शालेय अभ्यासोपयोगी साईटस, पुस्तकं

Submitted by मामी on 30 July, 2013 - 01:11

शालेय अभ्यासात उपयोगी पडणार्‍या बेवसाईटस आणि पुस्तकं यांची नोंद या धाग्यावर करावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.ixl.com/

ही एक माझ्या दोन्ही मुलांची आवडती वेबसाईट. प्रीके पासून ८ वी पर्यंतच्या विद्यार्थांसाठी उपयुक्त आहे.

ही आणखी एक.

http://www.brainpop.com/

paragon publishing ची गोल्ड स्टार बुक्स खूपच छान आहेत. क्यूट, रंगिबेरंगी चित्रं आणि मोठ्या फाँटमधली अक्षरं, अंक.

http://www.parragonpublishing.in/index.php/category/early-learners-workb...

हे पुस्तक तर फारच उपयोगी पडतं : http://www.parragonpublishing.in/index.php/details/my-big-book-of-math-a...

क्रॉसवर्डमध्येही उपलब्ध असतं. मी दादरच्या रानडे रोडवरच्या पणशीकरच्या लाईनीत ती दोन खेळाची दुकानं आहेत ना? त्यापैकी एका दुकानातून घेतलं होतं. (आत्ता त्या दुकानांची नावं आठवत नाहीयेत.)

खान अकॅडेमी म्हणून युट्युब वर एक चॅनल आहे. त्यावर बरेच चांगले व्हिडिओ आहेत विज्ञान आणि गणित विषयांवर. लिंक: http://www.youtube.com/user/khanacademy

परवा कुणी तरी लहान मुलांसाठी कार्यक्रम असा धागा काढला होता तो सापडेना म्हणून इथेच लिंक देते आहे- http://www.thehindu.com/news/cities/Hyderabad/jurassic-park-to-come-up-i...

http://www.mathfactcafe.com/home/
इथे मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशीट्स बनवून छापू शकता. मला यांचे कस्टमायझेशन आवडते.

खान अकॅडमी खूपच उपयुक्त आहे.
माझ्या विद्यार्थ्यांना ट्रिग्नॉमेट्रीचे बेसिक रेश्योज समजावयला, घोटून घ्यायला वापरले. त्यांच्यासाठी नेटवरचे लेसन्स, शिक्षकांचा वेगळा एक्सेंट ही नॉव्हेल्टी असल्याने अगदी पूर्ण लक्ष देऊन शिकली मुलं.
लेसनवरची ऑनलाइन प्रश्नोत्तरे, बरोबर उत्तराचा स्मायली,पाच सलग बरोबर उत्तरे दिल्याशिवा सुटका नाही इ. भारी.
एवढे विविध प्रश्न, रँडम ऑर्डरने छापील स्वरूपात मिळणे कठीण. स्वतः फळ्यावर आकृत्या काढून विचारायचे तर त्यात अख्खा दिवस गेला असता. त्यामुळे ते फारच उपयोगी ठरले.

आजच लोकसत्तात पाहीले.

http://mocomi.com/

kids.nationalgeographic.com/kids

www.ipl.org

तसेच खालील साईट्स पण बघण्यात हरकत नसावी.

http://explore. glacierworks.org /en/

,http:// www.funbrain.com/

,http:// amazing-space.stsci.edu/,

http://earthquake. usgs.gov/learn/kids/,

http://kids.discovery.com/

ही शिक्षकांना/ पालकांना आणि स्वत:हुन आभ्यास करणार्यांना जास्त उपयोगी आहे.
आम्ही लवकरच भारतीय स्टँड्र्ड्स पण मॅप करणार आहोत.
http://www.goorulearning.org/

http://about.goorulearning.org

हा धागा वर काढतोय.
मला एसेसी बोर्डाच्या नववी-दहावी विज्ञान विषयासाठी उपयुक्त अशा सॉफ्टवेअर्सची माहिती हवी आहे. इंटरनेट नव्हे, तर इंटरनेट शिवाय वापरता येतील अशा सीडीज, पेन ड्राइव्ह. इत्यादी. तसंच एका वेळी एका विद्यार्थ्याला वापरता येतील अशी नव्हे तर दहा-बारा मुलांना पाहून समजून घेता येतील अशी साधने हवीत. अ‍ॅनिमेशनचा वापर जितका जास्त तितकं छान (असं मला वाटतंय, चूक असेल तर सांगा)

शोधाशोध केल्यावर आढळलेली साधने
१) http://www.e-class.in/eclass-products/
यांचे एकेका यत्तेसाठीचे पेन ड्राइव्हज आहेत. पण ते सगळ्या विषयांसाठी एकत्र आहेत आणि एकच वर्ष चालणार आहेत. डेमो छान वाटलेय.
२) http://www.a2e.co.in/
व्व्हरेज टु एक्सलंट : याचे नेटवरचे रिव्ह्यु सीडी आनि कन्टेन्ट दोन्हीच्या बाबत चांगले नाहीत. पण एका किंवा दोन विषयांची एक सीडी हे बरे आहे.
३) http://www.tataclassedge.com/
हे भारी आहे. पण बजेटच्या बाहेर आहे.

कोणी स्वतः वापरून पाहिलेली प्रॉडक्ट्स असतील तर त्याबद्दल लिहा.
-------
हा धागा 'मुलांचे संगोपन' या ग्रुपमध्ये आहे. शिक्षणासाठी वेगळा ग्रुप नाही का?

इंग्रजी वाचन, शब्दसंपदा, समज, आकलन वाढवण्यासाठी ही वेबसाईट उत्कृष्ट आहे. graded levels असतात, आणि सर्व प्रकारची शब्दसंपदा कव्हर केली जाते. मजकुरावर विचारले जाणारे प्रश्न सुद्धा level नुसार हळूहळू कठिण होत जातात.
एक पुस्तक एकदा ऐकायचे, एकदा वाचून रेकॉर्ड करायचे मुलाने आणि मग त्यावरील प्रश्न सोडवायचे.

https://www.raz-kids.com/

बिल्वा ने लिहीलेली ixl मलाही आवडते. गणित सरावासाठी आम्ही नेहमी वापरतो. आणि ब्रेनपॉप पण मस्त आहे.