आज सांजच्याला अड्ड्यावरनं घरला निघालो,आणी गाडी सवईनी पानाच्या आमच्या आवाडत्या ठेल्यावर गेली. "बोलो साब...कितना...?" मी-"तीन बनाओ,तीनो पार्सल करो. असं म्हणालो आणी जरा कानावरचा हेडफोन दूर करुन आजूबाजुला न्याहाळायला लागलो. आमच्या सदाशिवपेठेतली ही गल्ली पूर्वी सदाशिवपेठेचा केवळ एक भाग होती आणी भरत नाट्य मंदिराचा चौक ते टिळक स्मारक मंदिराचा चौक यांना जोडणारी गल्ली.."इतकिच" नाट्यमय तिची ओळख होती.पण गेल्या १५ वर्षात या गल्लीला एक नविन ओळख मिळाली... मटण-गल्ली! हो....! हेच नाव त्या लेनला आता मिळालं आहे.म्हणजे मला वैयक्तिक रित्या ही काहि खेद-जनक अथवा शरमेची गोष्ट वगैरे वाटत नाही.पण काळाबरोबर मूल्य कशी आणी किती बदलतात,याचा हा एक गमतीशीर पुरावा. या गल्लीत पूर्वी नागपुर खानावळ ही एकच पारंपारिक नॉनव्हेज खानावळ होती.आणी त्यानंतर त्याला तात्विक शह द्यायला आलेली सात्विक-थाळी! पण हल्लीच्या रस्सास्वादवादी चळवळीच्या जनकांनी गावभर जिथेतिथे जे तांबड्या/पांढर्याचं व्यापक आंदोलन "सुरू" केलय त्याची पाळमुळं याच गल्लीत असावी असा माझा आपला एक अंदाज आहे. कारण एकेक म्हणता म्हणता या गल्लीत पाच/सहा हॉटेलं त्याचीच चलु झाली हळुहळू! असो..आपली मांसाहारावर प्रीतीही नाही...दुस्वासही नाही!
या गल्लीतनं "हे" अवलोकन करून बाहेर पडता पडता,मनात का कोण जाणे चटकन नाव आलं ते आमच्या बादशाही'चं! लोकांना हे पुण्यातलं बादशाही(लॉजिंग/बोर्डींग) म्हणून माहित आहे,आंम्हाला हे पुण्याचं-(लॉजिंग/बोर्डींग) म्हणून माहित आहे. (सदर वाक्यातील खोच ही ज्यानी बादशाही'ची लॉजिंगची "नियमावली" हे अस्सल पुणेरी प्रकरण वाचलं आहे,आणी त्यानंतर तो'ही वाचला आहे,त्यालाच कळेल
)
तर.... मनात आलं आज नेहमीच्या मेसला दांडी मारून आपल्या बादशाही'ला पुन्हा एकदा फेस करावं.घड्याळात पाहिलं आणी शेवटची पंगत मिळेल या अंदाजानीच आत गेलो.अंदाज फेल गेला नाही,कारण काऊंटरवरचा तो प्राचीन खानावळ संस्कृतीतला इसम माझ्याकडे त्याच चेहेर्यानी बघत टोकन-पावती फाडायच्या बेतात उभा होता. पैसे दिले पावती हतात आली,आणी "नंबर"चा पुकारा होई पर्यंत तिथल्या एका जुन्या श्टाइलच्या आणी खरोखर तितक्याच जुन्याकाळी-घेतलेल्या वेटिंगच्या लांबलचक आसनावर स्वस्थ झालो.
वेळही भरत आलेली असल्यामुळे ५ मिनिटातच तिनशे...ती...स! असा पुकारा आला,आणी एंट्रिला उभ्या असलेल्या माणसानी,"आतल्या बाजुची कोपर्याची खुर्ची..!" असं म्हणत मला "आत-धाडलं" देखिल!
ही खास बादशाही श्टाइल आहे. मी नवि-पेठ हा सदाशिवपेठेचा वाढता भूभाग म्हणून वेगळा केलेला,माझ्या कर्मभूमीचा एरिया सोडून शिव्हगड-रोडला विस्थापित झाल्यानंतरची (म्हणजे ७/८ वर्षानंतरची! =)) ) ही माझी पहिलीच भेट होती,त्यामुळे तो आत "सोडणारा" ,श्राद्धाला पिंडांना नमस्कार करायला जे जमतात,त्या चेहेर्याचा आणी पेहेरावाचा'ही- नेहमीचा वयस्क मनुष्य दिसतो का? ह्या खुषीत होतो.पण आज मला एका दुसर्या'च माणसानी आत सोडलं.पण श्टाइल तीच असल्यानी मला त्याच्या मागे आजही उभा असलेला तो म्हातारा दिसलाच!
यही तो इधरकी खासियत है! जश्या इथल्या पाट्या अस्सल पुणेरी,तशीच या खानावळीची संस्कृतीही अस्सल पुणेरीच.
खरं म्हणजे अस्सल हा शब्द वापरायला नकोच आहे, ते थोडसं ,"हे डोक्यावरचे माझे अस्सल केस आहेत!" असं म्हटल्या सारखं होतं. इथल्या खुर्च्या/टेबलं/पाण्याचे पितळी तांबे.जेवण वाढायची/जेवणाची भांडी ही सुद्धा अजून तशीच आणी तीच आहेत.
म्हणजे या खानावळीला (इथल्या माणसांसकट) नूतनीकरण नावाची नव मार्केटिंगवादी-झळ कधिही पोहोचलेली नाही. आणी ती पोहोचण शक्यही नाही.अहो कुंडितली तुळस उपटून फ्लॉवरपॉटमधे लावली तर ती गुलाबी येत नसते.आपल्याला उगाच नविनपणा केल्याची हौस भागवल्या सारखं होतं इतकच. बादशाही मधे मिळणारं साधं मराठी भोजन हे पूर्वीही भोजनच होतं आजही भोजनच आहे.(तिथल्या कोथिंबिर लाऊन दिल्या जाणार्या ताकासारखं!) त्याची कधिह्ही राइसप्लेट झाली नाही आणी थाळिही!
एक्स्ट्रॉ स्विटडिश पूर्विही होत्या आजही आहेत,पण त्याबरोबरच इथे खास जुन्या पुणेरी मामल्याचं-एक्स्ट्रॉ तूपंही मिळंतं. (आज शेवटच्या पंगतीला असल्यामुळं ते अदृश्य झालवतं. ) इथला आमटिचा प्रकार तर एक लाजवाब प्रकार आहे.अगदी खाण्यापासून ते वाढला जाण्यापर्यंत! आपण इथे जेवत असतांना आमटिचं गरम पातेलं आणी गरमागरम आमटिचं पातेलं... असं घेऊन कुणि ना कुणी अधून मधून येरझार्या घालतच असतो. इथल्या आमटिचा स्वाद म्हणजे खरोखर स्वाद या शब्दाची इज्जत राखणारा स्वाद आहे. जेवताना एरवी कधीही आमटी हा प्रकार आपण पीत नाही.पण इथे आमटी ही कढी सारखी गरमागरम प्याविशी वाटते. मी ज्या वयात शाळेतल्या मास्तरांना पगार मिळण्याचं "कारण" होतो,म्हणजे ६वी ७वीत शाळेत होतो,तेंव्हा कधितरी बाबांबरोबर दुपारचा इथे पहिल्यांदा जेवायला गेलो होतो.पण पदार्थाची क्वालिटी/चव/आकार/प्रकार सर्व काहि आजही तस्से आणी तसेच आहेत.एखादी ओली भाजी,एखादी सुकी भाजी ,आमटी,भात,पोळ्या,लिंबाची एकच-फोड!,एखादी चटणी,पिठातलं डांगर,कांदा असा अत्यंत साधा आणी घरगुती मामला असतो.त्यातही महागाईच्या नावाखाली बटाट्याचा आणी गेल्या काहि वर्षातल्या सोयाबिनचा "आधार" या खानावळीनी आजही घेतलेला नाही,त्यामुळेच या खानावळीचा ताटाचा "भाव" वाढलेला असला,तरी त्याची "किंमत" पूर्वी होती, तीच आहे! जेंव्हा "सातत्य" ही बाब असते तेंव्हा "दर" ही गोष्ट गौण ठरली पाहिजे,हे चांगल्या ग्राहकाच्या मनाचं अर्थशास्त्र असेल,तर त्याला हाही दर रुचून जातो! नव्हे रुचला पाहिजे,असं मला आमच्या बादशाही'च्या बाबतीत थोड्याश्या अडेल आग्रहानी म्हणावसं वाटतं.कारण भोजनाची पूर्णता तृप्तीच्या ढेकरेनी जेव्हढी यायला हवी,तितकीच "मस्त जेवलो बुवा !" ही समाधानाची हाकही मनातून येणं आगत्याचं आहे. या दोन्ही गोष्टी इथे घडतात,किंबहुना त्या घडून याव्या असाच इथल्या अन्नाचा स्थायीभाव आहे.
आजचा जमाना हा "सर्व्हिस"चा जमाना आहे.पण त्यात फक्त सर्व्हिस'च येते आहे,सेवा देणं शून्यवत झालं आहे.तश्या जमान्यातही आपलं खरंखुरं पुणेरीपण टिकवून गिर्हाइकं न वाढवता गेस्टपास'ही देणारी ही जुन्या पुण्या इतकीच-जुनी खानावळ आजही थाटात उभी आहे आणी तशीच पुढे राहिलंही!
<<"मस्त जेवलो बुवा !" ही
<<"मस्त जेवलो बुवा !" ही समाधानाची हाकही मनातून येणं आगत्याचं आहे >> खरच आणि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बादशाही हे समधान भरभरून देतं.
मस्त लेख वाचला बुवा.
<<"मस्त जेवलो बुवा !" ही
<<"मस्त जेवलो बुवा !" ही समाधानाची हाकही मनातून येणं आगत्याचं आहे >> + १००
तुमचे सगळेच लेख छान असतात.
तुमचे सगळेच लेख छान असतात.
मस्त लेख... फक्त त्या खरकट्या
मस्त लेख... फक्त त्या खरकट्या ताटाने जरा मजा घालवली... त्याऐवजी मस्त भरलेले ताट दिसले असते तर आम्हिही त्रुप्त झालो असतो..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शब्द नी शब्द अचुक वापरलेयत,
शब्द नी शब्द अचुक वापरलेयत, आवडलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त. एकदम नॉस्टॅल्जिक केलंत.
मस्त. एकदम नॉस्टॅल्जिक केलंत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाहीतर पूर्वी सिधये तालमीचा मंडळाकडे जाणारा बोळ आणि रेणुकास्वरूपकडे जाणारा विरुद्ध दिशेचा बोळ हेच त्या गल्लीतले महत्वाचे लॅण्डमार्क्स होते. आता असंख्य नॉनव्हेज हॉटेल्स आणि प्रतिमा सिल्क्स नामक साड्यांचं प्रसिद्ध दुकान यासाठी गल्ली फेमस झालीये
'मटण-गल्लीचा इतिहास' एकदम अचूक
बादशाही अमर रहे! तिथली सुकी बटाट्याची भाजी माझी फेवरिट!
हो, पुढच्या वेळेला गेलात भरलेल्या ताटाचा फोटो काढून इथे अपडेट मारा
छान लेख. मी बहुतेक एकदा
छान लेख. मी बहुतेक एकदा लहानपणी तिथे जेवलो होतो.. फोटो मात्र आडवे ताणल्यासारखे का दिसताहेत.
वरदा , खरच बाद्शाही अमर रहे
वरदा , खरच बाद्शाही अमर रहे .... आत्ताच भुक लागलिये बादशाहीची.....:)
माझ्या कडे अजुन एक तिकडचा मस्त फोटो होता ...सापडला की टाकते ......
@ डीडी | 22 August, 2013 -
@ डीडी | 22 August, 2013 - 00:52
मस्त लेख... फक्त त्या खरकट्या ताटाने जरा मजा घालवली... त्याऐवजी मस्त भरलेले ताट दिसले असते तर आम्हिही त्रुप्त झालो असतो.. >>> डीडी...तृप्त व्हा!
अपेक्षित बदल केला आहे. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद शेंगदाण्याची उसळ आणि
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेंगदाण्याची उसळ आणि दुधी/नवलकोलाची भाजी दिसतेय
फोटो दिसत नाहियेत बाकी लेख
फोटो दिसत नाहियेत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
बाकी लेख मस्तच.
आमच्या बादशाहीला भेट
आमच्या
बादशाहीला भेट देणार्यांचे आभार! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेख मस्तच आहे. मला भरलेले ताट
लेख मस्तच आहे. मला भरलेले ताट मात्र दिसत नाहीये.
आय हाय, जुने पुणे. असंख्य
आय हाय, जुने पुणे. असंख्य वेळा तिथून चालत गेले आहे. एकदाच जेवले. भेंडीची रस भाजी होती. लेख मिपावरच वाचला तिथे प्रतिक्रिया देता आली नाही. छान लिहीता तुम्ही.
@ लेख मिपावरच वाचला तिथे
@ लेख मिपावरच वाचला तिथे प्रतिक्रिया देता आली नाही. छान लिहीता तुम्ही.>>> मनःपूर्वक धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)