निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.
आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
<<आर्या, पुण्यात असतेस?<, हो
<<आर्या, पुण्यात असतेस?<,
हो गं! १९९३ पासुन पुण्यात आहे.
अनिल७६, "मधु-मकरंद, घरबांधणीच
अनिल७६,
"मधु-मकरंद,
घरबांधणीचे हे अप्रतिम आणि दुर्मिळ फोटो शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
माणसांला या घरच्या बांधकामापासुन शिकण्यासारखं खुप आहेच" >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> फोटो मी टाकलेले नाहीत.
जिप्सी, वाढदिवसाच्या हार्दिक
जिप्सी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जिप्स्या / राधा / जागू...
जिप्स्या / राधा / जागू... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
जिप्स्या आता जर्दाळू दिसत नसतील.. ( मी तोडले ना सगळे !! )
जागुतै, राधाला वाढदिवसाच्या
जागुतै, राधाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जिप्सी, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
दोन्ही जुनेच फोटो. पहिला श्रीलंकेतला, दुसरा जर्मनीतला. सार्वजनिक ठिकाणी (रेल्वे स्टेशनवर आणि रस्त्याच्या कडेला) इतकी सुंदर फुलं टिकून राहिलेली आपल्याकडे कधी बघायला मिळाणार?
मानुषी, ससुला आणि सहेली,
मानुषी, ससुला आणि सहेली, हिरवा गालिचा भारी आहे.
हे पुण्याहुन गावी जाताना
हे पुण्याहुन गावी जाताना बसमधुन काढलेले फोटो ..
माझ्या वाडीवरच्या प्राथमिक शाळेत गेलो, तिथे फुललेली काही फुले ..
शाळेच्या भिंतीच्या आतल्या बाजुची फुले अगोदरच तोडली आहेत,२५-३० फुले मुलांच्या हातात होती,रविवार असल्यामुळे..
अनिल्,अतिशय आनंददायी फोटो
अनिल्,अतिशय आनंददायी फोटो आहेत,,, फुलं कसली सुरेख आहेत..
(माझ्याकरता हळद ठेवलीयेस कि नाही अजून?????????????)
अनिल, सुरेख फोटो.
अनिल, सुरेख फोटो.
वर्षु,शांकली धन्स. आता
वर्षु,शांकली
धन्स.
आता सगळीकडे हळद ३-४ फुट ऊंच आली आहे, हळदीचे बी एप्रिल-मे मध्ये असते.
हळदीची आठवण म्हणजे माझ्या
हळदीची आठवण म्हणजे माझ्या माहेरी (कळंबूशी- ता. संगमेश्वर) आमची हळदीची बाग आहे, हल्ली ३वर्षे मी हळद विकत घेते त्याआधी कधीच घ्यावी लागली नाही, बाबा गणपतीला गावाला जायचे तेव्हा हळदीची पाने आणि तवस घेऊन यायचे मग पातोळे असायचे, हळदीच्या पानावरचे मोदकपण छान लागतात आणि हळदीचे पान चुरडून केलेले पोहेपण मस्त लागतात.
आता गावाला आत्ते असते ती म्हातारी आहे आणि आई-बाबापण म्हातारे आहेत, गणपती हल्ली आम्ही इथे शहरात आणतो त्यामुळे हळद आता कोणीच करत नाही त्यामुळे विकत घेतो आता.
अनिल फोटो खुपच सुंदर आहेत.
अनिल फोटो खुपच सुंदर आहेत. दुस-या फोटोतलं कुंपण खुप छान दिसतय..
जिप्स्या / राधा / जागू...
जिप्स्या / राधा / जागू... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! - उशीरा देत आहे तरी कृपया राग मानू नये .
मी सध्या बँकॉकला (कामानिमित्त) आहे - इथे पटाया जवळ नाँग नूच म्हणून एक फार मोठी म्हणजे अवाढव्य शब्दही कमी पडेल अशी बाग आहे -त्यात फिरताना सर्व नि ग करांची खूपच आठवण येत होती - इथे इतक्या प्रकारची झाडे, वेली, रोपे, वगैरे आहे की किमान एक महिना लागेल हे सर्व नीट पहायला - सर्व इतके सुरेख मेंटेन केले आहे की आश्चर्याने सर्व बोटे तोंडात जातील - सर्व झाडांवर त्यांची बोटॅनिकल नावेही आहेत - कोणी त्या भागात गेलात तर जरुर जरुर या बागेला भेट देणे - मला स्वतःला पटाया बीच पेक्षाही ही बागच प्रचंड आवडली ...
गुगलून पहा
www.nongnoochgarden.com
इथले फोटो काढणे केवळ अशक्य आहे - कारण विविधताच इतकी आहे की हे बघू का ते असे होऊन जाते - सर्व ठिकाणी जाणेही अशक्य आहे इतका मोठा पसारा आहे ...
राधाला, जिप्सीला वाढदिवसाच्या
राधाला, जिप्सीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
किती सुरेख फोटो आहेत प्रत्यकाचे.
जिप्सी / राधा (जाग).....
जिप्सी / राधा (जाग)..... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, उशीरा शुभेच्छा दिल्याबद्द्ल रागावू नका कारण आज ३ दिवसानंतर माबो वर आले.
सहेली, मी सुध्दा आधीच क्लेम लावून ठेवला आहे
चांगली बातमी ही की मला शेवटी
चांगली बातमी ही की मला शेवटी माझ्या स्वप्नातली शेतजमीन मिळाली. अजुन खरेदीखत व्.व. करायचेय पण त्या सगळ्या गोष्टींना सुरवात केलीय. मी शेतकरी आहे हे सिद्ध करण्यापासुन तयारी करावी लागणार...
>>
हायला, शेतजमीन खरेदी करण्यासाठी शेतकरीच असावे लागते काय? माझे निवृत्त झाल्यावर जमिन घेऊन शेती करायचे स्वप्न आहे.
शशांक, तिथे जायचे माझे
शशांक, तिथे जायचे माझे प्लानिंग आता सुरु पण झाले. पुर्वी गेलो होतो त्यावेळी डिजीटल कॅमेरा नव्हता.
अनिल, कृष्णकमळे बरीच लागलीत कि.
इथे लुआंडाला जमीनीचा एक लांबलचक चिंचोळा पट्टा समुद्रात घुसलेला आहे. त्या पट्ट्यावर मोठमोठी हॉटेल्स आहेत. काल तिथे गेलो होतो. खुप सुंदर बीच आहे आणि स्वच्छही आहे. फोटो सवडीने.. आज स्विस गुलाबांचा मारा केला आहे
हायला, शेतजमीन खरेदी
हायला, शेतजमीन खरेदी करण्यासाठी शेतकरीच असावे लागते काय? माझे निवृत्त झाल्यावर जमिन घेऊन शेती करायचे स्वप्न आहे
हो, घराण्यात कोणतरी शेतकरी हवा.
मी सुद्धा आधीच क्लेम लावून
मी सुद्धा आधीच क्लेम लावून ठेवला आहे स्मित>>>> होय ग स्निग्धा, आज पिशवीत लावून ठेवतेय, मग ठरवा कोण कधी येतेय ते.
चांगली बातमी ही की मला शेवटी
चांगली बातमी ही की मला शेवटी माझ्या स्वप्नातली शेतजमीन मिळाली. >>>>>>>>>>>....साधने, अभिनंदन!
हे वाचल तेव्हाच अभिनंदन करायला आले. आणि ते सोडून सर्व बोलले.
हो, घराण्यात कोणतरी शेतकरी
हो, घराण्यात कोणतरी शेतकरी हवा.
मग मी तुझा मोठा भाऊ
मग मी तुझा मोठा भाऊ
मग मी तुझा मोठा भाऊ >>>>>>>>>>>>हे कोणासाठी आहे?
तुमची पण शेती आहे का?
साधनाची शेती ना, मग मी तिचा
साधनाची शेती ना, मग मी तिचा मोठा भाऊ.
कूळ कायद्याची चाहूल लागल्यावर माझ्या आजोबांनी आपली जमीन स्वहस्ते कूळाच्या नावावर केली आणि
त्याची आठवण म्हणून आजतागायत त्या शेतावरून आजोळी धान्य / भाजी येते.
आजोबा राजवाड्यात खजिनदार होते मग बेकरीच्या व्यवसायात आले. तो आजही मामा / माम्या चालवताहेत.
मावशीची शेती आहे, तिच्याघरचा गावठी तांदूळ. तिच्या आमराईतले आंबे.. येतातच. पण त्या दिवसात मी तिथे नसतो म्हणून ती हळहळते.
मावशीची शेती आहे, तिच्याघरचा
मावशीची शेती आहे, तिच्याघरचा गावठी तांदूळ. तिच्या आमराईतले आंबे.. येतातच. पण त्या दिवसात मी तिथे नसतो म्हणून ती हळहळते>>>>>>>>>>>>>.कुठे असतात त्या. तुमच्या ऐवजी आम्ही हजेरी लावू.
कुठे असतात त्या. तुमच्या ऐवजी
कुठे असतात त्या. तुमच्या ऐवजी आम्ही हजेरी लावू
दिनेश आनंदाने.
स्निग्धा, वाढदिवसाच्या
स्निग्धा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
दिनेश स्मित
दिनेश स्मित आनंदाने.>>>>>>>>>.साधने, राखी पाठवून दे.
ओह, उ मो आणि गुलाबही.. खुप
ओह, उ मो आणि गुलाबही.. खुप खुप धन्यवाद शोभा
शोभा, मावशी देवरुखला असते.
शोभा, मावशी देवरुखला असते. देवरुखात नलावडे म्हणून विचार. कुणीही घर दाखवेल
साधना, शेतातच काय, शेताच्या कडेने देखील चालायला मला छान वाटते. धावत्या गाडीतून पण पिकं ओळखतो मी.
मागे जागूने अबईच्या शेंगांची भाजी लिहिली होती. तिचे झाड असते कि वेल असतो ?
मला इथे पण तश्याच पण आकाराने बर्याच मोठ्या ( १० इंच लांब आणि पाऊण इंच रुंद ) अशा शेंगा मिळाल्या.
पोर्तुजीज नाव फेज्यँव म्हणजे कडधान्याची शेंग. पण चवीला अगदी मस्त. दोरे वगैरे नाही काढावे लागले.
शिजल्याही पटकन. फोटो टाकतो नंतर.
स्निग्धा, वाढदिवसाच्या
स्निग्धा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Pages