अभिनंदनीय कामगिरी व सन्मान

Submitted by बेफ़िकीर on 8 April, 2011 - 23:47

हा धागा कोठे असावा किंवा असा धागा आधी अस्तित्वात आहे का हे माहीत नसल्याबद्दल क्षमस्व!

लेखनाव्यतिरिक्तही अनेक क्षेत्रात मायबोलीकर अभिनंदनास्पद कामगिरी बजावत असतील.

'अभिनंदन' या धाग्यात मला फक्त लेखन प्रकाशित होण्याचे अभिनंदन असावे असे वाटले.

म्हणून हा धागा!

अभिनंदनास्पद कामगिरी बजावणार्‍या मायबोलीकरांचे नाव, क्षेत्र, कामगिरी व त्यास मिळालेला सन्मान यची माहिती कृपया येथे द्यावी व प्रतिसादकांनि अभिनंदनही करावे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

=================================================================

प्रथम अभिनंदन नवी मुंबईचे डॉ. कैलास गायकवाड यांचे!

यांना काल नवी मुंबई मनपाने उत्कृष्ट वैद्यकीय अधिकरी म्हणून सन्मानीत केले.

मनःपुर्वक अभिनंदन!

कैलासराव आपल्या सर्वांना मैत्रीपूर्ण व सौम्य वागणारे, डॉक्टर असल्याचे व मराठी गझल क्षेत्रात सातत्याने सक्रिय सहभाग देणारे मायबोलीकर म्हणून परिचित आहेत. गझलेबाबत गंभीर दृष्टिकोन असणे व विविध विचारप्रणालींवर विविध पातळ्यांवर चर्चा घडवून आणणे हा त्यांचा छंद दिसतो. आंतरजालीय विश्वात निर्विवादपणे वादोत्पादक बाबींपासून ते यशस्वीरीत्या दूर असतात, जे साध्य करणे काहीसे अवघड आहे.

कैलासरावांकडून अधिकाधिक लेखन व्हावे व त्याचवेळेस त्यांच्या क्षेत्रातही त्यांचा उत्कर्ष व्हावा अशी मनापासून शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

एका अत्यंत आगळ्यावेगळ्या संदर्भात मायबोलीच्या जुन्या सदस्या नीधप (नीरजा) यांचा सन्मान झालेला आहे.

'भारतीय साड्यांच्या संदर्भात अनेक वर्षे संशोधन करणार्‍या' रिता कपूर यांच्या 'सारीज ऑफ इन्डिया' या द्विखंडीय पुस्तकात नीरजा यांचा नामोल्लेख अशासाठी आहे की 'आऊट ऑफ द वे' जाऊन नीरजा यांनी नऊवार साडी नेसणे / साडीबाबतच्या प्रथा / संस्कृती या संदर्भात लेखिकेला बहुमोल मदत केलेली आहे.

हर्दिक अभिनंदन नीधप

=====================

आपण केलेल्या मदतीबाबत अधिक खुलासेवार लिहिलेत तर आनंद होईल. कोणकोणत्या भागात कसे कसे अनुभव आले याबाबत अधिक माहिती.

====================

येथे समाविष्ट झालेल्या अभिनंदनीय कामगिरींमध्ये ही घटना फारच आगळी वाटत आहे

===================

-'बेफिकीर'!

की 'आऊट ऑफ द वे' जाऊन नीरजा यांनी नऊवार साडी नेसणे / साडीबाबतच्या प्रथा / संस्कृती या संदर्भात लेखिकेला बहुमोल मदत केलेली आहे. <<<
माझे योगदान एवढे काही मोठे नाहीये. खरंच.
रिता कपूर यांनी संपूर्ण भारतभरातील पारंपारिक साड्यांची माहिती व नमुने जमवले आहेत.
कापड, धागा, विणकामाची पद्धत, पारंपारिक विणकर, विविध प्रकारची नक्षी व त्यांचे सांस्कृतिक संदर्भ/ अर्थ, प्रत्येक साडीचे सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक संदर्भ, नेसण्याची पद्धती अश्या विविध मुद्द्यांना धरून ही प्रचंड माहिती जमवलेली आहे. हे भारतभरच्या प्रत्येक राज्यातील बहुतांश सर्व प्रकारच्या साड्यांबद्दल त्यांनी केले आहे.
यात मराठी मुलखातल्या नऊवार साड्यांच्या नेसण्याच्या काही प्रामुख्याने दिसणार्‍या पद्धती, जातीजमातींनुसार बदलणारी पद्धत व शब्द इत्यादी गोष्टींसंदर्भात मी थोडीशी मदत त्यांना केली.
दर्यामे खसखस स्वरूपाची ही मदत होती असे म्हणायला हरकत नाही.

आपण केलेल्या मदतीबाबत अधिक खुलासेवार लिहिलेत तर आनंद होईल. कोणकोणत्या भागात कसे कसे अनुभव आले याबाबत अधिक माहिती.<<<
मी जे काय थोडंफार केलं ते सगळं २००५ मधे. ते मी नंतर विसरूनही गेले होते. रिता यांचा फोन आला काल तेव्हा 'अरे हो की!' असं झालं. तेव्हाचं सगळं आत्ता आठवणं मुश्कील आहे. Happy

आपल्या मायबोलीकर श्यामली (कामिनी केंभावी) आणि सोनाली जोशी ह्या दोघींचेही संगीत अल्बम्स अनुक्रम "चांदणशेला" आणि "सांगावा"...... यंदाच्या मराठी चित्रपट परिवार पुरस्कारासाठी नामंकित झाले आहेत.

ही लिंक तुम्ही बघू शकता

http://marathichitrapatparivar.com/puraskar.htm

दोघींचेही मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !!!!!!!!!

मायबोली रॉक्स Happy

आपल्या मायबोलीकर श्यामली (कामिनी केंभावी) आणि सोनाली जोशी ह्या दोघींचेही

हार्दिक अभिनंदन!

जयश्री पोस्टबद्दल आभारी आहे.
सर्व मायबोलीकर,
माझ्या कविता कथा .. मी फार लेखन केलेले नाही पण त्याला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचेही आभार मानते. असाच लोभ असू द्या.
सोनाली

http://www.youtube.com/watch?v=toPS3X1IRiA
तुला बोलावतो सागर - बेला शेंडे

482638_574553672569325_1267816539_n.jpg

मायबोलीवरील उत्तम गझलकार्,श्री.गंगाधर मुटे यांना अंकुर साहित्य संघातर्फे,अंकुर मराठी साहित्य संमेलन २०१३ मध्ये, अंकुर वैभव विशेष पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.

मुटेजींकडून उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती होवो व असे अनेक पुरस्कार त्यांस लाभोत ही सदिच्छा.

आपले मनःपूर्वक अभिनंदन मुटेजी.

मायबोलीकर गझलकारा प्राजक्ता पटवर्धन ह्यांच्या 'मौनाची आर्जवे' या आगामी गझलसंग्रहास प्रकाशनाआधीच बुलढाणा साहित्य परिषदेचा 'आद्य गझलकार श्री. अमृतराय पुरस्कार' जाहीर!

प्राजक्ता पटवर्धन उर्फ प्राजू ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! Happy

Pages