"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.
ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html
हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.
वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.
जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.
हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.
करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!
"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei
<<खाल ड्रोगो हाऊंड>> वाह
<<खाल ड्रोगो
हाऊंड>>
वाह लोला........... जबरा चॉइसेस आहेत तुमच्या.............
आणि त्या अमेरीकावाल्या
आणि त्या अमेरीकावाल्या डिव्हिड्या इथे भारतात चालत नाहीत बहुतेक.
ज्या मित्रांनी पहिली पाचही
ज्या मित्रांनी पहिली पाचही पुस्तकं वाचलीये, त्यांनी उगाच फेसबूकवरून स्पॉयलर्स टाकलेत, त्यामुळे काय आणि कसं होणार हे कळलंय... पण वाचायला अजून मजा येतीये. मालिकेत जे लिटलफिन्गरचं कॅरॅक्टर दाखवलंय, ते पुस्तकात एवढं महत्त्वाचं नाही वाटत. तिसर्या सीझनमधल्या सहाव्या/सातव्या भागाच्या शेवटी येणारं लिटलफिंगरच्या तोंडचं वाक्य मात्र ज्जाम्म आवडलंय...
"सम थिंक ऑफ ऑफ केऑस अॅज पिटफॉल, व्हाईल सम टेक इट अॅज अ लॅडर टू क्लाईंब हायर" असं काहीसं...
टिरीअन नक्कीच भारी. जोफ्रीची अॅक्टींग करणार्या मुलाने पुस्तकातल्यापेक्षा चांगला वठवलाय. केटलीन आणि सान्सा मट्ठ मुळीच वाटल्या नाहीत.
आणि मालिकेत दाखवलेलं रॉबचं अफेअर पुस्तकात कुठेच नाहीये.
>>केटलीन आणि सान्सा मट्ठ
>>केटलीन आणि सान्सा मट्ठ मुळीच वाटल्या नाहीत.
कुठं? पुस्तकात?
केटलीन अजून तरी बरी वाटतेय.
केटलीन अजून तरी बरी वाटतेय. सान्साला मुद्दाम तसं टिपिकल गर्ली काम दिलय आणि नीट करतेय असं वाटतय, पुढे बघू काय होतय.
खाल अजून नुस्ता हुंकारातच बोललाय. आणि हो, लायसा अॅरनच्या एंट्रीनी नी जरा हदारायला झालं.
संपला का नाही पहिला सीजन?
संपला का नाही पहिला सीजन?
काल लवकर पडी खालली लोला. परवा
काल लवकर पडी खालली लोला. परवा मॅकचे बाळंतपण करत होतो त्यामुळे खुप उशिर झाला झोपायला. आज संपवणार!
****SPOILER***** लोला :
****SPOILER*****
लोला : कॅटलीन, नेड स्टार्क मेल्यानंतर स्वतःच्या मुलांना सांभाळणारी कणखर आणि तरीही आतून तुटलेली, हळवी आई, रॉब स्टार्कला व्यवस्थित सल्ला मसलत देणारी, विचारपूर्वक वागणारी स्त्री आहे. ती सर्सीसारखी धूर्त आणि हिंसक नाही म्हणून तुम्हाला ती मठ्ठ वाटली असावी. पुस्तकात आणि मालिकेतही तीचं कॅरॅक्टर सारखंच आहे. (अवांतर : कॅटलीनचं काम करणार्या स्त्रीने आधीच डिरेक्टरला सांगितलं होतं की मी कपडे उतरवणार नाही म्हणून... पुस्तकात ते ही आहे. त्यामुळे अॅक्ट्रेसच मठ्ठ आहे असंही नाही म्हणता येणार.) सान्सा स्वप्नाळू मुलगी असते, जिला लहानपणापासून लेडी होण्याचं शिक्षण दिलं जात असतं, तिचे भ्रमाचे भोपळे हळुहळू फुटतात. खरंतर, मालिकेत डिनेरीस, रॉब, जॉन, ब्रॅन, आर्या, सान्सा या सगळ्यांची वयं पुस्तकापेक्षा दोन ते ५ वर्षांनी मोठी घेतलीये. त्यामुळे तुमचा आक्षेप मला चुकीचा वाटला.
अहो, गोष्ट फोडू नका हो.
अहो, गोष्ट फोडू नका हो.
****SPOILER**** >>रॉब
****SPOILER****
>>रॉब स्टार्कला व्यवस्थित सल्ला मसलत देणारी, विचारपूर्वक वागणारी स्त्री आहे
हे मला नाही पटले हो. बरेच घोळ झाले तिच्यामुळे. रॉबच्या लग्नाचा घोळ, जेमीला सोडले ते.. सान्साने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. एका एपिसोडमध्ये म्हणतेच ती स्वतःला स्टुपिड.
****
काय राव? स्पॉयलर वॉनिंग पण
काय राव? स्पॉयलर वॉनिंग पण नाही?
लोला, हेडर मध्ये सुचना दे कृपया.
****SPOILER**** आता ती एक
****SPOILER****
आता ती एक स्त्री आहे, ती भावनेच्या भरात जे करते त्यामागे तिच्या मुली कॅप्टीव्ह्ज् असल्यामुळे जेमीला सोडल्यानंतर तरी किमान आपल्या मुली लॅनिस्टर्स परत करतील अशी तिची आशा असते. (कारण विंटरफेल थिऑन ग्रेजॉयने काबीज केल्याची बातमी आणि पुढचे सगळे.) रॉबच्या लग्नाचा घोळ मालिकेततरी रॉब स्वतःच ओढवून घेतो असं दाखवलंय. पुस्तकात तर त्या मुलीचा उल्लेखही नाही. प्रत्यक्ष कारण मी अजून वाचलं नाहीये, पण रॉब आणि केटलीन फितुरीमुळे *अडकतात* (तिच्या मूर्खपणामुळे नाही.) सान्सा तेरा-चौदा वर्षाची मुलगी आहे. अजून काय अपेक्षित आहे तिच्याकडून?
असो. रस जायचा लोकांचा...
मी वाचलो थोडक्यात, खुप पुढचं
मी वाचलो थोडक्यात, खुप पुढचं काही कळलं नाही. आताच सिजन १ संपवला. हर्षल्सि, वरच्या पोस्टीत पण देऊन टाका स्पॉयल अलर्ट.
<< सान्सा स्वप्नाळू मुलगी
<< सान्सा स्वप्नाळू मुलगी असते, जिला लहानपणापासून लेडी होण्याचं शिक्षण दिलं जात असतं, तिचे भ्रमाचे भोपळे हळुहळू फुटतात. >> +१
सान्सा मधे झालेली ही ग्रोथ पुस्तकामध्ये छान दाखवली आहे. मालिकेत सान्सा आणि जॉफ्रीची कामे उत्तम आहेत. (सर्वांचीच उत्तम आहेत म्हणा.....) जॉफ्रीचा स्वभाव, अतिरेकी वृत्ती त्या अभिनेत्याने उत्तम टिपली आहे.
>>सान्सा तेरा-चौदा वर्षाची
>>सान्सा तेरा-चौदा वर्षाची मुलगी आहे. अजून काय अपेक्षित आहे तिच्याकडून?
अहो, म्हणजे तेरा चौदा वर्षाच्या मुली मठ्ठच असतात असं म्हणताय की काय?
तिची धाकटी बहीण हुषार आहे.
>>अशी तिची आशा असते
याला काय म्हणावं बरं! असो.
मी पुस्तक वाचलेले नाही. वाचणार्यांना वेगळे वाटत असेल.
>>आताच सिजन १ संपवला
हुश्श. तरीपण सीजन एक मधल्या गोष्टीबद्दल बोलताना वॉर्निन्ग द्यावी म्हणजे कोणी नुकतीच बघायला सुरुवात केली असेल तर गोष्ट फुटायला नको..
वोईच तो!
वोईच तो!
मग काय "संपवला" एवढंच?
मग काय "संपवला" एवढंच?
लोला : <<<म्हणजे तेरा चौदा
लोला : <<<म्हणजे तेरा चौदा वर्षाच्या मुली मठ्ठच असतात असं म्हणताय की काय? डोळा मारा
तिची धाकटी बहीण हुषार आहे.>>> तुम्ही मराठी/हिंदी मालिका पाहत असल्यासारखी कमेंट करावीत तसं त्या कॅरॅक्टर्सना मठ्ठ म्हणताय जे की, स्टोरीलाईन तशी जात असल्यामुळे, आणि लेखकाने त्यांना तसं बनवलंय त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वागण्याला एक अर्थ आहे. आर्या तरी हुषार आहे असं म्हणतांना, ती लहानपणापासूनच बंड दाखवलीये. तिला मुलांप्रमाणे वागायचंय, घोड्यावर बसायचंय, तलवार चालवायचीये, तिला उगाच एक स्त्री आहे म्हणून कुणा राजाची राणी होऊन केवळ नसते सोपस्कार पार पाडायची मुळीच इच्छा नाहीये आणि पुढे येणार्या प्रसंगांना ती त्याच स्वभावाने तोंड देते, तेच सान्साच्या बाबतीत उलट आहे हे तुम्ही तिला मठ्ठ म्हणून नाकारता आहात एवढंच मला म्हणायचंय. सान्सामध्ये होत जाणारा बदल बघत रहा. आर्याचं वागणं तिला पुढे कसं मदत करतं हे ही तुम्ही पाहिलं असेलंच.
केटलीनने रॉबला थिऑन ग्रेजॉयला पाठवू नकोस हा दिलेला सल्ला, रिव्हर क्रॉसिंगसाठी वॉल्डर फ्रेच्या मुलीशी लग्नाचा प्रस्ताव, रेन्ली बराथिऑनशी वाटाघाटी करून त्याच्यासोबत मिळून किंग्सलँडींगवर हल्ला करण्याचा मनसुबा, अशा बर्याच गोष्टींमध्ये ती सहभागी आहे. रॉब फक्त सोळा वर्षांचा मुलगा आहे. मग जेमी लॅनिस्टरला जर रॉबच्या लोकांनी मारून टाकलं तर तिच्या स्टार्क कुटूंबातला एकही जण जीवंत राहणार नाही हे ओळखून तीने त्याला सोडायचा निर्णय घेतला. जे की त्यांनी पाठवलेल्या पीस टर्म्स सर्सी आणि टिरीअनने नाकारलेल्या असतात. मात्र केटलीनला युद्ध होऊच नये असं वाटंत असतं. आता तुम्हाला हे पटत नाही कारण तुम्ही केटलीनच्या जागी असता तर असं नसतं केलं हाच विचार असावा असं मला वाटतं...
>>तुम्ही मराठी/हिंदी मालिका
>>तुम्ही मराठी/हिंदी मालिका पाहत असल्यासारखी कमेंट करावीत तसं त्या कॅरॅक्टर्सना मठ्ठ म्हणताय
म्हणजे इंग्रजी मालिकेतल्या कॅरॅक्टर्सना मठ्ठ म्हणायचं नाही?? काबरं?
>> स्टोरीलाईन तशी जात असल्यामुळे, आणि लेखकाने त्यांना तसं बनवलंय त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वागण्याला >>एक अर्थ आहे
असेल की. लेखक एखादे कॅरॅक्टर मठ्ठ दाखवू शकत नाही का?
आर्या माणसांना बरोबर ओळखून आहे. लहान असल्यामुळं तिला अॅक्शन काय घ्यावी कळत नाही.
>>मग जेमी लॅनिस्टरला जर रॉबच्या लोकांनी मारून टाकलं तर
कोण म्हणतंय मारुन टाका?
>>तुम्ही तिला मठ्ठ म्हणून नाकारता आहात
मी "नाकारलं" म्हणजे नक्की कसं म्हणे?
तुम्हाला नाही वाटत नाहीत ना त्या मठ्ठ? मग तुमचे मत तुमच्यापाशी, माझे माझ्यापाशी. ते तसे का हे थोडक्यात लिहीलेही आहे. तुम्हाला याची वेगळी कारणमिमांसा करत बसण्याची गरज नाही. मी पुस्तक वाचलेलं नाही हे अगोदरच सांगितलं आहे. माझी मतं ३ सीजनवर आधारीत आहेत. पुढचं पुढे.
धन्यवाद.
सिजन १ संपवला परवा रात्री.
सिजन १ संपवला परवा रात्री. इथे मोठी पोस्ट ही लिहिली होती पण ब्राऊजर नी घात केला आणि पोस्टायच्या आधीच उडाली. असो. मजा आली बघायला. आता कोणाचा मुडदा पडतोय ह्याची सतत काळजी लागून राहते.
काही प्रसंगांचा संदर्भ कळला नाही आणि पुढे कदाचित संदर्भ लागेल, बघू. हॅरी पॉटर बघताना कसे, पार पहिल्या भागातल्या बारिक बारिक तपशीलांचा संदर्भ अगदी शेवटच्या काही भागांमध्ये लागतो तसं इथेही करण्यात मार्टिन आणि दिग्दर्शक यशस्वी झाले तर मजा येइल.
सतत बाजी कधी इकडे, कधी तिकडे होत राहते त्यामुळे डेस्टाईन्ड टू लिव अनटिल द एंड अॅन्ड ट्रायम्फ असं कोणीच वाटत नाही. ह्या भागांमध्ये टायविन लॅनिस्टरची ओळख झाली. ते कॅरॅक्टर ही चांगलं डेवलप होईल असं उगाच वाटतय.
मी थ्रोन्स च्या बरोबरीने डाऊनट्न अॅबी ही बघतोय. एकीकडे कमालीचा रानटीपणा बघून नंतर अपर क्लास इंग्लिश ड्रामा बघायला मस्त वाटतं. ते ही का कोणास ठाऊक पण आवडायला लागलय. वेळ मिळाला तर मी त्याच्या बाफं उघडायच्या विचारात आहे.
छान. नंतर संदर्भ लागेल. मी
छान.
नंतर संदर्भ लागेल. मी पुन्हा उजळणी करत आहे. तिसरा सीझन बघितल्यावर आता मी पहिला सीझन पाहताना एक-दोन पात्रांचे छोटे संवाद एकदम वेगळंच सांगून गेले, जे आधी लक्षातही राहिले नव्हते. आणि त्यावरुन आता पुढचं काहीतरी लक्षात येतंय असं वाटतंय, त्यामुळं सगळे संवाद नीट ऐकावेत.
दुसरा सीझन आणा आता.
डा. अॅ. याला उतारा म्हणून चांगलं आहे. माझ्या कलिगच्या बायकोने तिसर्या सीझनचा "तो" एपिसोड बघून धक्का बसल्याने नंतर लगेच एक डा. अॅ. चा एपिसोड पाहिला.
**spoiler**
Game of Thrones Season 3 is quite simply a masterpieceThe only criticism one could possibly raise is that the wait for the fourth season will be absolutely unbearable
खरय, संवाद लक्ष देऊन ऐकायला
खरय, संवाद लक्ष देऊन ऐकायला हवेत. थ्रोन्स बघताना शिंचं आवाज मोठा ठेवायचा म्हणजे पण लफडं आहे.
सगळे उपलब्ध असलेले सिजन क्यू मध्ये आहेत. पुढचे १-२ महिने सेट आहे मी.
उतारा>>>>> +१
अजून लिहिणार होतो पण इथे लिहिणे योग्य नाही. धागा काढातला हवा.
पहील्या खंडात एक उत्तम संवाद
पहील्या खंडात एक उत्तम संवाद आहे,
जेव्हा cersie joffrey ला समजवत असते की तिने खर्या कोल्या ऐवजी दुसर्या कोल्याचा का बळी दिला...
Cersei: A King should have scars, you fought off a direwolf. You're a warrior like your father.
Joffrey: I'm not like him. I didn't fight off anything. It bit me and all I did was scream. And the two Stark girls saw it, both of them.
Cersei: That's not true. You killed the beast. You only spared the girl because of the love your father bears her father. When Aerys Targaryen sat on the Iron Throne, your father was a rebel and a traitor. Someday you'll sit on the throne and the truth will be what you make it.
इतिहास कसा लिहीला जात असावा, हे इथे कळते, झालेले काहीतरी एक असते, पन जेव्हा ईतिहासका ते लिहीतो (पोवाडे(?)) तेव्हा मिठ मिरची कशी लावले जाते ते.
जावुंदेत तो सुरा कोणी पाठवला असेल bran ला मारायला? नी Ned चे जे होते ते अपेक्षित होते का?
SPOILER WARNING on stuff from
SPOILER WARNING on stuff from Season 1 & 2!
नेडचे जे काय झाले ते आजिबात अपेक्षित नव्हते (खरंतर होते कारण वर हर्षलसीनी बिना स्पॉयलरची पोस्ट टाकली), म्हणूनच मी म्हंटलं वर, सारखी बाजी इकडे तिकडे होते. हिरो असं कोणीच नाही.
तो संवाद भारी आहे माणूस. सुरा सरसेई किंवा जेमीनीच पाठवला असणार ना? पण बरोबराय, काहीतरी गोची आहे. टिरियॉनचा सुरा का वापरला?
पुस्तके आधी वाचली त्यामुळे
पुस्तके आधी वाचली त्यामुळे पहाताना आणखी मजा आली. सीझन २ पर्यंत आलोय.
हॅरी पॉटर आणि लॉर्ड ऑफ द रिंग्ज नंतर पुस्तकाच्या बरोबरीने आवडलेली ही एक सीरीज.
सगळ्यात भन्नाट म्हणजे लेखक कुठल्याही व्यक्तिरेखेच्या प्रेमात नाही, पॉवरफुल वाटणारी व्यक्तिरेखाही क्षणात संपू शकते आणि कथानक एकदम पलटी खाऊ शकते.
पुस्तक वाचताना टिरीअन आवडला होताच, पडद्यावरही आवडला, 'डेथ अॅट अ फ्युनरल' पिक्चरमधे पाहिलेला पीटर डिंकलेज आणि टिरिअन साकारणारा यात जमीन अस्मानाचे अंतर आहे (अभिनयाच्या दृष्टीने) . पण शॉन बीनचा नेड स्टार्क सगळ्यात जास्त आवडला. जॉन स्नोपण भारीच.
फ्लिपकार्टवर काही दिवसांपूर्वी पुस्तकांचा कंप्लीट बॉक्स सेट मिळाला. पुनर्वाचन आणि सीझन ३ सुरू करतोय लवकरच. आता पुन्हा पुस्तके वाचताना चेहरे स्पष्ट दिसणार टी व्ही मालिकेमुळे.
खास Joffrey च्या
खास Joffrey च्या चाहत्यांसाठी.
तुमचा जो काही राग असेल तो Batman वर काढा, त्यानेच ला वाचवले होते. व त्याची निवड प्रसिद्ध खलनायकांमधे झालीय
माणसा अमेय, मी सेट हातात
माणसा
अमेय, मी सेट हातात घेतलेला ठेवला. मालिका संपल्याशिवाय नकोच म्हटलं कारण आणला तर तो वाचल्याशिवाय रहावणार नाही.
थोडे पुरस्कार इ.-
Emmy Wins and Nominations-२०११ पासून २०१३ पर्यंत जिंकलेली/नॉमिनेशन्स असलेली या मालिकेची लिस्ट.
टाररियनसोबत २०११ मध्ये टायटल सिक्वेन्सला एमी मिळालंय आणि २०१२ मध्ये साऊंड एडिटिन्गसाठी 'ब्लॅकवॉटर' एपिसोडला. नॉमिनेशन्स वाचल्यावर ते एपिसोड त्या दृष्टीकोनातून बघता येतील.
२०१३ मध्ये टायरियन आणि खलीसीला सपोर्टिन्ग रोलसाठी नॉमिनेशन आहे.
65th Primetime Emmy Awards
September 22r LIVE on CBS at 8:00 p.m. ET/5:00 p.m. PT.
SPOILER on Season 1 & Season
SPOILER on Season 1 & Season 2.......
अरे हो, खरच की. आता लक्षात आला तो पोर्या! मी पाहिलं तिथ पर्यंत तो आताशी गादी वर बसलाय. बसल्या बसल्या करामत दाखवली भाऊ नी. असो. जॉन स्नोचा काय सिग्निफिकन्स आहे पुढे कथेत त्याबद्दल ही उस्तुकता आहे.
I started watching thrones
I started watching thrones after reading about it here. I am liking the series, waiting for new season. Two actors are in suits present season, kate n valeryus, I think, g** bald man. I think short man-sansa marriage will fall through. Sorry! I have difficulty remembering character names they are not regular names.
कुठे गेली सर्व प्रजा... का
कुठे गेली सर्व प्रजा... का वाईट व्यसनांच्या आधीन जावुन तुम्ही राज्याबद्दल ची कर्तव्य विसरलात
Pages