आजारच नसलेल्या पेशंटचं टेन्शन
रोगावर उपचार करतांना पेशंटला टेन्शन असतं तसंच डॉक्टरवर ही असतं. कालांतरानं डॉक्टरांना याची संवय होते. पण समजा की पेशंटला मुळातच काही आजार नाही तर मग? तुम्ही म्हणाल मग काय प्रॉब्लेम आहे? टेन्शनचं कारणच काय? तर मग ऐका :आजारच नसलेल्या पेशंटची कहाणी.
पैठणला असतांना एकदा रात्री अवेळीच कॉल आला. सर्वसाधारणपणे दवाखान्याचा चपराशी कॉल घेवून घरी येत असे. (तेंव्हा मला घरी सुद्धा टेलीफोन सुविधा नव्हती). या वेळी मात्र चपराशा बरोबर पोलीस हवालदार होता. मी विचारणा केली, पण तो हवालदार (नेहेमीचा असूनही) काही बोलेना. मामला गंभीर असावा! दवाखान्यात पोहोचलो, तो तिथं दहाबारा पोलीस, दोन तीन इन्स्पेक्टर असा मोठा लवाजमा जमलेला.माझ्या मनात विचार आला: "काय खूना बिनाची केस आहे की काय!"
आत गेल्यावर मी पेशंट कडे गेलो आणि आता मात्र खरंच आश्चर्यचकित झालो. चांगली उंचीपूरी देहयष्टी. वाढलेल्या दाढीमिशा आणि त्यामुळे दिसणारं उग्र रूप असा तो पेशंट. मी विचारपूस आणि तपासणी केली. पेशंटचं आणि माझं दोघांचही एकमत झालं. काहीही झालेलं नाही! एक गोष्ट मात्र मला अजिबात आवडलेली नव्हती कारण पेशंटला पलंगाशी बेड्यांनी जखडून ठेवलेलं होतं. आता असं करायला तो पेशंट म्हणजे काही खुनी किंवा दरोडेखोर नव्हता. तर ते होते प्रसिद्ध दलित नेते प्रा. जोगेंद्र कवाडे! ते दिवस मराठवाडा नामांतर चळवळीचे होते. आणि कवाडे पोलीसांना गुंगारा देत अचानक कधी इथे तर कधी तिथे असे अचानक प्रगट व्हायचे! त्या दिवशी मात्र ते कसे कुणास ठावूक पण पोलीसांच्या हाती सांपडले होते. पोलीसांची काही अडचण होती, त्यामुळे दुस-या दिवशी न्यायालयापुढे त्यांना हजर करण्या आधी रात्र भर त्यांना दवाखान्यातच ठेवावं ही पोलीसांची विनंती होती. माझी ही काही हरकत नव्हती, मात्र प्रा. कवाडेंसारखा माणूस आपण प्रमुख असलेल्या दवाखान्यात पलंगाला बेडीनं जखडून ठेवलेला आहे हे काही मला पचनी पडत नव्हतं. मी पोलीसांना ते बोलूनही दाखवलं. पण ते ऐकेनात. बरीच हुज्जत घातल्यावर मी लेखी हमी घेतली तर बेडी काढायला पोलीस तयार झाले. आमच्या दवाखान्यात तेंव्हा एक्स-रे मशीन बसवण्यासाठी तीन खोल्यांचं बांधकाम नुकतंच झालं होतं. त्याला स्वतंत्र टॉयलेट होतं. मुख्य म्हणजे स्वतंत्र प्रवेशद्वार होतं, तिथं पाहिजे तर पोलीस ठेवता येतील हे मी पोलीसांच्या निदर्शनास आणून दिलं. माझी लेखी हमी घेवून आणि तरी ही पोलीसांची मोठी नाराजी स्विकारून आम्ही कवाडेंना त्या नव्या खोलीत शिफ्ट केलं आणि मी रात्री एक दीडला घरी आलो.
रात्रभर मला झोप आली नाही. पोलीसांच्या हातावर तूरी देवून आणि आमच्या नवीन बांधकाम केलेल्या खोलीची भिंत फोडून कवाडे पसार झाल्याची स्वप्न मला पडत होती. एकदा तर मीच मला पोलीसांनी बेड्या ठोकलेल्या अवस्थेत पाहिलं. मला दरदरून घाम फुटून जाग आली. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे तीन वाजलेले. काही वर्तमान घ्यावं म्हटलं तर त्याकाळी घरी सुद्धा फोन नव्हता. शेवटी मी सकाळी आठलाच दवाखान्यात पोहोचलो. वातावरण शांत दिसत होतं. मी तडक कवाडेंना ठेवलं होतं त्या खोलीकडे गेलो. ते उठलेले होते. त्यांनी हंसून माझ्याकडे पाहिलं. ते बेड्या प्रकरण त्यांच्या कानावर गेलं होतं. मी मोकळेपणानं माझं टेन्शन, रात्रीची माझी अवस्था त्यांना कथन केली. ते म्हणाले: "डॉक्टर, अहो मग मला सांगायचं. पण इन एनी केस मी दवाखान्यातून पळून जावून तुम्हाला कधीच अडचणीत आणलं नसतं".. आणि ते मोकळे पणाने हंसले. आता मात्र मी ही त्यांच्या हंसण्यात सामील झालो. प्रा. कवाडेंना हा प्रसंग आठवतो कां नाही मला माहित नाही, पण मी जेंव्हा केंव्हा त्यांचं नाव पेपर मधे वाचतो तेंव्हा तो प्रसंग मला आठवल्याखेरीज रहात नाही.
-अशोक
@ राहुल१२३ * क्या पता किस बात
@ राहुल१२३
*
क्या पता किस बात पर बोल रहे थे हम
बातो-बातो मे, अपनाही पता भूल बैठे थे हम!
-अशोक
डॉक्टर तुम्ही मायबोलीवर
डॉक्टर
तुम्ही मायबोलीवर आल्यापासूनचं लिखाण पुन्हा एकदा पहा बरं. प्रत्येक लेखाखाली माझा प्रतिसाद दिसेल तुम्हाला. इथे मी फक्त साखळदंडावरून एक शेरा मारला त्याला कारण सध्या इतरत्र कुठेही काहीही लिहीलं कि एक देश सोडून गेलेले आणि एतद्देशियांना देशद्रोही म्हणणारे एक हिंदुत्ववादी त्या पोस्टला भगव्या भिंगातून तपासून भले मोठे प्रतिसाद देत सुटले आहेत. सनातन प्रभातच्या सदस्यांची चौकशी हा त्यांना हिंदुत्वावरचा आघात वाटला. इतर हिंदू निरुपयोगी आहेत असा आक्रोश त्यांनी केला म्हणून हा शेरा होता. हे समजण्याची बुद्धी त्यांना असती तर तर हाजी मस्तानला भविष्यातून नामांतर चळवळीत त्यांनी ओढले नसते. याच हाजी मस्तानचे आणि इतरही स्मगलर्स, देशद्रोही वगैरेंचे वकीलपत्र नेहमी घेणा-या वकिलाला त्यांच्या हिंदुत्ववादी सरकारने कायदामंत्री बनवले होते.
जोगेंद्र कवाडे, त्यांचा पक्ष यांच्याशी कुठलाही संबंध नाही. ना त्यांचं समर्थन करावंसं वाटतंय. तुमच्या या धाग्यावर अवांतर खूप झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून आधीचे प्रतिसाद उडवत आहे.
ता.क. : संघाला डॉ आंबेडकर प्रातःस्मरणीय आहेत अशा अर्थाने लिहीलं होतं. आम्हाला म्हणजे त्यांना...
(डॉक्टरांच्या बाफवर विषयांतर होत असल्याने प्रतिसाद हटवले आहेत. पैलवानांचे प्रतिसाद अतिशय विनोदी होत चालल्याने थांबतोय.
)
@ राहुल१२३ * क्या पता किस बात
@ राहुल१२३
*
क्या पता किस बात पर बोल रहे थे हम
बातो-बातो मे, अपनाही पता भूल बैठे हम!
-अशोक
डॉक जोगेंद्र कवाडे, त्यांचं
डॉक
जोगेंद्र कवाडे, त्यांचं भूमिगत असणं आणि अचानक तुमच्याकडे येणं यामुळे नामांतराची जखम पुन्हा उघडी झाल्यासारखं वाटणं हे तरी स्वाभाविक आहे ना ? त्या वेळी ट्रक, वाहनं अडवून आडनाव विचारून पेटवून दिली जात होती. घरं दारं जाळली गेली. मुस्लीमांसारखी दलितांना मराठवाड्यात "अन्य" आयडेंटिटी मिळाली. ही नामांतराची कल्पना कुणाच्या डोक्यातून आली कुणास ठाऊक.. पण आजही कामानिमित्त गेलेल्यांना काहींना आडनाव सांगितल्यावर औरंगाबाद, अहमदनगर इथे भाडेकरू म्हणून नाकारलं जातं. डॉक्टरांना भावनांशी घेणंदेणं असू नये म्हणतात. पण तुमच्या लेखात संवेदनशीलता आढळत असल्याने हे लेख वाचनीय वाटले. असो.
हे वास्तव आहे. याला पाच सहा आठवड्यांपूर्वी इथं जन्माला आलेलं बाळ गरळ म्हणत असेल तर ते काय लायकीचं आहे हे सांगायची गरज नाही.
मुद्दाम हसेन, १. >> इथे मी
मुद्दाम हसेन,
१.
>> इथे मी फक्त साखळदंडावरून एक शेरा मारला त्याला
नेमकी त्याचीच गरज नव्हती!
२.
>> सध्या इतरत्र कुठेही काहीही लिहीलं कि एक देश सोडून गेलेले आणि एतद्देशियांना देशद्रोही म्हणणारे एक
>> हिंदुत्ववादी त्या पोस्टला भगव्या भिंगातून तपासून भले मोठे प्रतिसाद देत सुटले आहेत. सनातन प्रभातच्या
>> सदस्यांची चौकशी हा त्यांना हिंदुत्वावरचा आघात वाटला. इतर हिंदू निरुपयोगी आहेत असा आक्रोश त्यांनी
>> केला म्हणून हा शेरा होता.
बाफशी विसंगत विषय!
३.
>> हे समजण्याची बुद्धी त्यांना असती तर तर हाजी मस्तानला भविष्यातून नामांतर चळवळीत त्यांनी ओढले
>> नसते
तुम्ही कसा काही कारण नसतांना हिंदूंचा विषय ओढून ताणून आणलात. तुम्ही जे विषयबाह्य क्षेत्रात केलंत ते मी कालबाह्य क्षेत्रात केलं. मग एकाने गाय मारली की दुसर्याने वासरू मारायचं असतं, हे विसरलात वाटतं!
आ.न.,
-गा.पै.
मुद्दाम हसेन, >> याच हाजी
मुद्दाम हसेन,
>> याच हाजी मस्तानचे आणि इतरही स्मगलर्स, देशद्रोही वगैरेंचे वकीलपत्र नेहमी घेणा-या वकिलाला त्यांच्या
>> हिंदुत्ववादी सरकारने कायदामंत्री बनवले होते.
भाजप आणि हिंदुत्ववादी? किती विनोदी लेखन करायचं ते!
आ.न.,
-गा.पै.
(No subject)
उद्दाम हसेन | 20 September,
उद्दाम हसेन | 20 September, 2013 - 13:40>>>एक देश सोडून गेलेले आणि एतद्देशियांना देशद्रोही म्हणणारे एक हिंदुत्ववादी त्या पोस्टला भगव्या भिंगातून तपासून भले मोठे प्रतिसाद देत सुटले आहेत.>>>>
سيد उद्दाम हसेनसाहब !!!
स्वदेश सोडून परदेशी गेल्यावर तेथे स्थापन झालेल्या व तेथून यु.एस् कायद्यानुसार (Maayboli is an interactive computer service as defined by 47 U.S.C. § 230.) कार्यरत असणार्या Maayboli Inc च्या वेबसाइईट वर आपण ही प्रतिक्रिया देत आहात हा एक मोठा विनोदच म्हणावा लागेल. मायबोली हे जगभरात पसरलेल्या मराठी बांधवांसाठी एकप्रकारचे व्यासपीठ असल्यामुळे, खरं तर येथे एखाद्यावर प्रतिक्रिया देताना ती त्याचा वास्तव्यावर देता त्याच्या वक्तव्यावर दिली जावी असे मला वाटते. तथापि; जेव्हा मुद्दा संपतो तेव्हा मुद्दामहून परदेशीपणाचा मुद्दा डाोके वर काढताो हे मी कि्त्येक धाग्यावर पाहिले आहे.
Pages