आज सकाळी फेसबुक वर चाळे करत असताना एक मालिकेचे पेज सापडले..त्या पेज चे नाव होते " GIANT ROBOT "
माझ्या लहानपणीचा पहिला सुपर हिरो.. जायंट रोबो..
त्यावेळेला ८८ -८९ च्या सुमारास ही मालिका लहान मुलांमधे प्रचंड गाजली. दर रविवारी सकाळी ९ / १० वाजता लागायची. फक्त त्याच्यासाठी मी सकाळी इतक्या लवकर उठायचो ते पण रविवारी..
सुरुवातीला दुरदर्शन सा सुप्रसिध्द लोगो त्याच्या साईंनिंग ट्युन सहित टिव्हीवर दिसायचा.
पॅ अॅअॅअॅआआ पेआ आ आआआआआअ
ट्न टनन टन्न टन्न ट न न
नंतर ५ मिनिट जाहिराती त्यात "गोल्ड स्पॉट" , "लिम्का", लिज्जत पापड वाला ससा आणि लिरिल....(लिरिल च्या वेळी डोळे झाकले जायचे, घरच्यांचा दमच तसा होता...;)
हे सगळ झाल्यावर पडद्यावर अवतार घ्यायचा ..........जायंट रोबोट.. आणि त्याचा लहान मालक "जॉनी सोको"
जो घड्याळात बघुन रोबोट शी संवाद साधायचा..मला फार अप्रुप होते त्याचे घडाळ्यात कसे बोलले जाते. मग आजोबा ऑफिस मधुन घरी आले की त्यांचे "घड्याळ" घेउन घरभर "कॉलिंग जायंट रोबोट" करत फिरत असायचो.. जायंट रोबोट चे कवायती बघुन काहीही घरच्यांनी काम सांगितले की आधी दोन्ही हात कवायत करत उठायचो.. हात इकडे तिकडे करुन झाल्यावर मग कामाला लागायचो..घरचे सुध्दा "रोबोट उठला ना आता सगळी काम कर.रोबोट थकत नाही काही. न सांगता सगळे काम करतो" इत्यादी बोलुन मला हरभर्याच्या झाडावर चढवुन सगळी काम करुन घेत ..:)
जायंट रॉबोट च्या चालु झाल्यावर अजुन एक मालिका काही महिन्यांनी चालु झाली " Fireball XL5 "
ही मालिका मुख्यतः अंतराळवीरांवर होती.. लहान बाहुल्यांप्रमाणे दिसणारी माणसे.. त्यांची मान सारखी "कठपुतली" च्या बाहुलीप्रमाणे सतत हलणारी होती. जायंट रॉबोट पेक्षा ही मालिका जरा जास्त सुटसुटीत होती..
यात देखील एक लांब बल्ब प्रमाणे दिसणारा लहानसा रोबोट होता... "वांय्य्य्यव , व्वाय्य्यांव" सारखा सतत आवाज करायचा..... बोलक्या बाहुल्यांसारखा प्रकार होता..पण तेव्हा हे पहायला मज्जा यायची
.
अजुन एक - दोन मालिका होत्या .. एक होती बाईक रेसर वर.. ती बहुदा अमेरिकन होती...नाव आता आठवत देखील नाही.. दुसरी मालिका होती.. चालत्याबोलत्या लहान गोळ्या ज्या परग्रहावरुन आलेल्या.. त्या गोळ्या वेफर्स आईस्क्रिम खायच्या..एकमेकांवर मनोरा रचुन काहीही करायच्या...
.
लहानपणी धम्माल मालिका होत्या....आजच्या मुलांना काय अप्रुप त्याचे....
.
आपल्याला सुध्दा काही आठवल्या तर नक्कीच लिहा.....:)
धन्यवाद मुग्धा!
धन्यवाद मुग्धा!
दुपारी ३-४ वाजता super human
दुपारी ३-४ वाजता super human syber sqad नावाची सेरियल लागायचि त्यात computer virus येतो आनि त्याचि टिम त्याचा मुकाबला करतात.
लोक्स, आज हिस्टरी चॅनेलवर एक
लोक्स, आज हिस्टरी चॅनेलवर एक जाहिरात पाहिली - 'तमस' १५ ऑगस्टपासून रात्री ९ वाजता सुरु होणार आहे.
सह्हीच! तेव्हा मला त्याचं
सह्हीच!
तेव्हा मला त्याचं टायटल साँग ऐकून फार भयंकर वाटायचं.
मुन्शी प्रेमचंद च्या गोष्टी
मुन्शी प्रेमचंद च्या गोष्टी आठवतात का कोणाला?
दुपारी लागणा-या मालिकांपैकी शांती, स्वाभिमान, देविजी, दामिनी, घरकूल...
रविवारी ई-मराठी वर पंचतंत्र च्या (बाहुल्यांच्या) गोष्टी लागायच्या...मला खुप आवडायच्या.
त्या इम्तिहान मालिकेचे टायटल
त्या इम्तिहान मालिकेचे टायटल साँग होतं
ऑखों में रोक ले, तू ये आसूओं का तूफान
लेती है जिन्दगानी, हर तरफ से एक इम्तिहान S S
आता है, रात के बाद ही दिन
जीत होगी तेरी इक दिन,
खुद पे ना ऐसे हार
हो हो हो हो हं हं हं
होंगी मुश्किले भी आसान
मस्त मालिका होती... रेणुका शहाणे नी फिर दौस दादी होत्या त्यात.
तमस,खूप छान होती, परत बघायला
तमस,खूप छान होती, परत बघायला हवी, thanx स्वप्ना.
पहिली, दुसरीत असताना गोट्या
पहिली, दुसरीत असताना गोट्या मालिका लागायची. जाम आवडायची. त्यानंतर रामायण, महाभारतसाठी आमच्या आसपासच्या तीन चार किलोमिटर परिसरातील शेतकरी मंडळी एका ठिकाणी जमायची. लिफ्ट इरिगेशनचा हॉल होता, तेथे एकमेव मोठा (क्राऊनचा तो अवजड ) ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्ही होता. रामायण, महाभारत संपल्याशिवाय काम सुरूच होत नसायचे. अलिफ लैला, तहकिकात, ब्योमकेश बक्शी, मालगुडी डेज अशा कितीतरी आशयपूर्ण मालिका असायच्या. या सर्वात प्रिय असायचा तो रविवारी चार वाजता लागणारा हिंदी चित्रपट. कुठलाही सिनेमा असला तरी तो आम्ही हमखास बघायचोच.
सोनाली मला आठवतायेत या
सोनाली मला आठवतायेत या मालिका...
दामिनी, घरकूल लागायचं तेंव्हा मी चौथी -पाचवीत असेन
घरकूलचं टायटल साँगही आठवतं थोडंस.....
जिथे निवारा, जिथे____
जिथे उब मायेची शितल
जिथल्या भिंती मध्ये रुजल्या आठवणी या हळव्या कोमल
घरकूल घरकूल घरकूल
आनंद अभ्यकर, मंजुषा गोडसे, शरद पोंक्षे ( त्याचं अडनाव चितळे होतं) हे तिघं होते त्यात ते आठवतय मला
आविष्कारही होता त्यातच, उकाही होता का?
मला त्या पोंक्षेंच्या भाच्या म्हणुन दाखवलेल्या दोघी कन्यका सपशेल आठवतायेत
मला त्या दोघीही आवडायच्या
शांतीची टिकली आठवते फक्त
हुश्श! काही तरी बोलायला मिळालं मला
आणि नंतर ते घरकूल मधलेच
आणि नंतर ते घरकूल मधलेच कलाकार घेऊन 'कानामागुन आली' पण बनवलेली
सुख दु:खाच्या चौअकटीवर घर उभे राही
रुसण्या फुगण्याविना घराला घरपण नाही
माया ममता जेथे बहरून आली
मंदिराची शोभा घरात दिसली
कानामागून आली
अन तिखट झाली... काना मागुन आली अन तिखट झाली
(त्या वरच्या वाक्यांचा या वाक्याशी संबंध काय कुणास ठाऊक :अओ:)
रिया, दामिनी खूप वर्षे चालले,
रिया, दामिनी खूप वर्षे चालले, ते संपेपर्यंत तुझ्या बऱ्याच इयत्ता झाल्या असतील.
दामिनी, बरेच वर्ष चालली खरी
दामिनी, बरेच वर्ष चालली खरी पण आमच्याकडे कोणी बघत नसत
त्यामुळे काही आठवत नाही त्यातलं
हो, अग मीपण सुरुवातीला बघायचे
हो, अग मीपण सुरुवातीला बघायचे मग बंद केले. तू खूप लहान आहेस माझ्यापेक्षा वयाने, कारण तू लिहितेस त्या मालिका ओळखीच्या आहेत पण मोठेपणीच्या, माझ्या विशिनंतारच्या.
ह्म्म्म्म:) माझ्या
ह्म्म्म्म:)
माझ्या विशीनंतरच्या मालिकांची आठवण कशी काढणार मी काही वर्षांनी?
या काय मालिका आहेत? होसुमियाघ, अचांरा,तुतिमी, तुमाज.... अरेरे~
एलदुगो ची काढेन आठवण फक्त
ते पण माबो मुळेच
रियाबाळ, देशात २ वाजलेत
रियाबाळ, देशात २ वाजलेत ना?... गाइ गाइ करा आता
झोप येत नाहीये मला
झोप येत नाहीये मला
music for deep sleep ऐकत
music for deep sleep ऐकत झोप... मी सांगितलं ना तुला मागेच, त्या निद्रानाशाच्या धाग्यावर?? डोळे मिटून ऐकत झोप बरं..एकदा प्रयत्न करुन बघ तर खरं..
एक अर्चना जोगळेकरची मालिका
एक अर्चना जोगळेकरची मालिका होती. नाव नाही आठवत. बारा राशींची एक मालिका होती, मोहन गोखलेंची, बहुदा योगी ? हाय, आय अॅम वाय आय पटेल, असं काहीतरी म्हणायचा.
मला welcome to the spectacular world of guiness book of reocrd ही सुरुवात खुप आवडायची. हल्क्युलर पॅरो बेस्ट. त्यावेळी त्याचं इंग्रजी भारी वाटायचं. आयरिश होतं का ते?
कोणाला अंतॉन चेखॉव्ह च्या कथा
कोणाला अंतॉन चेखॉव्ह च्या कथा दाखवायचे ते आठवते का? तो राजेंद्र का कोण निवेदक असायचा.
ती मोहन गोखलेची 'मिस्टर योगी'
ती मोहन गोखलेची 'मिस्टर योगी' होती.
हम पाँच..आठवते का
हम पाँच..आठवते का कुणाला....मला फक्त टायटल साँग आठवतय...आणि अशोक सराफ...मुलासारखी रहाणारी एक मुलगी.....
परन, राधिका- विद्या बालन , ,
परन,
राधिका- विद्या बालन , , काजलभाई,स्विटी आनि तिची चेली , छोटी आनि मीनाक्षी काय मस्त सिरीयल होती.
आनि फोटोतली बायको
शाळेतुन घरी आल की दुपारच जेवण झाल्यावर मी आणि आजी हम पाँच आनि झी खाना खजाना पाहत बसायचो.
राधिका - स्कॉलर मुलगी
मीनाक्षी - महिलांचा हक्काबाबत जागरुक कायम
स्वीटी - एकच गोष्ट जी कधीच बोअरींग वाटल नाही.. बेल वाजली की हिच आपल गाण सुरु व्हायच आनि नाच पण
काजलभाई - दादागिरी
आनि ह्या सगळ्यांना आनि फोटोतल्या बायकोला मॅनेज करनारा बिचारा बाप - अशोक सराफ
तमसच्या एका एपिसोड मधे एक
तमसच्या एका एपिसोड मधे एक पंजाबी भजन होतं; फार सुरेख होतं ते. आता परत ऐकता येईल .
अंकु आठवलं....काजलभाई मला फार
अंकु आठवलं....काजलभाई मला फार आवडायची....आणि फोटोतली प्रिया तेंडुलकर पण.....
स्वीटी आणी काजलभाइ मस्त...
स्वीटी आणी काजलभाइ मस्त...
चेकॉव्हच्या कथा मला आठवतात,
चेकॉव्हच्या कथा मला आठवतात, निवेदक आठवत नाहीये.
सुरभी - रेणुका शहाणे
सुरभी - रेणुका शहाणे
ह्या मालिकांपैकी ब्योमकेश
ह्या मालिकांपैकी ब्योमकेश बक्षी अजून डीडी वर लागते. मालगुडी डेज हिट एन्टरटेनमेन्ट ह्या चॅनेलवर लागते. काल रात्री ९ वाजता सर्फिंग करताना डीडी वर श्रीकांत असं दिसलं म्हणून स्विच करून पाहिलं तर आशालता वाबगावकर आणि सुजाता मेहता दिसल्या. ही फारुख शेख असलेली श्रीकांत तर नव्हे?
http://doordarshan-serials.bl
http://doordarshan-serials.blogspot.in/2011_07_01_archive.html
हे पण पहा एकदा लोक्स
पल्लवी जोशीची मृगनयनी. आणि
पल्लवी जोशीची मृगनयनी. आणि हेमामालिनीची पण एक सीरीयल होती तीचे नाव आठवत नाहीये.
तन्वी आझमी ची लाईफ लाईन मस्त होती.
Pages