Submitted by अनघा कुलकर्णी on 29 August, 2013 - 11:50
गूळ पापडी -------------------
साहित्य ----चांगले तूप ,गूळ ,कणिक .
कृती ----कढइत कणिक चांगल्या तुपावर खंमंग भाजून घ्या . गस बंद करा . भाजलेल्या कणकेत गूळ चिरून अंदाजी घाला . व लाडू वळा . किंवा तसेच खा .
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओ ताई, जरा प्रमाण वगैरे सांगा
ओ ताई,
जरा प्रमाण वगैरे सांगा की!
नक्की यालाच गुळपापडी म्हणतात का? माझ्या मते तरी काहीतरी वडी सारखा पदार्थ असतो तो.
इथे तर हे चुर्म्याचे लाडू सारखे काहीतरी तयार होईल असे वाटतय.
कढईत तुपावर कणिक भाजल्यानंतर
कढईत तुपावर कणिक भाजल्यानंतर त्यातच मी चिरलेला किंवा किसलेला गूळ घालून थोडा वेळ मंद विस्तव ठेवते आणि गूळ किंचित गरम झालाकी gas बंद करते आणि त्यात सुका मेवा,वेलची घालते, मग ताटलीला तूप लावून वड्या थापते. विस्तव खूप वेळ ठेवला तर वड्या कडक होतात.
मला आधी ही पण कविताच वाटली.
मला आधी ही पण कविताच वाटली. आणि त्या रेघांवरून परीक्षेतील गाळलेल्या जागा भरा आठवले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तू काय उत्तरं भरलीस तिथे?
तू काय उत्तरं भरलीस तिथे?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुळपापडीत इतरही साहित्य असतं
गुळपापडीत इतरही साहित्य असतं - भाजून नंतर हातानं चुरलेलं सुकं खोबरं, खसखस भाजून, वेलची पावडर वगैरे वगैरे... आणि सहसा वड्या पाडतात.
<किंवा तसेच खा> हे खूप आवडलं.
<किंवा तसेच खा> हे खूप आवडलं.
एक्स्प्रेस्स गुळपापडी.
एक्स्प्रेस्स गुळपापडी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझी आई नेहमी करायची......
माझी आई नेहमी करायची......:)
अनघाताई खालच्या लिंकवर क्लिक
अनघाताई खालच्या लिंकवर क्लिक क्लिक करा.
http://www.maayboli.com/node/2994
आणी मनस्विनीने कशी प्रमाण देऊन कृती टाकली आहे ते बघा. पुढे ज्या पाककृती इथे टाकाल त्या प्रमाण देऊन टाका.
अंजुने पण लिहीले आहेच, पण प्रमाण देता आले तर चांगले.
शतशब्दकथा हल्ली फेमस झाल्यात
शतशब्दकथा हल्ली फेमस झाल्यात माबोवर.... आता दशशब्दपाकृ यायला लागल्या.
माझी आई हा पदार्थ करायची .
माझी आई हा पदार्थ करायची . अंदाजीच करते मी पण . तरी एक वाटी कणिक ,३ चमचे चांगले तूप ,अर्धी वाटी चिरलेला गुळ.
dry fruit घालु शकता.
प्रमाण काय????? की घरात जे
प्रमाण काय????? की घरात जे जितकं अव्हेलेबल तितकं कितीही कसही????? सोप्प आहे पण १ किलो कणकेत २चमचे तुप टाकलं तर बट्ट्य्याबोळच् की हो....माझ्या सारख्या नवशिक्यांची भंबेरीच मग.....कसलं सोप्पं नी कसलं काय.....
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आणि लाडु वळा असे म्हटले आहे
आणि लाडु वळा असे म्हटले आहे पण नाव पापडी का????
अनघा, तुम्ही आत्ता लिहिलेल्या
अनघा, तुम्ही आत्ता लिहिलेल्या प्रतिसादातील प्रमाण आणि टिपा वर पाककृतीतही लिहा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किंवा तसेच खा!
किंवा तसेच खा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अंजली दी....तसेच शिरा खातो
अंजली दी....तसेच शिरा खातो तसे खावे लागेल मग....( जस्ट जोकिंग
) ...मी आधी असच कोणाचे तरी ऐकुन अगदी थोडी बनवली होती गूळ पापडी काय चुकलं माहित नाही पण दगड पापडी झाली होती.....तुटतच नव्हती नॉरमल दातांनी.....
आता या सर्व पद्धतींनी करुन बघेन......
अनिश्का तुमच्यासाठी आणि
अनिश्का तुमच्यासाठी आणि तुमच्यासारख्यांसाठी मी खास लिहिलेली पाककृती बघा. अश्या पद्धतीने गुळपापडीची रेसिपी हवी का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://www.maayboli.com/node/43825
अनिश्का.. रश्मीने लिंक दिलेय
अनिश्का.. रश्मीने लिंक दिलेय त्या पद्धतीने बघ करुन वड्या. छान होतात. पण या वड्यांना तसेही तूप जरा सढळ हस्तेच वापरावे लागते,
पण पाणी घालून पाक केलास तर कमी लागेल कदाचित.
रश्मी, मी प्रमाण दिले नाही
रश्मी, मी प्रमाण दिले नाही कारण माझे अंदाज-पंचे दाहोदरसे असते, त्यामुळे मी पाककृती लिहित नाही फक्त वड्या कशा करते आणि सुका-मेवा, वेलची( आख्खी किंवा पूड घालते) एवढंच लिहायचं होते.
मनस्विनी यांनी छान लिहिलेय, लिंक दिल्याबद्दल धन्यवाद रश्मी. आता त्या पद्धतीने करेन.
जाम भारी विजय दा..... हसुन
जाम भारी विजय दा..... हसुन हसुन वारले....
( हा शब्द पण मायबोलीवरच शिकलेय )
अंजली >>>> मी ती रेसिपी सेव्ह
अंजली >>>> मी ती रेसिपी सेव्ह करुन घेतली आहे....रविवारी करेन...
नाहीतरी श्रावणच आहे....रवीवार साठी मस्त...माहेरी आले आहे काही दिवसांसाठी तर चुकलं तरी चालेल... ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मला आवडतो हा प्रकार! गूळ +
मला आवडतो हा प्रकार! गूळ + तुपावर भाजलेली कणिक भारी लागते एक्दम !
गुळ पापडी आमच्या शेजारची
गुळ पापडी आमच्या शेजारची गुजराथी भाभी करुन द्यायची मला आवडते म्हणुन ...खुपच अप्रतीम असायची ती...
अंजु असु दे. तुझी कृती छान
अंजु असु दे. तुझी कृती छान आहे, माझे पण अंदाज असतात तरीही नवशिक्यांकरता ( विशेषतः परदेशात/ देशात इतरत्र रहात असलेल्या मुलामुलींकरता) प्रमाण उपयोगी पडेल असे मला वाटले.
माझी सगळ्यात जास्त आवडती पाककृती म्हणजे गुळपापडी. मी तशी पण वाटीत घेऊन खाते. कधी कधी त्यात दुध घालुन पण. खरे तर एकावेळेस ३ ते ४ खावेसे वाटतात पण तसे होत नाही.:अरेरे::फिदी: