Visiting Ladakh - 3

Submitted by जिवेश on 5 September, 2013 - 11:28

Visiting Ladakh - 3
Visiting Ladakh - 2
दिवस चौथा - लेह
जे पर्यटक थेट दिल्ली ते लेह असा विमान प्रवास करतात त्यांना लेहला आल्यावर acclimatization साठी १-२ दिवस सक्तीची विश्रांती घ्यावी लागते. आम्ही श्रीनगर - कारगील - लेह असा तीन दिवसांचा प्रवास करुन लेहला पोहचलो होतो. त्यामुळे लेहच्या विरळ हवामानाशी एकरुप झालो होतो. ग्रुप मधिल काही जणांनी शक्य तितकी खबरदारी घेऊनही त्यांना डोकेदुखीचा त्रास जाणवत होता.

कालचा कारगील - लेह प्रवास हा उत्तर पश्चिम असा होता. तर आज लेहच्या दक्षिण परिसरातील मॉनेस्ट्री फिरणार होतो. साधारण ६० कि.मी. परिघातला प्रवास असल्याने आम्ही बिनधास होतो. गब्बर एक्स्प्रेस कालच श्रीनगरला रवाना झाली होती. आज आमचे सारथ्य करायला तिबेटियन नामखर हजर होता.

लेहच्या दक्षिणेला मनाली रस्तयावर शे पॅलेस, थिकसे मॉनेस्ट्री, हेमिस गोंपा, सिंधु घाट हा परिसर आहे.

प्रचि १
IMG_7700
हेमिस गोंपा डोंगरांच्या गपचणीत लपलेला आहे. सिंधु नदीला ओंलाडुन आम्ही हेमिसला पोहचलो.
प्रचि २ हेमिस गोंपा
IMG_7660

हेमिस पाहुन गाडी जवळ आलो... तेव्हढ्यात जोराचा गडगडाट झाला. इथल्या लहरी हवामानाचा अंदाज येण फार मुश्किल काम. विखुरलेल्या पब्लिकची जमावाजमव करुन अर्धा तासात थिकसे मॉनेस्ट्रीला पोहचलो.

प्रचि ३
IMG_7772
प्रचि ४
IMG_7781
प्रचि ५
IMG_7782
प्रचि ६ थिकसे
IMG_7794
प्रचि ७
IMG_7806
थिकसे मॉनेस्ट्रीत असलेल्या एकमेव उपहार गृहात थुपका ऑर्डर केला. लेह शहर सोडलं तर इतर पर्यंटन स्थळांवर खादाडीची मारामारी आहे.

परतीच्या वाटेवर थ्री इडियट मधली शाळा बघितली. गिरीने 'Silencer'चा जिथे फ्युज उडाला होता त्या जागेचा फोटो काढला. :d

या ओसाड प्रदेशात दुपारच्या उन सहनशक्तीचा अंत पहातो. चारच्या सुमारास परत शहरात आलो आणि आमचा मोर्चा 'हॉल ऑफ फेम' या भारतीय सैन्यदलाच्या संग्राहलया कडे वळवला.
प्रचि ८
IMG_7809
प्रचि ९
IMG_7810
प्रचि १०
IMG_7813
प्रचि ११
IMG_7814

संध्याकाळी विंडो शॉपिंग करुन हॉटेल गाठले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खल्लास फोटो. तिसर्‍या भागाची वाटच बघत होतो.

फोटो क्रं ९, १०, ११ विशेष आवडले.

>>गिरीने 'Silencer'चा जिथे फ्युज उडाला होता त्या जागेचा फोटो काढल<< हे मस्तय

मस्त Happy

खुप सुंदर.

आम्हाला फक्त फोटो दिसतात पण तुम्हा लोकांना झालेला विरळ हवामानाचा त्रास दिसत नाही. केवळ
याच कारणासाठी मी तिथे जाण्याचे टाळत आलोय. आता कदाचित परत धीर गोळा करता येईल, तेवढे बळ
या लेखमालिकेतून मिळाले.

दिसले दिसले Happy

लै भारी!!!
पण इतके कमी फोटो का टाकले?? फक्त ११ च??? त्यात पण ४/५ आणि १०/११ सेम (एकच ठिकाणाचे) आहेत. Uhoh
तुमच्या कडुन खुप अपेक्षा आहेत रे.. भरभरुन फोटो टाका Happy