मुख्य जिन्नस
पनीर
मक्याचे दाणे
चवीचे जिन्नस
आलं मिरचीचे वाटण
जिर्याची पूड
मीठ
इतर जिन्नस
बाऽऽरीक रवा
पाणी
योगायोग! केवळ योगायोग!
काही कुकारणांनी घरी आणलेलं दूध नासावं आणि सुलेखाची घावनं आठवावीत हा योगायोग.
त्याच दिवशी संयोजकांनी पूर्णब्रम्ह स्पर्धा जाहिर करावी आणि फ्रिजात मक्याचे दाणे सापडावेत हा तर मणीकांचनयोग!
लगेचच दुसर्या दिवशीच्या नाश्ता मुहुर्तावर ही धिरडी केली आणि तोंडून आपसूकच शब्द बाहेर पडला - 'अहाहा! मखमली धिरडी!'
कृती अगदी सोप्पी आहे. पाणी काढून टाकलेलं पनीर अर्धी वाटी घेऊन ते मिक्सरमधे अगदी छान गुळगुळीत वाटून घ्यायचं. त्यात वाटलेलं आलं, मिरची आणि अर्धी वाटी मक्याचे दाणे घालून भरडसर वाटून घ्यायचं. मग त्यात एक भांडभर पाणी, अर्धी वाटी बाऽऽरीक रवा, मीठ आणि जिर्याची पूड घालून साधारण दहा पंधरा मिनिटं झाकून ठेवायचं. रवा उमलून आल्यावर चांगल्या तापलेल्या तव्यावर धिरडी घालायची आणि चटणी, लोणी किंवा सॉसबरोबर खाऊन टाकायची.
१. पनीरमुळे ही धिरडी इतकी स्निग्ध होतात की तव्याला अजिबात तेल/ तूप लावावं लागत नाही. खातानाही पनीरचा अलवारपणा मस्तपैकी जाणवतो. मी घरचंच पनीर वापरलं, बाजारच्या पनीरचं काही माहिती नाही.
२. यात बाईंडिंगसाठी कुठलंही पीठ घालू नका, धिरडी गिच्च होतात. रवाऽऽच वापरा, तोदेखिल बाऽऽरीकच.
मध्यम/ जाड रवा मक्याची शान घालवतो.
३. ही धिरडी जरा उरपतायला नाजूक होतात, त्यामुळे धिरडी करताना घिसाडघाई, धसमुसळेपणा इत्यादी पंचाक्षरी, षडाक्षरी कृती करू नका. पीठाची कन्सिस्टन्सी हुकमी ठेवा.
aali aali. tikhat Manju aali.
aali aali. tikhat Manju aali.
वॉव मंजूडी! मी केलेल्या
वॉव मंजूडी!
मी केलेल्या पाकृमधून थोडे पनीर शिल्लक आहे, करून बघेन. फोटो छान टाकलाय
mast vatayet dhiradi. karun
mast vatayet dhiradi. karun baghanar nakki.
छान. नाहीच जमली तर त्यातच
छान.
नाहीच जमली तर त्यातच कणीक घालून पराठे लाटता येतील. (अर्थात हवे तेवढे पंचाक्षरी षडाक्षरी नाच करता येतील. :P)
मंजुडी, खूपच छान.धिरड्याचा
मंजुडी,
खूपच छान.धिरड्याचा मऊ-लुसलुशीतपणा अगदी जाणवला मला...लिखाण मस्त जमले आहे.
मस्त
मस्त
षडाक्षरी>>> थँक्यू गं स्वाती
षडाक्षरी>>> थँक्यू गं स्वाती
ओ संयोजक, एवढं बदलते हां मी वरती.
स्वाती, लाट पराठे लाट, पण कणकेत 'ते' घाल. त्यात कणीक घातलीस तर घरातच डिस्कोदीवानेऽऽ आहा!
(No subject)
पाककृती सांगायची पद्धत आणि
पाककृती सांगायची पद्धत आणि प्रेझेंटेशन दोन्ही आवडलं. इंटरेस्टिंग वाटतेय, मुहुर्त लागला की करून बघणार.
मस्त!
मस्त!
धिरडी मस्तच आणि प्रस्तावनापण
धिरडी मस्तच आणि प्रस्तावनापण मस्त.
मस्त वाटतय. एकंदर
मस्त वाटतय.
एकंदर लिहिण्याच्या स्टाईलवरुन मंजुडीने नाचत नाचत ही धिरडी केलीत हे जाणवते. (डो.मा)
धिरडी आणि मखमली?? मुलायम
धिरडी आणि मखमली??
मुलायम धपाट्यांसारखं वाटतंय.
छान.
प्रस्तावना आवडली
प्रस्तावना आवडली
ही "मुला" "यम" धिरडी आमच्यात
ही "मुला" "यम" धिरडी आमच्यात कधी घडतिल तेव्हा घडतिल...
पण ही पाकृ आणि ती लिहायची इष्टाईल... लsssय (बाsssरिक च्याच तालात) भारी.
मंजुडे... झक्कास
व्वा व्वा! अगदी मखमल इफेक्ट
व्वा व्वा! अगदी मखमल इफेक्ट जाणवतोय फोटोतुन
योगायोग अगदी जमून आला छान आहे पाकृ
मस्त आहे ईश्टाईल अन रेस्पी
मस्त आहे ईश्टाईल अन रेस्पी सुद्धा!
व्वा व्वा! लिहण्याची ष्टाईल
व्वा व्वा! लिहण्याची ष्टाईल नि फोटो ..दोन्ही मस्त!!
मक्याचे दाणे ,रवा आहेच.. पनीर आणुन करेन आजच
लिहायची स्टाईल खूपच आवडली आणि
लिहायची स्टाईल खूपच आवडली आणि पाकृ मस्त दिस्तिये अगदी!... यम्मी!! नक्की करून बघेन! (असे योगायोग घडण्याची वाट न बघता! :डोमा:)
सोपी रेसिपी ...नक्की करुन
सोपी रेसिपी ...नक्की करुन बघणार
सही!
सही!
तिखट मंजूडी, पाकृ लिहायची
तिखट मंजूडी, पाकृ लिहायची पद्धत फक्कड जमलीये तुला आता
सुलेखाच्या कृतीने धिरडी खरंच मुलायम होतात. त्यात मक्याची अॅडिशन चांगली आहे. बाऽऽरिक रवा आहे घरात. करेन लवकरच.
पाककृती सांगायची पद्धत आणि
पाककृती सांगायची पद्धत आणि प्रेझेंटेशन दोन्ही आवडलं. इंटरेस्टिंग वाटतेय, मुहुर्त लागला की करून बघणार>>> हेच म्हण्ते
मस्त रेसिपी , उद्याच करणार
मस्त रेसिपी , उद्याच करणार
मस्त दिसतायत धिरडी ! (३र्या
मस्त दिसतायत धिरडी ! (३र्या टिपेमुळे मी करायची शक्याता कमी वाटते()
वा! छानच लागतील ही धिरडी.
वा! छानच लागतील ही धिरडी. नक्की करणार. सांगितलीयेस पण एकदम खुसखुशीत स्टाईलनी.
घरातले लोक पनीर खात नाहीत, आता यातून खायला घालता येईल.
व्वा मस्त !!! नक्की करणार
व्वा मस्त !!! नक्की करणार
मी आईला करायला सांगेन अगदी
मी आईला करायला सांगेन
अगदी टिपांसह
सई, घरातले लोक पनीर खात नाहीत, आता यातून खायला घालता येईल.>>> अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र! मला बोलवत जा मग जेवायला पनीर करशील तेंव्हा
लिहायची स्टाईल मस्तय. पण मी
लिहायची स्टाईल मस्तय.
पण मी तशीही घावनं /धिरडी याबाबतित थोडी ढ आहे आणि त्यातनं तूझी टिप नं ३ अजूनच घाबरवतेय.
धसमुसळेपणा इत्यादी पंचाक्षरी,
धसमुसळेपणा इत्यादी पंचाक्षरी, >> हे एकदम भारी.
Pages