तर आता एकेक स्थळाला सवडीने भेट देऊ या. स्विसला गेल्यावर आपले वास्तव्य जर झुरीक मधे असले तर
या सहलींना जाणे सोपे पडते. विमानतळावरुन रेल्वेने थेट झुरीक स्टेशनला जाता येते. ( विमानतळ म्हणजे फ्लुगाहफेन मग ओर्लिकॉन आणि मग झुरीक स्टेशन ) हॉटेल जर याच भागात असले तर उत्तम.
झुरीक स्टेशनसमोरचा एकच रस्ता दिवसभर गजबजलेला असतो. पण आजूबाजूचे भाग दिवसाही निवांत असतात.
आपल्याला या सहली भारतातूनही बूक करता येतात पण तिथे गेल्यावर सगळी माहितीपत्रके बघून सहली निवडल्याच चांगले. तसे स्विसमधे कुठल्याही भागात बसने / ट्रेनने जाणे अवघड नाही. पण जर सहलींने गेलो तर तिकिटासाठी धावपळ वाचतेच शिवाय तिथले उत्तम गाईडस आपल्याला सुंदर माहिती देत राहतात.
स्टेशनजवळच एका मोठ्या पटांगणातून या सहली निघतात. बेस्ट ऑफ स्वित्झर्लंड आणि ग्रे लाईन या दोन कंपन्या तिथून सहली काढतात. त्यांच्या वेळा काटेकोर पाळाव्या लागतात कारण ठरल्या मिनिटाला बस तिथून निघते.
तर आज आपण जाऊ, इन टू द आल्प्स या सहलीवर. या सहलीचा पहिला टप्पा म्हणजे आर गॉर्ज.
या जागेबद्दल फारशी माहिती नेटवरही नाही. पण या जागेचा एखादा फोटो तुम्हाला भारून टाकू शकतो.
आणि आता तिथे जाऊन आल्यावर मला आवर्जून सांगावेसे वाटते, कि फोटोतूनही त्या जागेची नीट्शी कल्पना
येत नाही.
आर हे एका नदीचे नाव. अनेक वर्षांपासून तिने एका डोंगराला भेदत एक अरुंद दरी निर्माण केलीय. एरवी अश्या
दरीत शिरणे धोकादायक असू शकते. पण स्विस तंत्रज्ञांनी गेल्या शतकापासूनच हि भक्कम पायवाट
तयार केली आहे. आजही तिची देखभाल त्याच तर्हेने करतात.
हि वाट अगदी सोपी आहे. साधारण ४० मिनिटात आपण ती पार करू शकतो. शेवटच्या टप्प्यात किंचीत चढ आहे. दोन्ही बाजूंना खायची प्यायची सोय आहे. दोन्ही बाजूंना ( जरा पायपीट करायची तयारी असेल तर )
रेल्वे स्टेशन्स आहेत. ( रेल्वे मात्र गॉर्ज मधून न जाता, स्वतंत्र बोगद्यातून जाते. )
स्विसमधे जायला जुलै / ऑगस्ट हे महीने सर्वात चांगले कारण हा त्यांचा उन्हाळा असतो आणि सगळीकडे मस्त वातावरण असते. फुले तर असंख्य असतात. मला या फुलांसाठी वेगळे बाफ काढावे लागतील पण
अगदी खास फुलांचे फोटो इथेच देतो.
तर चला...
झुरीक मधून बाहेर पडल्यावर अशी सुंदर निसर्गदृष्ये दिसू लागतात.
एका कड्यावर थांबल्यावर पायाशी दिसलेली हि फुले.
आल्प्सचे प्रथम दर्शन
हा फोटो खास लाजो साठी. या ठिकाणी MERINGUES चा शोध लागला, असे सांगितले.
आणि हा फोटो निंबुडासाठी. या जागेचा संदर्भ शेर्लॉक होम्सच्या कथेत आला आहे असे सांगितले. कोपर्यात त्याचा पुतळाही दिसतोय.
आणि हे एक खास फुल.
गॉर्जमधून बाहेर पडणारी हि आर नदी.
या बोगद्यातून आपण गॉर्जमधे शिरतो
इथून या पायवाटेला सुरवात होते.
या ठिकाणी हि गॉर्ज जेमतेम मीटरभर रुंद आहे.
मग हि वाट अदृष्य झाल्यासारखी वाटते.
मग वाट दिसूही लागते.
बाहेरचे आणि आतले तपमान यात फरक असल्याने, नदीवर धुकेही असते.
या वाटेची माहिती देणाला फलक.
या वाटेवर काही बोगदेही लागतात. अंधार पडल्यावर इथे खास प्रकाशयोजना असते.
बोगद्यातून दिसणारे धुके
धुक्याच्या सानिध्यात
या गॉर्जच्या भिंतीही चांगल्याच उंच आहेत. काही ठिकाणी त्या २०० मीटर्स उंच आहेत. डोक्यावर आकाशाचा अरुंद पट्टा दिसत राहतो.
मधेच ही गॉर्ज थोडी तिरकस आहे.
पाण्याचा प्रवाह खोल आहे. आणि त्याचा सदोदीत आवाज येत राहतो. ( पण अजिबात दुर्गंधी येत नाही )
हि पायवाट सोडून जायचे नाही अशा सुचना दिलेल्या असतात आणि ते पाळण्यातच आपले हित असते.
( सहल संयोजक, आपण गॉर्जमधे आपल्या जबाबदारीवर जातोय, असे लेखी निवेदन घेतात. )
वाटेत एक धबधबा दिसतो. त्याची माहीती.
आणि हा प्रत्यक्ष धबधबा.
त्या धबधब्यानंतर हि गॉर्ज थोडी रुंद होते.
खळखळ वाहणारे पाणी.
अत्यंत जबाबदारीने वावरणारे पर्यटक. कुठेही ढकला ढकली होत नाही.
मग आपल्याला शेवट दिसू लागतो, तरी तो तसा दूरच आहे.
मग आपण प्रवाहापासून थोडेसे वर चढत जातो.
ग्लेशियर मिल.. म्हणजे थोडक्यात मोठा रांजण खळगा.
~
ग्लेशियर मिलची माहिती
उंच कडे
मला आवडलेली एक फ्रेम.
शेवट आल्यावर आपल्याला थोडा चढाव लागतो.
तिथली पार्किंग लॉट. इथली जागा जरा कमी असल्याने, केवळ लहान गटांच्या सहलीच इथे आणल्या जातात.
तिथले एक झोकदार वळण
ती गॉर्ज सोडताना, मन उदास होते. मागे वळून पाहताना..
समोरून येणारी नदी आणि तिच्यावरचा पूल
पुढे रेल्वे ट्रॅक आणि स्टेशनचा परीसर दिसतोय.
तिथे रस्त्याच्या कडेला उगवलेली निळी फुले.
या ठिकाणाहून आपण बाहेर पडतो. या दरवाज्यातून बाहेर न पडता त्याच तिकिटात आपण परत जाऊ शकतो.
एकदा तरी भेट द्यावीच अशी हि जागा आहे. परत एकदा रेल्वेने तिथे जावेसे वाटतेय.
दिनेशदा मस्तच... फुलांचा फोटो
दिनेशदा मस्तच...
फुलांचा फोटो तर जाम आवडला...
फारच सुंदर!! माहिती आणि
फारच सुंदर!! माहिती आणि फोटो..दोन्हीही....
घरबसल्या स्विस ट्रीप होतिये!!
वॉव अप्रतीम फोटो!
वॉव अप्रतीम फोटो!
सानी, ही गॉर्जही छान दिसतेय.
सानी, ही गॉर्जही छान दिसतेय. मस्त फोटो.
दिनेशदा, हो यंदा त्यांचा हिवाळा लांबला होता. पण आम्हाला चॉईस नव्हता. लेकीची सुटी तो आमचा भटकण्याचा सीझन.
वा, मस्त !
वा, मस्त !
सुप्प्प्प्पर्ब!!!!!!!!!!!!!!
सुप्प्प्प्पर्ब!!!!!!!!!!!!!!
वॉव सही फोटो आहेत दिनेशदा!
वॉव सही फोटो आहेत दिनेशदा! सानी यांचे फोटोही छान आहेत!
अमेझिंग!! मस्त फोटोज
अमेझिंग!! मस्त फोटोज ...
पहिला फोटो खूपच आवडला..!
सुंदर फोटोज , धन्यवाद
सुंदर फोटोज , धन्यवाद फोटोंसाठी.
बायदवे नदीच्या पाण्याचा रंग चुनखडी मिसळ्यासारखा का वाटतोय ?
सानी आणि दिनेशदा दोघांचेही
सानी आणि दिनेशदा दोघांचेही फोटोज मस्त आहेत....वॉव
सुरेख आलेत फोटो गॉर्जचे व
सुरेख आलेत फोटो गॉर्जचे व इतरही. मामी, छान माहिती.
अप्रतिम .
अप्रतिम .
व्वा! सुंदर फोटोज आणि माहिती
व्वा! सुंदर फोटोज आणि माहिती
MERINGUES << आठवणीने फोटो काढलात त्याबद्दल धन्स दिनेशदा
सानी चे फोटो ही सह्हीच
सध्या माबोवर घरबसल्या मस्त टूर्स होतायत.... स्विस काय, लेह-लडाख काय... मज्जा आहे आमची
डोळ्यांचं पारणं फेडलत.....
डोळ्यांचं पारणं फेडलत..... सुरेख!!!!!
ह्या ठिकाणी पुढल्या वेळी नक्की जाणार.....
सानी, आता मला तिथेही गेलेच
सानी, आता मला तिथेही गेलेच पाहिजे
श्री,
या नदीच्या पाण्यात बरीच खनिजे मिसळलेली आहेत, म्हणून हा रंग. इतर नद्यातील पाणी वेगळ्या रंगाचे होते.
धन्स दोस्तांनो.. असेच अजून बरेच भटकायचे आहे आपल्याला.
अप्रतिम!!!!!!!!!!!
अप्रतिम!!!!!!!!!!!
वॉव केवळ अप्रतिम!
वॉव केवळ अप्रतिम!
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
अप्रतिम .
अप्रतिम .
सुंदर सहल दा , पाणी पांढरे
सुंदर सहल दा , पाणी पांढरे वाटतेय ते पिण्या योग्य नाही का?
मस्त !
मस्त !
मस्त आहे हे लोकेशन.
मस्त आहे हे लोकेशन. डिस्कव्हरी ट्रॅव्हल वर पण अनेकदा व्हिडिओ पाहिला आहे. स्विस आणि नॉर्वेला एकदा जायचेच आहे.
दिनेशदा, खूपच सुंदर माहिती
दिनेशदा,
खूपच सुंदर माहिती आणि मस्त फोटो ......
हे बघितल्यावर एक प्रश्नही पडला कि आपल्या देशात अशी स्वच्छता, असे नियोजन, अप्रतिम फोटो कधी दिसणार ?
२०२० नाही तर निदान २०४० मध्ये तरी ...!
दादाश्री, स्विसमधले कुठलेही
दादाश्री, स्विसमधले कुठलेही पाणी बायोलॉजिकली क्लीन आहे असे आवर्जून सांगतात. हे पाणी अर्थातच क्षारयुक्त आहे. पण प्यायलो तरी धोकादायक नक्कीच नाही. ( आणि तसेही तिथे कुठल्याही नळाचे पाणी प्यायलो तरी चालते. )
आता पुढच्या भागात, ग्लेशियरच्या पोटात शिरु !
नितांत सुंदर!
नितांत सुंदर!
पहिल्याच चेंडुवर सिक्सर...
पहिल्याच चेंडुवर सिक्सर...
मस्तच फोटो दिनेशदा!
मस्तच फोटो दिनेशदा!
मस्त
मस्त
सहीच !
सहीच !
दिनेशदा, अप्रतिम प्रतिमा
दिनेशदा, अप्रतिम प्रतिमा .आभार.
पाषाण आणि पाणी.. दोन माध्यमांमध्ये निसर्गाने केलेला खेळ अन मानवी अभियांत्रिकीची करामत.
Pages