मुख्य पदार्थ :-
चीज/पनीर + फळ
चीज/ पनीर +मका
चीज /पनीर+ फळ+ मका
या स्पर्धेचे नियमः
१) प्रमुख जिन्नसांमध्ये यापैकी एक समूह असणे गरजेचे आहे.
उरलेले उपपदार्थ आपल्या आवडीचे घेता येतील.
चीज किंवा पनीर मुख्य पदार्थ म्हणून घेतल्यास घ्यायचे असल्यास अनुक्रमे पनीर किंवा चीज उपपदार्थ म्हणून घेता येईल.
२) वरील समुहातील एखादी गोष्ट केवळ सजावटीकरिता वापरल्यास ग्राह्य धरली जाणार नाही.
३) वरील जिन्नस वापरून एकच गोड किंवा तिखट पदार्थ बनवू शकता.
४)पदार्थ शाकाहारीच असावा.. अंडं, मांस, मासे आणि इतर सीफूड यापैकी काही वापरू नका
५) तयार पदार्थाचं प्रकाशचित्र अनिवार्य आहे. कृतीची (पायर्यांसहित) प्रकाशचित्रे द्यायला हरकत नाही.
६) प्रवेशिका भरताना, पदार्थ गोड आहे का तिखट याचा स्पष्ट उल्लेख हवा.
७) एक सभासद दोन प्रवेशिका पाठवू शकेल मात्र त्यापैकी एक गोडाची व एक तिखटाची असायला हवी. एक सभासद दोन्ही गोडाच्या वा दोन्ही तिखटाच्या पाककृती पाठवू शकणार नाही.
८) एका प्रवेशिकेत एकच पाककृती असावी.
९) या स्पर्धेचा अंतिम विजेता मायबोलीचे सभासद मतदान पध्दतीने ठरवतील. या मतदानासाठीचा धागा अनंतचतुर्दशी नंतर उघडण्यात येईल.
प्रवेशिका कधी, कुठे व कशा पाठवाव्यात?
१. प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून,९ सप्टेंबर २०१३ (भारतीय प्रमाणवेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, १८ सप्टेंबर २०१३ (अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) स्वीकारण्यात येतील.
२.प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१३' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता 9 सप्टेंबरला खुला करण्यात येणार आहे.
३. 'मायबोली गणेशोत्सव २०१३ पानाच्या उजवीकडे दिसणार्या 'मायबोली गणेशोत्सव २०१३' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर सामील व्हा या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१३' या ग्रूपचे सभासद झाला आहात.
४. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन पाककृती' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१३ ग्रूपमधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)
५. नवीन पाककृतीचा धागा उघडला जाईल. त्यात 'शीर्षक' या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :-
- तुमच्या पाककृतीचे नाव - गोड/तिखट - मायबोली आय डी.
तसेच साहित्यात तुम्ही मुख्य पदार्थ म्हणून कोणता गट घेतलाय आणि उपपदार्थ कुठले घेतलेत ते स्पष्ट आणि वेगवेगळे लिहा.
६. शब्दखुणा या चौकटीमध्ये मायबोली गणेशोत्सव २०१३ हे शब्द लिहा.
६. मजकुरात प्रकाशचित्र टाकण्यासाठी मजकुराच्या चौकटीखाली मजकुरात image किंवा link द्या. यातील image शब्दावर टिचकी मारा. एक नवीन खिडकी (विंडो) उघडेल. त्यात वरती दिलेल्या पर्यायांपैकी 'upload' हा पर्याय निवडा. मग 'browse' वर टिचकी मारुन तुमच्या संगणकावरून योग्य ती फाईल upload करा. फाईल अपलोड झाली की खालच्या करड्या चौकटी मध्ये त्याची पावती (मेसेज) दिसेल. मग ही फाईल सर्वात वरती दिलेल्या पर्यायांपैकी 'Send to text area' हा पर्याय वापरून तुमच्या मजकुरात समाविष्ट करा.
प्रकाशचित्र टाकण्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.
७. नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर ग्रूप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
८. Save ची कळ दाबा.
९. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल/बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.
********
पाककलापटू माबोकरांच्या चविष्ट प्रवेशिकांची प्रतीक्षा आहे.
ही स्पर्धा लवकर जाहिर केली ते
ही स्पर्धा लवकर जाहिर केली ते छान झालं. ऐन गणपतीत पदार्थ करून फोटो काढून प्रवेशिका पाठवणं यामधे गडबडच होते.
आता नियम वाचते
वा! मस्त.. नियमांमधे कसलीही
वा! मस्त.. नियमांमधे कसलीही संदिग्धता नाही.
फक्त एऽऽकच शंका:
चीज/ पनीर + फळ असा समूह असेल तर फळांचा रस घेऊ शकतो ना? की ताजी फळेच वापरणे अपेक्षित आहे?
मका म्हणजे मक्याचं पीठ वापरलं तर चालेल का? की मक्याचे दाणेच अपेक्षित आहेत?
मी गोड प्रवेशिका पाठवली तर तिचे नाव होईल - XXXX गोड मंजूडी
मग मीही होऊ का गोड पौर्णिमा?
मग मीही होऊ का गोड पौर्णिमा?
मुख्य पदार्थ चांगले आहेत. कला आणि पाककौशल्याला बराच वाव आहे. प्रयत्न करेन भाग घ्यायचा.
माझी गेल्यावर्षीची पाककृती
माझी गेल्यावर्षीची पाककृती (सफररिंग) यंदाच्या नियमांतही बसतेय.
मंजूडी, मका कोणत्याही
मंजूडी, मका कोणत्याही स्वरुपात वापरू शकता. फळं मात्र ताज्या स्वरुपातच वापरली जावी. फळांचा रस चालेल पण डब्बाबंद पल्प, मुरांबे, मोरावळा ईत्यादी चालणार नाही.
धन्यवाद संयोजक
धन्यवाद संयोजक
हे चीज/पनीर चा मतलब चीज
हे चीज/पनीर चा मतलब चीज किंवा पनीर असे आहे ना?
छान कल्पना. परदेशात मिळणारी
छान कल्पना.
परदेशात मिळणारी काही प्रकारची चीज, शाकाहारी नसतात. ( काफ रेने वापरलेली ) भारतात मात्र बहुतेक शाकाहारीच मिळतात. (इन्झाईम्स वापरलेली ) शक्यतो लेबल वाचलेलं बरं.
<सुगरण माबोकरांच्या चविष्ट
<सुगरण माबोकरांच्या चविष्ट प्रवेशिकांची प्रतिक्षा आहे.>
संयोजक, सुगरणबद्दल मोल्सवर्थ बघा काय म्हणताहेत : सुगरण (p. 857) [ sugaraṇa ] a (सुगर) Skilful, expert, apt. Note. This word is more commonly applied to females, and with the implication of expertness in cookery and other points of housewifery. It is but a form of the word सुगरीण, although, through ignorance or inattention, it is sometimes used of male persons.
वर दिलेल्या अर्थात बसणार्या माबोकरांच्याच प्रवेशिकांची प्रतीक्षा आहे का?
>>परदेशात मिळणारी काही
>>परदेशात मिळणारी काही प्रकारची चीज, शाकाहारी नसतात. ( काफ रेने वापरलेली )<< +१
इथे शाकाहरी चीज मिळते. पन भारतात असणारे अमूल असते शाकाहारी असा दावा करतात.
तसेही दूधाचे पदार्थ व फळ विरोधी आहार.. ज्यास्त करून बाहेरच्या देशाकडून आलेली पद्धत आहे.
झंपी, हे वाचा - १) प्रमुख
झंपी, हे वाचा -
१) प्रमुख जिन्नसांमध्ये यापैकी एक समूह असणे गरजेचे आहे.
उरलेले उपपदार्थ आपल्या आवडीचे घेता येतील.
चीज किंवा पनीर मुख्य पदार्थ म्हणून घेतल्यास घ्यायचे असल्यास अनुक्रमे पनीर किंवा चीज उपपदार्थ म्हणून घेता येईल.
_____
भरत मयेकर, सुगरण शब्दाला कोणताही निकष आपण सध्या लावत नाही आहोत. त्यामुळे मनापासुन भाग घेऊ इच्छिणार्या प्रत्येक सभासदाच्या प्रवेशिकेचे स्वागत आहे. ही बाब लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! योग्य बदल करत आहोत!
....
....
धन्यवाद
धन्यवाद
आह्हा... आता अजून नवनवीन
आह्हा... आता अजून नवनवीन रेसिपीज मिळतील बघायला,शिकायला.... !!!
४) पदार्थ शाकाहारीच असावा
४) पदार्थ शाकाहारीच असावा >>> असा नियम का? (उत्सुकता आहे)
केदार,ऐन गणपतीच्या
केदार,ऐन गणपतीच्या दिवसांमध्ये घरात नॉन-व्हेज बनवलं जाण्याची शक्यता बर्याच अंशी कमी असते.
हा साधा विचार करुन इतर नियमांप्रमाणे हाही एक नियम सहज ठरवण्यात आलेला आहे. त्यामागे कोणतेही खास कारण नाही.
छान. तिखट लोला.. >>ऐन
छान.
तिखट लोला..
>>ऐन गणपतीच्या दिवसांमध्ये घरात नॉन-व्हेज बनवलं जाण्याची शक्यता बर्याच अंशी कमी असते
कोणाच्या घरात?
अंडं घालू का नको?
लोला, कोणाच्या घरात?>>>बहुतेक
लोला,
कोणाच्या घरात?>>>बहुतेक घरांमध्ये!
अंडं घालू का नको?>>
याला हरकत घेणारे आम्ही कोण? मात्र स्पर्धेसाठीच्या पाककृतीत नको..
अंडं, मांस, मासे आणि इतर सीफूड यापैकी काही वापरू नका.
*नियम आणखी स्पष्ट करायचा
*नियम आणखी स्पष्ट करायचा प्रयत्न केला आहे.
मजकुरात प्रकाशचित्र टाकायचे
मजकुरात प्रकाशचित्र टाकायचे असल्यास >>> मजकुरात प्रकाशचित्र 'टाकण्यासाठी' - अशी शब्दरचना हवी संयोजक
.
.
एका समूहाचा सगळं मिळून एकच
एका समूहाचा सगळं मिळून एकच पदार्थ तयार करायचा आहे ना? म्हणजे मक्याचे सूप आणि पनीरचे स्टार्टर असे वेगवेगळे करून एकाच डिशमध्ये सर्व्ह केले तर चालणार नाही ना?
पौर्णिमा, सगळे जिन्नस वापरून
पौर्णिमा, सगळे जिन्नस वापरून एकच पदार्थ तयार करण्यात यावा.
म्हणजे मक्के की रोटी आणि
म्हणजे मक्के की रोटी आणि सरसोंका पनीरवाला साग चालणार नाही
ओके संयोजक, धन्यवाद. उचित
ओके संयोजक, धन्यवाद. उचित वाटलं तर-
३) वरील जिन्नस वापरून गोड किंवा तिखट पदार्थ बनवू शकता.>> इथे 'एकच' शब्द टाका.
मंजूडी धन्यवाद पौर्णिमा. बदल
मंजूडी
धन्यवाद पौर्णिमा. बदल करत आहोत.
>>बहुतेक घरांमध्ये मग त्या
>>बहुतेक घरांमध्ये
मग त्या बहुतेक लोकांनी टाकल्या असत्या की शाकाहारी आणि थोड्या मांसाहारी आल्या असत्या तर काय बिघडलं असतं? त्यांच्या घरचा बाप्पा रागवतो की काय! आमची गौर रागवली तर?
ही अल्पसंख्यांकांची गळचेपी आहे!
"३)" मध्ये तो 'एकच' शब्द घातल्यानं आता खालच्या पोस्ट्स न वाचता नुसते नियम वाचले तर ३ आणि ७ वाचून गोंधळ होतोय. 'तिखट' च्या आधीही 'एकच' लावायला पाहिजे. किंवा "दिलेल्या एका समूहातील सर्व घटक हे एकाच पदार्थात असले पाहिजेत" असं काहीतरी.
धन्यवाद.
पनीर आणि चीज हे पदार्थ खूप
पनीर आणि चीज हे पदार्थ खूप वेगळे आहेत. त्यापैकी एक आणि मग फळ/मका/फळ + मका असे चालेल ना?
इतर उपपदार्थांचे काय? जसे फोडणीचे पदार्थ, सजावटीचे सामान (खोबरे, कोथिंबीर, लिंबू इ.), गोडाचे मसाले जसे वेलची, जायफळ इ. चालेल ना??
मस्त आहे स्पर्धा. संयोजक असा
मस्त आहे स्पर्धा. संयोजक असा अर्थ आहे ना वरच्या नियमांचा
१.पनीर +फळ
२.पनीर्+मका
३.पनीर्+मका+फळ
४.चीज+फळ
५.चीज+मका
६.चीज+मका+फळ
वरील सहा ऑप्शन मधला कोणतेही काँबीनेशन घेवून पदार्थ करावयाचा आहे. पदार्थ करताना ऑप्शन मधले पदार्थ घेतलेच पाहिजेत. त्या व्यतिरिक्त कोणतेही इतर घटक अॅड करता येतील.
>>ऐन गणपतीच्या दिवसांमध्ये
>>ऐन गणपतीच्या दिवसांमध्ये घरात नॉन-व्हेज बनवलं जाण्याची शक्यता बर्याच अंशी कमी असते<<
अहो पण इथे(मायबोलीवर) देवाला नैवेद्य कशाचाही( शाकाहारी/मांसाहारी) दाखवला तर काय फरक पडतो..(आठवा आईसक्रीम नैवेद्य किंवा बकर्याचे बळी देणारी चर्चा).. असे अश्या बीबीवर आपले मौलिक विचार प्रकट करणारे बरेच आहेत, त्यांना उगीचच 'पुन्हा रुढीत' खेचल्यासारखे वाटेल व जाचक वाटेल.. व सर्व जे पुढारलेल्या विचारांचे आहेत(त्यांच्या मते पुढारलेले कारण त्यांना पिढ्यान पिढ्या देवाला फक्त 'शाकाहरी' का 'च' घालायचे मान्य नाही ते) त्यांना बरे नाही वाटणार.
आणि इथे मायबोलीवर पुढारलेले(?) लोकं ज्यास्त असल्यास ह्या स्पर्धेला कमी प्रतिसाद मिळेल असा वाव आहे. असा एक अंदाज आहे.
काही खूपच हुशार आहेत जे फक्त अंडे व तत्सम मांस घालूनच बनवू शकतात त्यांच्या पाककलेला वाव नाही मिळणार.
मनाने दाखवले तर काहीही चालायला पाहिजे, शेवटी आपणच नैवेद्य खाणार असे त्यांचे(पुढारलेल्यांचे) मत आहे.
Pages