एका पेक्षा एक (अप्सरा आली)- पर्व ७ वे.

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 07:01

एका पेक्षा एक (अप्सरा आली)-पर्व ७ वे...

सचिन-महागुरु
पुष्कर श्रोत्री-सूत्रसंचालक
आणि सहभागी- श्रुती मराठे, मानसी नाईक....इत्यादी.

चर्चा करायची????

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>बिहू स्टेप काही केल्या जमलेली वाटली नाहीच
मल पण तो डान्स गंडलेला वाटला....स्टेप्सचे पण खुप रिपीटेशन वाटले... पण महागुरुंनी चक्क ब्लास्ट दिला... असो!

सह्याद्री दुरदर्शनवर एक नाच असलेली मालीका आहे वारे वा! त्यातल्या आजीबाई खरोखर चांगले गुणदान करतात. त्यांना नाचाची खूप समज, अभ्यास आहे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर एक आणखी परिक्षक असतात. ते देखील अभ्यासू आहेत.

या असल्या लोककला जाणणार्‍या लोकांकडून खरी वहावा मिळाली पाहीजे.

बाकी इतर सर्व वाहीन्यांवरील डान्स, रिअ‍ॅलीटी शोज पहाण्याचा एक सल्ला:
फक्त त्या कार्यक्रमात डान्स पहा, अन गुणदान देतेवेळी आवाज म्यूट करा.

तुम्ही वरील सल्ला एकदा आजमावून पहा. डोकेदुखी, जळजळ थांबली नाही तर पैसे परत!

फक्त त्या कार्यक्रमात डान्स पहा, अन गुणदान देतेवेळी आवाज म्यूट करा. >> +१
नाहीतर सरळ चॅनल बदलते मी.. वीकांताला कुणाचा तरी डान्स चालु होता 'तुम्हारी अदाओं पे मे वारी वारी वर'
भुवया उंचवायचा प्रयत्न करत होती असं वाट्लं .. उगाचच विचित्र हावभाव .. Sad
बंदच केला बघायचा

कुणाला तरी सचिनचा मेल आयडी अथवा मोबाइल नंबर ठाउक असेल तर ह्या धाग्याची लिंक त्याच्या पर्यंत पोचवा... प्लीजच.

Happy

फक्त त्या कार्यक्रमात डान्स पहा, अन गुणदान देतेवेळी आवाज म्यूट करा.
>> नाही. टेरेन्स लुइस, रेमो डीसूझा ज्यावेळेला गुणदान देताना कमेंट्स देत असतात त्या खरंच चांगल्या असतात. मुळात हे लोक कोरीओग्राफर आहेत. देशीविदेशी नृत्याची चांगली समज असणारे आहेत. त्यामुळे मला तरी त्यांच्या कमेंट्स फार आवडतात. त्य्यातही ते लोक फालतू बडबड न करता फक्त आणि फक्त नृत्याबद्दल बोलतात हे अजून एक (सर्वात) महत्त्वाचे.

काल तो बिहू डान्स पाहिला. संताप येइस्तोवर पाहिला Happy . मला बिहू हा नृत्यप्रकार अतिशय आवडतो. त्याला एक छान लय आहे, त्या नाचात एक मस्ती आहे आणि दिसायला सोपा असला तरी करायला अतिशय कठिण प्रकार आहे तो. सवार लू गाणंच मुलात स्लो ठेक्यात आहे, तिथे बिहू स्टेप पकडायला स्लोमो करावा लागला असता. ते या बाईला आजन्मात जमणे शक्य नाही. बिहूच करायचं होतं तर "देखा है पहली बार" नाचायचं ना. किंवा चोरीचोरीचुपकेचुपके मधलं "देखने वालो ने क्या कया देखा होगा"

शिवाय ती नाचताना तिची पोज काय विचित्र होती, पायामधे दीड दोन फुटाचं अंतर ठेवून नाचत होती (अगदी गणेश आचार्याची आठवण झाली बघा) तिच्या एक्स्प्रेशन्सबद्दल तर मी बोलणार पण नाही.

भाऊ... Happy

नंदिनी.. ती भरतनाट्यम शिकलेली आहे. त्यामुळे पाय जवळ घेऊनही नाचतात हेच तिला माहिती नसेल..

नंदिनी.. ती भरतनाट्यम शिकलेली आहे>> तिच्या आतापर्यंत दोन्ही परफॉर्मन्सेस पाहून मला ती नृत्य शिकलेली आहे असं अजिबात वाटलं नाही. कसला ग्रेस नाहीच तिच्या एकंदर डान्समधे.

परवा ती वारी वारी वाली बाई प्ण किती अट्टहासाने क्लासिकल छाप्न डान्स करायला बघत होती. शुक्राची चान्दणी नाचणारीला त्या डोक्यावरच्या मुकुटाचं ओझं झालं होतं बहुतेक.

झीला चांगले नृत्य शिकलेले लोक मिळत नाहीत का नाचायला?

मला एकसारख्या लावण्या ऐकून ऐकून कंटाळा आलेला आहे. >> आणि हट्कुन बैठकीच्या लावण्या ... म्हणजे नाचायला जास्त चान्स नाही ... खपुन जातो "नाच".

आता डान्स बार चालू होतील.
ह्या टीव्ही वरच्या बार बालांना कोण बघणार आता?

आज भारतातले वेगवेगळ्या ठिकाणचे क्लासिकल डान्स पाहिले, एकापेक्षा एक भंगार होते. सगळ्या गाण्यांची आणि नृत्यप्रकारांची वाट तर लावली होतीच, वर ते महागुरू प्रत्येक प्रकाराची शिकवणी घेऊन आले होते. सुकन्या चाळणचे आतापर्यंतचे इतरत्र पाहिलेले डान्सेस पाहून थोडी आशा होती, तीपण संपली.

मला नृत्यातलं काहीही कळत नाही, ज्यांना कळतं त्यांना किती राग आला असेल नुसती कल्पनाच करते.

बादवे, श्रुती मराठे डोळे इकडे-तिकडे करायचं सोडून थेट मान इकडे तिकडे करत होती.

फुलवा दाणदाण उड्या मारायला शिकवते पण असेच वाटते तिने कोरीओग्राफ केलेले बरेचसे नाच पाहून.
(त्यातल्या त्यात अपसरा आली बरा होता).

पण इथे डीआयडी मध्ये जरा चांगले नाचायला शिकलीय ती(फुलवा) स्वतः. बैठी लावणी बरी केलेली पण काच्याच्कै तारीफ केली.
डीयाडी मध्ये तिची खूपच तारीफ केलीय.. (मला ती सुरुवातीच्या डान्स मध्ये बोजड वाटायची, आता बारीक झाल्याने बरी वाटते नाचताना).

सचिन बद्दल त्याची बयको सुप्रियाच म्हणालेली की ह्याला ना जिथे तिथे पीजे मारायची सवय एकदम नकोशी होते कधी कधी.

विचार करवत नाही अश्या माणसाला झेलणं रोजच. Proud

एकापेक्षा एक चा पहिलाच सीझन मस्त होता. .. मला अमृता खानविलकर ची कोरीओग्राफर आवडायची.. मस्त बसवायची ती डान्स.. नंतर्चे सुकन्या काळण वगैरे त्यांचा पन सीझन बरा होता.. बाकीचे अतिशय बोअर.
आताच्या अप्सरांना नाही पाहवत..सुकन्या काळण वगळता.
छम छम करता है नशीला बदन वर ती नेहा काय नाचली Sad ते गाण कुठे तिच्या स्टेप्स कुठे ??? तरी आतापर्यंत झालेला चांगला परफॉर्मन्स अस महागुरु म्हणाले.

परवा कुठल्यातरी अप्सरेला "चोली के पिछे" नाचताना पाहिले. हिडीस हा एकच शब्द सुचला मला.

स्टेप्स भयाण होत्याच, पण एक्स्प्रेशन्स त्याहून बेकार. ऑन स्क्रीन माधुरीने इतक्या भडकाऊ गाण्यात जी काय अदा सादर केली आहे ती आजवर कुणालाही जमलेली नाही. सरोज खानची कोरीओग्राफी आणि माधुरीचे अजिबात चीप न वाटणारे एक्स्प्रेशन्स यामुळे ते गाणं वेगळ्या उंचीवर जाऊन पोचतं.

भिक नको पण कुत्रा आवर असा आहे हा महागुरु. लायकि पेक्शा जास्त बोलतो. आणि काय ते भिकार डांस. नावाप्रमाने पिळतो हा पिळगावकर. एखाद्याला टॉर्चर करायचे असेल तर त्याला हया महागुरुचा कार्यक्रम दाखवा.>>>>>>>>>+१००

अरे त्या शिवलेल्या नवूवारी साड्या बंद करा रे बाबांनो. जाणकारांच्या नजरेला येते ते.

कालच्या प्रॉप डान्स मध्ये शृती मराठेने प्लास्टीक च्या बादल्या घेवून पोरखेळ केला अगदी.

आणि एकीने सिलींडर वापरुन डोळ्यांचं पारणं फेडलं; आयला नाच आहे का मस्करी. हेमांगी कवी तर स्टेजवर सोडलेली चिडिया (दिवाळीच्या फटाक्यांमधली) वाटत असते...

Pages