पाणी - २ ते ३ कप
अगर अगर पावडर - २ / ३ टी स्पुन , एका कपाला एक टीस्पुन
फळे - आवडीची. डाळींब, अननस, केळं, सफरचंद
क्युब चीज - १ क्युब
रुहअफझा - १ टे स्पु.
साखर - चवीपुरती साधारण १ ते २ टी स्पुन.
मीठ - कणभर
- डाळींब सोडून फळे इतर अगदी बारीक स्लाईस करुन घ्या.
- चीज क्युब चे बारीक स्लाईस करुन घ्या.
- एका सपाट भांड्यात तळाशी फळे पसरवुन टाका. त्यावर चीज चे काप पसरवा.
- आता दुसर्या एका भांड्यात २ कप पाणी ( किंवा फळांच्या थराच्या वरपर्यंत येईल इतके) उकळत ठेवा. त्यात साखर , मिठ घाला.
- पाणी उकळले की एका कपाला एक टी स्पुन या प्रमाणात अगर अगर पावडर घालुन लग्गेच ढवळा.
-८ ते दहा मिनीटे मंद आचेवर हळु हळू ढवळत रहा.
- गॅस बंद करुन त्यात रुहअफझा टाका
- आता हे मिश्रण मांडलेल्या फळांवर ओता
- फ्रिजमधे ठेवुन एक तासात जेली सेट होते. ( अगर अगर असल्याने बाहेर ठेवुनही जेली सेट होते पण त्याला वेळ लागेल )
- थंडगार खायला घ्या. उन्हाळ्यात खायला मस्त पदार्थ आहे!
- फळात पपई, टरबुज वापरु नका जेली सेट होत नाही ( असे नेटवर वाचलेले आठवते )
- अगर अगर टाकल्यावर लगेचच ढवळा नाहीतर त्या गुठळ्या होतात .
- आधी नुसती फळे घालुन केले होते, स्पर्धेसाठी चीज घालुन करुन पाहिले. चीझ चेरी पायनॅपल स्टीक्स सारखी चव लागते.
जेली सानुच्या आवडीची. करुन
जेली सानुच्या आवडीची. करुन बघेन
वॉव. मस्त!!! आमच्याकडच्या हाफ
वॉव. मस्त!!!
आमच्याकडच्या हाफ तिकिटाला खूप आवडेल हा पदार्थ.
मस्त दिसतेय
मस्त दिसतेय
मस्त आयडिया!
मस्त आयडिया!
आईशप्पथ!! कसली भारी दिसतेय
आईशप्पथ!! कसली भारी दिसतेय जेली. मस्त मस्त मस्त!
ती अगर अगर पावडर मी घेऊनच येते आता. फळं चिक्कार आहेत घरात.
अगरगर काय असतं? कोणी तरी करुन
अगरगर काय असतं?
कोणी तरी करुन खायला घाला रे
मस्त दिसतेय.
मस्त दिसतेय.
वॉव! अप्रतिम दिसतंय
वॉव! अप्रतिम दिसतंय
Chhan
Chhan
जबरी दिसतेय जेली. आमच्याकडे
जबरी दिसतेय जेली. आमच्याकडे पण जेली बनवणे आणि खाणे हा आवडता प्रकार आहे. नक्की करणार.
जबरदस्त फोटो! सुंदर!! हाच
जबरदस्त फोटो! सुंदर!!
हाच प्रकार रेडीमेड जी जेली तयार करण्याची पाकीटं मिळतात ते वापरून सुद्धा करता येईल. त्यात फ्लेवर असतोच त्यामुळे वेगळं म्हणजे फळं घालता येतीलेत.
मी पण करून ठेवीन आता फ्रिजात... जाता येता किंवा जेवणानंतर खायला होईल...
मला एक सांगा, तयार जेली फ्रिज मध्ये किती दिवस राहील?
वॉव! मस्त दिसतयं
वॉव! मस्त दिसतयं
हाच प्रकार रेडीमेड जी जेली
हाच प्रकार रेडीमेड जी जेली तयार करण्याची पाकीटं मिळतात ते वापरून सुद्धा करता येईल. त्यात फ्लेवर असतोच त्यामुळे वेगळं म्हणजे फळं घालता येतीलेत.>>> +१
लगेच करून बघते. चीज, फळं आणि जेलीमिक्स पाकिटं आहेतच घरात. आयडिया छान आहे.
थँक्यु हा पदार्थ घरच्या
थँक्यु
हा पदार्थ घरच्या हाफतिकीटासाठीच केला जातो
अगर अगर स्वीट कॉर्नरमधे मिळेल मंजूडी.
रिया, अगर अगर म्हणजे व्हेजीटेरियन जिलेटीन आहे. करुन बघ तु , खुपच सोप्पं आहे करायला. ( नाहीतर मी कसं केलं असतं ; )
योगेश, विकतच्या पाकीटांमधे फार स्ट्राँग फ्लेवर असतात. शिवाय इतर घटक, प्रिझर्वेटीव वगैरे असु शकतील. आणि त्यात जिलेटीन असते - अगर अगर नाही. त्याची जेली तितकी घट्ट होतही नाही माझी. हे फार सोप्पं आहे वापरायला. चव किती स्ट्राँग करायची ते आपल्या हातात. रसना, फ्रुट ज्युस घालुन फ्लेवर करता येतील सहज. मात्र अगदी अगर अगर मिळत नसेल तर ते जेलीमिक्स वापरता येतील
सह्ही दिसतयं.. मस्तचं!
सह्ही दिसतयं.. मस्तचं!
अ प्र ति म!!! बघुनच
अ प्र ति म!!! बघुनच बच्चेकंपनी खुष होईल अगदी.
त्याची जेली तितकी घट्ट होतही
त्याची जेली तितकी घट्ट होतही नाही माझी >>> जिलेटिन वापरायला हरकत नसल्यास पाकिटावर दिलंय त्याच्या पाऊणपट किंवा कमीच पाणी घातलं तर छान सेट होते त्याची पण जेली.
आता आठवलं माझ्या ऑफिसमध्ये संत्र्याच्या फोडी ग्रिल करून त्या जेलीत सेट करून त्याचं टॉपिंग असलेलं ऑरेंज-व्हनिला parfait मिळतं. अगदी 'जां निछावर' टाइप्स लागतं.
सुरेख दिसते आहे जेली. आणि
सुरेख दिसते आहे जेली. आणि सोपीही आहे. नक्की करणार. लेकाला आवडेल.
आता आठवलं माझ्या ऑफिसमध्ये
आता आठवलं माझ्या ऑफिसमध्ये संत्र्याच्या फोडी ग्रिल करून त्या जेलीत सेट करून त्याचं टॉपिंग असलेलं ऑरेंज-व्हनिला parfait मिळतं. अगदी 'जां निछावर' टाइप्स लागतं.
>>> वॉव, वाचूनच तोंपासू!
योगेश, विकतच्या पाकीटांमधे
योगेश, विकतच्या पाकीटांमधे फार स्ट्राँग फ्लेवर असतात. शिवाय इतर घटक, प्रिझर्वेटीव वगैरे असु शकतील. आणि त्यात जिलेटीन असते - अगर अगर नाही. त्याची जेली तितकी घट्ट होतही नाही माझी. हे फार सोप्पं आहे वापरायला. चव किती स्ट्राँग करायची ते आपल्या हातात. रसना, फ्रुट ज्युस घालुन फ्लेवर करता येतील सहज. मात्र अगदी अगर अगर मिळत नसेल तर ते जेलीमिक्स वापरता येतील>>> वक्के!
अगर अगर स्वीट कॉर्नरमधे मिळेल >> हे कुठेशी ठान्यात?
कूल.. मुलांना तर हे खासच
कूल.. मुलांना तर हे खासच आवडेल.. मी पण त्याच वयाचा आहे तसा
वाह काय सही दिसतय
वाह
काय सही दिसतय
पाऊणपट किंवा कमीच पाणी घातलं
पाऊणपट किंवा कमीच पाणी घातलं >> ओह तरीच.
संत्र्याच्या फोडी ग्रिल करून त्या जेलीत सेट करून त्याचं टॉपिंग असलेलं ऑरेंज-व्हनिला parfait >> भारी लागेल हे.
स्वीट कॉर्नर >> गोखले रोडवरुन राममारुती रोडवर जायला जिथे वळतो तिथेच आहे. स्टेशनकडुन आलात तर डावीकडे लागेल. त्याला व्हेजिटेरियन जिलेटीन सांगितले तर देईल तो.
छान .. फोटो मस्तच ..
छान .. फोटो मस्तच ..
मस्तं कल्पना आणि photo ! एकदम
मस्तं कल्पना आणि photo !
एकदम 'हटके' विचार केलाय :).
सुंदर फोटो! >>एकदम 'हटके'
सुंदर फोटो!
>>एकदम 'हटके' विचार केलाय
+१
सुंदर... मस्त दिसते आहे जेली.
सुंदर... मस्त दिसते आहे जेली.
यम्मी दिसतोय फोटो, जेलीची
यम्मी दिसतोय फोटो, जेलीची आयडीया खूप आवडली.
संत्र्याच्या फोडी ग्रिल करून त्या जेलीत सेट करून त्याचं टॉपिंग असलेलं ऑरेंज-व्हनिला parfait >> वाव. सहीच असेल.
स्पर्धा म्हणून चीज असू दे. पण
स्पर्धा म्हणून चीज असू दे. पण एरवी रूहअफ्झाच्या चवीबरोबर खाली शेवइ टाकून फालुदाच होईल की. तुमच हाफ तिकीट 'ये जवानी' मधल्या रणबीरसारख नाठाळ नाय दिसत. अख्ख्या सिनेमात तो रूह अफ्झा पीत नाही त्याला द्यायला पाहिजे हा पदार्थ नक्की :).
नाठाळ नाही गं. गुणाचं आहे. जे
नाठाळ नाही गं. गुणाचं आहे. जे देईल ते खाते ( तिच्याकडेतरी काय उपाय आहे )
हो हो फालुदाही होईल.
पण चिझ टाकून चव मला जास्त आवडली. शिवाय 'मम्मीभी खुष, बच्चाभी खुष' असाही फायदा झाला.
Pages