Submitted by प्राजु on 14 August, 2013 - 09:02
श्रावण म्हणतो गावे गाणे, तारा छेडून किरणांच्या
साथीला मेघांचा ठेका आणि सुरावटी धारांच्या..
लवलव नाचे गवत पोपटी, गिरकी घेऊन झुलताना
ऊन बागडे हरणाच्यापरी, गवतावर झिरमिरताना
तान टपोरी झरली ओठी हिरव्या रेशिम पात्यांच्या
साथीला मेघांचा ठेका आणि सुरावटी धारांच्या..
घुमू लागला श्रावण सोडून रंगित शेला जरतारी
सतरंगी चापास कुणी अन कधी घातली हाकारी
कुण्या खुळीने रचल्या त्यावर ओळी हळव्या कवनांच्या
साथीला मेघांचा ठेका आणि सुरावटी धारांच्या..
बघता बघता निसर्ग अवघा श्रावणप्रेमाला भुलला
तर्हेतर्हेने रंगून, गंधून, चहू दिशांतून मोहोरला
उरात घेतो साठवून तो माळा श्रावण-स्मरणांच्या
साथीला मेघांचा ठेका आणि सुरावटी धारांच्या..
-प्राजु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त! मस्त! मस्त! अगदी
मस्त! मस्त! मस्त!
अगदी 'श्रावणमासी हर्ष मानसी' सरसरुन आठवली!
छान, लयबद्ध.
छान, लयबद्ध.
कित्ती गोड, कित्ती सुरेख,
कित्ती गोड, कित्ती सुरेख, सुरेल ....
सुंदर गीत वाह प्राजु वाह
सुंदर गीत
वाह प्राजु वाह
मस्त आहे. आवडली!
मस्त आहे. आवडली!
सर्वांचे मनापासून आभार.
सर्वांचे मनापासून आभार.
केवळ सुंदर...
केवळ सुंदर...
धन्यवाद पुरंदरे शशांक!
धन्यवाद पुरंदरे शशांक!
कुठल्याही ऋतुमधे वाचताना
कुठल्याही ऋतुमधे वाचताना मनाला श्रावणाचा सुखद शिडकावा देणारी सुरेल रचना - पुन्हा पुन्हा वाचत रहावी अशी गोड रचना ...