![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2020/12/29/Baal-batate%20bhaaji.jpg)
बाळ बटाटे - पाव किलो
कांदे - २ मोठे
तमालपत्र - १
वाटलेली हिरवी मिरची - साधारण चमचाभर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)
किसलेलं आलं - साधारण चमचाभर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)
जिर्याची पूड - १ चमचा
चिंचेचा कोळ - एक चमचा
हळद, तेल, मीठ, साखर(मी घालते)
साजूक तूप - दोन चमचे
लाल तिखट - अर्धा चमचा (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)
या आयडीला कोणाकोणाच्या विपुतच रेसिप्या लिहिण्याची खोड आहे, निषेध करूनही काऽही उपयोग नाही. या आयडीची विचारपूस करताना त्या रेसिप्यांवरचे प्रश्न आमच्या नजरेस पडतात मग कितीही नाही म्हटलं तरी मूळ रेसिपी आणि उत्तरे शोधण्यासाठी विपौड्या मारण्याचा मोह आवरत नाही. विपौड्या मारण्याची खोड आम्हांला याच आयडीमुळे लागली असे मानायला हरकत नाही.
आता ह्या रेसिपीची प्रमाणं काही त्या विपूमधे लिहिलेली नव्हती, सगळं आम्ही आमच्या अंदाजानेच घेतलं, पण भाजी मात्र त्या आयडीने लिहिल्याप्रमाणे अफाट चवीची झाली. मग त्या आयडीचे आणि रेसिपीच्या मूळ स्रोताचे आम्ही जाहिर आभार मानले, तर बाकी लोकं आम्हाला योग्य विपूचा पत्ता विचारू राहिली. आता ती विपुतली रेसिपी तशी मागे पडली आहे. विपुची पानं उलटता उलटता लोकांचा भाजी करण्याचा उत्साह सरायचा, त्यापेक्षा म्हटलं की ही भाजी लिहूनच टाकूया. ही भाजी लिहिण्यासाठी परवानगी मागण्याचे पुण्यकर्म एका प्रिय मैतरणीने केले आहे, तिचे आभार! तसेच ही भाजी विपूत ठेवणारीचे आभार! तसेच ही भाजी (कुठेतरी का होईना) लिहिण्याचे काम करणारीचे अनंत आभार!
तिच्याच शब्दांत आता पुढे भाजीची रेसिपी:
बारके बटाटे उकडून. (त्यांची सालं काढावी लागत नाहीत.)
किसलेला कांदा, तेजपान, किसलेलं आलं, वाटलेली हिरवीमिरची, हळद तेलात घालून परतायचं. यात उकडलेले बटाटे घालायचे. अगदी जरासा चिंचेचा कोळ आणि मीठ घालायचं. व्यवस्थीत परतून भाजलेल्या जिर्याची पूड वरून घालायची. जितका पातळ रस्सा हवा तितकं पाणी घालायचं. उकळू द्यायचं. आता सगळ्यात मस्त भागः चमचाभर (किंवा भाजीच्या क्वांटिटीनुसार) साजुक तूप कडकडीत गरम करून त्यात तिखट घालायचं आणि पोळलेलं हे तिखट्+तूप लागलीच उकळत्या भाजीत ओतायचं. अफाट चविची भाजी होते!
आभार: अलकामावशी
रबडी-पुरीबरोबर ही अशी भाजी झकास लागते.
![alakamavashi bhaji 3 edited.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u85/alakamavashi%20bhaji%203%20edited.jpg)
मस्त भाज्या आहेत सगळ्यांच्या
मस्त भाज्या आहेत सगळ्यांच्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगोची भाजी बाळ बटाटेवड्यांची भाजी वाटतेय
पण झक्कास दिसतेय.
बटाटेवड्यांची भाजी सशल, हो
बटाटेवड्यांची भाजी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सशल, हो कांदा परतून-वाटून घातला. कांदा किसायला खूप कंटाळा येतो, डोळ्यांतून पाणी येते, शिवाय कांदे बुळबुळीत असले तर अजिबात किसता येत नाही नीट ( तसेच निघाले ह्यावेळी ). कांदा जरा कमी पडला. ग्रेव्ही दाटच हवी होती म्हणून पाणी घालून वाढवला नाही त्यामुळे त्या चुल्लूभर रश्श्यात सगळे बटाटे बुडाले नाहीत![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
लोला, बरोबर आहे तुझं. पुढच्यावेळी अजून चांगला ( मुख्य म्हणजे क्लॅरिटी असलेला )फोटो काढायचा प्रयत्न करेन.
अरेरे. सशलच्या स्वसंपादित
अरेरे. सशलच्या स्वसंपादित रेस्पीचा चक्क अनुल्लेख!
उल्कामावशींची भाजी म्हणून सहज खपेल ती ![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
सिंडी, अगोच्या भाज्या मस्त दिसताहेत.
अलकामावशी रागावतील म्हणून कांदा वगळून नाही केली भाजी. करणार आहे पण एकदा अशीच्या अशी.
माझ्याकडे काल बेपो नव्हते
माझ्याकडे काल बेपो नव्हते म्हणून मोठ्या बटाट्याच्या तुकड्यांना गोलसर आकार दिला. निघालेले पातळ कापही भाजीत घातले! यात थोडा गूळही आहे-
आज हे "पीवी" बटाटे मिळाले. याची करणार.
![piwee.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u26225/piwee.jpg)
वा वा! मस्तच! तवंग/तर्री छान
वा वा! मस्तच! तवंग/तर्री छान दिसत आहे ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजूनही सगळ्यांच्या भाज्या वेगळ्याच दिसत आहेत .. (मृणने अजून पर्यंत दोघींनां मावशीची भाजी अशीच दिसते असं सांगितलेलं आहे .. :हाहा:)
लोला, फोटो मस्तच. पण भाजीला
लोला, फोटो मस्तच. पण भाजीला लालसर रंग नाही आला का ?
माझाही नव्हता आला. लोला
माझाही नव्हता आला. लोला सारखाच आला होता, पण कांदे बारीक चिरल्याने ग्रेवी मिळून आली होती.
रंग आला नाही म्हणून फोटो पण काढला नाही.
(हां आठवलं, माझ्याकडून वाटलेली मिरची जास्त पडल्याने भाजी आधीच खूप तिखट झाली म्हणून वरुन तुपात अगदीच कणभर तिखट घातलं होतं मी.)
तिखट फक्त वरच्या फोडणीतच आहे,
तिखट फक्त वरच्या फोडणीतच आहे, भाजीत तिखट नसल्यानं ती लाल दिसत नाही. सर्वांना वरुन तिखटही झेपणार नसल्याने मी या छोट्या कढईत काढलेल्या भाजीवर फोडणी ओतून न हलवता फोटो काढलाय.
आजच केलि हि भाजी... मस्त झालि
आजच केलि हि भाजी... मस्त झालि आहे.
पाककृतीसाठी आभारी आहे. नक्की
पाककृतीसाठी आभारी आहे. नक्की करणार.
ही भाजी काही १५-२०
ही भाजी काही १५-२० दिवसापुर्वी केली. जशी व्हायला हवी तशीच झाली.. म्हणजे झक्कास्स झाली. फक्त एक करायला हवे होते ते म्हणजे बटाट्यांना एक चीर द्यायला हवी होती म्हणजे मसाला आत गेला असता. चीर न दिल्याने बटाट्यात मीठ-मसाला शिरले नाही व ते जाणवले. आजपण हाच मसाला वापरुन करणार आहे पण त्यात बट्याऐवजी दुसरी काहीतरी घालुन. पाहु प्रयोग कसा जमतो ते.
सुनिधी, मी अश्या अख्ख्या
सुनिधी, मी अश्या अख्ख्या बटाट्यांची ग्रेव्ही करताना फोर्कने टोचे मारते. मसाला छान मुरतो म्हणजे त्यात.
ओके. पुढील वेळेस छोट्या
ओके. पुढील वेळेस छोट्या बटाट्यांना ह्याच पद्धतीने टॉर्चर करेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बिल्वा +१ मी टूथ्पिक ने
बिल्वा +१ मी टूथ्पिक ने टॉर्चर करते. मस्त मसाला मुरतो आतपर्यंत.
या वीकेंडला ही भाजी केली
या वीकेंडला ही भाजी केली होती. झक्कास झाली होती. साजुक तुपाच्या फोडणी घातली की जीभ सॉलिड खवळते मात्र.
अलकामावशींना या कृतीसाठी धन्यवाद.
जबरदस्त!! छानच
जबरदस्त!! छानच झालेली..धन्यवाद मृण्मयी!!
ही भाजी करून पाहिली. बरेच
ही भाजी करून पाहिली. बरेच दिवस बुकमार्क करून ठेवली होती. मस्त आहे. मी चुकून धणा-जिरा पूड घातली पण आमचाकडे सर्वांना आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मं़जुडी अॅण्ड कं.चे आभार्स
काल केली होती. बाळ बटाटे न
काल केली होती. बाळ बटाटे न मिळाल्याने नेहमीचे बटाटे वापरले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम यम्मी यम्मी झाली होती.
फायनली!! अलकामावशीकृत, मंजूडी
फायनली!! अलकामावशीकृत, मंजूडी प्रस्तुत या भाजीचा प्रयोग आमच्याइथे आज करण्यात आला. प्रयोग हिट होता, पण मिरची कमी पडली. मिरचीचे प्रमाण योग्य करून पुढल्यावेळेपासून सुपरहिट्ट हाऊसफुल्ल प्रयोग सादर होतील! धन्यवाद!
सहीच!!!.. मी आज करणारे..
सहीच!!!.. मी आज करणारे.. रिपोर्ट पोस्ट लंच देण्यात येइल..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फार्फारच सुरेख झाली आहे भाजी!
फार्फारच सुरेख झाली आहे भाजी!
मी मात्र गूळ घातला आणि हि मि असल्यामुळे तिखट जरा कमी घातलं. कारण मंडळींना शक्यतो गुळाशिवाय भाजी-आमटी जात नाही. पण तरी किंचित आंबट-गोड आणि वरून साजुक तुपातली चळचळीत खंग्री फोडणी... आहाहा!
मस्त रेस्पीसाठी संबंधित सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फायनली आज या भाजीचा मुहूर्त
फायनली आज या भाजीचा मुहूर्त लागला माझ्याकडे. बाळबटाटे नव्हते म्हणून मोठेच बटाटे तुकडॆ करून घातले. अर्थात चव मात्र भन्नाटच लागली. चव आणि सोपेपणा यामुळे सारखीच केली जाईल आता.
ही रेसिपी लिहिणा-या, इथपर्यंत पोचवणा-या आणि टेम्प्टिंग फोटो टाकून प्रवृत्त करणा-या सगळ्यांचे मनापासून आभार.
रेसिपीबद्दल आभारी आहे! वरुन
रेसिपीबद्दल आभारी आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वरुन तूप+तिखट फोडणी हा खरंच सगळ्यात मस्त भाग आहे
मी चिंचेच्या कोळाऐवजी चिंचगुळाची चटणीच घातली थोडीशी. आणि शेवटी थोडी कसूरी मेथी हाताने कुस्करुन घातली. मस्त चव आली.
bhariye.... nakki karun
bhariye.... nakki karun bhagen
पाककृती विभागाचा सदस्य नसताना
पाककृती विभागाचा सदस्य नसताना ही कृती दिसते पण २१९८६ (मंजुडी ने सांगितलं म्हणून बघायला गेलो तर) दिसत नाही.
अॅडमिन, पान पाहायची परवानगी सगळीकडे सारखीच करणार का कृपया ?
मिलिंदा, ती पाककृती सार्वजनिक
मिलिंदा, ती पाककृती सार्वजनिक केली नसेल सुलेखाताईंनी. तशी केली तर बघण्यासाठी सदस्यत्व लागत नाही.
अच्छा अच्छा ... असं असू शकेल.
अच्छा अच्छा ... असं असू शकेल. धन्यवाद स्वाती.
अॅडमिन, काही करु नका.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काल केली... कातील झाली होती!
काल केली... कातील झाली होती! धन्यवाद सगळ्यांना..
चार वेळेला ही भाजी करुन
चार वेळेला ही भाजी करुन झाल्यानंतर घेतलेला धडा: कांदा किसायचे कष्ट वाचवायचे असतील तर कांदा मिक्सरवरुन काढता येतो पण मग वाटलेला कांदा ताबडतोब परतायला घ्यायचा, ठेवून दिला की वर म्हटल्याप्रमाणे कडू होतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व वि २०१४च्या आठवणी
व वि २०१४च्या आठवणी
Pages