ग्रुप- पनीर + फळ
पनीर १ वाटी
सफरचंद १
मैदा १ टेबलस्पून
तूप
साखर
फ्रुट सॉससाठी स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लॅकबेरी अशा बेरीज्.
बंगाली मिठाईसाठी करतो त्याप्रमाणे पनीर करुन घ्यावे. घट्ट पिळून त्यातील सगळे पाणी काढून घ्यावे.
आता पनीर एकजीव करण्यासाठी किसुन घ्यावे अथवा मिक्सरमधुन काढून घ्यावे.
अर्धे सफरचंद किसुन घ्यावे. ते पनीर मध्ये मिक्स करावे.
आता जे मिश्रण तयार होईल ते जरा सैल असेल. घट्टपणासाठी त्यामध्ये १ चमचा मैदा घालावा. गोड्पणासाठी वाटल्यास थोडी पिठीसाखर घालू शकता.
आता ह्या मिश्रणाच्या टिक्की करून नॉनस्टिक पॅनमधे थोडे तूप टाकून दोन्ही बाजूनी शॅलोफ्राय करा.
नंतर त्याच पॅनमध्ये अर्धे किसलेले सफरचंद आणि बेरीजचे तुकडे आणि चवीपुरती साखर व थोडे पाणी घालून बारीक गॅसवर ठेवा. साखर विरघळली आणि मिश्रणाला जरा चिकटपणा आला की गॅस बंद करा. टिक्की आणि सॉस सर्व करा.
मी लाल आणि हिरवे अशी दोन्ही सफरचंद वापरली.
किसताना सफरचंदाच्या साली कडचा किस बाजूला काढून ठेवला आणि तो टिक्कीवर लावला, जरा कलरफूल दिसेल असे वाटले होते
टिक्की करण्यासाठी साचा वापरला आहे.
प्रयोग करण्याआधी यशस्वी होईल
प्रयोग करण्याआधी यशस्वी होईल की नाही अशी शंका होती म्हणून स्टेप्सचे फोटो काढण्याचे मनावर घेतले नाही.
मस्त दिसतायत टिक्क्या
मस्त दिसतायत टिक्क्या
वॉव! मस्त दिसतायत
वॉव! मस्त दिसतायत
मस्तच, नवीन प्रकार आहे हा!
मस्तच, नवीन प्रकार आहे हा!
मस्त फोटो.
मस्त फोटो.
मस्त असणारेय हे
मस्त असणारेय हे
छान प्रकार.
छान प्रकार.
प्रतिक्रियांबद्दल आभार
प्रतिक्रियांबद्दल आभार
छान दिसतोय हा प्रकार.
छान दिसतोय हा प्रकार.
मस्त दिसतायत.
मस्त दिसतायत.
छान आहे आयडिया ..
छान आहे आयडिया ..
मस्तं !
मस्तं !
फोटो उलट्या क्रमाने टाकले
फोटो उलट्या क्रमाने टाकले असते तर तीनही टिक्की एका मागे एक आ वासून सॉस कडे गेल्यासारखे दिसले असते
छान वाटतोय हा प्रकार!
छान वाटतोय हा प्रकार!
मस्त दिसतंय. आ वासून..
मस्त दिसतंय. आ वासून.. मिलिंदा LOL
छान ! मिलिंदा >>
छान !
मिलिंदा >>
धन्यवाद लोला, वत्सला,
धन्यवाद लोला, वत्सला, स्मिता!
मिलिंदा, मी फोटो तसाच काढला होता, इथे रोटेट करून टाकला
छान दिसतायत टिक्क्या.
छान दिसतायत टिक्क्या.
कठीण केलंत तुम्ही लोकांनी
कठीण केलंत तुम्ही लोकांनी जगणं अशा मस्त पाकृ देऊन
हे छान आहे! गार सर्व्ह केल का
हे छान आहे! गार सर्व्ह केल का गरम?? गार टिक्की वर गरम सोस?? मला ह्याच्याबरोबर व्हानीला आईस्क्रीम आवडेल
>>>>मला ह्याच्याबरोबर
>>>>मला ह्याच्याबरोबर व्हानीला आईस्क्रीम आवडेल डोळा मारा<<
सिमंतिनी,
मग तुम्हाला इथून डायरेक्ट 'आज व्यायम केला का?' इथे जावं लागेल. पनीर, मैदा, साखर..
त्यात ह्याच्यात आईस्क्रीम म्हनजे दूध व सफरचंद एक होणार... ते तुम्हाला कसे चालणार...( दोन मिनीटात विसरलात.. कमाल आहे हो.)
ह.घ्या.
ते तुम्हाला कसे चालणार..>>
ते तुम्हाला कसे चालणार..>> नाहीच चालणार्र म्हणून फक्त 'आवडेल' म्हणायचं, भला मोठा उसासा टाकायचा आणि 'मेलोड्रामा कि जय' म्हणून डब्यातील पोळीभाजी खायची...
माधवी,
माधवी,
कृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे 'पुर्णब्रह्म' असं लिहा.
संयोज़क बदल केलेला आहे.
संयोज़क
बदल केलेला आहे. (तुम्हीच केला का? मी बदल करायला गेले तेव्हा content has been modified by another user असा मेसेज आला.)
दोनदा पोस्ट झाले.
दोनदा पोस्ट झाले.
छान दिसताहेत टिक्क्या.
छान दिसताहेत टिक्क्या.
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.
पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383