निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोर्तुजीज नाव फेज्यँव म्हणजे कडधान्याची शेंग.>>>>>> गोव्याला मिळणारे फजाव तर नव्हे ना? उंडे आणि
फजावाचे दबदबीत खूssssssssप वर्षांपूर्वी खाल्ले होते त्याची आठवण आली.

निसर्गाचा एक चमत्कार Happy
नुब्रा व्हॅली (लडाख) येथे दिसलेले इंद्रवज्र किंवा सनरिंग :-). सूर्याच्या भोवती आलेले गोलाकार इंद्रधनुष्य. Happy

स्निग्धा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy

जिप्स्या, इंद्रवज्र काय सह्ही दिसतंय! आणि त्यात तुझी फोटोग्राफी!! म्हणजे दुधात केशर काड्या!! Happy

भारीच जिप्स्या!!

<<त्यात तुझी फोटोग्राफी!! म्हणजे दुधात केशर काड्या!!<< +१११

गर्दनिळ्या पार्श्वआकाशावर ते इंद्रवज्र काय सुंदर दिसतय!! Happy

इंद्रवज्र सुंदरच..

नाही येळेकर, या हिरव्या ताज्या शेंगा असतात. गोव्यात तसल्या बघितल्या नव्हत्या मी कधी.

चांगली बातमी ही की मला शेवटी माझ्या स्वप्नातली शेतजमीन मिळाली. अजुन खरेदीखत व्.व. करायचेय पण त्या सगळ्या गोष्टींना सुरवात केलीय. मी शेतकरी आहे हे सिद्ध करण्यापासुन तयारी करावी लागणार...
साधना,
अभिनंदन,
आता नवीन कमाल जमीन धारणा कायदा येणार अशी चर्चा चालु आहे, त्या नुसार (एकाच व्यक्तीच्या नावे) ५ एकरा वरील जमीन सरकार जमा होईल.

तुझी ही जमीन जर ५ एकर पेक्षा जास्त असेल तर ती तु या मोठ्या भावाच्या (दिनेशदाच्या) नावावर आताच करु शकतेस.:हाहा:

हो साधने, नावच हवे असेल तर माझे नाव वापर !

अनिल,
आमच्याघरी श्रावणातल्या सगळ्या गोड पदार्थात, तूझ्या घरचे बेदाणे वापरले.

दिनेशदा,
बदल/गंमत म्हणजे पुर्वी व्यापार्‍यांकडुन प्रक्रिया केलेल्या पिवळ्या बेदाण्याला मागणी असायची,पण सध्या (अधिक खर्च करुन तयार केलेला) हा पिवळा बेदाणा पिछाडीवर आहे,कुठलीही प्रक्रिया न केलेल्या हिरवा बेदाणा ची मागणी वाढत आहे.
इथे मी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था झाली तर बघतोय्,मग मला बेदाणे अधिक दिवस ठेवता येईल.

गोव्यात फेज्ज्यांव चवळीसारख्या दिसणार्‍या गोडसर शेंगांना म्हणतो आम्ही. मला वाटतंय आमच्या बागेत रुजूनपण आलंय त्यातलं एक. उद्या शक्यतो फोटो टाकते.

सर्वात आधी स्निग्धा...वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !!!

मस्त गप्पा चालल्यात.. पेण्टर्सकडून निजात मिळाल्यावर तुम्हा सर्वाच डोकं खायलासुरु करीनच कि बाल्कनीत कोणकोणती ,रोपं लावावी,, इइइइ ;०

वर्षू, बाल्कनीत काही रोपे लावायची गरज नाहीच. आजूबाजूला मस्त झाडे आहेत. एक खुप बहरलेला कदंब उत्पल संघवी शाळेजवळ आहे. त्याच्या फळांची ( निव ) चव बघच एकदा. आता नक्कीच असतील. कोकणात त्याचे लोणचे घालतात.

पिशी, इथल्या शेंगा म्हणजे आपल्या सपाट फरसबीचा २०० % आकाराची फोटोकॉपी आहे.

दिनेशदा तुम्ही निवची आठवण काढलीत, आम्ही असेच तिखट-मीठ लावून निव खायचो, अहाहा, काय लागायचे, खूप वर्षे झाली खाऊन.

आता, वर्षू सगळ्यांना निव दाखवून टूक टूक करेल.

काल मला इथल्या सुपरमार्केट्मधे अंगोलाचे फणस दिसले. तीन फूट लांब आणि दीड फूट रुंद. घेता आला नाही म्हणून जीव हळहळला. घेतला असता तर पुढचा महीनाभर फणसच खावा लागला असता.
काल करमळं सुद्धा होती. ती मात्र घेतली आणि कॅश काऊंटर सोडल्याबरोबर एक कचाकच खाऊन टाकले.

आता उद्या करवंदाच्या जाळीकडे फेरी मारायला हवी.

सोनचाफ्या ला बारा महिने फुलं लागतात का? दोन आठवडया पुर्वी एका मोठया कुंन्डीत झाड लवले आहे. झाड आणले तेव्हा त्याला एक फुल लागलेल होत, आमच्या घरी गणपती बसवतात, १० दिवसात एक तरी फुल वाहता यावं, अस मनापासुन वाटतं. नागपूर ला सोनचाफा फार दुर्मिळ आहे, बर्‍याच नरसर्‍या पालथ्या घातल्या, तेव्हा कुठे एक झाड हाती लागलं.

कोकण म्हणण्यापेक्षा हवामान आणि पोर्तुगीज.. हे कॉम्बिनेशन जमलंय इथे. आंबे, काजू यांची भरपूर लागवड आहे इथे.

सायली, साधारण पावसाळ्यात बहर असतो, हिवाळ्यात कमी होतो. गणेशोत्सवात असेल बहर. पण झाड मोठे हवे.

ध्न्यवाद दिनेश. हो झाड बर्‍या पैकी मोठ आहे. साधारण ४ फुट उंचीच असेल. दर वेळेला मी फसते, त्याला नविन पान आल की ते क़ळी सारखच वाटत कारण ते जरा टणक असत. मग दोन दिवसानी माझा भ्रमनीरास होतो.

त्याच्या फळांची ( निव ) चव बघच एकदा. आता नक्कीच असतील. >>>>>>...दिनेशदा, धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल. माझी एक मैत्रिण (कोकणातील)गणपतीसाठी कोकणात चाललेय. तिला निव आणायाला सांगायच ठरवल. पण विसरले होते. आता फोन करून आधी सांगते. तिला चिबुड पण आणायला सांगितले आहेत. कित्त्येक वर्षात, निव, चिबूड, पपनस, करांदे, फुलातली काकडी, अशा बर्‍याच वस्तू खाल्लेल्या नाहीत. पण आठवण स्वस्थ बसू देत नाही. Uhoh
अंजू, तुम्ही कोकणातल्या का? कुठे? Happy

Pages

Back to top