छत्र घेउन गणराय विराजमान होतात..
- -
(यावर्षी घरात एका व्यक्तीचे देहावसन झाल्याने मागच्या भिंतीवर 'पिंपळ' काढलेला आहे)
--
- -
प्रथम तुला वंदितो..
-
बाप्पांसमोर केळीच्या पानावर नैवेद्य ठरलेलाच..
मग होतात रमणीय त्या आरत्या रमणीय ते भजन.. रात्री महिलांच्या फुगडयाही रंगतात.. दिवसभरात दुरदुरवरुन गणपतीची गाणी ऐकू येतात.. पण रात्रीच्या शांततेत दुरुन ऐकू येणारे भजनाचे स्वर कानावर जेव्हा पडतात तेव्हा कोकणातल्या गणेशोत्सवाची खरी सर कळून येते..
- -
गणरायाच्या गजरात सगळे वातावरण मंगलमय होउन गेलेले असते.. या धामधूमीत बाप्पांचा निरोप घेण्याची वेळ कधी येउन ठेपते ते कळतच नाही.. साहाजिकच मन दाटून येते.. शेवटची आरती आटपली की खळ्यात(अंगणात) काढलेल्या रांगोळीवर बाप्पांना आणले जाते.. इथे बाप्पांची मुर्ती अधिकच मोहून टाकते..
- -
शेवटचे नमन करुन बाप्पांना उचलून घेतले जाते.. नि मग गजर सुरु होतो.. 'पायी हळुहळू चाला.. मुखाने गजानन बोला..' 'गणपती चालले गावाला.. चैन पडे ना आम्हाला'
- -
- -
असे एखादेतरी दृश्य दिसतेच..
'गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..' _/\_
---------------- * * * --------------
कोकणातलो गणपती (२०१२)
http://www.maayboli.com/node/38286
खुप सुंदर.
खुप सुंदर.
झकास
झकास
सुंदर फोटो, तितकेच सुंदर
सुंदर फोटो, तितकेच सुंदर वर्णनही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फार फार आवडले चमक दमक
फार फार आवडले चमक दमक नसलेल्या साध्या गणेशोत्सवाचे फोटो. >>+१
कोकणातल्या मातीचा अस्सल बाज भरुन राहिलाय सार्या प्रकाशचित्रांमध्ये..>> +१
हाताने घडवलेली मुर्ती खुप सुंदर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुन्दर मी पण कोन्कनातिल
सुन्दर
मी पण कोन्कनातिल आहे
एकदम माझ्या गावचा गणपती विडिओ बघितल्यासारखा वाटला
व्वा ! छान फोटो
व्वा ! छान फोटो आहेत.
"कोकणातल्या मातीचा अस्सल बाज भरुन राहिलाय सार्या प्रकाशचित्रांमध्ये.." >>> +१०
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
गावातले सर्व गणपती विसर्जनाच्या ठिकाणी एकत्र आणले जातात आणि तिथे सर्वांची मिळून आरती केली जाते.
एकत्वाची जाणीव निर्माण करणारा हा कार्यक्रम.
याचेही फोटो द्यायला हवे होते असे वाटले.
(माझ्याकडे (हरिहरेश्वर गावातील) यावर्षीचे २-३ फोटो आहेत.
धागाकर्त्याची अनुमती असल्यास इथे प्रकाशित करू शकेन.)
योगेश फार आवडले फोटो तिथल
योगेश फार आवडले फोटो तिथल वातावरण, हिरवळ.
मला वाटत पूर्वी आमच्याइथेही अशाच मुर्ती मिळायच्या. म्हणजे फिनीशिंग मला ओळखीच वाटल. खुप छान.
पुर्वी आम्हीही काही सण असेल तर केळीच्या पानावर जेवायचो ह्याची आठवण झाली.
एक नोटीस केल गणपतीला फुलांचे हार नाही दिसले. एक आर्टीफिशीअल आणि एका फोटोत कंठी दिसली.
धन्यवाद.. गेल्या वर्षीचा
धन्यवाद..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गेल्या वर्षीचा चित्रकार कुठेय? >> १०वी च्या अभ्यासात गुंतलाय..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धागाकर्त्याची अनुमती असल्यास इथे प्रकाशित करू शकेन >> अवश्य करावे.. पाहण्यास उत्सुक
जागू.. मस्त नोट केलेस..
मस्त फोटो.
मस्त फोटो.
सुंदर! शेवटून ४ था फोटो बरच
सुंदर! शेवटून ४ था फोटो बरच काही सांगून जातोय , बाप्पा घरी चाललेत पण लक्ष सदैव त्याच्या भक्तगणानकडे आहे . बाळकृष्ण सुंदर रेखाटलाय.
व्वा... कसलाही भपका, शो
व्वा... कसलाही भपका, शो नाही. सुंदर...विलोभनिय गणपती! निरागस लोकं आणि भक्तीमय वातावरण!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडलं.
सही !!! सगळेच फोटो सुरेख
सही !!! सगळेच फोटो सुरेख आलेत.
डोळ्यांना सुखद सुखद वाटले
डोळ्यांना सुखद सुखद वाटले सगळे फोटो पाहून..
गेल्या वर्षीचा चित्रकार
गेल्या वर्षीचा चित्रकार कुठेय? >> १०वी च्या अभ्यासात गुंतलाय.. >> ओह! त्याला खुप सार्या शुभेच्छा!
(No subject)
सुरेख फोटो. भातशेतीचा हिरवा
सुरेख फोटो. भातशेतीचा हिरवा रंग पाहून डोळे निवले.
गणवेष,मंडळाचे नाव असलेल्या टोप्या, बँड, टी व्ही कॅमेरे, ट्रक वगैरे काही नसताना सुद्धा गणपती आणता येतो, अन विसर्जनाला नेता येतो की
केळीच्या पानावरचा नैवेद्य सुद्धा किती मस्त दिसतोय.
चित्रकाराला शुभेच्छा
सुरेख!
सुरेख!
फारच मस्त रे
फारच मस्त रे दगडू....शहरातल्या गणपतीपेक्षा असा हा निवांत, निसर्गातल्या कुशीतला गणेशोत्सव पाहून फारच बरे वाटले..डोळे निवले....
डॉल्बीचा दणदणाट नाही, डोळे फिरवणारा झगमगाट नाही, कर्कश्य गाणी, अचकट विचकट नाच नाही
असाही गणेशोत्सव असू शकतो हे पाहून छान वाटले...
कधीतरी घेऊन जा आम्हालाही
सुंदर.. नुसते फोटो बघूनच किती
सुंदर..
नुसते फोटो बघूनच किती शांत, प्रसन्न वाटतं... प्रत्यक्षात किती मानसिक समाधान देणारा अनुभव असेल..!
धागाकर्त्याची अनुमती असल्यास
धागाकर्त्याची अनुमती असल्यास इथे प्रकाशित करू शकेन >> अवश्य करावे.. पाहण्यास उत्सुक >>>
धन्यवाद यो.रॉक्स.
गावातले सर्व गणपती विसर्जनाच्या ठिकाणी एकत्र आणले जातात आणि तिथे सर्वांची मिळून आरती केली जाते.
एकत्वाची जाणीव निर्माण करणारा हा कार्यक्रम.
विसर्जनाकरता समुद्रकिनारी आणलेले सर्वांचे गणपती -- (१)
![G1-S.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u24960/G1-S.jpg)
विसर्जनाकरता समुद्रकिनारी आणलेले सर्वांचे गणपती -- (२)
![G2-S.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u24960/G2-S.jpg)
आणि या गौरी --
![Gau-S.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u24960/Gau-S.jpg)
सर्व गणपतींची आरती -- (१)
![G-aarti-S.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u24960/G-aarti-S.jpg)
सर्व गणपतींची आरती -- (२)
![G-aart-2-S.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u24960/G-aart-2-S.jpg)
आपापला गणपती घेऊन विसर्जनासाठी निघालेले गावकरी --
![Vis-S.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u24960/Vis-S.jpg)
अवांतरः यावर्षी घरात एका
अवांतरः यावर्षी घरात एका व्यक्तीचे देहावसन झाल्याने मागच्या भिंतीवर 'पिंपळ' काढलेला आहे.
>> यामागे काय शास्त्र आहे?
अवांतरः यावर्षी घरात एका
अवांतरः यावर्षी घरात एका व्यक्तीचे देहावसन झाल्याने मागच्या भिंतीवर 'पिंपळ' काढलेला आहे.
>> यामागे काय शास्त्र आहे?...>>>... शास्त्र/ धर्मशास्त्र काहिही नाही... घरातील जाणत्या/ जबाबदार व्यक्तीचे निधन झाल्यास, पुढिल पूर्ण वर्ष येणारे सण-उत्सव हे अत्यंत साधेपणाने साजरे करायचे, अशी कोकणातल्या लोकांची पद्धत आहे, ज्या मधे भपकेबाजपणा, दिखावुपणा या गोष्टीना थारा नसतो...
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
वाह!!! यो ..रिअली रॉकिंग
वाह!!! यो ..रिअली रॉकिंग पिक्स!!!!!!!!!!!! वॉव
अतिशय आवडलं हे. इतक्या सोज्वळ
अतिशय आवडलं हे. इतक्या सोज्वळ वातावरणातला घरगुती गणपतीबाप्पा एकदम प्रसन्न दिसतोय. साधीच पण मनापासून केलेली पारंपारीक सजावट, सारवलेल्या जमिनीवरचा केळीच्या पानातला नैवेद्य, हिरव्यागार शेतातून येणारे आणि परत जाणारे बाप्पा, भजनीमंडळी .... फारच सुरेख वाटलं.
धन्यवाद, यो.
व्वा.. खुप सुंदर... नैवैद्य
व्वा.. खुप सुंदर... नैवैद्य तर खासच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप सुरेख लिहिलंय आणि
खूप सुरेख लिहिलंय आणि प्रकाशचित्र पण . हाताने घडवलेल्या मूर्ती कसल्या सही आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतिशयच सुरेख!!!
अतिशयच सुरेख!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सुंदर!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! योग्या गावची फेरी करुन हाडलस. मस्तच रे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अशक्य सुंदर
अशक्य सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages