घरामधे पैशांची गुंतवणूक करणे

Submitted by शर्मिला फडके on 20 August, 2013 - 05:53

गुंतवणुकीच्या दृष्टीने सध्याचे 'हॉट डेस्टीनेशन' कोणते आहे?
वांगणी, नेरळ, कर्जत हे पर्याय रिसेल व्हॅल्यू, व्यवहारांची सुरक्षितता या दृष्टीकोनातून कसे आहेत?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या घरा मधे गुंतवणुक करायची टाळा.

रहायला म्हणुन पाहीजे असेल तर घ्या. गुंतवणुक म्हणुन नको.

१. मुम्बै मधे १ लाख फ्लॅट बिल्डर कडे पडुन आहेत, तेव्हडेच लोकांनी विकत घेउन रिकामे ठेवले आहेत.
२. घरावरच्या गुंतवणुकीवर सततचा खर्च असतो. सोसायटी चा खर्च सुद्धा आजकाल खुप असतो, बाकी टॅक्स, वीजबील वगैरे आहेच.
३. जर फ्लॅट रेडी पझेशन नसेल तर ताब्यात यायला खूप उशीर होईल. बिल्डर कडे पैश्याची चणचण आहे. बर्‍याच योजना थोडे बांधकाम होऊन थंड पडल्या आहेत.

रहायला म्हणुन पाहीजे असेल तर घ्या. गुंतवणुक म्हणुन नको.

येत्या काही महिन्यांमधे घरांच्या किंमती खाली उतरतील....

वांगणी येते नविन रेल्वेचे कारशेड उभारत आहे.. त्यामुळे लोकल ट्रेन्स वाढतील... अश्यामुळे नोकरदार वर्ग बदलापुर वांगणी नरेळ ला मोठ्याप्रमाणावर स्थलांतरीत होउ शकतो

नेरळ मधे मागणी आधीपासुनच वाढलेली आहे.. आणि दलाल वगैरे मुळे तिथे व्यवहार जपुन करावा...

कर्जत सध्या हॉट व्हॅल्यु आहे... कारण पुणे आणि मुंबई महामार्गामुळे दोन्हीबाजुंना सारखे आहे...तसेच कॉलेजेस ..पॉलिटेक्निकल कॉलेज झाल्यामुळे ... जमिनींचे भाव चांगले आहेत...

बदलापुर .... सध्या इथे जास्त बांधकाम जास्त चालु झाले आहे ... नविन २७-३८ गावांना बदलापुर नगरपालिकेत समाविष्ट केल्याने... बदलापुर चा विस्तार जास्त झाला आहे... बदलापुर (पश्चिम) ला प्रचंड पुराचे पाणी आलेले २७ जुलै ला त्यामुळे पुर्वेकडच्या भागांचा भाव वधरलेला आहे...

चिखलोली....हे नविन स्टेशन अंबरनाथ आणि बदलापुर यांच्या दरम्यान उभारले जात आहे... इथे सुध्दा चांगले लोकेशन आणि चांगल्या बिल्डर चे प्लॅन्स चालु आहेत.. . बारवी डॅम जवळ आहे... हा भाग..

रहायचे म्हणजे कायम तर जाऊन रहाता येणार नाही. त्यामुळे गुंतवणूक असे लिहिले. खरं तर वांगणीचा पर्याय त्यामुळेच डोळ्यासमोर आहे. लोकलने कनेक्टेड आहे. मुरबाड वगैरे जाण्यायेण्याच्या दृष्टीने फार गैरसोयीचे आहे.

चिखलोलीचा पर्याय सुचवल्याबद्दल धन्यवाद.

गुंतवणुकीच्या दृष्टीने सध्याचे 'हॉट डेस्टीनेशन' कोणते आहे?>>>>>
पुण्याजवळ हवे असेल तर
वाकड
रावेत
ताथवडे
हिंजवडी
बाणेर
बालेवाडी

१. मुम्बै मधे १ लाख फ्लॅट बिल्डर कडे पडुन आहेत, तेव्हडेच लोकांनी विकत घेउन रिकामे ठेवले आहेत.
>>> हा डेटा कुठून मिळतो? मला खरोखरीच उत्सुकता आहे.

हा डेटा कुठून मिळतो? मला खरोखरीच उत्सुकता आहे. >>>

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/-/articleshow/...

तुम्ही पण आजुबाजुला बघितले तर मी जे म्हणलो आहे त्याचे प्रत्यंतर येईल.

ह्या दुरवरच्या उपनगरातल्या नविन इमारती कडे रात्री बघा ६०% फ्लॅट मधे दिवे नसतात.

मला मुंबई पुणे पर्याय नको कारण ते परवडणारे नाहीत. इथे रिसेल फ्लॅट्सच्या किंमतीही अव्वाच्या सव्वा आहेत.

गुंतवणूक म्हणजे नक्की कश्या प्रकारचा परतावा अपेक्षित आहे यावर ठिकाण नक्की करा.
घर विकत घेऊन कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून मग ते भाड्याने द्यायची योजना आहे की स्वतःच्या कुटुंबासाठी 'हॉलिडे होम' करायचे आहे की टॅक्स वाचण्यासाठी घरकर्ज घ्यायचे आहे आणि घरामधे गुंतवणूक करायची आहे यावर जागा शॉर्टलिस्ट करा.

भाड्याने द्यायचा नाही. अधून मधून जाऊन रहायचे आणि काही वर्षांनी विकून टाकायचे असं मनात आहे.

गुंतवणुकीचे इतर फारसे पर्याय नाहीत. फिक्स्ड डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स इत्यादी सोडले तर. शेअर्समधे अजून कधी गुंतवलेले नाहीत कारण त्याची फारशी माहिती नाही आणि फॉलोअप करायला लागेल तर वेळही नाही. सोन्यापेक्षा जागेत गुंतवावे असे वाटले.

काही वर्षांनी विकून टाकायचे >>>
ओके! मग वर म्हटल्याप्रमाणे चिखलोली, अंबरनाथ, बदलापूर, कर्जतमधे नव्याने वसणार्‍या टाऊनशिप, नव्या मुंबईत बेलापूरपासून पनवेलपर्यंत हे पर्याय चांगले आहेत.

भाड्याने द्यायचा नाही. अधून मधून जाऊन रहायचे आणि काही वर्षांनी विकून टाकायचे असं मनात आहे.>>>>>

दर वर्षी किमान ४०००० ते ५०००० खर्च आहे ( सोसायटी भारीची असली तर अजुन जास्त ). १५ वर्षानी विकायचा म्हणलात तर जुन्या फ्लॅट ला २०% तरी कमी भाव मिळतो. तुम्ही गेल्या ५-७ वर्षाच्या अनुभवावर जाऊ नका. IT ची बूम आल्या मुळे लोकांकडे खुप पैसा आला आणि भाव वाढले. आता पुन्हा तसे होणार नाही.

ही मटा मधली बातमी बघा.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/-/articleshow/...

भाड्याने द्यायचा नाही. अधून मधून जाऊन रहायचे
<<
हॉलिडे होम!
निसर्गरम्य जागा..
मोकळे आकाश. सुंदर परिसर. आखिव रेखिव घरे. जाहिरात करणारा रांगडा मिलिंद गुणाजी. (तो थोडा माझ्यासारखा दिसतो असं आमच्या हिचं मत आहे)
*
अधून मधून जाऊन रहायचेच असेल, तर ४-५ हजार रुपये रोज भाडं असलेलं एकादं ३-४ स्टार वालं हॉटेल पहावं. ४ दिवस राहून यावं, अन मज्जा करावी, हे माझे मत.
हॉलिडे होम अजिबात परवडत नाही. अगदी ३ एकराचा तुकडा विकत घेऊन तिथे बागायत बनवून फार्महाऊस बांधले, तिथे रहायला व सगळे पहायला एक इमानदार लोकल कपल मिळाले, तरीही, 'इन्व्हेस्टमेंट' म्हणून परवडत नाही. (अनुभव)
रहायला जातो तेव्हा तिथे लाईट नसतात. रस्ता सगळा उखडलेला असतो. लाईट नाही म्हणून तिथे बसवलेली आरो सिस्टीम मेलेली असते. ग्यास संपलेला असतो. हजार गोष्टी असतात. अहो, जवळच्या गावातल्या किराणा दुकानात टॉर्चसाठी सेल मिळतील की नाही ही देखिल शंकाच असते. हां, ५ रुपयेवाले कुरकुरे नक्की मिळतात. आणी दस बस है वाला थम्सप. :-s
शहरात इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेल्या फ्लॅटचे भाडे येते त्याटले बरेच म्युन्सिपाल्टी अन सोसायटी भरण्यात जाते. उरलेल्यातून आपण फ्लॅट घेण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज जेमतेम फिटते. मुद्दल अलग. (भर डेक्कनला इन्वेस्टमेंट म्हणून घेतलेला फ्लॅट १८ वर्षे कोर्टकचेर्‍या करून भाडेकर्‍याकडून सोडवून घेण्याचे प्रयत्न करणार्‍या मित्राची आठवण येऊन डोळे पाणावले. अजूनही त्या ४ रूमच्या फ्लॅटपैकी एका खोलीत भाडेकरूचे भंगार भरलेले आहे, अन कोर्टाचे सील आहे. केसचा निकाल 'आमच्या' बाजूने लागलाय बरं का!)
*
हॉलिडे होमच्या जाहिरातींना भुलणार्‍यांना गोड बोलून मूर्ख बनविण्याची कप्यासिटी असलेल्या लोकांनीच इदर घर लिया और उदर बेचा करीत लाख दोन लाख कमवावे असा तो सगळा प्रकार आहे. या साठी विशिष्ट कम्युनिटींमध्ये जन्मावे लागते. फ्लॅट/रोहाऊस/कॉलन्या बांधतानाच बेसिक मधे पार्टनर म्हणून तुम्हाला घुसता यायला हवे. कोणत्याही नव्या स्कीमला गेल्यावर बिल्डर जे ६०% बुकिंग झाले आहे म्हणून सांगतो, त्यातले ६०% "हे" लोक असतात. अन्यथा कठीण आहे.
*
फ्लॅट/घरांमध्ये "इन्व्हेस्टमेंट"च्या संपूर्ण विरोधी असलेला (इब्लिस)

निबंधलेखनाबद्दल क्षमस्व.

<<भाड्याने द्यायचा नाही. अधून मधून जाऊन रहायचे आणि काही वर्षांनी विकून टाकायचे असं मनात आहे. >>
फक्त हाच उद्देश असेल तर टाइमशेअर चा ऑप्शन तपासा.

नोटः टाइमशेअर मे नॉट बी अ गुड ऑप्शन फ्रॉम फायनांशियल इन्व्हेस्ट्मेंट स्टँड्पॉइंट - बट किप इन माइंड; यु आर इन्व्हेस्टींग इन लाइफस्टाइल, हॉलिडेज, गुड टाइम विथ द फॅमिली...

हॉलिडे होम्स, सेकंड होम हे प्रकार मेन्टेन करायला अवघड याबद्दल काही शंका नाही. माझेही हेच मत आहे. म्हणूनच इतकी वर्षं कधीही त्या भानगडीत पडलो नव्हतो. पण मग मोठ्या आणि सेफ गुंतवणुकीकरता वेगळा पर्याय काय आहे? वर म्हटलय तसं सोने आणि शेअर्स नको आहे.

निवांतपणे कुठेतरी जाऊन लिहावसं वाटतं, त्याकरताही हा घराच्या गुंतवणुकीचा विचार मनात आला होता हेही खरं. पण या सर्व कटकटी बोरिंगच आहेत.

टाइमशेअर हा ऑप्शन काय प्रकार असतो?

मोठ्या आणि सेफ गुंतवणुकीकरता अशा लांबच्या ठिकाणी घर घेणच योग्य . फक्त तुम्ही तो कर्ज काढून घेणार असाल तर मात्र भाड्याने द्यायला पाहिजे म्हणजे "ईएमआय "भाड्यातून वळता होतो. कर्ज काढूनही घ्यायचा आणि भाड्याने द्यायचा नाही म्हटले तर आर्थिक गणित थोडे जड जाऊ शकत . कदाचित तुमच्या करता जाणार ही नाही. पण घरामध्येच मधेच गुंतवणूक योग्य हे माझ वैयक्तिक मत .

महिन्द्र क्लबची जी स्किम आहे ती टाइमशेअर ऑप्शनमधलीच आहे म्हणजे, पण अशा स्कीम्सचा हवे तेव्हा बुकिंग न मिळणे वगैरे अनुभव ओळखीच्यांकडुन ऐकले आहेत, फारसे पॉझिटीव रिव्ह्यूज ऐकले नाहीत आजवर. अर्थात अनुभव घेतला नाही आहे.

सुजा कर्ज (फार) घेण्याच्या भानगडीत पडणार नाही आहे. जेव्हढे शक्य आहे तेव्हढेच बजेट.

अगदी काही आठवड्यांपुर्वीच मी पुण्यात अजून एक घर घ्यायचा विचार केला होता. पण खूप विचाराअंती क्यान्सल केला! Happy

एक घर मेंटेन करणं म्हणजे अशक्य कटकटीचं काम आहे. आपल्या पैश्याचा आपल्या हयातीत उपयोग करता येणं महत्वाचं. शेवटी त्या पैश्याचा "आपल्याला" किती उपयोग होतो हे महत्वाचं.

असलेले पैसे खणखणीत ब्यांकेत ठेउन त्याच्या व्याजावर दर महिन्य-दोन-महिन्याला अगदी जवळपास हिंडणे, काहितरी नविन शिकणे असलं काहितरी करायचं ठरवलय. सर्वात सुरक्षीत गुंतवणुक म्हणजे स्वतःत केलेली गुंतवणुक. जिम, एरोबिक, किंवा योगा क्लास मध्ये जावा. दर आठवड्याला थायी/केरळी मसाज पार्लर ला जाणं, स्पा घेणं, नविन भाषा शिकणं, (अजून) एखादं वाद्य वाजवायला शिकणं, नाटकांना-व्याख्यनांना जाणं किंवा अगदी मस्त घरी जबरा रिफ्रेश रेटवाला मोठ्ठा ३-ड टिव्ही घेउन आवडते चित्रपण सगळ्यांबरोबर बघणं, 'बोस' च्या हेडफोन वर फ्युजन किंवा मेटॅलिका ऐकणं, 'पोलिस' पर्फ्युम वापरणं हे करायचं ठरवलय. :))

सहज म्हणून परवा अरविंद गुप्ताची पास-सात वैज्ञानिक खेळण्यांची पुस्तकं घेउन अजु-बाजूच्या वस्तीतल्या मुलांमध्ये वाटली.

इब्लिस, तुर्रमखान +१
सध्या रुपयाची हालत वाईट होत चालली आहे, तेन्व्हा जरा त्याचाही विचार असु द्या. कदाचित होम लोन चे रेट्स वाढतील. Sad

मला एक सल्ला हवा आहे. आम्हाला घरी रन्ग्काम करायचे आहे तर कलर करावे कि वोलपेपर लावावेत? नक्कि काय करावे? मदत करा आणि हॉल बेडरूम आणि किचनला कोणता रन्ग द्यावा?
वास्तुशासत्राप्रमाणे

विद्याबाई,

- सर्वप्रथम वास्तुशास्त्र नावाच्या खुळचटपणावर विश्वास ठेउ नका.
- 'जेव्हडं विचारलयं तेव्हडं सांगा, आमच्या श्रद्धेला नावं ठेउ नका' असं म्हणू नका. डोळे उघडे ठेउन विचार करा.
- भारतात असाल तर धुळीमुळे वॉल पेपर निरुपयोगी आहेत. चांगला प्लस्टीक पेंट लाउन घ्या जो ओल्या फडक्याने पुसता येतो.
- तुम्हाला प्रसन्न वाटतील असे लाइट शेड्स निवडा. उगाच वास्तूशास्त्र सांग्तं म्हणून काळा रंग देउ नका.
- तुम्ही भारताबाहेर असाल तर मला क्षमा करा तुम्हाला सल्ला देण्याची माझी लायकी नाही.

मी सुद्धा मुंबई (दहिसर / बोरीवली ला ) स्वतः राहण्यासाठी घर घेण्याचा विचार करत आहे . अजुन कुठे advance money दिला नाहीये . Real Estate चे भाव उतरतील अस मी हि ऐकलय आणि ते म . टा . च article पण वाचलय. तर काय करावे ? थोडे महिने थांबून मग घर घ्यावे का ?

सध्या घरा मधे गुंतवणुक करायची टाळा.

रहायला म्हणुन पाहीजे असेल तर घ्या. गुंतवणुक म्हणुन नको.>>>>>>+१०००१

खूप फ्लॅट पदून आहेत हे नक्की.....I dont have statistics ....पण माझ्या मित्राने पण investment म्हणून दुसरा फ्लॅट घेतला....आता appreciation झाले असो किंवा नाही...पण विकलाच जात नाहीये....शेवटी त्याने builder चेच पाय धरले......बहुतेक आता तो विकला जाईल्....गम्मत म्हणजे Builder चेच कित्येक फ्लॅट अजून विकले गेलेले नाहीत.....

खूप फ्लॅट पदून आहेत हे नक्की.....I dont have statistics ....पण माझ्या मित्राने पण investment म्हणून दुसरा फ्लॅट घेतला....आता appreciation झाले असो किंवा नाही...पण विकलाच जात नाहीये....शेवटी त्याने builder चेच पाय धरले......बहुतेक आता तो विकला जाईल्....गम्मत म्हणजे Builder चेच कित्येक फ्लॅट अजून विकले गेलेले नाहीत..... >> +१
हे मी पण ऐकले आहे. माझा भाचा मुंबईमधे एका नामवंत बिल्डर कडे काम करतो. त्याच्याकडुन ऐकले आहे, कि बरेच फ्लॅट विकले गेले नाहियेत आणि बिल्डरकडे पैसे नाहियेत अजुन म्हणुन कामवरिल बरेच लोक कमि केले आहेत त्यांनि म्हणुन.

सध्या घरांच्या किंमतीच एवढ्या अव्वाच्या सव्वा झाल्यात की सर्वसामान्यांना घरे विकत घेणेच कठीण झाले आहे.

त्यात महागाई वाढत जाते पण पगार नाही, त्यात कर्जाचा हप्ता, घरखर्च यांचा ताळमेळ कसा घालणार? या विचाराने कोणीही कर्ज काढून घर घेण्याच्या नादात पडत नाही.

माझ्या एका मित्राने २ वर्षांपूर्वी बोरीवली पूर्वेला १ BHK फ्लॅट घेतला. तिथे २ BHK फ्लॅट, कार पार्किंग अजून पडून आहे.

मंडळी चर्चा मस्त....

मी गेली १५ वर्ष ह्याच व्यवसायात आहे. ह्याच क्षेत्रात आहे... फक्त दुसर्‍या बाजुला. मी अशा अनेक गुंतवणुकी केल्या, करुन दिल्या. माझा सल्ला योग्य वाटला तर पहा
१. सध्या प्रॉपर्टी मार्केट जरा नरम आहे.
२. सगळ्याच मार्केट प्रमाणे ह्या ही मार्केट्वर गुंतवणुकदाराची नजर हवीच
३. वीकेंड होम हे एक शुध्द फॅड आहे. मला अशा दोन विकेंड होम चा अनुभव आहे. ही घरं आतुन नीट मेंटेन रहात नाहीत. धुळ आणि कोळीष्टक मालक होतात. आमचं पुण्याला डेक्कन वर घर होते. दर दोन महिन्यांनी कोणी तरी जायचच... पण प्रत्येक वेळी धुवा, पुसा एकतर स्वतः नाहीतर मिळालेल्या एखाद्या बाई कडुन. त्यात आर्धा दिवस जायचा.. किते ही नाही म्हंटलं तरी गाद्या उश्यांवर धुळ साचतेच... नंतर नंतर नवर्‍याला सर्दीचा फारच त्रास व्हायला लागला. मुलीला पण... मग जाणे कमी झाले. शेवटी मेंटेन होइना मग विकुनच टाकले. दुसर्‍या घराचीही हीच आवस्था आहे....

४. मार्केट सध्या एकदम पीक ( ओव्हर पीक ) ला आहे. अत्ता गुंतवणुक केलीत तर वापरणार असाल ( केअर टेकर वगैरे ठेवुन ) तर उत्तम... गुंतवणुकीला हा काळ योग्य नाही. ह्या रेट मधे बरीच करेक्शन्स येतिल

५. योग्य डेस्टिनेशन म्हंटलत तर सध्या पनवेल एकदम झकास आहे. फ्लॅट पडून असल्याने चांगला डिल मिळेल. शक्यतो लोन वगैरे नसेल तर रेडि पझेशन बघा. सध्या अंडर कन्स्ट्रक्शन मधे गुंतवणूक नकोच...मेंटेनस्न हा येणारच सध्या बहूतेक ठिकाणी लिफ्ट, सीक्युरिटी, क्लब इ.इ. असल्याने २ ते ३ रुपये पर स्क्वे. फुट पर मन्थ मेंटेनन्स येतोच. पनवेल वगैरे सिडको एरियात साधारण ५० ते ६० पैसे पर स्क्वे.फू. प. म. प्रॉपर्टी टॅक्स आहेच. बदलापूर ते कर्जत मधे साधारण ३० ते ४० पैसे पेर स्क्वे.फू.प.म प्रॉपर्टी टॅक्स आहेच. ह्या रकमा आपल्या अ‍ॅसेट्च्या मेंटेनन्स साठी आहेत असे समजावे.

६. परत हा फ्लॅट्/जागा/बंगला विकायचा असेल, तर मात्र चांगल्या काळा साठी थांबणे योग्य. कारण आजच्या सारखं मार्केट परत बुम मधे येइल ह्याची काहीच गॅरेंटी नाही.

७. सध्या सगळीकडे मंदिचच वातावरण आहे. नव्या योजना उअपक्रम बासनात आहेत. सध्या लोकांकडे व्हाइट वर्किंग कॅपिटल नाही. आहे ती सगळी कॅश. एका लिमिट पलीकडे ती कॅश बाजारात सोडता येत नाही. मग डेस्परेट सिच्यशन होते आणि मग मार्केट पडतं...( अनेक क्लायेंटचा अनुभव) हा जो काळा पैसा ह्या उद्यगात आहे तो आता निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर निघेल. त्या करीता मार्केट मधे बरच करेक्शन होइल.

८. आता ह्या सगळ्याला पर्याय काय. = जर तुम्ही खरच त्या घरात जाउन रहाणार असाल तर मात्र असं ठीकाण निवडा ( उदा पनवेल, न्यु पनवेल, कामोठे, बदलापूर, कल्याण, विरार, ) जिथे नीदान इन्फ्रास्ट्रुक्चर पोहोचलेलं आहे. वांगणी, कर्जत, कसारा, मुरबाड, पाली, तळेगाव हे इन्फ्रा च्या दृष्टीने अगदी बाल्या वस्थेत आहेत. रहाणार नसाल तर आणि तरच ह्या पर्यायांचा वापर करा. नाहीतर हे प्रकार नाइट मेअर आहेत ( मित्राचा अनुभव आणि स्वतःचा देखिल).

९. मार्केट मधे अशा अनेक संस्था कार्यरत आहेत ज्या सर्व्हे ह्या प्रकारात सर्व्हीस देतात. उदा. रीअल इस्टेट मधे कुश्मन वेक्फिल्ड, नाईट फ्रँक, जे.एल.एल., सी.आर.बी., इ.इ. ह्या संस्था ना हे सर्व्हे त्यांच्या फॉरेन गुंतवणुक्दारांसाठी, एन.आर.आय च्या फंडांसाठी, आणि अनेक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कंपन्यां साठी करावे लागतात. हे जे बडे गुंतवणुक्दार असतात हे भारतच नव्हे तर अनेक विकसित आणि विकसनशील देशांत गुंतवणुक करत असतात. हे जे सर्व्हे रेकॉर्ड्स असतात हे ह्या लोकांकडुन मिळतात. हे सर्व्हे अतिषय अभ्यास्पुर्ण आणि खुप तज्ञ लोकांकडुन केले जातात. हे लोक त्यांच्या क्शेत्रात अतिषय हुशार आणि तयार असतात. यांना अनेक देशांचे अनुभव असतात व अभ्यासही असतो(स्वानुभव... नवरा ह्या पैकी एका कंपनीचा एक्झीक्युटिव्ह डायरेक्टर आहे)

१०. सध्या दुबई किंवा सिंगापुर रीअल इस्टेटची अवस्था आपल्या पेक्षा बिकट आहे. जेंव्हा बुम होती तेंव्हा लोकांनी भराभरा फ्लॅट घेतले आणि आता मंदित ते भाड्यानेही जात नाहियेत आणि विकलेही जात नाहियेत ( एका मराठी मित्राने तो तिकडे असताना २००६ मधे फ्लॅट घेतला. तेंव्हा चांगला रेंट ने गेला पण २०१० पासुन पडुन आहे ना रेंट ना आर्धी किंमत येतेय... बिचारा अगदी कात्रित आहे). पुर्वी जे फ्लॅट धडाधड रेंट ने जायचे ते अगदी पडुन आहेत.

११. मग अजुन कुठे गुंतवणुक करायची?... सध्या तरी म्युचुअल फंड, बँक, ह्यांना पर्याय दिसत नाही

१२. दुसरा एक उपाय... दोघे तिघे एकत्र येवुन जर जागेत गुंतवणुक करणार असाल तर जास्त बजेट मधे ठाणा, शीळ फाटा, कल्याण, वसई, पालघर इथे चांगले पर्याय मिळु शकतात. एकत्र येताना करारात सरळ प्रत्येकाचा शेअर नीट नोंद करुन ठेवावा. ह्या मुळे फसवा फसवी आणि मतभेदाचा प्रश्ण नाही.

चला बरच लिहिलं.... आवडिचा आणि रोजचा विषय असल्याने लिहिलं गेलं...... ऑल द बेस्ट फॉर युवर इन्व्हेस्ट्मेंट!!!!!

Pages