Submitted by प्राजु on 29 July, 2013 - 08:12
गाऊ नको जराही, गुणगान पावसाचे
बाहेर बघ जरा तू, थैमान पावसाचे
वाहून गाव गेले..! तरिही नभात अजुनी
आहे बरेच शिल्लक.. सामान पावसाचे!
गळली पिके उभ्याने, शेतात नांदणारी
तरिही कसे गळेना अवसान पावसाचे?
कोठे किती झरावे, ठाऊक त्यास नाही
होईल दूर केव्हा, अज्ञान पावसाचे?
ओला नि कोरडाही, दुष्काळ हा नशीबी
चुकतेच नेहमी का अनुमान पावसाचे?
भिजलीस ना जराही, त्याच्यासवे म्हणूनी
झालेय केवढे बघ, नुकसान पावसाचे!
बाहेर तू अवेळी , जाऊ नकोस 'प्राजू'
भलतेच बघ इरादे, बेभान पावसाचे!
-प्राजु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भिजलीस ना जराही, त्याच्यासवे
भिजलीस ना जराही, त्याच्यासवे म्हणूनी
झालेय केवढे बघ, नुकसान पावसाचे!<<< व्वा व्वा, झालेच असणार म्हणा!
बाहेर तू अवेळी , जाऊ नकोस 'प्राजू'
भलतेच बघ इरादे, बेभान पावसाचे!<<< मस्त मक्ता!
गझलही आवडली.
भिजलीस ना जराही, त्याच्यासवे
भिजलीस ना जराही, त्याच्यासवे म्हणूनी
झालेय केवढे बघ, नुकसान पावसाचे!
<< क्या बात !
बाकी गझल अप्रतिम
गझल फेस्बुक्वर वाचलीचय मी व
गझल फेस्बुक्वर वाचलीचय मी व प्रतिसादही दिले आहेत
खूप आवडली आहे ही गझल सगळेच्या सगळेच शेर !. आजवरच्या तुझ्या मला आवडलेल्या अनेक गझलांमधील ही आणखी एक संस्मरणीय गझल .माझ्या मते ही गझल तू बांधलीस फार छान रदीफ काफिया वृत्त मस्त भट्टी जमली
माझ्यासाठी "सामान पावसाचे " हाच हासिले गझल ...अविस्मरणीय आहे दुसरी ओळ माझ्यासाठी
वाहून गाव गेले..! तरिही नभात
वाहून गाव गेले..! तरिही नभात अजुनी
आहे बरेच शिल्लक.. सामान पावसाचे!>> मस्त!
भिजलीस ना जराही, त्याच्यासवे म्हणूनी
झालेय केवढे बघ, नुकसान पावसाचे!>>>>>>
क्या बात है!! सुर्रेख!
फार आवडली
कोठे किती झरावे, ठाऊक त्यास
कोठे किती झरावे, ठाऊक त्यास नाही
होईल दूर केव्हा, अज्ञान पावसाचे?
भिजलीस ना जराही, त्याच्यासवे म्हणूनी
झालेय केवढे बघ, नुकसान पावसाचे! >>> हे दोन सर्वात विशेष वाटले.
मस्स्स्त गझल ! विशेषतः सामान
मस्स्स्त गझल !
विशेषतः सामान , नुकसान आणि मक्ता बेभान फार आवडले .
गझल आवडली! पहिले २ शेर विशेष.
गझल आवडली!
पहिले २ शेर विशेष.
मनापासून आभार मंडळी!
मनापासून आभार मंडळी!
सामान , मक्ता ग्रेट !
सामान , मक्ता ग्रेट !
पुलस्तिंशी सहमत. सर्वच शेर
पुलस्तिंशी सहमत.
सर्वच शेर आवडले, आता जरा आधिक सफाई आणि गोटीबंदतेवर विचार झाला की झालेच!
सुपर्ब ....
सुपर्ब ....
सर्वच शेर कमी अधिक प्रमाणात
सर्वच शेर कमी अधिक प्रमाणात आवडले.
फार सुंदर गझल.
बाहेर तू अवेळी , जाऊ नकोस
बाहेर तू अवेळी , जाऊ नकोस 'प्राजू'
भलतेच बघ इरादे, बेभान पावसाचे!
फारच सुंदर!
सर्वांगसुंदर गझल शुभेच्छा
सर्वांगसुंदर गझल
शुभेच्छा
अगदी सफाईदार! एकेक शेर अवीट
अगदी सफाईदार! एकेक शेर अवीट गोडीचा! सुंदर!
खुप आवडली.
क्लास
क्लास
आवडली.
आवडली.
गझल आवडली !
गझल आवडली !
भिजलीस ना जराही, त्याच्यासवे
भिजलीस ना जराही, त्याच्यासवे म्हणूनी
झालेय केवढे बघ, नुकसान पावसाचे!
बाहेर तू अवेळी , जाऊ नकोस 'प्राजू'
भलतेच बघ इरादे, बेभान पावसाचे!<<< सगळेच आवडले शेर ..पण हे विशेष. उत्तम गझल.:)
मस्त!! भारीच.........खुप
मस्त!! भारीच.........खुप छान......शब्द् सम्पले.
एकदम भारी गझल......मनापासून
एकदम भारी गझल......मनापासून आवडेश !!
प्रत्येक शेर इतका सहज आलाय ना..... !!
अख्खी गझल जबरी !!
मनापासून आभार पुन्हा एकदा!
मनापासून आभार पुन्हा एकदा!
सुरेख ! >> भिजलीस ना जराही,
सुरेख !
>> भिजलीस ना जराही, त्याच्यासवे म्हणूनी
झालेय केवढे बघ, नुकसान पावसाचे!
बाहेर तू अवेळी , जाऊ नकोस 'प्राजू'
भलतेच बघ इरादे, बेभान पावसाचे! >> हे जास्त आवडले.
सुंदर गझल. प्राजु यांच्या
सुंदर गझल.
प्राजु यांच्या रचना आवर्जून वाचाव्याशा वाटतात. ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं.
मस्त गझल !
मस्त गझल !
सामान मस्तच! सगळेच्या सगळे
सामान मस्तच!

सगळेच्या सगळे शेर आवडले
खुपच सुंदर
फारच
फारच छान!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!१
Aah... Too good... Jiyyyo !
Aah... Too good... Jiyyyo !
केवळ सुंदर
केवळ सुंदर