बेफिकीरी (शतशब्दकथा )

Submitted by बाबूराव on 31 August, 2013 - 05:23

गाडी पाहताक्षणीच येणारा जाणारा थबकत होता. त्याला जगाची फिकीर नसावी. त्याच बेफिकिरीने ऐटीत त्या रोल्सराईसमधे बसला. लोक वळून वळून पाहताहेत याची पर्वा न करता त्याने चावी लावली. एक स्वर्गीय सौंदर्याची मालकिण गाडीजवळ येऊन थबकली. तिने त्या गाडीला हात लावल्याचे पाहीले. तिच्या सौंदर्याचा त्याच्यावर थोडाही परिणाम झाला नाही. त्याचा चेहरा पूर्वीइतकाच कठोर होता.

त्याने मागे वळून न पाहता गाडी स्टार्ट करत तिच्यासाठी डोअर लॉक उघडलं. ती चक्क आत येऊन बसली तरीही त्याच्या चेह-यावर कसलेही भाव नव्हते. जसं काही ती आता काहीतरी बोलेल याची त्याला कल्पनाच होती. आणि ती बोलली

" ड्रायव्हर ! बाहेर येऊन दवाजा उघडायचं काम कुणाचं ? यू आर फायर्ड... गेट लॉस्ट "

- बाबूराव
( मु पो - प्रौढ साक्षर वर्ग )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

का माहीत नाही...पण...तुमच्या..शैलीची नाही वाट्ली....