निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.
आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
शांकली, कधी कधी फुले एवढी
शांकली, कधी कधी फुले एवढी लहान असतात कि असे कॅमेराचे डोळे लावल्याशिवाय त्यांचे सौंदर्य जाणवतच नाही.
मानुषीचा फोटो बघून वाटायला लागले, कॉम्प्यूटर हे माध्यम गंधाची पण कधी जाणीव करुन देणार ?
तो दिवस दूर नसावा.
सुप्र
सुप्र निगकर्स.........
कॉम्प्यूटर हे माध्यम गंधाची पण कधी जाणीव करुन देणार ?
तो दिवस दूर नसावा.>>>>>>>>>>>> +१००
पुण्याच्या घरातलं बाल्कनीतलं हायकसचं(नाव बरोबर?) झाड.
याच बाजूने दिसणारे "फिंच"चे घरटे. म्हणजे खरं म्हणजे काहीच दिसत नाही.
आता या झाडाच्या मागे जाऊन काढलेला घरट्याच्या तोंडाचा फोटो. आत अक्षरशः झिग्झॅग रूम्स असणार आहेतसं वाटतं .
मानुषी, ते हायकस नाही, फायकस
मानुषी, ते हायकस नाही, फायकस नूडा किंवा बेंजामिना आहे.
फिंचचं घरटं मस्तच आहे.
आज आमच्या बागेत अॅशी आला होता. एकटाच इकडून तिकडे मजेत बागडत होता. अधून मधून काहिबाही बोलत पण होता. आपल्याच नादात, विश्वात त्याचं बागडणं मला किती आनंद देऊन गेलं हे त्याला समजलं ही नाही. त्याच्यामुळे आजचा दिवस माझा निखळ आनंदाचा गेला..... अगदी सहज आनंदाचा!!
हं.........शांकली बरोबर
हं.........शांकली बरोबर .......फायकसच.
आणि हा अॅशी कसा असतो?
शांकली.. खरेच गं असे अवचित
शांकली.. खरेच गं असे अवचित पाहुणे येतात आणि आनंद देऊन जातात.
माझ्या गच्चीत त्यादिवशी अचानक सातभाई आले. आमह्याइथे आहेत भरपुर पण असे घरात आले नव्हते कधीही. मी आणिऐशु दोघीही पडद्याआड लपुन पाहात होतो त्यांना. उगीच त्यांना कळले तर पोबारा करतील म्हणुन. थोडा कलकलाट करुन मग झाले पसार.
नॅशनल जिओच्या ह्या महिन्याच्या अंकात दोन्ही ध्रुवांवरचे सगळे बर्फ वितळल्यावर जे नवे जग तयार होईल किंवा उरेल त्या जगाचा नकाशा छापलाय. तो नकाशा बघुन मला हुडहुडी भरली.
समुद्रपातळी साधारण २१६ फुट इतकी वाढेल. म्हणजे समुद्रकिनारी वसलेली गावे, शहरे, देश सगळे गडप.. भारताच्या नकाशात कच्छचे रण बेट होईल आणि कलकत्ता मुंबई इ.इ.सगळे पाण्याखाली गडप होईल. बांगलादेशही जाईल, श्रीलंका अजुन आकुंचन पावेल.
याआधी बर्फमुक्त पृथ्वी ही परिस्थिती साधारण ३४० लाख (३४ मिलियन) वर्षांपुर्वी आलेली. परत नैसर्गिकरित्या हे व्हायला यापुढे ५००० वर्षांपेक्षाही जास्त काळ जाईल. पण मानव मात्र स्वतःचे शहाणपण आजसारखेच ह्यापुढेही दाखवत राहिला ही बिलामत लवकर ओढवुन घेईल.
अण्वस्त्रसज्ज मानवजात तोवर शिल्लक राहिल का की त्याआधीच सर्वनाश ओढवुन घेईल देव जाणे. सर्वनाशाचे शक्य तितके सगळे मार्ग त्याने तयार केलेले आहेत.
ओह्....साधना खूप इंटरेस्टिंग
ओह्....साधना खूप इंटरेस्टिंग पण भीतिदायक माहिती!
भीतीदायक खरे पण
भीतीदायक खरे पण नैसर्गिकरित्या हे होणारच आहे.
साधना, सातभाई आले होते? अरे
साधना, सातभाई आले होते? अरे वा! भाग्यच म्हणायचं! ह्या पक्ष्यांना आपल्या अस्तित्वाची जाणीव नसते तेव्हा ते ज्या मोकळेपणी बागडतात ते फारच आनंददायी असतं नै!!
आणि वर तू दिलेली माहिती सर्वांना नक्कीच विचार करायला लावेल यात शंका नाही.
हम्म्म्म्म्म्म्म! यावरच
हम्म्म्म्म्म्म्म!
यावरच विद्न्यानकथा वाचली होती. सगळं जग गोठतं. पण कुठे तरी एक जीवांश शिल्लक असतो त्यातून कालांतराने पुन्हा जीवसृष्टी निर्माण होते.
हाय लोक्स!... सध्या दै.
हाय लोक्स!...
सध्या दै. 'लोकमत' च्या दर बुधवारच्या 'युरेका' या पुरवणीत डॉ. साने मॅडमचे वृक्षपरिचयाचे लेख येत आहेत. काल दि. ११/०९/२०१३ च्या पुरवणीत कमळाबद्दल मस्त लेख आलाय तो इथे मुद्दाम देत आहे....
'पद्मपुराण'..........
'इचिरो ओहगा (Ichiro Ohga) एक जपानी तज्ञ. गोष्ट १९५० ची. त्यांना कोळशाच्या दलदलीत काही बिया सापडल्या. 'कार्बन १४' या कालमापन पद्धतीनं ओहगा यांनी त्या बियांचं वय आजमावलं. ते निघालं अंदाजे दोन हजार वर्षे. ओहगा महाशयांनी नंतर या बियांवर काही संस्कार करून, त्या रुजवल्या. बिया रुजल्या. रोपं उगवली. ओहगांनी ती दलदलीत लावली. आश्चर्य म्हणजे, या रोपांच्या छान वेली वाढल्या. त्या वेलींवर कमलपुष्पं फुलली. ओहगा तर या फुलांचं वर्णन करताना कवीच झाले. कमळाची कळी त्यांना 'साके' या मद्याची सुरई वाटली. दुसर्या दिवशी कळी उमलून त्याचा पेला झाला. तिसर्या दिवशी वाडगा, तर चौथ्या दिवशी बशी.
प्राचीन भारतीय संकल्पना आहे, की कमल-वेल अर्थात पद्मकमल अमर आहे. प्रत्येक देवतेच्या मूर्तीच्या पार्श्वभागी एक महिरप, कमान असते. त्या कमानीच्या तळाशी प्रत्येक बाजूला एक अक्राळ विक्राळ मुख असतं. हे मुख म्हणजे मकर, अर्थात मगरीचं तोंड. म्हणून हे मकर, किंवा मखर, (तोरण). या प्रत्येक तोंडातून एक वेल फुटलेली असते. मूर्तीच्या शीर्षस्थानी या दोन्ही वेली एकमेकांना मिळतात. मकराच्या तोंडापासून निघालेल्या वेली या कमलवेली मानल्या जातात. मगर (मकर) जशी दीर्घजीवी, तशीच कमलवेलीही. ओहगांच्या प्रयोगावरून कमलवेलीचं दीर्घजीवित्व सिद्ध झालं आहे. बियाण्यांच्या स्वरूपात का होईना, सुप्तरुपानं कमलवेल टिकून राहिली होती.
या कमळाचं शास्त्रीय नाव नेलम्बो, म्हणजे आपलं पद्म.
गणेशपूजेसाठी बाजारात मोठ्या प्रमाणावर जी कमळं उपलब्ध असतात, ती उत्पल जातीची. नीलोत्पल अथवा नीलोफर. मात्र, उत्पल जातीच्या कमळाचे वर्ण निळ्याबरोबरच लाल किंवा पांढरेही असतात. उत्पल कमळालाच 'इजिप्शीयन कमळ' असंही संबोधलं जातं.
पद्म आणि उत्पल दोघांच्या आकृतीबंधात खूपच फरक आहे. पद्माची पानं गरगरीत, वाटोळी, छत्राकृती, पाण्याच्या पातळीच्या बाहेर डोकावणारी. फुलंही तशीच. पाण्याच्या पृष्ठभागापासून दशांगुळं वर! चिखलात रुजूनही त्यापासूनच नव्हे, तर पाण्यापासूनही कसं अलिप्त रहावं, याचा माणसासाठी आदर्श वस्तुपाठ!
पाण्याचा थेंबही पर्णपात्यावर क्षणभर टिकतो. तो मोत्यासारखा टपोरा, गोलाकर दिसतो आणि क्षणभरात घरंगळून पडतो. संसारापासून केवळ लांबच राहून चालत नाही, तर षड्विकारांना मनात थारा द्यायचा नाही, याचं हे द्योतक! याच प्रकृतीधर्मामुळे पद्म आणि उत्पल यांना तत्वज्ञानात खास मानक समजलं जातं.'
साधना, त्यावेळी तू अंबोलीला
साधना, त्यावेळी तू अंबोलीला असणार
शांकली, असेच एका चाफ्याच्या बाबतीतही घडले होते. ती बी देखील रुजली आणि मग लक्षात आले कि ती एक वेगळीच जात आहे. सर अटेंबरोंच्या एका कार्यक्रमात ते झाड दाखवले होते.
खरी कमळे आपल्याकडे जरा कमीच दिसतात. पनवेलला आहेत. खरं तर या दिवसात कुणी पनवेलला गेले तर अनेक जातींची कमळे व लिली दिसू शकतात.
शांता शेळके यांनी एक वेगळेच
शांता शेळके यांनी एक वेगळेच रुपक मांडलेय. कमळाच्या वेली म्हणजे नात्यांचा गुंता. वरवर सगळे शांत आणि प्रसन्न पण आतमधे मात्र नको तितके पीळ आणि गुंता !
दिनेश तुम्हीही या. शांकली
दिनेश तुम्हीही या.
शांकली मस्त माहिती गं.
दिनेश, ते पनवेलचे तळे मी पाहिलेय. नव्या मुंबईत ही गुलाबी कमळे खुप आहेत. पंकजच्या घराच्या बाजुलाच एक तळे आहे तिथे आहेत गुलाबी कमळे. सध्या पावसामुळे तलाव खुप भरलाय त्यामुळॅ दिसत नव्हती. काल पाहिले तर परत कुठेतरी कोप-यात गुलाबी तुरे दिसत होते. तलाव पुर्ण भरला की फोटो टाकते.
शांकली पद्म आणि उत्पल
शांकली
पद्म आणि उत्पल दोघांच्या आकृतीबंधात खूपच फरक आहे. >>> जमलं तर दोघांचे फोटो टाकाल का?
Common name: Blue water lily,
Common name: Blue water lily, Blue lotus of India • Hindi: Neelkamal नीलकमल • Manipuri: থরিক থরো Thariktharo • Tamil: நீலாம்பல் Neelambal • Kannada: Nyadalehuvu • Bengali: Nil-sapla
Botanical name: Nymphaea nouchali Family: Nymphaeaceae (waterlily family)
Synonyms: Nymphaea stellata, Nymphaea cyanea, Nymphaea edgeworthii (http://flowersofindia.net येथून माहिती व फोटो साभार)
व हे खरेखुरे कमळ -
Common name: Lotus, Sacred lotus, East Indian Lotus • Hindi: कमल Kamal, Pundarika, पद्म Padma • Manipuri: থম্বাল Thambal • Marathi: Pandkanda, कमल Kamal • Tamil: செந்தாமரை chenthaamarai, Tamarai, அம்பல் Ambal • Malayalam: Tamara • Telugu: Tamara, Erra-tamara • Kannada: Tavare-gadde • Bengali: কমল Komol, পদ্মা Padma • Oriya: ପଦମ Padam • Urdu: نیلوفر Nilufer • Assamese: Padam • Gujarati: Motunkamal • Sanskrit: सरसिज Sarsija, Pankeruha , शारदा Sharada, अम्बुज Ambuj
Botanical name: Nelumbo nucifera Family: Nelumbonaceae (Lotus family)
Synonyms: Nelumbium speciosum
शशांक, सारसबागेत छान लिलिज
शशांक,
सारसबागेत छान लिलिज आहेत. खरी कमळे सातपुड्याच्या उत्तरेलाच जास्त. म्हणून कमलकाकडी / मखाणे यांचा जास्त खप तिथे.
ज्ञानेश्वरांनी जे अनेकवेळा रुपक म्हणून वापरले आहे ते खरे कमळ असेल का आणि त्या काळात आपल्याकडे कमळे खुप फुलत असतील का ? कारण रुपक म्हणून वापरायची वस्तू सर्वांना माहीत असायला हवी ना !
खरी कमळे सातपुड्याच्या
खरी कमळे सातपुड्याच्या उत्तरेलाच जास्त >>>> मी तर खरी कमळे फक्त फोटोतच पाहिली आहेत .... ते मखाणे वगैरे फार्फार लांब राहिले ...
व्वाह...शशांकजी! खरं कमळ काय
व्वाह...शशांकजी! खरं कमळ काय सुंदर दिसतय!
खरी कमळे म्हणजे? वरची गुलाबी
खरी कमळे म्हणजे? वरची गुलाबी कमळे खरी आहेत ना? ही मी पाहिलीत भरपुर. त्यांच्या त्या मधल्या गोलात तर ते मखणे असतात.
शशांक, मुंबईत हे ओले मखाणे पण
शशांक, मुंबईत हे ओले मखाणे पण येतात विकायला. सिंधी / पंजाबी / बिहारी लोक जास्त खातात.
साधना, म्हणते ते खरेच आहे. तिच्या परीसरात हि कमळे आहेत. पनवेलला एस टी स्टँड समोर मोठे सरोवर आहे. तिथे कमळांची शेती होते.
दुसरे आहे कळंबोली जवळ स्मृतीवनाच्या मागे.
साधना, बहुतेक आपण पंकजसोबत तिथे गेलो होतो.
पुरंदरे शशांक धन्यवाद!
पुरंदरे शशांक
धन्यवाद!
ठाण्यात रायलादेवी तलावात
ठाण्यात रायलादेवी तलावात गुलाबी कमळे आहेत. मात्र सध्या पावसात दिसत नाहीयेत.
शांकली, धन्यवाद, तुमचे
शांकली,
धन्यवाद, तुमचे पद्मपुराण अप्रतिम आहे. खरच या ब्लोग वर आल्या वर खुप भारावुन गेल्या सारख होतय.
तुम्ही सगळी मंडली खुप माहान आहात.
आमच्या घरी, ऑदुंबर ला अश्या
आमच्या घरी, ऑदुंबर ला अश्या प्रकारच एक सोनेरी अंड दिसतय, कोणाला माहिती आहे का?
सायली, तो फुलपाखराचा कोष आहे.
सायली, तो फुलपाखराचा कोष आहे. रोज सकाळी लवकर त्यावर लक्ष ठेवत जा. एका दिवशी त्यातून पाखरु बाहेर आलेले दिसेल. त्याचाही फोटो काढा
सर्व निसर्गप्रेमीं मंडळीना
सर्व निसर्गप्रेमीं मंडळीना नमस्कार !
मी माबोवर नविन आहे, इथे निसर्गाबद्दल छान माहिती मिळाली.
रांगोळी साठी पान माहीत नसल्या मुळे ही माझी रांगोळी इथे देत आहे.
कमळं मस्तच ! अश्विनी, किती
कमळं मस्तच !
अश्विनी, किती सुरेख रांगोळी काढली आहेस !
अप्रतीम! संस्कार भारतीची
अप्रतीम! संस्कार भारतीची रांगोळी का? या खालच्या लिंकमध्ये सदस्य व्हा आणी तिथे ही रांगोळी छापा.
http://www.maayboli.com/node/37110
साधना थोडी भर टाकतेय. मलाही एक मेल माझ्या परिचितांनी पाठवली होती. त्यांच्याकडे जुना चित्रलेखाचा अंक होता. या अंकात जागतीक वैज्ञानीकांची जी परीषद भरली होती, तिचा गोषवारा त्यात होता. तर त्या वैज्ञानीकांनी सांगीतले की पृथ्वीवर येणार्या काही शतकातच भारतातील कलकत्ता, मुंबई, मद्रास, तर अख्खा बांगलादेश तसेच जगभरातुन लंडन, व्हेनिस, पनामा अशी बेटे/ शहरे पूर्ण पाण्याखाली जातील. ही भविष्यवाणी नव्हती तर तो त्यांचा अभ्यास होता. आता हा चित्रलेखा होता साधारण २० वर्षापूर्वीचा, तर तू पाहिलेला नॅजिओ अंक आहे आताचा. म्हणजे तेव्हाची त्यांची शंका आता किती खरी ठरतीय्.:अरेरे:
निगवर निसर्ग भरभरुन पहायला मिळतोय.सर्व निगकरांना मनापासुन धन्यवाद या मेजवानीबद्दल. शांकली उत्तम माहिती.:स्मित:
वा अश्विनी - काय सुंदर
वा अश्विनी - काय सुंदर रांगोळी आहे - एक छान लय आहे सर्व रेषांना आणि रंगसंगतीही किती सुरेख ...
पहात रहावी अशी रांगोळी .... अजून असतील तर कृपया द्या इथे ....
किती सुरेख रांगोळी काढली आहेस
किती सुरेख रांगोळी काढली आहेस !>>>> +१
Pages