आज सकाळी फेसबुक वर चाळे करत असताना एक मालिकेचे पेज सापडले..त्या पेज चे नाव होते " GIANT ROBOT "
माझ्या लहानपणीचा पहिला सुपर हिरो.. जायंट रोबो..
त्यावेळेला ८८ -८९ च्या सुमारास ही मालिका लहान मुलांमधे प्रचंड गाजली. दर रविवारी सकाळी ९ / १० वाजता लागायची. फक्त त्याच्यासाठी मी सकाळी इतक्या लवकर उठायचो ते पण रविवारी..
सुरुवातीला दुरदर्शन सा सुप्रसिध्द लोगो त्याच्या साईंनिंग ट्युन सहित टिव्हीवर दिसायचा.
पॅ अॅअॅअॅआआ पेआ आ आआआआआअ
ट्न टनन टन्न टन्न ट न न
नंतर ५ मिनिट जाहिराती त्यात "गोल्ड स्पॉट" , "लिम्का", लिज्जत पापड वाला ससा आणि लिरिल....(लिरिल च्या वेळी डोळे झाकले जायचे, घरच्यांचा दमच तसा होता...;)
हे सगळ झाल्यावर पडद्यावर अवतार घ्यायचा ..........जायंट रोबोट.. आणि त्याचा लहान मालक "जॉनी सोको"
जो घड्याळात बघुन रोबोट शी संवाद साधायचा..मला फार अप्रुप होते त्याचे घडाळ्यात कसे बोलले जाते. मग आजोबा ऑफिस मधुन घरी आले की त्यांचे "घड्याळ" घेउन घरभर "कॉलिंग जायंट रोबोट" करत फिरत असायचो.. जायंट रोबोट चे कवायती बघुन काहीही घरच्यांनी काम सांगितले की आधी दोन्ही हात कवायत करत उठायचो.. हात इकडे तिकडे करुन झाल्यावर मग कामाला लागायचो..घरचे सुध्दा "रोबोट उठला ना आता सगळी काम कर.रोबोट थकत नाही काही. न सांगता सगळे काम करतो" इत्यादी बोलुन मला हरभर्याच्या झाडावर चढवुन सगळी काम करुन घेत ..:)
जायंट रॉबोट च्या चालु झाल्यावर अजुन एक मालिका काही महिन्यांनी चालु झाली " Fireball XL5 "
ही मालिका मुख्यतः अंतराळवीरांवर होती.. लहान बाहुल्यांप्रमाणे दिसणारी माणसे.. त्यांची मान सारखी "कठपुतली" च्या बाहुलीप्रमाणे सतत हलणारी होती. जायंट रॉबोट पेक्षा ही मालिका जरा जास्त सुटसुटीत होती..
यात देखील एक लांब बल्ब प्रमाणे दिसणारा लहानसा रोबोट होता... "वांय्य्य्यव , व्वाय्य्यांव" सारखा सतत आवाज करायचा..... बोलक्या बाहुल्यांसारखा प्रकार होता..पण तेव्हा हे पहायला मज्जा यायची
.
अजुन एक - दोन मालिका होत्या .. एक होती बाईक रेसर वर.. ती बहुदा अमेरिकन होती...नाव आता आठवत देखील नाही.. दुसरी मालिका होती.. चालत्याबोलत्या लहान गोळ्या ज्या परग्रहावरुन आलेल्या.. त्या गोळ्या वेफर्स आईस्क्रिम खायच्या..एकमेकांवर मनोरा रचुन काहीही करायच्या...
.
लहानपणी धम्माल मालिका होत्या....आजच्या मुलांना काय अप्रुप त्याचे....
.
आपल्याला सुध्दा काही आठवल्या तर नक्कीच लिहा.....:)
आणि लोकहो 'ओशिन' आठवते का?
आणि लोकहो 'ओशिन' आठवते का? तेव्हा ईंग्लिश काही कळायचे नाही तरी आम्ही ती मालिका बघायचो. छोटी ओशिन फारच गोड होती.
मृगनयनी मस्त होती अनेक मराठी
मृगनयनी मस्त होती अनेक मराठी कलाकार त्यात होते. हेमामालिनी आणि कबीर बेदीची सिरीयल छान होती. (बंधन का बंदीश नाव होते असे वाटते नक्की आठवत नाहीये.)
त्या 'किले का रहस्य' च्या
त्या 'किले का रहस्य' च्या सुमारास रात्री अजून एक मालिका लागायची. नाव आठवत नाही. पण त्यात कोणी 'काली बहू' की 'छोटी बहू' असं कॅरॅक्टर होतं. आणि तिचा मेणा घेऊन सतत ते भोई फिरायचे मालिकेत 'हुन हुना हुन हुना हुन हुना रे हुन हुना' म्हणत.
आठवतेय का कोणाला?
हो आठवतेय रमड. नाव नाही आठवत
हो आठवतेय रमड. नाव नाही आठवत पण नवनी परिहार होती त्यात. त्यातला हिरो आवडायचा मला.
हेमामालिनी आणि कबीर बेदीची
हेमामालिनी आणि कबीर बेदीची सिरीयल छान होती. >>> मला वाट्ते " नुपूर" नाव होते त्या मालिकेचे..
आणि लोकहो 'ओशिन' आठवते का?
आणि लोकहो 'ओशिन' आठवते का? >>>> त्या जापानीज की चायनीज मुलीची का? बर्फाळ प्रदेशात राहणारी तीच का ?? मला आठवतेय.. आइ-वडिल सगळे पाहायचो ती आवडीने
ओशिन' आठवते का? तेव्हा
ओशिन' आठवते का? तेव्हा ईंग्लिश काही कळायचे नाही तरी आम्ही ती मालिका बघायचो. छोटी ओशिन फारच गोड होती.>>+१ हो हो माझी पण आवड्ती होती.
इन्द्रधनुष ??
इन्द्रधनुष ??
हो मी अंजली बरोबर 'नुपूर'
हो मी अंजली बरोबर 'नुपूर' होते नाव. शेवटचा डायलॉग 'इसे बंधन समझना बंदीश नही'(कबीर बेदी) असा होता.
`हुन हुना रे हुन हुना'`मधली
`हुन हुना रे हुन हुना'`मधली कालीगंज की बहू नूतन होती.
हो रावी नूतन होती आणि तिची
हो रावी नूतन होती आणि तिची सून नवनि परिहार होती वाटते, मग त्या नवनिचे दुसरे लग्नपण होते हिरोने तिला सोडल्यानंतर, हिरोला लग्नात इंटरेस्ट नसतो, असे काहीसे आठवतंय.
किलबिलमध्ये माझ्या वर्गातली
किलबिलमध्ये माझ्या वर्गातली एक मुलगी काम करायची. आता ती एक मराठी कलाकार आहे."विणा जामकर"
हेमामालिनीच्या सिरियलची माझी
हेमामालिनीच्या सिरियलची माझी एक आठवण आहे. मला वाटत त्यामधे हेमामालिनी गुरुकुल पद्धतिने नृत्याच प्रशिक्षण घेत असते, तर एका एपिसोडमधे तिचा मित्र तिला भेटायला येतो आणि नेमकी ती वेळ तिच्या अध्ययनाची वेळ असते तेव्हा ती आपल्या मित्राला निक्षुन सांगते की मी आत्ता तुला भेटणार नाही ही माझी अध्ययनाची वेळ आहे. ते पाहुन माझ्या आईने माझं बौद्धिक घेतल होत ते असं "बघ ती कस म्हणाली तिच्या मित्राला? गेली का लगेच ती तिचा अभ्यास सोडुन? तु पण असच वाग नाहितर कुणी म्हणाल चल खेळायला की निघाली लगेच वगैरे वगैरे" :स्मितः या धाग्याच्या निमित्ताने आज ते परत आठवलं
त्या वेळच्या मालिका इतक्या
त्या वेळच्या मालिका इतक्या सुंदर होत्या ना की घरचे मोठे आवर्जुन बघायला सांगायचे आताच्या मालिकांपासुन लहान मुलांना शक्य तितक परवृत्त करणच चांगल अस वाटत..... पूर्ण परिवाराने एकत्र बसुन बघाव अश्या मालिकाच नाहित आता.... मनोरंजन होतच नाही शिकवण बिकवण तर लांबच....
अविगा, वीणा जामकर चांगले काम
अविगा, वीणा जामकर चांगले काम करते, पुर्वीच्या मालिकांबद्द्ल मुग्धाला अनुमोदन.
माय फेव्हरेट ---------
माय फेव्हरेट --------- मालगुडी डेज ( तानाना ताना नाना ना)
नूतनच्या त्या मालिकेचं नांव
नूतनच्या त्या मालिकेचं नांव होतं 'मुजरिम हाजीर'!
धन्यवाद मस्त कलंदर, कितीही
धन्यवाद मस्त कलंदर, कितीही डोक्याला ताण दिला तरीही नाव आठवतच नव्हते.
अरे वा........धागा सार्थकी
अरे वा........धागा सार्थकी लावलात...
आपल्या आवड्या मालिकांचे
आपल्या आवड्या मालिकांचे पोस्टर या फोटो टाकले तरी चालतील.......नावावरुन नाही किमान फोटो पाहुन तरी जुण्या आठवनी ताज्या होतील
किलबिल नंतर सांताकुकडी
किलबिल नंतर सांताकुकडी लागायचे.......गुजरातीत लिहिलेले ते मी नेहमी सांताडुडडी असे वाचायचे. संध्याकाळचे कार्यक्रम बघायला जमायचे नाही कारण ती वेळ बाहेर मैदानात खेळायची असायची.
येस! कालीगंज की बहू. आणि
येस! कालीगंज की बहू. आणि नूतनच होती ती. मलाही आठवलं. धन्स सगळ्यांना.
सांताकुकडी मला पण कधीच बघायला जमलं नाही. काय असायचं त्यात?
खूप पूर्वी रविवारी सकाळी रूना लैला वगैरेंची गाणी लागायची दूरदर्शन वर. आणि बहुधा मिकी-डॉनल्ड. पण याव्यतिरीक्त काहीच आठवत नाही तेव्हाचं. थेट साप्ताहिकी आणि संध्याकाळचा पिक्चर आठवतो.
ते शो थीम वगैरे आठवतंय का कोणाला?
हो रविवार सकाळ कार्टून
हो रविवार सकाळ कार्टून लागायचे ..मला आवडायचे.
प्रतिमा आणि प्रतिभा हा कार्यक्रम मी बघायचे नाही पण त्याचे नाव नीट आठवते आहे. तसेच ज्ञानदीप सुद्धा....ज्ञानदीप लागले कि दिव्याचे चित्र दाखवायचे....तेव्हा माझ्या मोठ्या बहिनीने मला सांगितले होते कि 'ज्ञानाचा दिवा आहे तो त्याला नमस्कार करत जा' आणि मी नेहमी तो दिवा दिसला कि नमस्कार करायचे
उदयन, ह्या धाग्यासाठी
उदयन, ह्या धाग्यासाठी धन्यवाद. 'पैलतीर' आठवतेय का कोणाला? त्यात मकरंद देशपांडे होता, त्याची पहिलीच मालिका, तो किती सोबर आणि छान दिसायचा. आता अगदी अवतार करून घेतलाय स्वतःचा. त्या सिरीयलमधे किशोरी शहाणे आणि बहुतेक दत्ता भट होते.
मराठीत एक मालिका होती तांडा
मराठीत एक मालिका होती तांडा चालला.. उदय म्हैसकर,सयाजी शिंदे होते त्यात.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा.
हो, पैलतीर आठवतेय. अधांतरी,
हो, पैलतीर आठवतेय. अधांतरी, परमवीर पण आठवतायत.
परमवीरचा टा.ट्रॅ. असा होता -
जो करे जीवाची होळी, छातीवर झेलूनी गोळी, जो देशद्रोह नित जाळी, तो परमवीर
हा देश घडवण्यासाठी, अन्याय बुडवण्यासाठी, डोळ्यांच्या करतो वाती, तो परमवीर
होनी अनहोनी आवडायची पण भिती वाटायची.
कथासागर म्हणून एक होती त्यात छान स्टोरीज असायच्या.
एक खानदान म्हणून होती. ती बर्यापैकी आताच्या मालिकांसारखी होती.
मला तूनळी वर एक दो तीन चार चा टायटल ट्रॅक सापडला
शेखर सुमनची रिपोर्टर
शेखर सुमनची रिपोर्टर
अधांतरी- जयवंत दळवींच्या
अधांतरी- जयवंत दळवींच्या 'अधांतर' कादंबरीवर होती,शेवट बदलला होता. हसरते हि हिंदी मालिकापण ह्याच कादंबरीवरून घेतलेली पण खूप भरकटत नेली मूळ कथानकापेक्षा.
रिपोर्टर- आवडायची मला.
कथासागर आणि एक कहानी ह्या
कथासागर आणि एक कहानी ह्या खूपच सुंदर मालिका होत्या. परत अशा कथांवर आधारित मालिका हव्यात, विविध भाषेच्या कथा असायच्या. लोहित किनारे हि मालिका पण छान होती.
मराठीत 'पिंपळपान' मराठीतील नावाजलेल्या कादंब-यांवर वर छान होती. सध्या अशा सिरीयल दिसत नाहीत.
आता जे तिशी-चाळीशीच्या आसपास आहेत ते बालपणीच्या मालिकांच्या बाबतीत भाग्यवान म्हणायला हवेत.
Pages