सर्व मायबोलीकरांस नमस्कार,
यत: प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् |
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धीं विंदति मानवा: ||
ज्याच्यापासुन सर्व भूतांची प्रवृत्ति झाली, व ज्याने हे चराचर विस्तारिले आणी व्यापिलेही आहे, त्याची पूजा आपल्याला प्राप्त झालेल्या कर्मांनी केली, म्हणजे त्यानेच मनुष्याला सिद्धी प्राप्त होते.
-----
मी भगवंताची तीव्र भक्ति म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म सर्वव्यापी आहे म्हणुनच माझ्यासमोर, माझ्या अंतरंगांत आणी मला अगम्य अश्या विश्वातही आहे ह्याच विश्वासाने, सर्व कर्मे करतो.
तोच सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे ह्याच जाणीवेने वागतो. ( भावनांवर संयम राखण्याचा अटोकाट प्रयत्न करतो, पण कधी-कधी संयम तुटतो तो त्याची अवहेलना झाली तर ).
त्याच्याशीच मनोमन संवाद करतो, आणी त्यात प्रेरणा आणी मार्गदर्शन घेतो.
त्यालाच सर्व कर्मे अर्पण करुन मनोमन अलिप्त राहातो.
प्रत्यक्ष त्यालाच भजतो.
जे काही भक्षण करण्यास मिळते ते सर्व काही त्यालाच सर्वप्रथम अर्पण करतो ( आता ही संवय झाली आहे, काहीही असेल ते मनोमन आपोआपच त्यालाच अर्पण होते, मगच मुखात जाते ).
वरील प्रमाणे आचरण करतांना काहीही कठीण वाटत नाही.
वरील प्रमाणे कर्म करतांना धर्म, वेद, उपनिषदे, पुराण, शास्त्रे, गुरु - शिष्य, भौतिक, आधिभौतिक आणी अध्यात्मही मध्ये कुठेच येत नाही . . . . ते सर्व मला कर्म कांडच वाटतात. ( ह्याचा अर्थ असा नाही कि अध्यात्म, वेद, शास्त्रे, गुरु, पुराणे आदी नगण्य झाले ! नाही ).
मला फक्त एकच गोष्ट अनुभवते, वरील प्रमाणे तीव्र आणी सरळ भक्ति, मग बाकी सर्व कुठे आले ह्यामध्ये !
राहाता राहिली एकच गोष्ट, मी आणी तो अशी प्रत्यक्ष द्वैत भावना, ही जेव्हा अद्वैतात परीवर्तित होईल ( जाणीव आहे लवकरच होणार ), म्हणजेच माझ्यातला तो आणी शरीराबाहेरील परब्रह्म एकच ही जाणीव, हा प्रत्यक्ष अनुभव ( काही वेळेस अवश्य अनुभवले आहे हे अगदी काही क्षणांसाठी ), नीत्य काळासाठी येणे.
सर्व कर्मे भगवंतालाच अर्पण करीत वाटचाल करतो आहे, काही कमि-जास्त माझ्याकडुन बोलले गेले असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करावी आपण सर्वांनी.
सर्व जण चांगले आहात, सुशि़क्षित आहात, धार्मिक आहात ( काहीजण नास्तिक असलात तरीही ),
जाणकार आणी अनुभवी आहात. . . . तिरस्कार सोडुन एकमेकांच्या विचारांची देवाण - घेवाण करीत चलावे, ज्ञान वर्धनच होईल.
आपल्या "अक्षर", अवस्थेत तो सर्वव्यापी परमेश्वर आपल्याच मायेने निर्मिलेल्या ह्या चराचरात आपल्या शक्तिने लवलवत आपल्या शरीरात आणी शरीराबाहेर प्रत्यक्ष अस्तित्वात आहे, त्याला ओळखा, ओळखण्याचा प्रयत्न करा . . . . हा निर्गुण असतो म्हणुनच आपल्यालाच चार पाऊले पुढे जावे लागेल, आणी तसे केल्यास हा परमपिता परमेश्वर, सर्वशक्तिमान भगवान प्राप्त होईलच.
ईथे सर्व जाणकार, पंडित, धार्मिक लोकं हे त्याचेच अवतार सर्वांचे उद्धार करण्यास आणी ज्यांना तर्क-कुतर्क करुन हेटाळणी करण्यात आनंद ( काही जणांच्या भाषेत " मजा " ), मिळतो वा समाधान होते ते सर्व ही त्याचेच अवतार, उद्धाराचीच वाट पाहाणारे अश्याच भावनेने ह्या मायबोलीच्या जगात वावरलो, म्हणजेच हा एक भगवंताने प्रेरणा देऊन निर्मिलेला मंच अशी भावना होती.
कुणाची ही अवहेलना करण्याचा हेतु कधीच नव्हता आणी नाही आहे. सर्वांस समान सन्मान देण्याचाच प्रयत्न केला.
मायबोली ह्या सर्वांच्या उपस्थितीने सजली आहे, हा मंच कृपया सर्वांनी मिळुन अत्यंत यशस्वी करावा ही विनंती.
आपणा सर्वांचे कल्याण असो, ही भगवंताच्या चरणी मनापासुन प्रार्थना.
खर्या अर्थाने हे लिखाण धार्मिक नाही कारण ह्यात धार्मिक असे काहिच नाही. ह्यात माझा देव आणी मी आहे,
आशा आहे, अजुन ही मी काय म्हणतो ते कळाले आसेल !
परब्रम्ह . . . . आलो स्वेच्छेने आणी प्रस्थानही स्वेच्छेनेच करीत आहे, सादर प्रणाम आपणा सर्वांस. . . .
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||
वा !!!! छान !!! पुढील
वा !!!!
छान !!!
पुढील प्रवासासाठी शुभेच्छा
पण मी काय म्हणतो परब्रम्हजी एकदा परमतत्त्वाचे पूर्ण ज्ञान झाले तर ते ज्ञान अखिल मानवजातीस कसे मिळेल ह्याबद्दल काही करणार आहात का त्या अवस्थेत गेल्यावर ? तसे काही आध्ही ठरवता येते का ? तसे शक्य असल्यास अवश्य करावेत
तुम्हाला प्रत्यक्ष भेटता आले असते तर "मजा" आली असती असे वाटत आहे आता असो...
धन्यवाद आजवर तुम्ही आमच्याशी सर्वांशी संवाद साधलात त्याबद्दल
असो.....
बाय !!!
आजवर मायाकडून झालेल्या चुकांबद्दल अजून तरी माफी वगैरे मागावी वाटत नाही आहे पुढे तसे वाटेल असे नक्की सांगता येत नाही पण वाटले तर मनातल्या मनात मानू०न बघीन
भेटूच !!!!
परब्रम्ह , आपल्या लिखाणातून
परब्रम्ह ,
आपल्या लिखाणातून आपण येथून निघून जात आहात असे वाटले.
मायबोली सोडून जाण्याचा निर्णय हा आपली वैयक्तीक निर्णय असल्याने त्याबद्दल काही बोलत नाही.पण आपले लिखाण चांगले आहे. त्यातून आपले धार्मिक ज्ञानही दिसून येत असते.
आपण परत एकदा विचार करावा ही विनंती.
इथे काही आयडी ना दुसर्यांच्या टवाळक्या / कुचाळक्या करण्यात काय आनंद मिळतो ते त्यांनाच माहित.
कुठलाही विषय असो, आपण सहमत असू वा नसू , पण दुसरा काय म्हणतो आहे ते ऐकून घेण्याचीही प्रवृत्ती काही जणांच्या कडे नसते असे लक्षात आले आहे. कदाचित आपल्याला समोरच्याची मते मान्यही नसतील , पण विरोध करण्याची / प्रतिवादाचीही एक डिसेंट लेवल असते. याचीही जाण दुर्दैवाने काही जणांच्या कडे नसते .
वादे वादे जायते तत्वबोधः हे तर बाजूलाच राहते .
ज्याप्रकारे वरील प्रतिसाद लिहिला आहे ते बघून मन उद्विग्न्न झाले.
नुसतेच दुसयावर वार करून मजा मिळवू पाहणा-यांची फक्त दया आणि कीव येते . त्यांच्या 'मजे'च्या कल्पना ही वेगळ्या दिसतात. पंढरीचा विठ्ठल बघतो आहे सारे एवढेच आपण म्हणू शकू.
असो.
आपल्याला शुभेच्छा.
नमस्ते उर्मीजी अहो आपण नीट
नमस्ते उर्मीजी
अहो आपण नीट वाचले नसावे .........
ते मायबोली सोडून जात आहेत असा अर्थ काढता यावा म्हणून ते लिहित नाही आहेत इथे ते
ते मुद्दा सांगताय्त की आता ते एक वेगळी अवस्था प्राप्त करणार आहेत त्या दिशेने वाटचाल करणार आहेत असे सांगायला ते आले आहेत आज त्याना मी शुभेच्छा देत आहे
मजा हा शब्द मी त्यांच्या मूळ लेखनातला घेतला आहे व त्याला दुहेरी अवतरण या साठी की त्यानी तो जरासा विरोधाचा सूर माझ्यासारखी प्रतिमा बनलेल्या प्रतिसादकाना (पूर्वेतिहास पाहून) त्यांच्या प्रतिमा पाहून त्यानी लेखात आळविला आहे ...हे मी ताडले आहे असे जाणवून द्यायला म्हणून!
मी माफी मागण्याबद्दल (एक तर ही मी व परब्रम्ह यांच्यातील खाजगी बाब..ते मला माफी मागा असे म्हनालेच नाहीत कधी ..) मनात जसे आले तसे बोललो मी व माझा आजवरचा परब्रम्ह यांच्याशी बोलण्याचा जसा 'अंदाज' राहिला आहे तसेच मनमोकळेपणाने बोललो इतकेच...त्यावर वाईट वाटून ते घेणार नाहीत हे माहीत आहे कारण आता अश्या बाबीवर वेळ घालवत बसणे त्यांच्याकरिता व्यर्थ असणार हे त्यानाही माहीत आहेच
भेटूच असे म्हणालो कारण ....ते जिथे जात आहेत तिथे मीही कधीतरी पोचेन अशी माझी श्रद्धा आहे म्हणून....
उगाच जाता जाता "नास्तिक" असे लेबल माझ्यावर डकवू नये .. ही विनंती ........(परब्रम्हना देखील तसे वाटत असेल तर त्यानाही हीच विनंती )
_____________________________________
मला एक वेडा शहाण्या म्हणाला
कुणीही फसावे असा वागतो मी
मला वाटते ते तुला वाटते का
मला विठ्ठला रे तुझा वाटतो मी
नका रे मला त्या अनंतात शोधू
जिथे शेर होतो तिथे संपतो "मी"
गैर् समज नसावेत
_________________________________________
कुणालाही कधी माझ्या शुभेच्छा देत नाही मी
इरादा विठ्ठलाचा काय तो मी काय सांगावा
असा एक माझा शेर असूनही मी आज परब्रम्हना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत ह्या विठ्ठलाकडूनच आल्यात अशी माझी भावना आहे
परब्रम्ह, तुम्ही मायबोलीवरुन
परब्रम्ह,
तुम्ही मायबोलीवरुन निघताय हे वाचून आनंद वाटला. कारण तुम्ही तुमच्यात परत मग्न होणार म्हणून. काही झालं तरी मायबोली ही तुमच्यासाठी एक उपाधी आहे. कालांतराने तिचा त्याग होणार यात संदेह नाही.
फक्त एक गोष्ट सुचवू इच्छितो. जेव्हाकेव्हा तुम्ही तुमची अनुभूती उघडपणे मांडाल, तेव्हातेव्हा आगोदर तुमच्या गुरूंची अनुमती घेत जा. प्रत्यक्ष माउलींनीही त्यांच्या गुरूंच्या म्हणजे निवृत्तीनाथांच्या आज्ञेनेच ज्ञानेश्वरी रचली होती.
पुढील प्रवासास शुभेच्छा!
आ.न.,
-गा.पै.
गामा नेहमीच बरोबर बोलतात
गामा नेहमीच बरोबर बोलतात
thats not good . pls call me
thats not good . pls call me at once, hon. parabrahma ji.
त्यालाच सर्व कर्मे अर्पण करुन
त्यालाच सर्व कर्मे अर्पण करुन मनोमन अलिप्त राहातो.
अहो भल्या भल्यांनाही जे जमले नाही ते तुम्हाला जमते आहे...
मला फक्त एकच गोष्ट अनुभवते, वरील प्रमाणे तीव्र आणी सरळ भक्ति,
फार भाग्यवान आहात! या पदाला पोहोचला आहात. निश्चितच पूर्वजन्मीचे साधना व कार्य आहे.
वर गामाजींनी योग्य ते विचार मांडले आहेतच.
(तरीही मला वाटते की हे बहुदा आपल्याला आलेल्या गुरू आज्ञेनेच घडत असावे...)
आपल्या काही विचारांचा सहवास येथे लाभला हे आमचे भाग्य.
साधनेचा दिवा असाच जळत राहू दे, हीच त्याच्या चरणी प्रार्थना आणि आपल्याला वंदन!
आपला
खुदा हाफीज
खुदा हाफीज
गामाजींना अनुमोदन.
गामाजींना अनुमोदन.
परब्रम्ह, आपणास प्रणाम, आणि
परब्रम्ह,
आपणास प्रणाम, आणि काही अपराध घडला असल्यास क्षमस्व.
"पुनरागमनाय च ..." अशी इच्छा करतो.
जो जे वांच्छील तो ते लाहो
जो जे वांच्छील तो ते लाहो प्राणीजात !