Submitted by संयोजक on 30 August, 2013 - 08:42
गणपती बाप्पा मोरया!
"आमचा विन्या ना,गणेशचतुर्थीचा हो, म्हणून तर चांगलं विनायक नाव ठेवलंय"
"ह्या घराचं डील बघा, गणपतीच्या मुहूर्तावर झालंय. अगदी भाग्याचं ठरलंय हे आम्हाला"
"ती हो म्हणावी असा नवस केला होता, उत्सवाच्या मिरवणूकीतच होकार मिळाला"
"हा व्हाईट माऊस ना, मुलांनीच आणला मागच्या गणपतीत, आता गणपतीच्या दिवसांत उंदीरमामा नको कसे म्हणणार?"
या आणि अशा काही मनस्पर्शी, चटकदार किंबा मजेशीर गणपतीच्या दिवसांच्या आठवणी तुमच्याकडे असतील तर मायबोलीकरांना कळू द्या.
या आठवणी धाग्याच्या प्रतिसादातच द्यायच्या आहेत. चला तर या आठवणींना शब्दांत उतरवूया अन वाटून घेऊया त्यांचा आनंद सगळेजण !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा! छान उपक्रम.
वा! छान उपक्रम.
मला तर एक गोष्ट सर्वात
मला तर एक गोष्ट सर्वात आवडायची , ती म्हणजे शाळेला सुट्टी असायची, म्हणजे जबरदस्तीनी घेतली जायची... ह्या ना त्या कारणाने.. जसे काल उशीरा झोपलो. आज पोटात दुखतय खूप गोड मोदक, मिठाई खावून वगैरे.
आमच्या शेजारीच काका रहायचा, त्यांच्याकडे घरचा बप्पा. मग काय वेगवेगळे पदार्थ रोज, उशीरा झोपणं,खेळ, गप्पा, खाणं, ओरडून आरत्या म्हणणं (भले पुर्ण येवोत न येवो... कित्येकदा मला चुकीची एकायला आलेली आरती असे व्हायचे.. पण म्हणायचो... जे काही कानावर जसे एकायला यायचे ते), प्रत्येकाच्या घरी जावून आरत्या..... हेच ह्या सणाच्या आठवणी. आणि ह्याच कारणासाठी हा आवडता. कारण ती एनर्जी इतकी असायची ना .. ती फक्त ह्याच सणात असायची(असायची कारण आता... हे सर्व गेले ते दिन गेले... ह्यात जमा आहे.).रात्रीचे मूवीज पहायचो जागून.. भजनं असायची कोणा ना कोणाच्या घरी. सर्व सार्वजनिक गणपती बघायचो.. अगदी चालत जावून रात्री रात्री उशीरा.
हिच मजेशीर आठवण आहे माझ्या मनात. अगदी खास आठवण म्हटले तर कॉलेजला गेले तेव्हा, बाबांनी माझ्यासाठी घेतलेली पहिली वहीली स्कूटर अश्याच एका गणपतीच्या दिवसात घेतलेली. व ती घरी आलेल्या प्रत्येक चुलत-मावस भावंडानी/मित्रांनी जमेल तशी कॉलनीत चालवून आता मोडतील की काय अवस्था केलेली... मग शेवटी बाबांनीच त्यांच्या मित्राकडे नेवून लपवली गणपती जाईपर्यंत.
गेले ते दिन गेले.. पुर्वी
गेले ते दिन गेले..
पुर्वी सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे मोठी पर्वणीच असायची. जादूचे प्रयोग , मुलांनी बसवलेले नाटक, सामना, बाँबे टु गोवा, डॉन, अमर अकबर सारखे सिनेमा आणि काय काय सगळी मज्जा मज्जा असायची.
आजकाल मात्र,
?
?
?
माझा मुलगा गणेशचतुर्थीचा.
माझा मुलगा गणेशचतुर्थीचा. तारीख दिली होती २४ सप्टेंबर, पण हा झाला ११ सप्टेंबरला गणेशचतुर्थीच्या दिवशी. मला तर मुलगीच हवी होती, त्यामुळे मुलीचं नाव फायनल केल होत. पण मुलगा झाला, तो पण गणेशचतुर्थीला म्हणून गणपतीच 'अथर्व' नाव ठेवलं. आता ३ वर्षाचा आहे मुलगा.
झंपी छान लिहिलंत. अजून येऊ
झंपी छान लिहिलंत.
अजून येऊ द्यात आठवणी लोकहो.
अवंतिका , माझा भाऊ पण गणेशचतुर्थीचा.
त्याचं नाव अमेय ठेवलंय.
जयंत पाठक, अगदी अगदी.
अगोदर ते रीळामागून रीळे चढवायचे पडद्यावरचे पिक्चर, मग व्हिडिओच्या खोक्यातले पिक्चर अशी गणपतीच्या निमित्ताने एकत्रं बघायला मजा यायची.
माझ्याकडे गणेशोत्सवाच्या अगदी
माझ्याकडे गणेशोत्सवाच्या अगदी रंगबेरंगी आठवणी आहेत.
मी साधारण ७-८वीत असेन तेंव्हाची गोष्ट. खुप चांगल्या चाललेल्या माझ्या बाबांच्या बिझनेसला पार्टनरने धोका दिला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आम्ही अक्षरशः रस्त्यावर आलोत म्हणलं तरी चालेल.
साधारण ऑगस्ट -सप्टेंबरचा काळ होता तो. आता पोटा पाण्याला काय म्हणून त्या काही दिवसांसाठी बाबांनी गणपती विकायचं ठरवलं. मला ते दिवस स्पष्ट आठवतात. भाड्याने घेतलेलं छोटसं दुकान, त्यात दिवसभर बसणारे बाबा, आणि किती मुर्ती बूक झाल्या याचा हिशोब करणारी माझी पहिलीतली बहिण. नातेवाईकांनी फिरवलेली पाठ आणि परक्यांनी उगाच म्हणून घेतलेल्या दोन-दोन मुर्त्या...
पुढे गणरायाच्या आशिर्वादाने आम्ही त्या परिस्थीतीतून बाहेर आलोत पण आजही गणपती उत्सव जवळ आला की मला ते दिवस आठवतात आणि पोटात कालवाकालव होते. दिवस बदलले तसं रक्ताच्या नात्यांना बदलेलं पाहिलं आणि श्वासाच्या नात्यांना आणखीन घट्ट होताना पाहिलं.
त्या दिवसांनी खुप काही शिकवलं.
एकदा गणपतीत ना आमच्याकडे - एकी, भगवंतावरची अतुट श्रद्धा आणि स्वतःवरचा आणि कुटुंबावरचा अढळ विश्वास अशा सगळ्यांचीच ओळख पटली
सध्या इतकंच...
आणखी लिहीन
रिया..
रिया..
रिया पण छान लिहिलंयस
रिया पण छान लिहिलंयस गं.
झंपी आणि इतर
रिया.. खूप हृदयद्रावक लिहिलंस
रिया.. खूप हृदयद्रावक लिहिलंस ग.. पण अशा गोष्टी स्ट्राँग करतात आपल्याला.
माझी आठवण मजेदार पण अर्थातच कवितांशी निगडित आहे.
एकदा एक सरदारजी लख्खा सिंग ( हे तिकडे दिल्लीत वगैरे फेमस गायक आहेत, हिंदी व पंजाबी गाणी गातात) गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी माझ्या एका स्टाफ मेंबरबरोबर माझ्याकडे आले. मला म्हणाले की मी मुंबईत कधीमधी कार्यक्रम करतो तर आता मला गणपतीची मराठी गाणी गायचीत ! तू लिहितेस म्हणून ऐकलं. तर मला लिहून देशील आठ गाणी ?(= एक ध्वनिफीत/सीडी )
मला कौतुक वाटलं. बघा सरदारजीला किती कदर आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीची.
गंमत म्हणजे त्या गणेशचतुर्थीला मी एका बैठकीत आठ गाणी लिहिली श्रीगणेशावर आठ तर्हेची, एक प्रकारचा रेकॉर्ड माझ्यापुरता. अन सरदारजीला फोन केला.
तर महाशय म्हणतात आता एक संगीतकारही आण, म्हणजे मी त्याला घेऊन अमुकतमुक म्यूझिक कंपनीकडे जातो ! यावर मी चाट ! मी म्हटलं बाबा ते मी कसं करणार ? मी फक्त लिहू शकते.
त्यावर सरदारजी दोन तीन वेळा आले, भेटले, बोलले.माझ्यासाठी त्यांच्या सीडीज भेट म्हणूनही आणल्या त्यांनी . तुणतुणं एकच. संगीतकार आण ना.
ते मला कधीच जमलं नाही. परिणामी पुढे काहीच घडलं नाही.
सरदारजीचा हा विनोद मात्र अगदी ओरिजिनल होता माझ्यासाठी.
रिया तुझ्या कुटुंबाचा अनुभव
रिया तुझ्या कुटुंबाचा अनुभव ऐकूण एकदम नि:शब्द झाले, डोळे भरून आले, बाप्पा सर्वांना सुखी ठेव अशी वेळ कोणावरही यायला नको.
जयंतजी छान आठवण पण माझ्यामते टिळकनगरचा बाप्पा अजूनही आपली शान राखून आहे आणि चांगले कार्यक्रम होतात तिथे.
रिया, आपल्यावर वाईट वेळ येते
रिया, आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हाच माणसांचे खरे स्वभाव कळतात. कोण आपलं आणि कोण परकं ह्याचा अनुभव येतो. 'असतील शितं तर जमतील भूतं' उगाच म्हणत नाहीत.
सायो +१.
सायो +१.
सायो +१ रिया, बिग हग !
सायो +१
रिया,
बिग हग !
रिया.... अगदी मनातलं
रिया.... अगदी मनातलं लिहिलंयस. अ बिग हग!
रिये, मनापासुन लिहिलयस!
रिये, मनापासुन लिहिलयस!
माझ्याकडुन पण एक आठवणः
१९९९-२००० सालची गोष्ट. बाबांनी नुकतच बांधलेल्या घरात रहायला आलो होतो तेव्हा. काही बांधकाम बाकी होतं. पुढचा हॉलच्या हॉलच्या भिंती, जिना, प्लॅस्टर ई. वॉल कंपाउंड तर अजुन पुढची गोष्ट. त्या एरियात तेव्हा एवढी वस्ती नव्हती. गल्लीतही तुरळक घरं होती. शेजारच्यांचं घर अगदी लागुन होतं.
हौसेनं गणपती बसवला. विसर्जनाच्या दिवशी, सेंधव्याहुन नुकतीच पुण्यात शिफ्ट झालेली माझी चुलतबहिण, तिचा नवरा आणि दीड्-दोन वर्षाच्या मुलासहित आली होती. दुपारी जेवणं झाली. सं.५.३०-६.००ला उत्तरपुजा करतच होतो. आम्हा दोघींची मुलं (माझा मुलगा तेव्हा ३वर्षाचा होता) आजुबाजुला खेळत होती. खेळता खेळता, घराभोवती चकरा मारतांना दोघं मागच्या बाजुला (दक्षिणेला) गेली. तिकडे शेजारच्यांच्या टॉयलेटची टाकी होती. त्यावरील झाकणाच्या जागी त्यांनी फक्त एक सिमेंटचं रिकामं पोतं टाकलेलं. उन्हा/पावसाने अर्थातच ते कुजलेलं होतं. आधी तिकडुन माझा मुलगा पळत आला. तो बहिणीच्या मुलापेक्षा थोडा मोठा असल्याने त्यावरुन उडी मारुन आला. पण बहिणीचा छोटा मुलगा त्यावरुन उडी मारु शकला नाही. त्याचा पाय त्या सिमेंटच्या रिकाम्या पोत्यावर आणि नंतर डायरेक्ट आत!
शेजारच्यांची ती टाकी ९-१० फुट खोल. म्हणजे आमच्या आख्ख्या कॉलनीत सर्वात खोल त्यांचीच टाकी होती. मुलगा पडल्यावर आधी तळाशी जाउन परत वरती आला. इकडे आमची उत्तरपुजा सुरु होती. माझा मुलगा पळत येउन सांगायला लागला, की 'सनी टाकीत पडला'. आम्ही पुजा तशीच टाकुन तिकडे धावलो. बहिण तर रडत मटकन खालीच बसली. सनीने तोपर्यंत २-३ गटांगळ्या खाल्ल्या असतील. एका क्षणी तो वरती आला, म्हणजे त्याचे केस पाण्यावर दिसले. त्याक्षणी बाबांनी ते इवलेसे केस ओढुन, होता नव्हता तो जोर लावुन त्याला वरती खेचला. पोट दाबुन आधी त्याच्या पोटातलं पाणी काढलं. सुदैवाने शुद्धीवर होता. अशा वेळेस घाणीची/ घाण पाण्याची पर्वा कोण करतं? आईने त्याला पदराने पुसुन तसच घेउन शेजारच्यांकडे गेली. तर शेजार्याची (सुविद्य ?) पत्नीने "काय झालं? कसा पडला? " वै. विचारण्याचं ही सौजन्य दाखवलं नाही. (आणि त्या बाई तेव्हा पाळणाघर चालवायच्या. ). नंतर डॉक्टरकडे नेउन सनीला आवश्यक ती औषधं दिली. मुलाचा जीव वाचला.
त्यावर्षी आम्ही बाप्पाचं विसर्जन केलं नाही. वर्षभर ठेवुन त्याची पुजा-अर्चा करत होतो.
ही घटना आम्ही आयुष्यभर विसरणार नाही.
मैत्रिणींनो!!!!!!!!!!!! नुसते
मैत्रिणींनो!!!!!!!!!!!!
नुसते शब्दच किती आधर देतात याची प्रचिती आली
ते दिवस गेले, आठवणी नाही विसरता येणार पण तुमचे शब्दही कायम लक्षात रहातील
थँक्स!
रिया, न विसरता येणारी आठवण,
रिया, न विसरता येणारी आठवण, छान लिहिलीस.
आर्ये, बाप्पानेच वाचवल ग सनीला. खरा विघ्नहर्ता. मंगलमूर्ती मोरया!
रिया पाणी आणलंस डोळ्यात..
रिया पाणी आणलंस डोळ्यात..
रिया, छान लिहिलयं!!! मी_आर्या
रिया, छान लिहिलयं!!!
मी_आर्या ... बापरे अंगावर काटे आणणारा प्रसंग आहे!
आर्या खरंच अंगावर काटा आला
आर्या खरंच अंगावर काटा आला प्रसंग वाचून, शेजाऱ्यांचा किती हलगर्जीपणा आणि वरून सौजन्यही नाही, खरंच वाचवले देवाने पण प्रसंग खूप बाका होता.
चला मी पुन्हा आले माझ्या
चला मी पुन्हा आले
माझ्या लहानपणी आम्हाला मोठ्या दादा मंडळींसोबत गणपती बसवायची खुप इच्छा असायची. पण ते आम्हाला घ्यायचेच नाहीत
मग एके वर्षी मी पुढाकार घेतला आणि माझ्या वयाच्या चिल्ल्या पिल्ल्यांना जमवलं ( मी तेंव्हा आठ वर्षाची वगैरे असेन). शाळेतली एक वही घेतली आणि शेजारी रहाणार्या एका ताई कडुन खुप सार्या पानांवर (म्हणजे १५ ते २० पानांवर पण त्या वेळी ते खुप वाटायचे) 'बालचमू मित्र मंडळ' असं लिहुन घेतलं ही झाली आमची पावती.
मग मी आणि आणखी दोन तीन पोरं सगळ्या सोसायटीत वर्गणी द्या वर्गणी द्या म्हणत फिरायला लागलो
त्यांना रितसर पावती पण देत होतो (कोरी )
ती मंडळीही कौतुकाने आम्हाला पैसे देत होती (२५ पैसे, ५० पैसे... मॅक्स म्हणजे २ रुपये पण म्हणून काय झालं )
गणपती बसवायच्या आदल्या दिवशी पैसे मोजले. ते पुरे २० रुपये भरले. आणि आम्ही जाम खुष झालो.
आता पुढची पायरी होती गणपतीची मुर्ती आणायची आणि मांडव बांधायचा
हे कसं करणार ते काही कळायला मार्ग नाही. मग एकाच्या डोक्यात आयडीया आली आपण पार्किंगमध्ये आडोसा करुयात. पण गणपती जमिनीवर कसा बसवणार? मग माझ्याकडे एक प्लॅस्टीकची खुर्ची होती छोटीशी, पिवळ्या रंगाची ( अनेकांना माहित असेल ही) ती आणली. कोणाकोणाच्या तायांच्या ओढण्या आणल्या आणि पार्किंग मधल्या खांबांवर टाकल्या.. मांडव झाला तयार मध्ये खुर्ची ठेवली.
आता पुढे मुर्तीचं काय? २० रुपयात कुठली मुर्ती येणार? सगळ्यात छोटी मुर्ती पण ३० रुपायची होती. घरात पिगी बँक होती पण आई वडीलांना न विचारता तिला हात कसा लावणार? मग आम्ही एक शक्कल लढवली
माझ्या आईला शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गणपतीची छोटीशी मुर्ती गुरुपौर्णिमेनिमित्त गिफ्ट केली होती.. मी म्हणाले आपण हीच बसवुयात
आता एवढे (? ) पैसे उरलेत तर त्याचं काय करायचं ते कळेना. मग ठरलं रोज प्रसाद आणायचा. मोठ्या मंडळाचे दादा गाणी पण लावतात, सजावट करतात मग आपण काय करायचं?
मग एका मुलाने घरुन वॉकमन आणला (नंतर कळालं की तो घरी न सांगता आणलेला.. लै धुतला त्याला घरच्यांनी ) त्यात जी मिळेल ती कॅसेट टाकून आमच्या गणपती पुढे लावली....
देखावा कुठला या वर एक आयड्या सुचली... त्या काळात भुताचे, हनुमानाचे, मिकीचे मुखवटे मिळायचे आणि प्रत्येकाकडे ते असायचेच! मग आम्ही ते मुखवटे घालून , अंगवर शाल पांघरून त्याच्या समोर नाचायचं ठरवलं! हा झाला आमचा देखावा
आता ही सगळी आधीची तयारी झाली. पुजेच्या दिवशी आम्हाला दिसलं की दादांच्या मंडळात एक उघडे बंब भटजी धोतर घालून आलेत आणि त्यांना शेंडी पण आहे आणि ते पुजा सांगतायेत... आमच्याकडे भटजीच नाहीत
मग आता? मग आमच्यातल्याच एका मुलाला सांगितलं जा धोतर घालून ये... त्याच्याकडे काही धोतर नव्हतं... मग मी आमच्या घरातला पांढरा पंचा आणला आणि त्याला लुंगी सारखा नेसायला लावला. तो काही शर्ट काढायला तयार नाही... आम्ही समजावतोय समजावतोय पण तो ऐकायलाच तयार नाही. मग मी त्याच्या एक कानफाडात ठेवून दिली आणि सांगितलं की शर्ट नसेल काढायचा तर जा आमचं मंडळ सोडुन उद्या पासून आमच्या सोबत सायकल खेळायला आलास तर बघच!
मग बिचार्याने शर्ट काढला नाईलाजाने पण आता शेंडी कुठुन आणायची? मग पुन्हा मी माझं सुपिक डोकं चालवलं आणि आईची काळी ओढणी आणली आणि बायका केस धुतल्यावर ती जशी डोक्याला बांधतात तशी त्याच्या डोक्याला बांधली शेंडी तयार!
जानवं तसं सोप्पच होतं.. हाराचा दोरा सोडला आणि लटकवला गळ्यात! सो आमचे भटजी तयार झाले
मग उगाच तोंडाने त्याने पुटपुटल्यासारखं केलं आणि झाली आमची प्रतिष्ठापना
रोज लिमलेटच्या गोळ्या आणायचो प्रसादाला
दहा दिवसात सगळी गर्दी मोठ्या बाप्पाकडेच! मग आमचा एगो दुखावला... मग आम्ही तसेच ते राक्षसाचे, हनुमानाचे मुखवटे घालून त्या गर्दीत घुसायचो आणि तिथल्या गर्दीतल्या माणसांना आमच्या मंडळात खेचत आणायचोत
दादा लोकं रागाने आम्हाला हकलायचे तरी आम्ही काही तिथुन निघायचो नाहीत
त्या गर्दीतुन एखादा जरी माणूस आमच्या मंडळाकडे यायला तयार झाला की दादा लोकांना खुन्नस देत जीभा दाखवत पळायचोत! मग त्या माणसाला डान्स करुन दाखवायचा, प्रसाद द्यायचा आणि मग सोडायचं
रोज तीच गाणी, तेच डान्स
अनेक शेजारी कौतुकाने हे माकडचाळे सहन ही करायचे
अशात आला शेवटचा दिवस! आता गणपती बसवलास म्हणजे विसर्जन पण करायलच हवं ना ! पण ती होती माझ्या घरची मुर्ती! तिचं विसर्जन केलं तर आई बडवेल चांगलीच! मग माझी जाम तंतरली. आता काय करू समजेना! मी म्हणूनही पाहिलं की आपण नको गणपती विसर्जन करायला. पण कोण ऐकणार माझं? स्पेशली तो भटजी झालेला मुलगा... त्याने तर वचपाच काढला... आता ही मुर्ती विसर्जन झालं नाही तर तुला सायकल खेळायला घेणार नाही म्हणायला लागला.नशीब आईने मुर्ती विसर्जनाची परवानगी दिली आणि माझं ग्रूप मधलं स्थान अबाधित राहिलं
त्यातंर काही कोणाला विषेश इच्छा राहिली नसावी बहुदा. किंवा मग मला त्यानंतरचे किस्से आठवत नाहीयेत.
काळाच्या ओघात हाही विसरले असते, पण त्या 'भटजी'च्या आईला ( माझ्या आईला - मारलेलं हो तुमच्या पोरीने माझ्या राजाला ) , माझ्या आईला ( लहानपणापासुनच आगाव होतीस तू) , आणि सोसायटीतल्या इतर लोकांना दर वर्षी ही आठवण येतेच
हाय मेरा बालपण!
गणपती बाप्पा मोरया!
रिया...
रिया...
अरे देवा रीया.. ह्याही
अरे देवा रीया.. ह्याही पोस्टने पाणी काढलं डोळ्यातून..
पण हसून हसून
मी एकटी इथे सेंच्युरी मारू
मी एकटी इथे सेंच्युरी मारू शकते
पण बास!
बाकीच्यांनीही ही लिहा ना
रिया आधी रडवून मग हसवण्याचा
रिया आधी रडवून मग हसवण्याचा उतारा भारीच आणि काय गं एवढी दादागिरी केलीस त्या बिचार्यावर?? त्याने वचपा काढला हे बाकी बरं झालं.. हिशोब असा वेळच्यावेळी चुकता करायची संधी त्याला मिळाली, हे छानच झालं..
रिया मस्तच, आधी रडवलेस आणि
रिया मस्तच, आधी रडवलेस आणि नंतर हसवलंस हा किस्सा सांगून.
रिया तुझ्या यशाचं रहस्य आता
रिया तुझ्या यशाचं रहस्य आता कळलं लय आगाव..
रिया कसलं भारी. आम्ही पण असाच
रिया कसलं भारी. आम्ही पण असाच उद्योग केला होता. आम्ही सक्खे चुलत मिळुन पाच भावंड. मोठ्या मंडळांना टक्कर म्हणुन गणपती बसवाय्चा ठरवला. मग पाच जणांचेच मंडळ. मोठि बहिण अध्यक्ष, दोन नं बहिण उपाध्यक्ष, मोठा भाउ खजिनदार आणि मी आणी माझ्या एवढा एक भाउ कार्यकर्ते. मग ते चार रुपयात छापिल पावती पुस्तक मिळते ते आणले. मग वर्गणी सुरु. आता तिथे बरेचशी दुकाने होती. घरे कमीच. बरेचसे दुकानदार आमचेच भाडेकरु. मग काय भरपुर वर्गणी जमली. (हजाराच्यावर). मग आता गणपती कुठे बसवायचा तर आमच्या घराच्या जिन्याच्या खाली जागा होती. बाहेरुन गेटपण होते. तीच फायनल केली. तिथे घरातलाच एक टेबल मांडला. आता गणपती कसा आणणार. कारण मि फक्त ६ वर्षांचि होते, भाउ ८ वर्षांचा, मोठ्या बहिणी ९,११ वर्षांच्या. मग आमच्या मोठ्या काकाने गणपती स्पोन्सर केला. तो पण पुण्याहुन खास आणला. आता तो गणपती एवढा मोठा होता कि त्या दादा लोकांच्या गणपतीपेक्षा मोठा वाटत होता.
मग डेकोरेशनचे काय? शेजारी एक इलेक्ट्रिकच दुकान होतं. त्याने येउन लायटींग केली, हॅलोजन लावले. लय भारी. सगळ बघायला गल्लितले बरेच जण येत होते. घरातलाच एका टेपवर गाणी लावुन डान्स करायचो. टिपर्या खेळायचो. अजुन पर्यंत वर्गणी तशिच्या तश्शिच होती. मग वडिल रोज आरती साठी प्रसाद आणायला लागले. कधि पेढे, बर्फि अजुन काही. आरतीला पण खुप गर्दी व्हायची. कारण असा उद्योग करणारे आम्हि पहिलेच होतो.
यथावकाश विसर्जनाचा दिवस आला. आदल्या दिवशी रात्रिपर्यं गणपतीसमोर खुप नाचलो. आता एवढ्या मोठ्या गणपतीचे विसर्जन कसे करायचे? कारण तो गणपती एकट्याला उचलन्या सारखा नव्हताच. मग परत त्या दादांच्या मंडळाकडे. मग त्यांच्या विसर्जनाच्या गाडीत आमचा पण गणप्ती नेला. उरलेल्या पैशांची मोठी खिरापत केली आणी सगळ्या दुकानदाराना भरपुर बांधुन दिली, अगदी घरच्यांसाठी पण. लय मजा आलती. आजपण तिथले लोक आठवण काढतात.
पेरू भारतीताई आणि बाकीच्या
पेरू
भारतीताई
आणि बाकीच्या सगळ्यांना - मी आता असं काही करत नाही
रिया, पेरु सहीये! एकदा असाच
रिया, पेरु
सहीये!
एकदा असाच गणपती आम्हीदेखील बसवलेला तेही अगदी १२ रुपये वर्गणीत.
टेबल घरचे, सजावटीचे सामान घरचेच्(वाढदिवसाला उरलेले फुगे, क्रेप पेपरच्या पट्या इ.)
मूर्ती एका काकांनी घरीच बनवून दिलेली. ते स्वतः घरी गणपती बनवायचे आणि स्थापना करायचे.
सगळे कसे A to Z इको फ्रेंडली!!
आम्हीच मग सर्व मुलांच्या स्पर्धादेखील घेतल्या होत्या. बक्षीस म्हणून पेन्सिली, रबर वाटले होते.
विसर्जन ५ दिवसांनी मूर्तिकार काकांच्या गणपतीबरोबर! सगळी गँग पायीच निघाली होती. दरवर्षी सगळे आठवण काढतात, तेव्हा मजा वाटते.