निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.
आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
जाई जुई चमेली कशी ओळखावी या
जाई जुई चमेली कशी ओळखावी या धाग्यावरची माझी पोस्ट इथे देत आहे. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
मी ज्या वेलीला जाई म्हणते तिला इकडे विदर्भात चमेली म्हणतात, तर जुईला जाई म्हणतात.
मग चमेली नक्की कशी दिसते ते काही समजत नाही.
अजुन एक सातारा भागात एक वेल येते जी मी फलटण चौकात अवधुत नावाच्या हॉटेलच्या कंपाऊंडला आणि चाफळच्या राम मंदिरात पाहीली आहे, तो गजर्याचा एकेरी मोगरा नक्कीच नाही.
पानांची ठेवण थोडी कुंदा आणि जुईच्या पानांच्या जवळ जाणारी.
फुल जुई आणि एकेरी मोगर्याचे कॉम्बीनेशन आहे.
हिच वेल मी पाटणजवळ निवकण्याची जानुबाईला तिथल्या जंगलात पण पाहीली आहे.
सारीका जाई बद्दल मी पण साशंक
सारीका जाई बद्दल मी पण साशंक आहे. पण चमेली, जुई आणि रानजाईचे फोटो माझ्याकडॅ आहेत. तुझ्या पोस्टवर टाकण्यासाठीच गेले १० मिनीटे शोधत आहे. सापडल्यावर लगेच टाकते.
जाई - जुई बद्दल हा गोंधळ मी
जाई - जुई बद्दल हा गोंधळ मी देखील अनुभवलाय. प्रांता प्रांतानुसार ही नावे नुसतीच बदलत नाहीत तर त्यांची अदलाबदलही होते.
http://www.sparkpeople.com/my
http://www.sparkpeople.com/mypage_public_journal_individual.asp?blog_id=...
इथे एकाने फरक दाखवलाय.
आर्या तै अगदीच चुकीची माहीती
आर्या तै अगदीच चुकीची माहीती वाटतेय.
मदनबाण तेवढा बरोबर आहे.
जुई म्हणुन भलतेच फुल दाखवलेय.
जाई म्हणुन चक्क एकेरी मोगरा आहे.
सायलीचेही तसेच.
हो ना! जाई आणी सायली बद्दल
हो ना! जाई आणी सायली बद्दल मलाही गोंधळ वाटला तिथे.
हो ना! जाई आणी सायली बद्दल
हो ना! जाई आणी सायली बद्दल मलाही गोंधळ वाटला तिथे.>>>>>>>>>.मी पण परवा वडीलांना नावे विचारत बसले होते. (लक्षात काय आहे विचारू नका :अओ:)
या जाई - जुईची बॉटेनिकल नावे
या जाई - जुईची बॉटेनिकल नावे कळतील का? या शास्त्रमान्य नावांवरुन फोटो शोधणे सोपे पडेल.
उद्या जाईचे फोटो टाकीन.
उद्या जाईचे फोटो टाकीन. संपूर्ण वेल मस्त फुलली आहे.
.
.
लुई अस्वथ होऊन खूप खाजवायला
लुई अस्वथ होऊन खूप खाजवायला लागला. म्हणून नीट पाहिलं तर अंगात गोचिड्यांसारखे मोठे किडे चिकटल्यासारखे दिसत होते. आणि आश्चर्य म्हणजे तो जिथे बसून उठत होता तिथे छोटे काळे किडे पडलेले दिसत होते. मग हेच काळे किडे मोठे होऊन अंगाला चिकटलेले गोचिडसदृश किडे होतात का? अजून लक्षात येत नाही.
मग डॉ. मा पाचारण केलं त्यांनी त्याला अॅनॅस्थिशिया देऊन सुरी आणि कात्रीने ते मोठे गोचिडसदृश किडे ओढून काढले. मग भूल उतरल्यावर तो बराच आनंदी दिसायला लागला. नंतर ३/४ दिवस गोळ्यांचा डोस दिला.
एक तर इथे अती पाऊस झाला. त्यात आजूबाजूला गाईगुरं...म्हणून डॉ.च म्हणणं पडलं की तिथून ते किडे इकडे येतात. आणि पावसाळी हवेने ते वाढले.
आता प्रिकॉशन घ्यायला लागेल.
असो........नंतर शरदने त्याला अंघोळ घातली.
तर ही लुईची तो तो......
तो तो नंतर गाई गाई..........
लुई रिलिव्ड दिस्तोय आता
लुई रिलिव्ड दिस्तोय आता
छान आहे.
छान आहे.
मधु-मकरंद, भाज्यांची माहिती
मधु-मकरंद, भाज्यांची माहिती मस्त. पण चाकवत फक्त हिवाळ्यातच २ महिने मिळतो. फार नाजुक भाजी आहे ती. पाने इतर पालेभाज्यांसारखी तजेलदार न दिसता मलूल झालेली असतात बाजारात येईपर्यंत.
आज कितीतरी दिवसांनी (वर्षांनी
आज कितीतरी दिवसांनी (वर्षांनी खर तर!) घराजवळ एक चिमणी दिसली.
सुदुपार! कुठे गेले सगळे?
सुदुपार!
कुठे गेले सगळे?
लुई मस्त आहे. आमच्या
लुई मस्त आहे.
आमच्या डॅनीलापण अशा गोचिड होतात. डॉ. पावडर देतात लावायला. आणि हे गोचीड चिमट्याने काढूनही टाकतो माझा पुतण्या.
बापरे....... जागू अगं डॅनी
बापरे....... जागू अगं डॅनी चावत नाही का ...........कारण गोचिड्या झालेल्या ठिकाणी नुस्ता हात जरी लावला तरी लुई अंगावर आल्यासारखं करतो. म्हणून तर भूल द्यायला लागली.
मी ५०० वी.
मी ५०० वी.:स्मित:
असे किटक कुत्रांना फारच
असे किटक कुत्रांना फारच त्रासदायक वाटतात. आमच्याकडे पण आम्ही पावडरच वापरत होतो.
( पण असे रक्तपिपासू किटक बहुतेक जनावरांना त्रास देतात. म्हणून तर बिचारे शेपटी हलवत / खाजवत असतात. खुपदा बगळ्यांसारखे पक्षी यासाठी मदत करतात. )
आज संध्याकाळी फिरायला जंगलात
आज संध्याकाळी फिरायला जंगलात गेलो होतो. मस्त मजा आली. कुडा, वावडिंग, कातणी, टाकळा, कुर्डू इ. भाज्या पाहून/आणून झाल्या. अक्खा पिसारा सांभाळत जाणार्या मोराला बघून झालं. करमळाची मोठ्ठी पानं जेवणासाठी जमवून झाली.. रानफुलं दिसली. अशी संध्याकाळ सत्कारणी लागली.
हे काय आहे ते कुणाला माहीत असल्यास कृपया सांगा. लाजाळू नाही. काटे नाहीत, पाने मिटत नाहीत आणि आकार लाजाळूपेक्षा लहान.
ही रानतुळस. वास तुळशीपेक्षा भयंकर उग्र. तुळशीत ओवा मिसळल्यासारखा. हिचे काही उप्योग आहेत का?
अरे बापरे किती दिवस मी येथे
अरे बापरे किती दिवस मी येथे आले नाही? आता सर्व वाचून काढले. छान माहिती आणि फोटो.
पिशी अबोली, मला तो कवळा
पिशी अबोली,
मला तो कवळा वाटतोय पण जागू नक्की सांगू शकेल.
जाई आणि चमेलीचे फोटो टाकावे
जाई आणि चमेलीचे फोटो टाकावे म्हटलं तर.....ते गुगल प्लसच उघडतंय.
आत्ताआत्ता तर आपले जिप्सीभौ आणि जागुतै यांची "टूशन" लाऊन पिकासावरून इथे फोटो टाकायला शिकले होते. आता पिकासा म्हटल्यावर ते गुगल प्लस काय उघडतंय? त्यात फोटो दिसताहेत पण लिंक टु द फोटो इ.इ. काहीच दिसत नाहीये
माणसांनी शिकावं तरी काय काय?
मानुषी मला ही खुप काही शिकावस
मानुषी मला ही खुप काही शिकावस वाटत म्हणजे कलेमधल पण वेळ अपुरा पडतो. दिवसाचे २४ तास आणि रात्रीचे १२ तास असते तर बर झाल असत. फोटोग्राफी स्पर्धेमध्ये बघ मेन पेजवर पिकासावरुन कसे फोटो टाकायचे त्याची लिंक आहे.
पिशी आबोली तो लाजाळूही नाही आणि कवळाही नाही. असेच जंगली झाड आहे. उंच वाढते आणि त्याला शेंगा येतात.
जागुले....अगं वरचे लुईचे फोटो
जागुले....अगं वरचे लुईचे फोटो बघ ना कसे टाकलेत पिकासावरूनच. आता पिकासा म्हटलं की ते गुगल प्लसच येतंय. आणि त्यात लिंक टु द फोटो असं काहीच दिसत नाहीये. असो....आज माझा लेक आणि सून येताहेत त्यांची "टूशन" लावते. बघू काही प्रकाश पडतो का! (असो.....इथे अवांतर झालं जरा. हा विषय बंद! )
चला मी पण थोडेसे विषयांतर
चला मी पण थोडेसे विषयांतर करतो..
परवा रात्री ब्रेड कापताना बोट कापले ( स्विस नाईफचा प्रताप ) बराच वेळ रक्त थांबेना. बर्फ दाबून ठेवला / बोट तोंडात दाबून ठेवले / ब्रेडचा तुकडा दाबला तरी रक्त थांबेना. शेवटी प्रज्ञाच्या काकांनी दिलेली हळदच कामाला आली. (ती हळद फार जपून म्हणजे काटकसरीने वापरतो मी, आणि पदार्थात अक्षरशः चिमूटभर घातली तरी पुरते.) ती दाबून धरली आणि थोड्याच वेळात रक्त थांबले. आज तर जखम सुकायलाही लागली.
आभार मानायचा उपचार नाही पाळणार मी, प्रज्ञा.
शेवटी प्रज्ञाच्या काकांनी
शेवटी प्रज्ञाच्या काकांनी दिलेली हळदच कामाला आली. (ती हळद फार जपून म्हणजे काटकसरीने वापरतो मी, आणि पदार्थात अक्षरशः चिमूटभर घातली तरी पुरते.) ती दाबून धरली आणि थोड्याच वेळात रक्त थांबले. आज तर जखम सुकायलाही लागली.>>>>>>>>>>>व्वा! मी कधी बोट कापल तर हाच उपाय करते. लगेच रक्त थांबून, जखमही लवकर बरी होते.
आभार मानायचा उपचार नाही पाळणार मी, प्रज्ञा.>>>>>>>>>>> बरोबर आहे.
आता ह्या तीन फ़ुलांची नावे
आता ह्या तीन फ़ुलांची नावे बरोबर आहेत का सांगा.
ही जाई ना?
ही जुई.
आणि हे कुंदाच फ़ुल आहे का?
पान १७, पिशी अबोली यांचा
पान १७, पिशी अबोली यांचा फोटो: हा कवळा आहे का? लाजाळू सारखा असतो. दोन चार वेळा हात लावल्यानंतर लाजाळू सारखा मिटतो. लहान नाजूक पिवळी फुले येतात.
Pages