फावला वेळ गावला म्हणून!

Submitted by भानुप्रिया on 30 August, 2013 - 07:56

ऑफिसात काम नाही, मा बो वर नवीन कथा नाहीत! (मोरपिसे पण संपलेली!!!)

अशावेळी काय करावं काही सुचत नव्हतं. म्हटलं जरा फ्रेश होऊन यावं, बॅग उघडली अन समोर माझं आयलायनर दिसलं! मग क्काय! माझ्यातला लपलेला कलाकार (??????) टुण्णकन उडी मारून बाहेर आला!!!

बघा कसं वाटतंय!

पहिल्यांदाच केलंय बरं!

(ते अर्थातच माझ्या कलेची 'क्वालिटी' बघितल्यावर जाणकारांच्या लक्षात येईलच म्हणा!!)

प्रचि १
IMG_20130830_154721.jpg

प्रचि २
IMG_20130830_154808.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं गं भानुप्रिया..

आम्ही शाळेत असताना ऑफ तासाला किंवा सुरू (बोर) तासाला असले उद्योग करत बसायचो.

आम्ही शाळेत असताना ऑफ तासाला किंवा सुरू (बोर) तासाला असले उद्योग करत बसायचो >>> आणि मी कॉलेजात करतीय!

माझ्या विद्यार्थ्यांनी बंक मारला म्हणून!

Lol

वॉव!

वाव ,मस्तच!!

लाल पेनानी हातावर मेंदि काढायचे उद्योग आम्ही पण शाळेत आणि कॉलेज मध्ये भरपुर केले आहेत . मग परिक्षेत तो हाता वरचा लाल रंग पेपरात दिसायचा!!;)

मस्तच.

खासच गं !!
तुझ्यातल्या टुण्णकन उडी मारुन आलेल्या कलाकाराला असंच जागं ठेव Happy

भानुप्रिया मस्त कला आहे तुमच्या हातात, पण ती पेपरवर अजून वाढवा ना. मोर आणी गुलाब दोन्ही आवडलेत्.:स्मित:

जयश्री ताई, आता इतकं प्रोत्साहन मिळतंय म्हटल्यावर हुरुप नक्कीच आलाय!!!

रश्मी: धन्यवाद गं आणि 'तुमच्या' नको, प्लीज! मला 'अगं'च म्हण!

मोर खुप छान आलाय.. ग्रेट..!! अहो फावला वेळ आम्हाला पण मिळतो, आणि असे काही करु असे नुसते ठरवण्यातच वेळ संपुन जातो.. पण तुमच्या दोन्ही कलाक्रुती पाहुन लक्षात येतेय की चित्रकलेचं अंग आहे तुमच्याकडे.
अजुन छान छान स्केचेस बघायला आवडतील.

दाद, चाऊ आणि प्रदीपा, खूप खूप आभार!
कौतूक करून घ्यायला भारी छान वाटतंय!

आणि मला प्लीज 'अहो' म्हणू नका तायांनो! मी बर्रीच लहान आहे! Proud