हा धागा कोठे असावा किंवा असा धागा आधी अस्तित्वात आहे का हे माहीत नसल्याबद्दल क्षमस्व!
लेखनाव्यतिरिक्तही अनेक क्षेत्रात मायबोलीकर अभिनंदनास्पद कामगिरी बजावत असतील.
'अभिनंदन' या धाग्यात मला फक्त लेखन प्रकाशित होण्याचे अभिनंदन असावे असे वाटले.
म्हणून हा धागा!
अभिनंदनास्पद कामगिरी बजावणार्या मायबोलीकरांचे नाव, क्षेत्र, कामगिरी व त्यास मिळालेला सन्मान यची माहिती कृपया येथे द्यावी व प्रतिसादकांनि अभिनंदनही करावे.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
=================================================================
प्रथम अभिनंदन नवी मुंबईचे डॉ. कैलास गायकवाड यांचे!
यांना काल नवी मुंबई मनपाने उत्कृष्ट वैद्यकीय अधिकरी म्हणून सन्मानीत केले.
मनःपुर्वक अभिनंदन!
कैलासराव आपल्या सर्वांना मैत्रीपूर्ण व सौम्य वागणारे, डॉक्टर असल्याचे व मराठी गझल क्षेत्रात सातत्याने सक्रिय सहभाग देणारे मायबोलीकर म्हणून परिचित आहेत. गझलेबाबत गंभीर दृष्टिकोन असणे व विविध विचारप्रणालींवर विविध पातळ्यांवर चर्चा घडवून आणणे हा त्यांचा छंद दिसतो. आंतरजालीय विश्वात निर्विवादपणे वादोत्पादक बाबींपासून ते यशस्वीरीत्या दूर असतात, जे साध्य करणे काहीसे अवघड आहे.
कैलासरावांकडून अधिकाधिक लेखन व्हावे व त्याचवेळेस त्यांच्या क्षेत्रातही त्यांचा उत्कर्ष व्हावा अशी मनापासून शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
@ आनंदयात्री..तुला वरती
@ आनंदयात्री..तुला वरती कितीतरी जणांनी अभिनंदन केलंय.. भटकंती साठी ऑनलाईन खजिना तुझा आहे नं..
,"गझलकार नचिकेत जोशी उर्फ आनंदयात्री यांचे आर्टिकल आजच्या पुणे सकाळमधील टुडे या पुरवणीतील फास्ट ट्रॅक या पानावर प्रकाशित झाले.
गेली अनेक वर्षे गिर्यारोहण करणार्या आनंदयात्रींचे हे 'दुर्ग दुर्गट भारी' आर्टिकल खचितच वाचनीय आहे.
आनंदयात्रींचे अभिनंदन!,"
-'बेफिकीर'!
नको असेल अभिनंदन तर दे परत, हाकानाका
वर्षू, ओह्ह... हवंय की...
वर्षू,
ओह्ह...
हवंय की... राहू दे...
(ते जून २०११ चं होतं ना, त्यामुळे गोंधळलो)
मीमराठी.नेट ह्या संकेतस्थळाने
मीमराठी.नेट ह्या संकेतस्थळाने घेतलेल्या लेखन स्पर्धेत अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल...
कवठीचाफा आणि विशाल कुलकर्णीचे हार्दिक अभिनंदन!
कवठीचाफा व विशाल कुलकर्णी
कवठीचाफा व विशाल कुलकर्णी यांचे मनापासून अभिनंदन
धन्यवाद या बातमीसाठी प्रमोदराव
मायबोलीकर गझलकार व सन्मित्र,
मायबोलीकर गझलकार व सन्मित्र, जळगावस्थित डॉक्टर ज्ञानेश पाटील यांची 'यू आर एल' फाउंडेशनच्या या वर्षीच्या 'गझल - उन्मेष' पुरस्कारासाठी सुयोग्य निवड झाली आहे. नवीन पिढीच्या गझलेतील आश्वासक व दमदार गझल या स्तुत्य निकषावर ज्ञानेश पाटील यांचे नांव निश्चीत करण्यात आले आहे. कार्यक्रम सोहळा दिनांक २९ मे २०१२ रोजी मुंबई येथे होईल. त्यात हा पुरस्कार ज्ञानेश यांना देण्यात येईल. याच सोहळ्यात 'गझल गौरव' हा पुरस्कार ललिता बांठिया या ज्येष्ठ गझलकारा यांना देण्यात येईल
दुर्दैवाने (मन्थ एन्ड मुळे ऑफीसचे काम अधिक असल्याने) मला मुंबईला जाता येणार नाही. मायबोलीवरील मुंबईस्थित मित्रांना जाता येईल अशी आशा आहे व सर्वांनी जाऊन ज्ञानेशचे समक्ष अभिनंदन करावे अशी नम्र विनंती
ज्ञानेश,
तुझे हार्दिक अभिनंदन, गझला तर बेहतरीन आहेतच, पण त्यांना बेहतरीन लौकीकाची नवनवी क्षितीजे आपल्याकडे बोलावोत अशी प्रार्थना
-'बेफिकीर'!
अभिनंदन ज्ञानेश.
अभिनंदन ज्ञानेश.
पर्फेक्ट निवड!!! अभिनंदन
पर्फेक्ट निवड!!!
अभिनंदन ज्ञानेशजी आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!
आपले खूप खूप अभिनंदन
आपले खूप खूप अभिनंदन ज्ञानेश!!!
Star Union Dai-ichi - a life
Star Union Dai-ichi - a life insurance joint venture between Bank of India, Union Bank and Japanese insurer Dai-ichi - has appointed Girish Kulkarni as the managing director and CEO of the company after Kamalji Sahay left.
Prior to this, Kulkarni was General manager at Generali in Dubai. His experience at Generali could come in handy to expand this predominantly bancassurance company into a multichannel insurer.
आपले मायबोलीकर स्नेही गिरीश कुलकर्णी यांची बँक ऑफ इंडिया, युनीयन बँक आणि जॅपनीज इन्शुरन्स कंपनी 'दाई इची' यांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या "स्टार युनीयन दाई-इची" या लाईफ इन्शुरन्स संयुक्त प्रकल्पावर मॅनेजींग डायरेक्टर आणि कंपनीचे सी.ई.ओ. म्हणून निवड झालेली आहे.
गिरीशदांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !
वा वा मनापासून अभिनंदन व
वा वा
मनापासून अभिनंदन व टाळ्या
अरे वा! दोघांचेही
अरे वा! दोघांचेही अभिनंदन!!
म्हणजे गिरीश कुलकर्णी आता भारतवासी आणि मुंबईकर होणार का?
बेफिकीर हेच का युआरेल फाउंडेशन? http://urlfoundation.org/gavrauv_puraskar.html
त्यांच्यात संकेतस्थळावर माहिती अद्यावत ठेवायची पद्धत नसावी.
कार्यक्रमाचे स्थळकाळ माहीत असेल तर लिहिणार का?
अरे व्व्वा. गिरीश कुलकर्णींचे
अरे व्व्वा.
गिरीश कुलकर्णींचे अभिनंदन
हो हेच असावे ज्ञानेशने मला
हो हेच असावे
ज्ञानेशने मला सांगितले की त्यांच्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे म्हणून
इथे (आणि फोनवरही) अभिनंदन
इथे (आणि फोनवरही) अभिनंदन केल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो !
@बेफिकीर/मयेकर-
त्यांची साईट अपडेट केलेली नाहीये. (करायला हवी खरं तर !) मी फक्त संस्थेची माहिती घेण्यासाठी वेबसाईट पाहण्यास सुचवले होते.
गिरीश कुलकर्णी यांचेही अभिनंदन ! मोठीच अचिव्हमेन्ट आहे ही.
- डॉ. कैलास गायकवाड - नचिकेत
- डॉ. कैलास गायकवाड
- नचिकेत जोशी उर्फ आनंदयात्री
- हबा व विशाल कुलकर्णी
- क्रांती सडेकर
- प्राजक्ता पटवर्धन
- कवठीचाफा आणि विशाल कुलकर्णी
- डॉक्टर ज्ञानेश पाटील
- गिरीश कुलकर्णी
सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन...!
अभिनंदन
अभिनंदन
वॉव..... यू आर एल वाल्यांनी
वॉव..... यू आर एल वाल्यांनी ज्ञानेशचा नंबर हवा म्हणून मला फोन केला होता..... मी खोदून विचारलं तरी कशा साठी हवा हे सांगितलं नाही.... कारण आत्ता समजतंय.
अभिनंदन ज्ञानेश....... त्रिवार अभिनंदन.
गिरीश कुलकर्णींचे अभिनंदन!
गिरीश कुलकर्णींचे अभिनंदन!
आपले मायबोलीकर स्नेही गिरीश
आपले मायबोलीकर स्नेही गिरीश कुलकर्णी यांची बँक ऑफ इंडिया, युनीयन बँक आणि जॅपनीज इन्शुरन्स कंपनी 'दाई इची' यांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या "स्टार युनीयन दाई-इची" या लाईफ इन्शुरन्स संयुक्त प्रकल्पावर मॅनेजींग डायरेक्टर आणि कंपनीचे सी.ई.ओ. म्हणून निवड झालेली आहे.
क्या बात है!!! गिरीशराव्,अभिनंदन.
यू आर एल फौंडेशन हे ज्येष्ठ व
यू आर एल फौंडेशन हे ज्येष्ठ व जाणकार गझलरसिक उदयदादा लाड ह्यांचे आहे असे वाचले होते(बहुधा 'कुसुमाकर'मधे)
यु आर एल = उदय आर . लाड
यु आर एल = उदय आर . लाड
श्री. ज्ञानेश पाटील, व श्री.
श्री. ज्ञानेश पाटील, व श्री. गिरीश कुलकर्णी -
मनपूर्वक अभिनंदन...!
मनःपूर्वक अभिनंदन
मनःपूर्वक अभिनंदन ज्ञानेश!
गिरीश, तुमचेही अभिनंदन!
जयश्री (जयावी), एक फारच गंमतः
जयश्री
खेरीज त्या गाण्यात समूह गाण्यात देखिल तू आहेस ही माहिती मी त्याला पुरवली..
(मी तुला समस देखिल टाकला होता.. कारण तू कुवेत मध्ये असल्याने तुला हे माहित आहे का याची कल्पना नव्हती..)
(जयावी),
एक फारच गंमतः ५ मे ला मुंबई विमानतळावर टॅक्सीतून जात असता १००.७ fm? (मराठी) वर तुझ्या पहिल्या अलबम मधील "ओला वारा".. "सांग ना वेड्या मना".. ही दोन गीते ऐकवली गेली. त्या आर जे ने गीतकार, गायक वगैरे (गाणे झाल्यावर) सांगण्यापूर्वीच, आधी पहिले काही म्युझिक ऐकून मी "अरे हे तर जया चे, ओला वारा गाणे.." असे म्हटले.. दोन्ही गाणी मी अशी ओळखल्यावर टॅक्सीवाल्याला (मराठीच होता तो ही!) आश्चर्य वाटले.. "तुम्हाला कसे माहित..?" या त्याच्या प्रश्नावर मी कॉलर ताठ करत म्हटले.. "कारण हे गाणे आम्च्या जयश्री चे आहे".. आर जे ने तुझे नाव मात्र जयश्री कुलकर्णी असे सांगितले..
असो एकंदरीत त्या वेळेला तुझे खूप कौतूक व अभिमान वाटला.. तुझी गीते अशीच दश दिशांत सर्वांना सुरेल प्रवास घडवोत अशीच सदिच्छा..!
या बाफ वर हे एव्हड्यासाठी लिहीले की हा तुझा, तुझ्या गीतांचा सन्मान आहे. बाकी कुवेत मधिल मायबोलीकरिणीने लिहीलेल्या गीताला मुंबई पुण्यातील कलाकाराने सूर साज चढवला.. दुबईकर ती गीते ऐकत आहेत.. "मराठी" ची चिंता मला तरी नक्कीच नाही!
जयश्री अंबासकरांचे अभिनंदन व
जयश्री अंबासकरांचे अभिनंदन व शुभेच्छा!
तहे दिल से शुक्रिया दोस्त
तहे दिल से शुक्रिया दोस्त
खूप छान वाटलं. तुझ्यासारखंच अजूनही खूप जणांनी सांगितलं की आम्ही तुझं गाणं ऐकलं. इतक्या प्रेमाने तुम्ही सगळे कौतुक करता.....ह्यातच सगळं मिळालं रे...!! असंच प्रेम असू द्या.
आपण मायबोलीकर खरंच एकमेकांच्या प्रगतीत मनापासून सामील असतो. हे सगळं फक्त मायबोलीमुळेच.
मायबोली रॉक्स.....
अभिनंदन जयश्री
अभिनंदन जयश्री
धन्यवाद बेफिकीर, कणखर
धन्यवाद बेफिकीर, कणखर
विशाल यांनी सांगितलेल्या
विशाल यांनी सांगितलेल्या बातमीचे हे लिंक
http://economictimes.indiatimes.com/news/news-by-company/corporate-annou...
आजच्या लोकसत्तेत ही आलंय.
अभिनंदन गिरीश कुलकर्णी
सन्मानप्राप्त सबधितांचे
सन्मानप्राप्त सबधितांचे अभिनंदन !
Pages