Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कालचा एपिसोड उगाच फुकट वेळ
कालचा एपिसोड उगाच फुकट वेळ घालवल्यासारखा वाटला, आता श्री जान्हवीला घरी घेऊन येण्यासाठी किती एपिसोड लागणार आहेत?
नारळीभात धार्जिणा नाही म्हणे
नारळीभात धार्जिणा नाही म्हणे गोखल्यांना.>> असं का म्हणे??
काय माहिती??? दरवेळी घरात
काय माहिती??? दरवेळी घरात नारळीभात केला की काहीतरी वाईट घडते म्हणे. त्यामुळे, रोहला नाभा आवडत नाही, असे काहीतरी चालू होते काल.
बर्बरं!!
बर्बरं!!
(No subject)
जान्हवीनी तरी उकडीचे मोदक,
जान्हवीनी तरी उकडीचे मोदक, वाटली डाळ असं काहीतरी न्यायचं ना या दिवसात
नारळीभात? काय नारळीपौर्णिमा
नारळीभात?
काय नारळीपौर्णिमा आहे का? टिपीकल मराठी घरातसुद्धा नारळी पौर्णिमेशिवाय नाही करत हे पक्वान्न.
जान्हवीने निदान माबो पूर्णब्रम्ह स्पर्धेतली एखादी पाकृ तरी करायची.
रोह ला काय झाले नारळीभात न आवडायला? कॉलेस्टेरोल वाढलाय का? की नारळीपौर्णिमेला काही अशुभ घडले?
निदान गोखल्यांकडे श्राद्ध आहे (पितृपक्ष सुरु झालाय ना) आणि ही गोडधोड घेऊन निघालीय, असे काहीतरी दाखवायचं.
(यामुळे निदान पितृपक्षात तरी सुनबाई श्री च्या घरी जाईल नाहीतर हा एपिसोड लांबता लांबता दिवाळी येईल :))
नारळीपौर्णिमेला काही अशुभ
नारळीपौर्णिमेला काही अशुभ घडले?>>>नाही ...नारळीभात केला तेव्हा अशुभ घडले..
श्रीची आई सांगते....नारळीभात केला आणि नेमक्या त्याच दिवशी मामंजी गेले. हे अमेरिकेला निघून गेले तोही दिवस नाभाचाच होता. इंदूला आणायला भाऊजी निघाले घरुन...तेव्हा मुद्दान इंदूसाठी नाभा केला होता आणि त्यांचा अपघात झाला....आणि ज्या दिवशी तुझ्या(शरयूच्या) नवर्याला आईने बाहेर काढले ना..त्या दिवशी सुद्धा नाभाचाच बेत होता....
एवढे ऐकून मला वाटले आता श्रीची आत्या म्हणेल....ज्या दिवशी मी माझ्या नवर्याला सोडून घरी आले तर त्या दिवशी घरी नाभाच केला होता.
शरयूला तिची फजिती /मूर्खपणा
शरयूला तिची फजिती /मूर्खपणा कळू नये म्हणून बाकीच्या चौघींनी जे केले ते बघायला छान वाटले.
अजूनही तो अनिल आपटे जान्हवीच्या घराभोवती घिरट्या घालतोच आहे.
पण जान्हवी गोखल्यांकडे
पण जान्हवी गोखल्यांकडे पोचायच्या आधी सायली जाऊन आगीत तेल ओतणार आहे ना? मला वाटतं पुढचा भाग त्याच्यातच घालवतील बहुतेक. सायली घरी आल्यावर तिलाच होणारी सून समजत असल्याने तिचं जंगी स्वागत होईल मग रहस्यभेद होईल.
प्लीज अपडेट टाकायला विसरू नका. इथे घरी मालिका बघता येत नसल्याने अपडेटची उत्सुकतेने वाट बघत आहे
तो अजून काय करणार
तो अजून काय करणार म्हणा........लग्न करायचे म्हणून जानूच्या आईने त्याच्याकडून पैसे घेतलेन आता त्याला बघून जानूच काय तिची आई पण पळून जाते,
हुश्श...... आज अखेर श्रीरंगने
हुश्श...... आज अखेर श्रीरंगने जान्हवीला आपल्या बंगल्यात आणलेच. भाग मस्तच रंगला. सुरुवातीला सहा आया आपल्या सूनस्वागताच्या विविध जबाबदार्या श्री ला सांगतात....अन् तो तिला आणायला तिथून निघतो तर दुसरीकडून जान्हवी आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन निघते. त्या दरम्यान सायली श्री ला त्याच बस स्टॉपवर भेटते....तो चकित होतो....पण सायली त्याला "माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझी तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे...:" असे स्पष्ट सांगते. श्री ला तिच्या आगावूपणाबद्दल राग येतो आणि तिला स्पष्ट शब्दात नकार देतोही. मात्र निराश झालेली सायली तिथून थेट सहाजणींकडे येते...त्याना वाटते होणारी सूनच आली. मात्र येते ती धाय मोकलून रडतच आणि "श्री ने मला फसविले...." असा पवित्रा घेऊन सहाही स्त्रियांना कोड्यात पाडते.
...थोड्यावेळाने श्री जान्हवीला घेऊन बंगल्यात प्रवेश करतो....आणि सर्वांसमोर "तुमची होणारी सून घेऊन आलो आहे..." असे हसत जाहीर करतो...त्याच्यामागून जान्हवी दबक्या पाऊलाने चौकटीतून आत पाय ठेवते. सार्यांना धक्का बसलेला दाखविला आहे.
शेष उद्या.
धन्यवाद अशोककाका एकूण
धन्यवाद अशोककाका एकूण उद्याचा भाग एकदम रंगणार असं दिसतं आहे!
गोखल्यांच घर म्हणजेच एलदुगो
गोखल्यांच घर म्हणजेच एलदुगो मधल काळ्यांच घर आहे का? समोरच आंगन सेम वाटलं तुळशी वृन्दावन वैगरे आजच्या सीन मधे.
चला....जानू उद्या घरी पोहचली
चला....जानू उद्या घरी पोहचली एकदाची!
जान्हवी भावि सून होणार(नो नो) ....अन ती नारळीभात घेऊन आली आहे(बिग नो).....अब आयेगा मजा!!!
अशोक काका, मजा आया. अगदी
अशोक काका, मजा आया. अगदी मनापासून आभार तुमचे. मी न बघताही गुंततेय ह्या मालिकेत... काय नं?
रो. ह्...अगदी अवास्तव व ओढून
रो. ह्...अगदी अवास्तव व ओढून ताणून वैर करते आहे जान्हवीशी असे वाटते. अगदीच बालीश. एवढ्या मोठ्या कारखानदारीणीला हजारो अशी माणसे भेटत असतील रोज.
दाद..... तुमच्या एरियात झी
दाद.....
तुमच्या एरियात झी मराठीचे जरी प्रक्षेपण येत नसले तरी तुम्ही http://www.dailymotion.com/video/x14qoo4_091520132000-chunk-1_animals ह्या लिंकवरून झालेले भाग सहजी पाहू शकाल. मालिका गुंतवून ठेवते हे बाकी खरंय.
चीकू थॅन्क्स.....
अशोक पाटील
मामा, धन्यवाद डेली अपडेट्स
मामा, धन्यवाद डेली अपडेट्स करता
५००वा प्रतिसाद
५००वा प्रतिसाद
अगं चिमुरी.... तुझ्यासारख्या
अगं चिमुरी....
तुझ्यासारख्या अनेक भाच्या वेळेअभावी ही मालिका नित्यनेमाने पाहू शकत नाहीत असे इथल्या कित्येक प्रतिसादांवरून दिसत्ये.....त्यांच्यासाठी तसेच माझेही मन ताजेतवाने ठेवण्यासाठी ते अपडेट्स देताना आनंद होत आहे. मालिकाही तितकीच आपुलकीची वाटत आहे.
अशोकमामा
धन्यवाद कालच्या अपडेट्स साठी
धन्यवाद कालच्या अपडेट्स साठी अशोक काका...कालचा भाग मिसलेला मी.....
ओके परन..... कालचा भाग खरंच
ओके परन..... कालचा भाग खरंच पाह्यण्यासारखा होता.....विशेषतः जान्हवीची घालमेल पाहाण्यासाठी तरी. भावी सासुरवाडीतील तिचा प्रवेश पाहाणार्यांनाही दडपणाचा वाटला कालचा भाग. एरव्ही नवी मुलगी जिथे एका सासूला तोंड देवू शकत नाही त्या ठिकाणी तब्बल सहा आडदांड [शरयूच काही वेळा तिची बाजू घेताना दाखविले आहे यापूर्वी] सासवांना सामोरे जायची वेळ आल्यावर तिला घाम फुटणे स्वाभाविकच....नेमके हेच भाव जान्हवी दाखवित आहे.
म्हणजे कालचा भाग डाऊनलोड करून
म्हणजे कालचा भाग डाऊनलोड करून पहावा लागणार तर......कारण मला जान्हवीचा अभिनय खूप आवडतो.....
आजचे [शुक्रवार २०
आजचे [शुक्रवार २० सप्टेम्बरचे] अपडेट....
या भागातील जान्हवीच्या अगतिकपणाच्या अवस्थेने सार्यांच दर्शकाच्या पोटात खड्डाच पडला असे म्हटले पाहिजे. सहा सासू तिच्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने पाहात आहेत आणि ही बिचारी बळीला चढविण्यासाठी आलेल्या बकरीसारखी थरथरत त्यांच्यासमोर खाली मान घालून उभी आहे....आणि ज्याच्या विश्वासावर ती गोखलेंच्या बंगल्यात आली आहे तो श्री केवळ आजीच्या चेहर्याकडे पाहात...."आजीआई, अगं काय झालय ?" याच्याशिवाय काहीच बोलत नाही.
त्या अगोदर सायली घरात येऊन सार्यांना श्री ने आपल्याला फसविले असे सांगते. पण आजी श्री ची बाजू घेते, त्याला विचारल्याशिवाय मी तुला काही शब्द देवू शकत नाही असे ऐकविल्यावर सायली सार्यांच्यावर चिडते. 'तुमचा मुलगा आहे म्हणून तुम्ही त्याचे खरेच मानणार...". आजीला असे थेट बोलल्याचा राग अन्य स्त्रियांना जरूर येतो अन् त्या सर्वांवर संताप व्यक्त करत सायली बंगल्याच्या बाहेर पडते तर दुसर्या बाजूने श्री जान्हवीला घेऊन घरात प्रवेश करतो.....तिला पाहून [ती कोण आहे हे त्याना माहीत असल्याने] सार्या थक्कच. आजी एकट्या श्री ला आपल्या रूममध्ये नेते आणि जान्हवीच्या विरोधात त्याला बोल लावते शिवाय तिचे लग्न झाले असल्याचीही वार्ताही श्री ला सांगते..... श्री सुन्न.
एकूण हा भाग अगदी ताणतणावपूर्ण..... खटकले ते एकच....जान्हवी दिवाणखान्यात एकटी उभी आहे तर त्या पाच सासूबाईपैकी एकही तिला खुर्चीत बस असे म्हणत नाही.
हे मिसल अपडेट साठी थँक्स मामा
हे मिसल
अपडेट साठी थँक्स मामा
जाई... तरीही उद्या ज्यावेळी
जाई...
तरीही उद्या ज्यावेळी रीपिट टेलिकास्ट असतो त्यावेळी जरूर ट्राय कर.....फारच छान काम केले आहे जान्हवीने. [आज रात्रीही ११ वाजता असतो....जमल्यास त्यावेळीही पाहू शकतेस तू.]
[आज रात्रीही ११ वाजता
[आज रात्रीही ११
वाजता असतो....जमल्यास
त्यावेळीही पाहू शकतेस तू.]>>>>> हे नव्हत माहीत
आता बघेन
धन्यवाद अशोककाका! पण श्रीला
धन्यवाद अशोककाका!
पण श्रीला माहिती आहे ना की जान्हवीचे लग्न झाले नाहिये ते आणि तोच अकाउंटंटचे नाटक करत होता. मग जान्हवीचे लग्न झाले आहे आणि तिचं अकाउंटंटबरोबर अफेअर आहे हे आजीने सांगितल्यावर तो लगेच तिचा गैरसमज दूर का करत नाही ?
चीकू..... त्याचा खुलासा
चीकू.....
त्याचा खुलासा आजीसमोर शक्य तितक्या सौम्यपणे तो उद्याच्या भागात करेल असे वाटते. जान्हवीने त्याच्यासाठी अनिल आपटेबरोबर ठरू पाहाणारे लग्न टाळले आहे, हे त्याला अर्थातच माहीत आहे. त्यामुळे जान्हवीचे लग्न झालेले नाही त्याबद्दल त्याच्या मनात शंका नाही. शिवाय 'अकौन्टंट" चा घोळही त्याला माहीत आहे. प्रश्न आहे तो हे सगळे कसे मॅनेज करील याचा.
आजीपुढे तिचे लग्न हाच एक कळीचा मुद्दा नसून तिने सुरुवातीला काही असत्य सांगितल्याचा राग आहे तसेच विघ्नेश्वराच्या देवळात जान्हवीच्या आईने केलेला दंगाही तिला स्मरतो.
फार किचकट प्रकरण झाले आहे बिचार्या जान्हवीचे..... त्यामानाने सायलीचे फणकार्यात तिथून निघून जाणे हे तिच्या स्वभावाला साजेसे असेच झाले.
Pages