निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभाताई निव(कदंब) हिरवे असताना त्याची चव थोडी आंबट असतेना म्हणून तिखट-मीठ लावून खातात किंवा लोणचे करतात ना? पिकल्यावर चव कशी असते? प्रकाश टाका शोभाताई, दिनेशदा.

श्रीकांत तुम्ही दिलेली लिंक मस्तच, तुमचा लेख आणि सर्व फोटो सुंदर आहेत आणि आनंदीबाईंच्या दुर्मिळ फोटोसाठी धन्यवाद, चेहेऱ्यावर निरागसता आणि गोडवा आहे.

श्री, सुंदर फोटो.

कदंबाचे फळ पिकल्यावरही गाभूळलेल्या चिंचेप्रमाणे लागते. त्याला एक प्रकारचा सुगंधही येतो तो फुलांपेक्षा थोडा वेगळा असतो. आणि त्याची पाने चुरगळली तर आयोडेक्स सारखा वास येतो.

वर्षू, त्या शाळेच्या जवळ बसस्टॉप आहे त्याच्या मागेच हे झाड आहे.

मी शेवटी काल करवंदाच्या जाळीत घुसलोच. आपल्यापेक्षा इथली करवंदे लहान असतात. पण गोड असतात.
माझ्याशिवाय कुणी गिर्‍हाईक नव्हते.

आता आमच्याकडे उन्हाळ्याला सुरवात झालीय. आमच्या कॉलनीतल्या बागेत मात्र खुपच फुले फुललीत.
काल मी तिथे बराच वेळ भटकत होतो.

मग मी तिथे गेल्यावर वेळेचे भान राहिले नाही, मी हरवलो, भरपूर फोटो काढले... हे सगळं परतपरत काय लिहायचे ?

मग मी तिथे गेल्यावर वेळेचे भान राहिले नाही, मी हरवलो, भरपूर फोटो काढले... हे सगळं परतपरत काय लिहायचे ?>>>>>>>>>>>>>..हे आता आम्ही गृहीतच धरायचे ना? Proud

धन्यवाद दिनेशदा निव जास्तकरून कच्चेच बघितलेत आणि खाल्लेत, पिकलेले आठवत नाहीयेत म्हणून विचारले (बरीच वर्षे झाली खाऊन, आता आठवणी).

कदंबाचा दुसरा अजरामर रेफरन्स.>>>> मानुषी खरचं, कदंब म्हटलं की हेच गाणं आठवतं मला.
आणि दुसरं कशी काळनागिणी सखे गं वैरीण झाली नदी मधली ओळ 'पैलतटि न का कदंब फुलले......'>>>> खरच.

कदंब तरूला बांधुनी दोला
उंच खालती झोले
परस्परांनी दिले घेतले
गेले ते दिन गेले..............>>>> मलाही हेच गाणं आठवलं आणि पुढे स्क्रोल केलं तर मानुषीताईंनी तेच लिहिलं होतं Happy

कसे आहात निगकर्स? Happy

दुसरं कशी काळनागिणी सखे गं वैरीण झाली नदी मधली ओळ 'पैलतटि न का कदंब फुलले......'>>>> खरच.+१००
अश्विनी के Happy

ओक्के दिनेश , चेक्करीन पण तोडून्,खाऊन पाहीनच याची गॅरंटी न्हाय घेत!!! Lol

जागु,या पावसाळ्यात तेरी नागिन का एकपण फोटू नाही आला>>शिफ्ट झाली वाट्टंतुझ्या एरियातून ..हुश्श!!!!

ते नाग आमच्याइथे कुळ कायद्याने राहतात. आता जाणे शक्य नाही. मध्ये मध्ये दर्शन होत असते. पण आता इतकी सवय झालेय आम्हाला की कोणी सांगितले की तिथे आहे तरी कुतुहल म्हणून बघायला मी जात नाही कारण मी दुसर्‍या कामांमध्ये व्यस्त असते.

पण वर्षूताई तुला मी निराश नाही करणार.

अरे वा, जागूची आठवण काढल्याबरोबर जागू हजर. अशी अधूनमधून गायब कशी होतेस ? आता सगळ्याचे कारण राधा असे लिहू नकोस Happy

अर्र्र्र्र्र्र्र्र....सर्र्र्र्र्र्र्र्कन काटा !!!!!!!!!! अ ओ, आता काय करायचं>>>>>>>>>..अग घाबरतेस कशाला?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
जागू आहे ना. Proud

बर. मी कारण नाही सांगत. येण्याचा त्यापेक्षा इथे निदान फोटो तरी टाकण्याचा प्रयत्न करते. Happy

शोभे मी काय तुला गारुडी वाटले?? Lol

शोभे मी काय तुला गारुडी वाटले??>>>>>>>>>>>..नाही. जागुडी. Lol अग लेकी कशा आहेत. राधा सध्या काय करते? Happy

बापरे.... विषारी अहे का तो? भीती नाही वाटत का तुम्हाला?>>>>>>>>>>...थोडे दिवसानी राधाचा हातात साप घेतलेला फोटो, बघायला मिळेल आपल्याला. . Proud

सायली नाही वाटत भिती मी फोटो काढायला जवळ काही अंतरावर जाते.

हा पण जर अगदी जवळ आला तर नक्की घाबरेन. पण ते आपल्याला बघुन पळतात.

शोभे बघायला ये काय करते ते. मी नाही सांगणार ज्जा........

शोभे,काय हे, जागुली काय तुला गारुडी वाटलेली?? Rofl

मला जागु लगेच डोक्यावर मुंडासं बांधलेली ,हातात .'बीन'घेतलेली डोळ्यासमोर आली ना Proud

जागू, नाग भारीच आहे, मस्त फोटो
पण नीट पाहिल्याशिवाय वावरणं धोक्याचं आहे....

माझ्या जास्वंदीच्या झाडाला अशा जुळ्या कळ्या आल्या आहेत.

jaswand.jpg

वा सुंदर कळ्या.

काल आमच्या झुंबराच्या घरट्यातली बुलबुल बाळे उडून बाहेर गेली. गेली म्हणजे त्याच्या आई-वडीलांनी त्यांना दिशा दाखवली. ते प्रत्यक्ष काल आम्ही पाहील. माझे डोळे पाणावले ते पाहताना. दोन्ही बुलबुल पिल्लांना शिकवते होते कस उडायच ते. स्वतःचे पंख फडफडवून दाखवत होते कसे उडायचे. मी फोटो काढलेत थोडे आणि थोडी शुटींग केली आहे. वेळ मिळताच इथे टाकेन.

सुदुपार निगकर,

जागु,
छान फोटो.
साप हा शेतकर्‍यांचा मित्र आहे अस नुसतं म्हणणारे खुप आहेत पण तुम्ही तुमच्या जगण्यातु दाखवुन दिलयं, इतरांप्रमाणे नागाला मारुन न टाकता.

जो_एस,
छान आणि दुर्मिळ फोटो.

काल आमच्या झुंबराच्या घरट्यातली बुलबुल बाळे उडून बाहेर गेली. गेली म्हणजे त्याच्या आई-वडीलांनी त्यांना दिशा दाखवली. ते प्रत्यक्ष काल आम्ही पाहील>>> वा, छानच
या पिल्लांची वाढ किती झटपट होतेना. घरट बांधायला लागल्यापासून महिनाभरात उडतातही ती.

हे फुल कसलं असेल ओळखा बघू.
( शांकली आणि जागू यांना नक्कीच माहीत असणार, तेव्हा त्यांनी गप्प बसायचे Happy )

जो , दो कलियाँ फारच मस्त आहेत...

दिनेश ,किलांबा त चक्कर टाकुन आले... फुलं...अतिशय सुरेख आहेत

वरचा प्रश्न माझ्याकरताही नाहीच्चे!!! Lol

Pages