मग तो असाच एक दिवस चालत चालत आमच्या सेंटरवर आला. मग हवेत बघत म्हणाला मला नोकरी हवी आहे. मग चौकशी झाली. मग कळले की सायको होता. मग गंमत म्हणून मॉक लेक्चर घेतले. मग पाहिले तर विद्यार्थी खुळ्यागत स्टँडस्टिल! मग काय विचारता महाराजा? मग देऊन टाकली नोकरी! मग सगळ्या फॉर्मॅलिटीज पण झाल्या. मग ते अपॉईंटमेंट लेटर वगैरे! मग ओठ विचित्र वेडेवाकडे करत बेडकासारख्या आवाजात आणि हवेकडे बघत चमत्कारीक हासत म्हणाला...
"थँक्यू... थँक्यू ... अॅक्च्युअली.. थँक्यू फॉर द सपोर्ट"
मग कळले मुसलमान आहे. मग पाहिले तर अस्वच्छ राहायचा. मग किळसबिळस यायची. मग म्हणाला मी डॉट नेट घेतो. मग एक फॅकल्टी रजेवर गेली. मग चर्चा! मग आता तिचे काम कोण करणार? मग कळले की हा यडा बर्यापैकी अनुभवी आहे. मग विचारले 'आर यू कंफर्टेबल इन टीचिंग जावा अॅज वेल?". मग म्हणाला "अॅबसोल्यूटली, आय कॅन टेक कोअर जावा, अॅडव्हान्स जावा". मग दिली त्याला एक बॅच.
मग फीडबॅक घेतला. मग चिकण्याचुपड्या सेंट लावणार्या गर्भश्रीमंत पोरी नाक मुरडत म्हणाल्या 'सर प्लीज चेंज द फॅकल्टी'! मग त्याला फीडबॅक दिला. मग नीट यायला लागला. मग असा प्रॉब्लेम झाला की सत्य कळले. मग हे कळले की सहा वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता. मग वेडा झाला होता. मग सायकिअॅट्रिस्टची ट्रीटमेंट घेतली होती. मग तमिळनाडू सोडून हैदराबादला शिकवत राहिला होता. मग हाकलला गेला होता, मग दोन वर्षे घरी होता. मग आई वडिलांनी हाकलून दिले. मग मोठ्या भावाच्या मदतीवर राहिला. मग त्यानेही आधार काढून घेतला. मग मोठ्या बहिणीच्या आधारावर काही दिवस टिकला. मग तिलाही तिचा संसार होता. मग जगात बाहेर पडला. मग मिळेल ते काम करत करत पुण्यात आला. मग अचानक आमचा बोर्ड पाहून त्याला आठवले की आपण एकेकाळी आय टी ची फॅकल्टी होतो. मग आत घुसला.
मग जाणवले की स्वभावाने अत्यंत दिलखुलास आणि प्रामाणिक आहे. मग हेही कळले की त्याला सगळे हासतात हे त्याला कळूनही तो तिकडे दुर्लक्ष करतो.
मग आणखी बॅचेसचा फीडबॅक आला. मग कळले की कोणालाच तो आवडत नाही आहे. मग मात्र माझे आणि त्याचे जुळले.
मग कळले की अतिशय गरीब आहे आणि पैसेच नाही आहेत. मग आम्ही त्याला सांगितले की उद्यापासून आमच्या दुसर्या सेंटरवर जायला लाग, इथला फीडबॅक चांगला नाहीये. मग हवेत बघत विचित्र आवाजात आणि ओठ वेडेवाकडे करत प्रामाणिकपणे म्हणाला...
"ओक्के ओक्के.. नो... नो प्रॉब्लेम.. नो प्रॉब्लेम.. आय मस्ट इम्प्रूव्ह मायसेल्फ... थँक यू फॉर अ व्हेरी कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक भूषण... आय ... आय टेक इट पॉझिटिव्हली.. "
मग त्याला सगळेच हसायला लागले.. मग त्याला सगळे विद्यार्थी टाळायला लागले.. मग अनेकांच्या तक्रारी आल्या की हा फार हाय लेव्हलचे शिकवतो... मग कळले की विद्यार्थी बिगिनर्स होते... मग तोही म्हणाला की मी बेसिकली डॉट नेटचा माणूस आहे.. मग म्हणाला मला सगळेच क्लासेस जावाचे दिले गेलेत पण ते मी एन्जॉय करतोय... मग म्हणाला की तरीही मी काळजी घेईन..
मग त्याला त्याच्या घरमालकाने हाकलून दिले.. मग अर्ध्या दिवसात पुण्यातल्या भलत्याच भागात जागा मिळेल तेथे राहायला गेला.. मग वेळेवर आला जसा आधी यायचाच..
मग कळले की कधी एक पैसाही मागत नाही.. मग कळले की जेवायला रोज मधल्या सुट्टीत खूप भिकार ठिकाणी जातो... मग कळले की काही प्रॉब्लेम झाला की चेन्नईतील वडिलांना फोन करून सांगतो आणि ते म्हणतात की तुझे तू बघ....
मग दोन विद्यार्थ्यांच्या पालकांनी रिफंड मागीतला... मग द्यावा लागला.. मग त्याला खूप झापले... मग विचार झाला की त्याला काढलेले बरे...
मग त्या दिवसापासून मी त्याला माझ्यातले जेवण आणि फुकटचा एक कप चहा देणे बंद केले... मग जाणवले की व्यावसायिक या तत्वानुसार मी तसा संदेश त्याला देणे हे सध्याच्या जगात आवश्यक आहे... मग माझे डोळे, जे कश्यानेही कधीही कुठेही भरून येतात, ते हक्काच्या कारणाने भरले..
मग म्हणाला...
"ओक्के ओक्के भूषण.. आय थॉट यू कॉल्ड मी फॉर गोईंङ आऊट फॉर अ कप ऑफ टी... नो प्रॉब्लेम.. आय हॅव बॅचेस.. आय विल काँसंट्रेट ऑन दॅट भूषण"
मग मी एकट्यानेच चहा आणि त्यात सांडलेले अश्रू असे द्रव्य प्यायले... मग ते काही तितके बरे लागले नाही...
मग त्याला हासणे, त्याच्यावर टीका, त्याचे नकोसे होणे टीपेला पोचले... मग मॅनेजमेन्टने मला सांगितले की त्याला सांगा की त्याने जायला पाहिजे... मग नाही जमले मला ते! मग मॅनेजमेन्टला चूक कळली की हे काम आपण अतिशय चुकीच्या माणसाला करायला सांगितले...
मग एक दिवस तो म्हणाला उद्यापासून रमझान आहे पण वडील म्हणाले की तू दुसर्या शहरात आहेस त्यामुळे उपास करू नकोस कारण तुला प्रॉब्लेम होऊ शकतो.. मग विचारले की वडील बोलतात वाटते? मग हवेत बघत प्रामाणिकपणे पण यावेळी डोळ्यात पाणी घेऊन म्हणाला...
"ओह... आय अॅम.. आय अॅम सॉरी... धिस अॅक्च्युअली हॅपन्ड टू इयर्स बॅक भूषण... नॉट धिस टाईम.. सॉरी टू बॉदर यू"
मग एक दिवस म्हणाला की बहिण ईदला बहुतेक पाच हजार पाठवेल.. मग म्हणाला ते पैसे मिळाले तर खूप प्रॉब्लेम्स सुटतील.. मग मला समजले की पैश्याचे महत्व किती असू शकते....
मग एक दिवस माझ्यासमोरच मॅनेजमेन्टने त्याला सांगितले की १५ ऑगस्टपर्यंतच येथे राहा...
मग हवेत बघत.... हारवलेल्या नजरेने... ओठ पिळवटत... हात विचित्र प्रकारे हालवत... मान होकारार्थी डोलावत... म्हणाला..
"ओक्के ... ओक्के.. सो आय कॅन बी हिअर ओन्ली फॉर नेक्स्ट फ्यू डेज... ओक्के ओक्के.. नो.. नो प्रॉब्लेम.. अॅक्च्युअली... थँक यू फॉर यूअर सपोर्ट... फॉर लास्ट टू मंथ्स..."
मग मी दगडासारखा स्थिर होतो... या क्षणापर्यंत...
मग मला मगाशी दोन वर्किंग प्रोफेशनल्स असूनही आमचे विद्यार्थी असलेल्यांचे फोन आले..
मग ते म्हणाले की आज सर का आले नाहीत... मग मी सांगितले की ते आज का आले नाहीत माहीत नाही पण ते आता फार दिवस आमच्याबरोबर नसतील...
मग ते दोघे म्हणाले की मग रिफंड द्या कारण आम्हाला दुसरी फॅकल्टी नको आहे...
मग मी इथे आलो... मग तेच आपले नेहमीचे... मग ते अश्रू... मग ते हे सगळे तुम्हा मित्रांना सांगणे.. मग आणखी एक दिवस मागे टाकणे
मग????
-'बेफिकीर'!
सहीच. झिरो
सहीच.
झिरो नंबर..........
(झिरो हा आकडा अंकगणितात सर्वात मोठा आकडा मानतात.)
म्हणुन १०० नंबरच्या बदली हल्ली झिरो नंबर बोलायची सवय लागली आहे.
पु.ले.शु....
बेफिकीर. 'जाणतेपण ' हा आपला
बेफिकीर.
'जाणतेपण ' हा आपला वर किंवा शाप. ते जाणणे तुम्ही अशा लेखनातून वाढवता. शैलीवरचा प्रयोगही अपरिहार्यतेतून आलेला असतो. आभार.
मग ते दोघे म्हणाले की मग
मग ते दोघे म्हणाले की मग रिफंड द्या कारण आम्हाला दुसरी फॅकल्टी नको आहे...? >>> मग काय?? मग अश्रू पुसायचे, मग
मॅनेजमेन्टला पटवायचे आणि मग सरांना कामावर कायम करायचे..मग इकडे येऊन पुढचे अनुभव लिहायचे.. >>>>+१०००००००
मग??? ते अश्रु आनंद अश्रु आहेत हे सांगायचे!!
(No subject)
छान लिहलय.....
छान लिहलय.....
तो सुधारेल नक्कीच
तो सुधारेल नक्कीच सुधारेल
बेफीजी शक्य असल्यास ..तो १५ ऑगस्ट नंतरही संपर्कात राहिल्यास त्याला गझल शेरोशायरी बद्दल रुची वाटेल असे काही नेहमी सांगाल का / शिकवाल का ...त्याला जर ती जमली तर नक्कीच तो शेरांचा हात धरून यातून बाहेर पडेल शेर त्याला ह्या 'अवस्थेतून' बाहेर काढतील असा मला विश्वास वाटतो
मल तरी तो शायर बनण्यास सुयोग्य वाटतो तो हरवलेल्या स्वतःच्या शोधात आहे असे दिसते त्याला तो मिळायला हवा !!!!
मग-ए-दार सत्यकथा.
मग-ए-दार सत्यकथा.
.......
.......
वाचकांचा आभारी आहे.
वाचकांचा आभारी आहे.
लेखन आवडलं
लेखन आवडलं
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
कडक लिहीलयं !!
कडक लिहीलयं !!
मस्त!
मस्त!
आवडलं..
आवडलं..
तुम्हि कोन आहत नक्कि मनुसच ना
तुम्हि कोन आहत नक्कि मनुसच ना?
काय लिहिता ओ खुप भारि
Pages