तर आता एकेक स्थळाला सवडीने भेट देऊ या. स्विसला गेल्यावर आपले वास्तव्य जर झुरीक मधे असले तर
या सहलींना जाणे सोपे पडते. विमानतळावरुन रेल्वेने थेट झुरीक स्टेशनला जाता येते. ( विमानतळ म्हणजे फ्लुगाहफेन मग ओर्लिकॉन आणि मग झुरीक स्टेशन ) हॉटेल जर याच भागात असले तर उत्तम.
झुरीक स्टेशनसमोरचा एकच रस्ता दिवसभर गजबजलेला असतो. पण आजूबाजूचे भाग दिवसाही निवांत असतात.
आपल्याला या सहली भारतातूनही बूक करता येतात पण तिथे गेल्यावर सगळी माहितीपत्रके बघून सहली निवडल्याच चांगले. तसे स्विसमधे कुठल्याही भागात बसने / ट्रेनने जाणे अवघड नाही. पण जर सहलींने गेलो तर तिकिटासाठी धावपळ वाचतेच शिवाय तिथले उत्तम गाईडस आपल्याला सुंदर माहिती देत राहतात.
स्टेशनजवळच एका मोठ्या पटांगणातून या सहली निघतात. बेस्ट ऑफ स्वित्झर्लंड आणि ग्रे लाईन या दोन कंपन्या तिथून सहली काढतात. त्यांच्या वेळा काटेकोर पाळाव्या लागतात कारण ठरल्या मिनिटाला बस तिथून निघते.
तर आज आपण जाऊ, इन टू द आल्प्स या सहलीवर. या सहलीचा पहिला टप्पा म्हणजे आर गॉर्ज.
या जागेबद्दल फारशी माहिती नेटवरही नाही. पण या जागेचा एखादा फोटो तुम्हाला भारून टाकू शकतो.
आणि आता तिथे जाऊन आल्यावर मला आवर्जून सांगावेसे वाटते, कि फोटोतूनही त्या जागेची नीट्शी कल्पना
येत नाही.
आर हे एका नदीचे नाव. अनेक वर्षांपासून तिने एका डोंगराला भेदत एक अरुंद दरी निर्माण केलीय. एरवी अश्या
दरीत शिरणे धोकादायक असू शकते. पण स्विस तंत्रज्ञांनी गेल्या शतकापासूनच हि भक्कम पायवाट
तयार केली आहे. आजही तिची देखभाल त्याच तर्हेने करतात.
हि वाट अगदी सोपी आहे. साधारण ४० मिनिटात आपण ती पार करू शकतो. शेवटच्या टप्प्यात किंचीत चढ आहे. दोन्ही बाजूंना खायची प्यायची सोय आहे. दोन्ही बाजूंना ( जरा पायपीट करायची तयारी असेल तर )
रेल्वे स्टेशन्स आहेत. ( रेल्वे मात्र गॉर्ज मधून न जाता, स्वतंत्र बोगद्यातून जाते. )
स्विसमधे जायला जुलै / ऑगस्ट हे महीने सर्वात चांगले कारण हा त्यांचा उन्हाळा असतो आणि सगळीकडे मस्त वातावरण असते. फुले तर असंख्य असतात. मला या फुलांसाठी वेगळे बाफ काढावे लागतील पण
अगदी खास फुलांचे फोटो इथेच देतो.
तर चला...
झुरीक मधून बाहेर पडल्यावर अशी सुंदर निसर्गदृष्ये दिसू लागतात.
एका कड्यावर थांबल्यावर पायाशी दिसलेली हि फुले.
आल्प्सचे प्रथम दर्शन
हा फोटो खास लाजो साठी. या ठिकाणी MERINGUES चा शोध लागला, असे सांगितले.
आणि हा फोटो निंबुडासाठी. या जागेचा संदर्भ शेर्लॉक होम्सच्या कथेत आला आहे असे सांगितले. कोपर्यात त्याचा पुतळाही दिसतोय.
आणि हे एक खास फुल.
गॉर्जमधून बाहेर पडणारी हि आर नदी.
या बोगद्यातून आपण गॉर्जमधे शिरतो
इथून या पायवाटेला सुरवात होते.
या ठिकाणी हि गॉर्ज जेमतेम मीटरभर रुंद आहे.
मग हि वाट अदृष्य झाल्यासारखी वाटते.
मग वाट दिसूही लागते.
बाहेरचे आणि आतले तपमान यात फरक असल्याने, नदीवर धुकेही असते.
या वाटेची माहिती देणाला फलक.
या वाटेवर काही बोगदेही लागतात. अंधार पडल्यावर इथे खास प्रकाशयोजना असते.
बोगद्यातून दिसणारे धुके
धुक्याच्या सानिध्यात
या गॉर्जच्या भिंतीही चांगल्याच उंच आहेत. काही ठिकाणी त्या २०० मीटर्स उंच आहेत. डोक्यावर आकाशाचा अरुंद पट्टा दिसत राहतो.
मधेच ही गॉर्ज थोडी तिरकस आहे.
पाण्याचा प्रवाह खोल आहे. आणि त्याचा सदोदीत आवाज येत राहतो. ( पण अजिबात दुर्गंधी येत नाही )
हि पायवाट सोडून जायचे नाही अशा सुचना दिलेल्या असतात आणि ते पाळण्यातच आपले हित असते.
( सहल संयोजक, आपण गॉर्जमधे आपल्या जबाबदारीवर जातोय, असे लेखी निवेदन घेतात. )
वाटेत एक धबधबा दिसतो. त्याची माहीती.
आणि हा प्रत्यक्ष धबधबा.
त्या धबधब्यानंतर हि गॉर्ज थोडी रुंद होते.
खळखळ वाहणारे पाणी.
अत्यंत जबाबदारीने वावरणारे पर्यटक. कुठेही ढकला ढकली होत नाही.
मग आपल्याला शेवट दिसू लागतो, तरी तो तसा दूरच आहे.
मग आपण प्रवाहापासून थोडेसे वर चढत जातो.
ग्लेशियर मिल.. म्हणजे थोडक्यात मोठा रांजण खळगा.
~
ग्लेशियर मिलची माहिती
उंच कडे
मला आवडलेली एक फ्रेम.
शेवट आल्यावर आपल्याला थोडा चढाव लागतो.
तिथली पार्किंग लॉट. इथली जागा जरा कमी असल्याने, केवळ लहान गटांच्या सहलीच इथे आणल्या जातात.
तिथले एक झोकदार वळण
ती गॉर्ज सोडताना, मन उदास होते. मागे वळून पाहताना..
समोरून येणारी नदी आणि तिच्यावरचा पूल
पुढे रेल्वे ट्रॅक आणि स्टेशनचा परीसर दिसतोय.
तिथे रस्त्याच्या कडेला उगवलेली निळी फुले.
या ठिकाणाहून आपण बाहेर पडतो. या दरवाज्यातून बाहेर न पडता त्याच तिकिटात आपण परत जाऊ शकतो.
एकदा तरी भेट द्यावीच अशी हि जागा आहे. परत एकदा रेल्वेने तिथे जावेसे वाटतेय.
मला स्विसला भेट द्याचे आहे
मला स्विसला भेट द्याचे आहे next month मधे london मधुन ..नवरा आनि मि दोघेच भटकणार अहोत..तुमचे trip che itinerary details share केले तर धन्यवाद. Hotel ani places to visit ??
रायमा, संपर्कातून इमेल केलीय.
रायमा, संपर्कातून इमेल केलीय.
आप्रतिम दिनेश. आता तर
आप्रतिम दिनेश. आता तर स्वित्झर्लंड ला जाणारच!!
व्वा अ प्र ति म
व्वा अ प्र ति म
१० x १२ च्या एकट्या खोलीत दार
१० x १२ च्या एकट्या खोलीत दार बंद करून मी बसलो आहे आणि तुमचा हात पकडून मी स्वीस याच नजरेने पाहतो ही भावना जबरदस्त मोहक वाटली मला दिनेश. तुमचा कॅमेरा जितका बोलका तितकेच लेखणीनेही तेच तादात्म्य पकडल्याने मायबोलीच्या वाचकांना तुमच्या या खास धाग्याची सवय लागल्याचे स्पष्ट दिसत्येच.
१९६४ साली आलेल्या राजकपूर वैजयंतीमाला आणि राजेन्द्रकुमारच्या 'संगम' मध्ये या गॉर्जची दृष्ये पाहल्याचे आठवते [हेच असतील याची आता खात्री नाही, मात्र क्रेडिट टायटल्समध्ये स्वीसचा उल्लेख असल्याने त्या काळी राजकपूरने कथानकासाठी या गॉर्जचा जरूर वापर केला असणार].
नयनरम्य जग....!
वा, खूपच सुंदर माहिती आणि
वा, खूपच सुंदर माहिती आणि मस्त फोटो दिनेशदा अनेकानेक धन्स
निसर्गाच्या विविधतेसमोर नत
निसर्गाच्या विविधतेसमोर नत मस्तक व्हावे हेच खरे.
दिनेशदा, वर भाग १/१ असं का
दिनेशदा, वर भाग १/१ असं का लिहिलंय? म्हणजे समजा, एकूण ५ भाग लिहायचे मनात असेल, तर इथे भाग १/५ असे हवे होते ना? आणि मग पुढचा भाग २/५.. जरा गोंधळ होतोय ते भागाचे नाव पाहतांना..
सानी, पहिल्या भागाचे ३ भाग
सानी, पहिल्या भागाचे ३ भाग आहेत दोन झाले आता पुढचा १/३.. मग २/१, २/२ असे करत जाईन.
अच्छा! म्हणजे २/१, २/२ भाग
अच्छा! म्हणजे २/१, २/२ भाग हे स्विस सहलीची वेगळी डायमेन्शन दाखवणारे असणार का? उत्सुकता आहे.. धन्यवाद..
सगळेच फोटो भन्नाट. काही काही
सगळेच फोटो भन्नाट.
काही काही तर अ फ ला तु न!!!!
अप्रतिम निसर्गसौंदर्य. खरच
अप्रतिम निसर्गसौंदर्य. खरच
आर गॉर्ज बद्दल संगितल्यबद्द्ल
आर गॉर्ज बद्दल संगितल्यबद्द्ल धन्यवाद. मी फ्रेंडस बरोबर वीकएंडला तिकडे जाऊन आले. आम्ही एक दिवस तिकडे एका mountain वर फार्म हाउस rent केले होते. दुसर्या दिवशी एक sherloch होम्स chi जिथे शेवटची फाईट झाली तो hike पण केला. खूपच मस्त trip झाली . Thank you for the information.
वा अनघा. मला पण तिथे जास्त
वा अनघा. मला पण तिथे जास्त वेळ काढायचा होता. तुम्ही काढलेले फोटो पण अवश्य दाखवा.
जानलेवा.....
जानलेवा.....
Pages