एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न!
धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने एखादी गोष्टं थोडी थोडी पुरी करावी.
एकेक सीन देत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखिका: नंदिनी
कथा: चेन्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्नई एक्स्प्रेस...
चेन्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्नई एक्स्प्रेस... सार्या आसमंतात तोच एक आवाज निनादून राहिला.
तिने प्लॅटफ़ॉर्मकडे एकदा पाहिले. ट्रेन सुटायला अजून वीस मिनिटे होती. चालत एक एक पाऊल पुढे गेली असती तरी ट्रेन सुटायच्या आधी पाच मिनिटं पोचली असती, पण तसं होत नसतं ना!!! तिने हातातल्या कागदावर पुन्हा एकदा डब्याचा नंबर पाहून घेतला, तिला एस४० याच डब्यात चढायचं होतं. वास्तविक ती घरातून पळून आली होती, आता ज्या गावावरून आपण पळून दूर आलो आहोत, त्याच गावाला जाणारी ट्रेन पकडण्यामधे काय शहाणपणा? असा प्रश्न तिच्या मनात केव्हाचा खदखदत होता. गर्दीमधे नक्की कुणाला हा प्रश्न विचारावा ते अजून तिला समजलं नसल्याने ती उगाच बदकासारखी मान इकडे तिकडे वेळावत उभी होती. अचानक तिला जाणवलं, तिच्या बाजूला कुणीतरी उभं आहे, खूप जवळ. ती भितीने जवळजवळ किंचाळलीच.
“किंचाळते कायको? अपन क्या तेरेको डराले रहा क्या?” बाजूला उभा असलेला काजलभाई बोलला.
“असा भुतीणीसारखा मेकप करून आलीस तर घाबरू नाहीतर काय करू?” ती पुटपुटली.
“ए.. अपनेको भूत बोलने का नै. देवगण आहे माझा. पर अभी तुम क्या कर रैले इधर?” काजलभाईने विचारलं.
तेवढ्यात तिला तिच्या कॅरेक्टरचे बेरिंग सापडले. शक्य तितकं तोंड वाकडं करत ती सांबार अॅक्सेंटमध्ये म्हणाली. “मै इदरको वैट करती. चेन्नई एक्स्प्रेस के वास्ते. कुम्बण गांव जाती, मेरे फ़ादर बहुत बडा गुंडी” तिची एवढी वाक्य ऐकून काजलभाई गरगरली.
“मेरेको पंजाब मेल पकडनी है. वैसे एक पंजाबी मेल ऑलरेडी पकडा है. पर अब ट्रेन पकडनी है.. “ स्वत:च्याच जोकवर काजलभाई एकटाच खदाखदा हसली. असं हसणं ही तिच्या दृष्टीने अभिनयाची परिसीमाच.
“वोक्के” म्हणून ती मान फ़िरवून उभी राहिली. त्या दोघींवर मघापासून ल्क्ष ठेवून असणारी “ती” मात्र दोघींकडे तिरस्काराने बघत होती. तिलापण हीच चेन्नई एक्स्प्रेस पकडायची होती.
इकडे प्लॅटफ़ॉर्मवर उभा असलेल्या चेन्नई एक्स्प्रेसमधे वेगळीच खळबळ माजली होती. कंपार्टमेंट्मधे बसलेल्या आपलं रीझर्वेशन नक्की कुठल्या गाढवाने केलंय हा प्रश्न तिघांनाही पडला होता. आळीपाळीते ते तिघे एकमेकांकडे खुनशी नजरेने बघत होते. राज, प्रेम आणि अमर. तिघांनाही चेन्नईमधे एक “अर्जंट काम” होतं. आणि तिघांच्याही सेक्रेटरीने विमानाऐवजी या चेन्नई एक्स्प्रेसची तिकीटे बूक केली होती. अर्थात एकमेकांना कल्पना नसताना.
“ट्रेन सुटायला अजून अठरा मिनिटे आहेत” अमर हळूच प्रेमला म्हणाला. प्रेम खिडकीतून बाहेर बघत डोळे मिटून “दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा” गाणं म्हणत होता. नातवाचे आजोबा खरंच हुशार.... या सिच्युएशनला काय परफ़्फ़ेक्ट गाणं गाऊन गेलेत असा विचार करत.
राज मात्र काहीही गरज नसताना विनाकारण उगाचच चुळबूळ करत होता. त्याची चुळबूळ बघून पलिकडच्या कंपार्टमेंटमधील एका हुशार व्यक्तीने “टॉयलेट तिकडे आहे” असे त्याला एक दोनदा सांगून पाहिले होते. पण राजने त्याला “डोण्ट वरी, नेचर्स कॉल. आय कॅन टेक इट ऑन माय मोबाईल. माय न्यु नो...” असे म्हणायला सुरूवात केल्यावर ऍडमिनवाणी झाली. “मोबाईल कोणता हवा या धाग्यावर जा. भलतीकडे भलत्या गप्पा नकोत” तरी राजचा चुलबुल पांडे करायचा प्रयत्न चालूच राहिला.
“प्रेम, तुझं लक्ष आहे का मी काय म्हणतो त्याच्याकडे?” अमरने प्रेमला विचारलं. प्रेमने हळूहळू मान वळवत, नजर तिरकी करत त्याच्याकडे पाहिलं. त्याला हीच ऍक्शन चांगली जमते. बॅकग्राऊन्ड म्युझिक कसं आहे त्यावरून या ऍक्शनचा नक्की अर्थ रोम्यान्टीक, चिडलेला की दु:खी हे ठरतं. आता दोस्त दोस्त ना रहा... त्यामुळे दु:खी ऍक्शन.
“मला चेन्नईला रजनीसरांना भेटायचंय..” तो म्हणाला. “रजनीसरांकडे देखील माझ्या समस्येला उत्तर नसेल तर मग मी कमल हासनला भेटेन” कमल हासनचं नाव आल्याबरोबर अमर चरकला. “आयला, याला कसं माहिती आपण विश्वरूपमच्या रिमेकसाठी चाललोय ते?” हे उद्गार आपल्या चेहर्यावर येऊ न देता तो वरवर हसला. “होता है होता है सबके साथ होता है.. टेन्शन नही लेने का” प्रेम काही न बोलता परत खिडकीतून बाहेर बघायला लागला. मात्र यावेळेला तो “ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडूनदे करीन तुझी सेवा” हे गाणं गुणगुणत होता.
राज उठून पुन्हा एकदा डब्यामधे उगाचच फ़िरून आला. तेवढ्यात पलिकडच्या कंपार्टमेंटमधे चढलेली एक युवती त्याला बघून “रा>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>ज” करून एवढ्या जोरात किंचाळली की अख्खा कंपार्टमेंट राहूदेत अख्खा स्टेशन या आवाजाकडे बघून दचकला. “चला, आपलं फ़ीमेल फ़ॅन फ़ॉलोइन्ग जबरदस्त आहे” या खुशीत तो काही बोलणार एवढ्यात तिने खिशातला मोबाईल काढला आणि पटकन फोन लावून “ए तुला माहितीये....... राजदादा आहे ना राजदादा, तो पण माझ्याच कंपार्टमेंटमधे आहे.” कार्टूनमधे चमकतात तसे राजच्या समोर राख्या तरळून गेल्या आणि बॅकग्राऊंडला “भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना” वाजायला लागलं. तेवढ्यात ट्रेन सुटायला पाचच मिनिटे राहिल्याची घोषणा झाली आणि एस४०मधे मोतीचुराच्या लाडूंचा वास दरवळला.
“राज, प्रेम, अमर!!” यावेळेला तीस वर्षे मुंबईमधे काढून देखील स्वत:च्या उच्चारांमधे अजिबात बदल न करण्याचा चमत्कार करणारी देवी तिथे अवतरली होती. पलिकडच्या कंपार्टमेंटमधे “पेडगावची असणार. तिथे देवी आणि श्री हे दोनच आयडी दिसतात” अशी कमेंट कुणीतरी मारलीच. “नो जोक्स.. “ देवी लाड्ल्याबोबड्या बोलात कडाडली. “वही तो!! तुम तीनोको इस ट्रेनमे मै बिटाया, ये टिकट मै निकाला. तुम तीनो साऊथ जाके अच्चा फ़िल्म्स देकनेका, जगडा नही करनेका. आपडीया. दोस्ती मै रहनेका. ये चेन्नई आनेतक तुम तीनो मे दोस्ती हो जाना. ट्रेन रास्तेमे किदर ओन्ली पूना और बंगलोर रूकना. ट्रेनमेसे कोइ नीचे नै उतरना... नही तो मिस्टर इंडियासे पंगा ले, वो भी इसी ट्रेनमे तुमारेपे नजर रखना.... वही तो!!!” तेवढ्यात ट्रेन निघाल्याची अनाऊनस्मेम्ट झाली, राज आणी अमर धावत जाऊन दरवाज्यापाशी उभे राहिले, प्लॅटफ़ॉर्मवर अपेक्षेप्रमाणे त्या दोघी धावत येत होत्याच... प्रेम मात्र खिडकीपाशी बसून “एक गरम चाय की प्याली हो, कोइ उसको पिलाने वाली हो” गुणगुणत होता.
चेन्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्नई एक्स्प्रेस्स... सार्या आसमंतात हा अवाज निनादत होता.
---------------------------------------------------------------------------------------------
१) पुढे ही ट्रेन पुणे आणि बंगलोरला थांबेल, हात दाखवून ट्रेन थांबायला ही एस्.टी. नव्हे.
२) स्टीरीओटाईप्ड पात्रे ,उदा. प्रेमळ ख्रिश्चन आंटी, अतिशूर सरदारजी, भरतनाट्यम डान्सर असलेला तमिळी,पठाण गुंडा, कर्तव्यदक्ष इन्स्पेक्टर अशी पात्रे वापरण्यास सक्त बंदी आहे.
३) ट्रेन मुंबई चेन्नई याच ट्रॅकवर जायला हवी, मधेच गोवा, मधेच सिमला, मधेच राजस्थान अशा भौगोलिक चुका चालणार नाहीत. रोशेकडे नसलं तरी आपल्याकडे लॉजिक असायलाच हवं. अधिक माहितीकरता कथालेखन बीबी वाचा.
४) ट्रेनमधे हिंदी मराठी कानडी तमिळ तेलुगु अशी सार्वभाषिक भारतीय गाणी वापरण्याची परवानगी आहे.
५) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
६) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, त्यावर 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावीत.
७) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परिचय करून देऊ नये.
८) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.
९) कथेचा शेवट १४ सप्टेंबर २०१३ ला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता व्हावा. कथेच्या शेवटी राज प्रेमच्या 'मंगेतरला ' पळवून नेतो आणि अमर मराठीतल्या एका सर्वाधिक लोकप्रिय संस्थळावर अमरचित्रकथा नावाची कादंबरी लिहू लागतो असा असावा.
प्रेम च काय करायचे हे पण
प्रेम च काय करायचे
हे पण सांगा,,,,,,
,
,
प्रेमचं काहिही करण्याची सूट
प्रेमचं काहिही करण्याची सूट आहे.
-- संयोजक मंडळातर्फे.
मग त्या बिचार्याचे लग्न
मग त्या बिचार्याचे लग्न लावायला हवे
।
।
।
किमान इथे तरी गुढघ्याला बाशिंग लागेल
उदयन लावा लावा. लग्नं लावा,
उदयन लावा लावा.
लग्नं लावा, लिव इन रिलेशन ठेवा काही करा पण गोष्ट लिहायला सुरूवात करा.
अरे पुढे लिवा की, निसत्या
अरे पुढे लिवा की, निसत्या गप्पा हानु नगा.:राग::फिदी: उगाच दोर्यात सोताला गुंडाळु र्हायलेत.:इश्श:
लग्नं लावा, लिव इन रिलेशन
लग्नं लावा, लिव इन रिलेशन ठेवा काही करा पण गोष्ट लिहायला सुरूवात करा.>>> इतकी सूट मिळालेली आहे, तर उदयन, आता तू लिहीच!!!
रश्मे, तू का मागे? लिव की तू
रश्मे, तू का मागे? लिव की तू बी
म्या सुट्टीवर हाय मोबाइल
म्या सुट्टीवर हाय
मोबाइल वापरतोया नायतर
कवांच लिहल असत,,,
सानी नाय गं. मला खरच लिहीता
सानी नाय गं. मला खरच लिहीता येत नाही.:अरेरे: वाचण्याचा आनंद मात्र घेता येतो.:स्मित: बाकी तू, उदयन, किरणु आणी बाकी माबोकर निश्चितच लिहु शकतात. लिवा पुढचं
कामाचं निमित्त सांगून
कामाचं निमित्त सांगून चेन्नईला निघालेले राज आणि अमर या दोघांचा जीव त्या दोघींना पाहून भांड्यात पडला. सुरु असलेल्या ट्रेनमध्ये डीडीएलजे स्टाईलने त्या दोघांनी- आपापल्या दोघींना अलगद आत ओढून घेतले.
मात्र... तेवढ्यात प्रेमची आणि तिची नजरानजर झाली. प्रेमच्या डोक्यात क्षणात एक तिडिक गेली. पूर्वीचा प्रेमभंग आणि तो अपमानास्पद प्रकार तो कसाबसा विसरुन एक नवीन सुरुवात करायला चेन्नईला चालला होता, आपल्या मंगेतरला भेटायला, तर अचानक ही भेटली, ते ही राजसोबत पळून चाललेली होती. बहुतेक ते ही लग्न करायलाच चाललेत, हे त्यांच्या एकूण अवतारावरुन त्याने हेरलं.
प्रेमचा उद्विग्न चेहरा पाहून ती सुद्धा अपराधी भावनेने पार खचून गेली होती. राजसोबत गेली होती खरी, पण तिचं प्रेमवरचं एकेकाळचं प्रेम आता तिला पुन्हा आठवायला लागलं होतं. आपण काही चूक तर नाही ना केली? असा प्रश्न आता तिला सतावायला लागला होता..
----------------------------------------------------------------------------------------------
इष्टोरी वगैरे आयुष्यात कधी लिहिलेली नाहीये, पण रश्मी, तुझा माझ्यावरचा विश्वास खोटा पडायला नको, म्हणून हा पहिला प्रयत्न. त्याबद्दल तुझे आभार.. पहिलाच प्रयत्न असल्याने गोड मानून घ्या लोकहो!
.... आणि आता मी लिहू शकते, तर तुम्ही का नाही? चला माझी गाडी पुढे सरकवा आता....
अरे वा! सानी सुरुवात तर
अरे वा! सानी सुरुवात तर दिलखेचक झालीय्.:स्मित: असू दे. उलट पहिला प्रयत्न छान झालाय. नंदिनीची कथा लय भारी.
थँक्स रश्मी
थँक्स रश्मी
प्रेमचा उद्विग्न चेहरा पाहून
प्रेमचा उद्विग्न चेहरा पाहून ती सुद्धा अपराधी भावनेने पार खचून गेली होती. राजसोबत गेली होती खरी, पण तिचं प्रेमवरचं एकेकाळचं प्रेम आता तिला पुन्हा आठवायला लागलं होतं. आपण काही चूक तर नाही ना केली? असा प्रश्न आता तिला सतावायला लागला होता..
तेवढ्यात बाजूच्या डब्यात काही वेगळेच घडत होते.
'मी म्हणते अमीरच ग्रेट- सिनेमा काय असतो कळायला रंग दे बसंती, दिल चाहता है बघा'
'हो क्का, मग मेला काय अमिरच्या भूताने काढला होता?'
'कुणी काही म्हणा, माझ्या बायकोला सारुक्खान आवडतो त्यामुळे झक मारत मला सगळे सिनेमे बघावे लागतात त्याचे'
' सारुक खानला बघता, पुढचा भाग कुठला नी पाठचा कुठला त्या झिपर्याचा ते कळतो का?'
असा कोलाहल माजला होता.
आपल्या प्रतिरूपाचा उल्लेख होताच राज कान टवकारून कंपारटमेंटच्या दारात उभा राहिला.
'कसला तो सारुक , प्रत्यक्षात काळा , हडकुळा आहे'
'अहो बाई, लोकप्रिय व्हायला स्क्रीन प्रेझेंस आकर्षक लागतो.
आणि बरंच कायकाय लागतं. आम्हाला आमच्या मास मिडियाच्या अभ्यासक्रमात..,'
'झालं हिचं त्या कोर्सचं तुणतुणं चालू. आता काय तिकडे जाऊन इडली डोसाच खात बसलीय न मास मिडिया सोडून'
' ए, ए, वैयक्तिक कॉमेंट करू नका. अहो अॅडमिन...'
तिघेही हा सावळा गोंधळ बघून बुचकळ्यात पडले. कोण हेलोक?
आपल्याबद्दल इतक्या तावातावाने का भांडतायत?
कुठे जातायत?
लै भारी पुढे येऊ द्यात
लै भारी
पुढे येऊ द्यात
>>पलिकडच्या कंपार्टमेंटमधे
>>पलिकडच्या कंपार्टमेंटमधे “पेडगावची असणार. तिथे देवी आणि श्री हे दोनच आयडी दिसतात” अशी कमेंट कुणीतरी मारलीच. “नो जोक्स.. “ देवी लाड्ल्याबोबड्या बोलात कडाडली.
हे या STY च्या सुरुवातीत आहे. मी हे वाचलंच नव्हतं. हे कसं चाललं? याबद्दल सांगितलं नाही का अॅडमिननी??
पुन्हा का ते चेन्नई
पुन्हा का ते चेन्नई एक्स्प्रेस... कंटाळवाणं आहे हे.
एखाद्या एकता कपूरच्या सिरियलवरून घ्यायचे ना.... पवित्र रिश्ता वगैरे.. भरपूर स्कोप आहे. मारायचे, जिवंत करायचे, जुळी, वगैरे पात्र टाकायला...
नवी गोष्ट द्या - सीता और
नवी गोष्ट द्या - सीता और पपीता... असल काहीही....
लोला, तुम्ही "असे म्हणायला
लोला, तुम्ही "असे म्हणायला सुरूवात केल्यावर ऍडमिनवाणी झाली. “मोबाईल कोणता हवा या धाग्यावर जा. भलतीकडे भलत्या गप्पा नकोत" हे वाचलेले दिसत नाही.
नवी गोष्ट द्या - सीता और
नवी गोष्ट द्या - सीता और पपीता... असल काहीही....
>>
तुम्ही वळवा ना असल्या ठिकाणी चेन्नई एक्सप्रेस
तिघेही हा सावळा गोंधळ बघून
तिघेही हा सावळा गोंधळ बघून बुचकळ्यात पडले. कोण हे लोक?
आपल्याबद्दल इतक्या तावातावाने का भांडतायत?
कुठे जातायत?
आणि इकडे दुसर्या कम्पार्टमेंटमध्ये राज, अमर, प्रेम आणि त्या दोघी.
प्रेमचे मन क्षणात भूतकाळात गेले. राज, अमर, प्रेम.. कॉलेजच्या दिवसातले जिगरी दोस्त.. देवीच्या घरी तिघांनी पेइइंगगेस्ट म्हणून रहायला सुरुवात केल्यामुळे त्यांची मैत्री केवळ कॉलेजमेट म्हणून न राहता रुममेट म्हणूनही अजून घट्ट झाली.
प्रेमळ देवीच्या साऊथ इन्डियन अॅक्सेन्टसोबतच तिच्या हातचे चवदार अन्न खात तिच्या आलिशान बंगल्यात तिघंही मस्त आयुष्य जगत होते. त्यांचे घर कॉलेजपासूनही अगदी जवळ होते, त्यामुळे आरामात उठून रमत गमत कॉलेजला जाणे त्यांना शक्य होते.
ह्याच कॉलेजच्या आणि घराच्या रस्त्याच्या मधोमध बसस्टॉप होता. त्याच बसस्टॉपवरुन रोज ती उतरुन कॉलेजच्या रस्त्याला लागायची. ह्यांची कॉलेजला जाण्याची वेळ आणि तिची बसस्टॉपवरुन उतरुन कॉलेजच्या दिशेने जाण्याची वेळ बरेचदा मॅच व्हायला लागली, आणि तिथेच सुरु झाली प्रेम आणि तिची प्रेमकहाणी... पण त्यावेळी प्रेमला कुठे माहिती होतं की तो जिच्या बघताक्षणी प्रेमात पडलाय, तिच्यावरच त्याचा जिगरी दोस्तही डोरे टाकतोय... एकमेकांचे कपडे घालता घालता मैत्रीत गर्लफ्रेंडही शेअर करावी लागणार आहे, याची जाणीव काश.. तेंव्हा प्रेमला झाली असती...
आँ ! चेन्नै एक्स-प्रेस हाय का
आँ ! चेन्नै एक्स-प्रेस हाय का जंजीर ?
नियमांमधे किती त्या टायपो????
नियमांमधे किती त्या टायपो????
शेवट काय हवा हे संयोजकच सांगताहेत..... ई नॉ चॉलबे.
टायपो काढले आहेत मंजूडी,
टायपो काढले आहेत मंजूडी, धन्यवाद लक्षात आणून दिल्याबद्दल. शेवट नियोजित असलेली यात्रा आहे ही , प्रवास सुखकर होवो !