Submitted by यशस्विनी on 14 August, 2013 - 01:17
गावाकडील स्वयंपाकघर - कॅनव्हासवर अॅक्रिलिक रंग वापरले आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गावाकडील स्वयंपाकघर - कॅनव्हासवर अॅक्रिलिक रंग वापरले आहेत.
कलर कॉम्बिनेशन मस्त आहे. आणि
कलर कॉम्बिनेशन मस्त आहे. आणि तुझ्या ब्रशच्या स्ट्रोक आता जास्त छान येत आहेत. पण चुलीमध्ये थोडी गडबड झालीये. थोडी सुधारणा करता येईल का बघ ना. अजून छान दिसेल चित्र.
थोडं फ्लॅट आहे........शॅडो वर
थोडं फ्लॅट आहे........शॅडो वर काम जास्त कर....बघितल्यावर मस्त दिसतय फक्त बारकाईने पाहिले की त्यातल्या काही गोष्टी लक्षात येतात..पण छान आहे हे...बस थोडा है थोडे की जरुरत है.....
कलर कॉम्बिनेशन मस्त आहे>>>>>>>>>>> +१११११
धन्स अल्पना... अग ही चुल
धन्स अल्पना... अग ही चुल रंगवताना मी खुप वेळ घेतला आहे. तीचा 3D आभास होण्यासाठी तर फारच... सतत वेगवेगळे रंगाचे शेड्स दिले, ब्रश स्ट्रोक्स बदलले. तरी प्रयत्न करते.
धन्स अनिश्का... अग थोडे की
धन्स अनिश्का... अग थोडे की जरुरत नही... बहोत की जरुरत है... अभ्यासप्रक्रिया चालु आहे, पण सध्या मी खुप खुश आहे चित्रकला आता थोडी थोडी जमु लागली आहे.
अभ्यासप्रक्रिया चालु आहे, पण
अभ्यासप्रक्रिया चालु आहे, पण सध्या मी खुप खुश आहे चित्रकला आता थोडी थोडी जमु लागली आहे.>>>>>>>>>>> मी नवीन नवीन जॉइन झाली फाईन आर्ट्स ला तेव्हा माझी ६ महिने गोची झाली होती....१० पैकी २-४ मार्क यायचे.. नंतर फंडा क्लीअर झाल्यावर गाडी ३-४ वरुन ८- ८ १/२ - ९ वर आली होती.....तु वॉटर कलर मधे काम नाही का करत??? ....खर म्हणजे ते कठिण मीडियम आहे...पोस्टर किवा अॅक्रेलिक पेक्षा.... पोस्टर किवा अॅक्रेलिक मधे रंगाचे स्ट्रोक्स वर स्ट्रोक्स मारु शकतो..पण वॉटर कलर मधे ते शक्य होत नाही...म्हणुन मला ते आवडत ही नाही...
अनिश्का... अग सर्व मिडियमचे
अनिश्का... अग सर्व मिडियमचे सामान आणुन ठेवले आहे.... जसा वेळ मिळेल तसे पेटिंग करते.... एखादा फोटो क्लिक झाला कि याचे चित्र काढायचे असे वाटते, मग त्याचे पेटिंग मला कोणते माध्यम वापरुन नीट काढता येइल याचा विचार केला कि अॅक्रिलिकवर माझी गाडी येउन थांबते. कारण ते हाताळायला सोपे व पेटिंग एका दिवसात होउन जाते. तेच तैलरंग वापरायचे म्हणजे रोज थोडे थोडे चित्र पुर्ण करता येते. जलरंग देखील आवडतात वापरायला पण सध्या त्यांना विश्रांती दिली आहे.
चित्र छानच. पण काही तपशील
चित्र छानच. पण काही तपशील वेगळे हवे होते.
चुलीचा रंग मातकट / काळपट हवा. तसेच तिला वाईल पण हवाच.
चुलीवर ठेवलेले भांडे लहान आहे. असे भांडे शक्यतो वाईल वर ठेवतात.
चुलीला तीन उंचवटे पण हवेत.... सॉरी जरा जास्तच लिहिले कारण अशा चुली समोर बसून आजीसोबत बराच काळ घालवला आहे म्हणून जे जाणवले ते लिहिले.
ओके दिनेशदा.... धन्यवाद ,
ओके दिनेशदा.... धन्यवाद
, नो सॉरी प्लिज....
वॉव... सहि आहे चित्र... अगदी
वॉव... सहि आहे चित्र... अगदी गावची आठवण झाली.
धन्स स्मिता
धन्स स्मिता
खूप छान . मस्त !
खूप छान . मस्त !
व्वा..सुरेख़
व्वा..सुरेख़
खूप आवडलं चित्र,
खूप आवडलं चित्र, दिनेशदांच्या सूचनाही समर्पक