निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हरकत नाही ना तीखायला.कारण ती भाजीवाली
देशी म्हणत होती. तिची शेजारीण जंगली म्हणत होती.

भाजी म्हणुन खायला काहीच त्रास नाहीय पण आपण ज्याला कंटोळी म्हणुन ओळखतो ती ही नव्हे. फारतर दुधाची तहान पाण्यात पिठ कालवुन भागवली एवढे म्हणता येईल Happy

या वेळी आंबोलीला एका गावक-याच्या दारात त्याने मुद्दाम रानातुन आणुन लावलेली कंटोळीची वेल पाहिलेली Happy

>>येळेकर | 20 August, 2013 - 14:43
आज मी करटुली (भाजी) घेतली.एकेक फळाचा आकार मोठ्या चिकूएवढा! प्रथमच इतकी मोठी करटुली पाहिली.

ही करटुली (Momordica dioica) बहुदा कुठल्याही खास ब्रीडिंग प्रक्रियेशिवाय, हॉरमोन्स (ग्रोथ रेग्युलेटर्स) वापरून मोठी केली गेली असण्याची शक्यता जास्त आहे. हे लक्षात आल्यावर थोडी शोधाशोध केली.
हे आर्टिकल मिळालं.

करटुल्यातल्या बटबटीत बिया नकोश्या वाटतात. एकूणच 'काकडी' कुटुंबात, काही फळांत बिया तयार होताना ती फळं जास्तं पोषण घेतात. त्यामुळे बाकीची फळं व्यवस्थीत तयार होत नाहीत.म्हणून बिनबियांचं फळ तयार करता आलं तर बरं असा दृष्टीकोन असतो.

वरच्या आर्टिकलमधे, 'पार्थिनोकार्पी' म्हणजे 'फलन न होऊ देता' फळं तयार करण्याचा प्रयत्न आहे. प्रयोगात करटुल्याचा वेल वापरलाय. '२-४ डी' वापरून सगळ्यात मोठी, वजनदार करटुली मिळालीत.

मृण्मयी,

हॉरमोन्स (ग्रोथ रेग्युलेटर्स) वापरुन मोठी केलेली ही फळे खाणे योग्य की अयोग्य?

अर्थात बाजारात ही कंटोळी फक्त एकाद महिनात मिळतात, इतर भाज्यांसारखी वर्षभर मिळत नाहीत त्यामुळे एकदा खाल्ली तरी फारसे काही होणार नाही असे माझ्या सामान्य मनाला वाटतेय पण इतर भाज्या/कडधान्ये इ. बाबतीत असले प्रयोग रोजच होत असणार आणि आपण रोजच्या खाण्यात ह्या भाज्या/कडधान्ये येत असणार. मग आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होत असतील??

लागवडीखाली असणारी मर्यादीत जमीन आणि जबरदस्त मागणी याचा समतोल साधताना असे अनेक प्रयोग होतच राहणार. आपण खातोय ते नक्की अश्या प्रक्रियेतून गेलेय का, याची खात्री करणे तसे अवघडच आहे.
आणि दुष्परिणाम म्हणायचे तर ते दिसायलाही काही वर्षे जातील.

साधना, प्रामाणिकपणे सांगायचं तर मला माहिती नाही.

येळेकरांना मिळालेली करटुली अशाच पध्दतीनं तयार केली असतील याची खात्री नाही, निव्वळ अंदाज आहे.

वरच्या लिंकमधल्या आर्टिकलमधे एक प्रयोग केला गेलाय. त्याचे रीझल्ट्स वापरून अशी मोठी फळं बाजारात सर्रास विकण्याइतपत त्याला व्यावसायिक स्वरूप आलं आहे की नाही याची खात्री नाही.

धरून चालू, 2,4-D नामक ग्रोथ रेग्युलेटर वापरून ही फळं तयार केलीत. पण हे हॉरमोन, फुलावर एका विशिष्ट वेळी फवारल्या गेलंय. यानंतर त्या फुलात होणारी फळ निर्मितीची प्रक्रिया, त्या दरम्यान 2,4-D पेशींपडून कसं वापरल्या गेलंय, साठवल्या गेलं असल्यास काय स्वरुपात आहे, आपण त्याला शिजवून, त्याची भाजी करून खाईपर्यंत मधे किती काळ लोटलाय, शिजवल्यावर त्याचं काय स्वरूप आहे, साठवल्या गेलं असेलच तर 2,4-Dची पातळी आणि स्वरूप घातक असण्याइतकं आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. याबाबतचं संशोधन, प्रयोग झाले असतील तर मला माहिती नाहीत.

दुभत्या जनावरांना टोचलेल्या ग्रोथ हॉरमोन्सचा मानवी शरिरावर दुष्मरिणाम होतो असं अनेक प्रयोग सांगतात. अमेरिकेत नसली तरी युरोपात हे हॉरमोन टोचण्यावर कायद्यानं बंदी आहे. अशाप्रकारचा अभ्यास भाजीपाला, फळं यांच्यावर झाला असेल तर शोधून काढावा लागेल.

भारतातली सीडलेस द्राक्षं giberellic acid नावाचं प्लांट ग्रोथ हार्मोन स्प्रे करुन सीडलेस केलेली असायची. अशी द्राक्षं गेली कित्येक वर्षे कॉमनली खाल्ली जात आहेत की

नमस्कार किशोर,

मी या ब्लॉग वर नविन आहे. तुम्ही शेयर केलेले फोटो अप्रतिम आहेत.काल ऑफीस मधुन घरी जाताना
प्रिन्ट आउट्स घेउन गेले होते, पोर जाम खुश झालीत.
या आऱकीटे़क्ट च नाव कळेल का?

आज २३ ऑगस्ट, जागू राधाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

DSCN9170.JPG

माहेर मासिक, ऑगस्ट २०१३ : यातील "शेतातल बालपण" हा तुझाच लेख ना, फार छान लिहिले आहे.

सुप्रभात,
खुप दिवसांनी आलो, सगळ्या छान गप्पा वाचुन काढल्या.

किशोर,
घरबांधणीचे हे अप्रतिम आणि दुर्मिळ फोटो शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
माणसांला या घरच्या बांधकामापासुन शिकण्यासारखं खुप आहेच.

मधु-मकरंद,
छान फोटो.

जागू,
राधाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

भारतातली सीडलेस द्राक्षं giberellic acid नावाचं प्लांट ग्रोथ हार्मोन स्प्रे करुन सीडलेस केलेली असायची. अशी द्राक्षं गेली कित्येक वर्षे कॉमनली खाल्ली जात आहेत की
भरघोस उत्पन्न घेण्याच्या नादात, शेकडो (त्यातल्या अनेक बनावट) कंपन्यांच्या जाहिरातीला, मार्केटिंगला भुलुन, दाखवलेल्या संभाव्य रोगांच्या हल्ल्याची भिती तसेच पिक वाया जाण्याची केवळ रिस्क नको म्हणुन देखील आपल्या द्राक्षाच्या पिकावर अनेक ऑषधांचा बेसुमार वापर होतो आहे.
Gibberellic acid चा वापर तर अनिवार्य झालाय...

>>वरच्या लिंकमधल्या आर्टिकलमधे एक प्रयोग केला गेलाय. त्याचे रीझल्ट्स वापरून अशी मोठी फळं बाजारात सर्रास विकण्याइतपत त्याला व्यावसायिक स्वरूप आलं आहे की नाही याची खात्री नाही.

मेधा, यावर तुझं हे पोस्ट आहे का?
>>भारतातली सीडलेस द्राक्षं giberellic acid नावाचं प्लांट ग्रोथ हार्मोन स्प्रे करुन सीडलेस केलेली असायची. अशी द्राक्षं गेली कित्येक वर्षे कॉमनली खाल्ली जात आहेत की

असेल तर वरच्या माझ्या वाक्यात,'करटुल्याची फळं' हे स्पेसिफिकेशन राहिलं. बाकी अनेक फळांवर ग्रोथ रेग्युलेटर्स नियमीत वापरले जातातच.

द्राक्षांवर GA3 अनेक कारणांसाठी फवारतात. घोसातल्या द्राक्षांचा आकडा कमी करण्यासाठी, आकार मोठा करायला.. याच्या जोडीला अनेक नॅचरल आणि सिंथेटिक ग्रोथ रेग्युलेटर खास द्राक्षांसाठी वापरतात. डॉरमेक्स सारखी आरोग्याला अत्यंत अपायकारक केमिकल्सपण. (हे बहुतेक फळांवर नाही तर वेलावर.)

ऑरगॅनिक द्राक्षं खायची ठरवलं तर घरीच वेल उगवायला हवे.

त्या वाक्याला उद्देशून नव्हतं लिहिलं - ( अजून कमर्शियलायकझेशन झालं नाही याच्या विरोधात पुरावा वगैरे म्हणून नव्हतं लिहिलं)

कोणीतरी आता अशी कर्टूलं खाणार नाही म्हणून लिहिलेलं त्या संदर्भात लिहिलं की ग्रोथ हार्मोन वापरुन फळे जास्त मार्केटेबल बनवणे हे नवीन नाहीये. गेली २५-३० वर्षे तरी भारतातली सीडलेस द्राक्षं याच पद्धतीने उगवली जातात. अन जवळपास प्रत्येक ( डायबेटिक नसलेल्या) मायबोलीकराने अशी द्राक्षे अनेकदा खाल्ली असणार Happy

अच्छा, सिडलेस द्राक्षे अशी बनवतात काय? मला वाटलेले एखादी जात विकसीत केली असेल ज्यात द्राक्षात बिया बनत नसतील.

जागु,राधाला वाढदिवसाच्या शुभेच्छा,पाहतापाहता पोर एक वर्षाची झाली...तुझी धावपळ अजून वाढलीअसेल ...

http://www.gutenberg.org/files/43531/43531-h/43531-h.htm

हे एक मस्त पुस्तक सापडले - The Vegetable Garden - WHAT, WHEN, AND HOW TO PLANT

गाईडच म्हणा ना.

चांगली बातमी ही की मला शेवटी माझ्या स्वप्नातली शेतजमीन मिळाली. अजुन खरेदीखत व्.व. करायचेय पण त्या सगळ्या गोष्टींना सुरवात केलीय. मी शेतकरी आहे हे सिद्ध करण्यापासुन तयारी करावी लागणार... Happy

नांगरतास धबधब्याच्या पुढे बेळगाव रोडवर कोल्हापुरच्या हद्दीत जमीन आहे (दिनेशना या वर्णनावरुन अंदाज येईल Happy ) गेले ६-७ वर्षे जमीन पडीक आहे, सध्या ७-८ काजुची मोठी झाडे आणि एक-दोन निलगिरीची झाडे आहेत.

मी जमिनीवर काय करणार हे अजुन ठरवलेले नाहीय... बघुया काय काय होतेय ते...

जागु,राधाला वाढदिवसाच्या शुभेच्छा,पाहतापाहता पोर एक वर्षाची झाली...

खरेच दिवस अगदी भराभर जातात. राधाला बिलेटेड हॅपी बर्थडे. Happy

हजारी मोग-याची रोपं कोणाकोणाला हवी होती? 3-4 आली आहेत.>>>>>>>>>>>..सहेली मी पहिला नंबर लावून ठेवलाय हां. Happy

Pages

Back to top