Submitted by श्रद्धादिनेश on 6 August, 2013 - 08:50
ह्या वर्षी लेकीच्या वाढदिवसाला प्रयोग म्हणून फॉंडंट (Fondent) वापरून केक सजवण्याचा प्रयत्न केला.
अनुभव नसल्याने बरीच मेहनत लागली हाताळायला. पावसमुळे सारखं पाणी सुटत होतं. पण वेगवेगळे आकार बनवायला एकदम मस्त...त्यात मजा आली. हे प्रकरण दिसतं मस्तं...पण खायला खुपच गोड. आपल्याला एवढ्या प्रमाणात साखर खायची सवय नसल्यामुळे असेल. मुलांनी आवडीने खाल्ला पण.
फॉंडंट रेडी आणले होते. रंग घरीच बनवले. फॉंडंट फार स्मुथ करायला जमलं नाही. सारखं चिकट होत होतं. करायला छान वाटलं पण मोठा केक करायला घेतल्यामुळे जर त्रास झाला. पुढचा प्रयोग छोट्या प्रमाणात करुन बघणार आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे फॉडंट काय असतं?
हे फॉडंट काय असतं?
मस्तच दिसतोय पण तुम्ही
मस्तच दिसतोय
पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे खायला फ्रेश क्रीमचेच छान लागतात. हे फार गोड होतात.
रिया, हे बघ. आयसिंगचा प्रकार आहे.
हे फॉडंट काय असतं? >
हे फॉडंट काय असतं? > +१
दिसतेय छान कलरफूल!
थॅन्क्स अगो! त्यामधे वेगवेगळे
थॅन्क्स अगो!
त्यामधे वेगवेगळे रंग टाकले आहेत का मग?
रियाने fondantबद्दल विचारले
रियाने fondantबद्दल विचारले म्हणून बरे झाले, मलापण माहिती नव्हते. माहिती मिळाली. रिया आणि अगो दोघींना धन्यवाद.
मस्त कलरफूल झालाय केक श्रद्धा.
धन्स अगो! हे मस्तय आणि
धन्स अगो!
)
हे मस्तय आणि बर्यापैकी सोप्प पण वाटतय
अगदी संपुर्ण केक नाही पण असले छोटे छोटे कपकेक्स बनवून चॉकलेट ऐवजी द्यायला छान वाटेल
पुण्यात कुठे मिळेल हे फॉडंट? काय म्हणुन मागायचं? फॉडंट म्हणूनच का? (त्यांना माहीत असतं का काय आहे ते?
शाब्बास$$$ गेल्यावेळि तुझी
शाब्बास$$$
गेल्यावेळि तुझी बाहुली पाहुन मी पण नादी लागलेय क्रीम केकच्या.. आता वरचेवर केले जातात.
आता हे सांग : fondant कुठे मिळाले. साधारण किती लागले ( केक किती किलोचा होता ) ?
श्रद्धादिनेश, थोडे डिटेलमधे
श्रद्धादिनेश, थोडे डिटेलमधे लिहा ना
छान दिसतोय केक फाँडंट
छान दिसतोय केक
फाँडंट जेव्हढे लागेल तेव्हढेच एका वेळेस बाहेर काढायचे. उरलेले प्लॅस्टिक रॅप मधे गुंडाळून ठेवायचे. लाटताना आयसिंग शुगरवर लाटायचे. फाँडंट कलर करताना शक्यतो पावडर कलर वापरायचे.
सुंदर, कलरफुल
सुंदर, कलरफुल केक!
डावीकडल्या, वरच्या कोपर्यात काय आहे? बोंडं? भजी? मस्तं दिस्ताहेत.
श्रद्धादिनेश, मस्तच केलंय
श्रद्धादिनेश, मस्तच केलंय आयसिंग! ultimate cake off आणि fabulous cakes (TLC चॅनल) चे episodes बघ. टिव्हीवर तर अधून मधून दाखवतातच पण युट्युबवरही आहेत.
@ मृ ....... डावीकडल्या, वरच्या कोपर्यात काय आहे? बोंडं? भजी? मस्तं दिस्ताहेत.
>>> यांच्या समोर हिर्याच्या चुर्यात घोळवलेले सोन्याचे घोस अमृतात घालून दिले ना, तरी यांना भजीच दिसणार!
मस्त झाला आहे. तुमचे कौतूक.
मस्त झाला आहे. तुमचे कौतूक.
घ्या आणि आम्ही आज रेडिमेड बुक्क करून आणि होम डिलेवरी मागवली. मेहनत म्हणून करायला नको.
छान दिसतोय केक. लेकीला हॅपी
छान दिसतोय केक. लेकीला हॅपी बर्थडे!!
मृ

मलाही भजीच दिसली आधी
सुंदर, कलरफुल केक!>>++११
सुंदर, कलरफुल केक!>>++११
छान
छान
सुंदर दिसतेय.
सुंदर दिसतेय.
पुण्यात कुठे मिळेल? आणि काय
पुण्यात कुठे मिळेल? आणि काय मागायचे?
अरे वा सुंदर , गुगलून बघितल
अरे वा सुंदर , गुगलून बघितल तर अनेक आयडीयाज/शेप मिळतील तुम्हाला
पण हा केक बरा लागतो कां ? लेकीच्या बडे साठी अणायचा विचार चालू आहे
मस्त दिस्तोय केक. >> यांच्या
मस्त दिस्तोय केक.

>> यांच्या समोर हिर्याच्या चुर्यात घोळवलेले सोन्याचे घोस अमृतात घालून दिले ना, तरी यांना भजीच दिसणार!
काय भाषेवर पकड आहे हो तुमची मामी.
पण तुमची डिश भूक लागल्यावर काय उपयोगाची? तेंव्हा भजीच दिसणार.
कसला मस्त केक आहे
कसला मस्त केक आहे
धन्यवाद मित्र-मैत्रिणींनो!
धन्यवाद मित्र-मैत्रिणींनो! सगळ्यांचे खुप आभार!!!
फाँडंट पिठीसाखर, ग्लुकोज, ग्लिसरीन ई. च्या मिश्रणाने बनवली जाते. आपल्या ईथे फाँडंट किंवा शुगर पेस्ट म्हणून मिळते. १ किलोच्या पॅक मधे १ ते दिड किलोचा केक कवर होऊ शकतो. ते आपण किती पातळ लाटतो त्यावर अवलंबून आहे. १ डबा ४५०/- रु ला मिळाला मला. रंग मी जेल फुड कलर वापरले.
लाजो ताईंनी म्हटल्या प्रमाणे लाटताना आयसिंग शुगरवर लाटायचे. प्रकरण एकूण खर्चिक वाटलं मला. हौस म्हणून केलं खरं
मी दोन डबे आणले होते, त्यातलं अर्ध बाकी आहे अजुन. केक एकुण ३+ किलोचा झाला होता. आमचाच अती उत्साह. छोटे केक अर्थातच करायला जास्त सोपे. आणि अर्थात प्रॉपर शिकलेल्यांना अजुन सोप्पं. ह्याचं अॅडव्हांटेज एकच महत्वाचं म्हणजे क्रिएटिव्हिटी ला योग्य तो आकार देता येतो. खुप काही करता येतं.
मामी, यु-ट्यूब आणि हे सगळे टिव्ही शोज बघुनच जरा किडा आला होता हे करायचा. यु-ट्यूब वर व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल.
केदार, हे फक्त कवर असतं. आत आपल्या आवडीचं फ्लेवर. मागच्याच आठवडयात मॉंजिनीज चा फाँडंट केक खाण्याचा योग आला. चवीत तरी सेमच. पिठीसाखर घट्ट स्वरुपात आपण कितपत खाऊ शकतो ह्यावरून अंदाज लावा. माझ्या अनुभवाप्रमाणे आपण थोडसं खाऊ शकतो आणि नंतर ते बाजूला काढून खाऊ लागतो. मी ऑफिसमधे छॉटे पिस करुन आणले होते ते फारच आवडीने खाल्ले गेले.
>>हिर्याच्या चुर्यात घोळवलेले सोन्याचे घोस >> जबरदस्त एक्दम
मृण्मयी ते पोटॅटो पॉप्स खुप आवडीने खाल्ले सगळ्यांनी. रेसिपी टाकेन फुरसतमधे.
हे पोटॅटो पॉप्स फारच तोंपासु
हे पोटॅटो पॉप्स फारच तोंपासु प्रकरण वाटतंय. प्लीज लवकर लिहा त्याची रेसिपी. रेसिपीखाली डकवायला फोटो तर तयारच आहे
अतिशय सुंदर.
अतिशय सुंदर.
मागच्याच आठवडयात मॉंजिनीज चा
मागच्याच आठवडयात मॉंजिनीज चा फाँडंट केक खाण्याचा योग आला. >>>> बरोबर आमच्या इकडे मी पाहील्यांदाच बघितला आणि लेक हट्ट करतेय बड्डे साठी असाच केक हवा म्हणून
पिठीसाखर घट्ट स्वरुपात आपण कितपत खाऊ शकतो ह्यावरून अंदाज लावा. >>>> मग फ्रेश क्रीमचाच केक बेस्ट
छाने पॉप्स रेस्पी येऊ द्या.
छाने
पॉप्स रेस्पी येऊ द्या. टेम्प्टींग दिसत आहेत तेही!
वाह् मस्तच केक... लेकीला वादि
वाह् मस्तच केक... लेकीला वादि च्या शुभेच्छा
खूपच मेहनतीचं काम दिस्तंय हे..
काही पर्टीक्युलर ब्रँड नेम आहे का fondant चं?
मामे हिर्याच्या चुर्यात घोळवलेले तुझे कमेंट्स ना...