उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग ६ : उर्वरित गंगटोक...

Submitted by सेनापती... on 8 November, 2012 - 10:00

उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग १ : पूर्वतयारी ...
उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग २ : गंगटोकच्या दिशेने...
उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग ३ : एम.जी.रोड...
उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग ४ : फुलले रे क्षण माझे...
उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग ५ : जोरगाँग आणि रुमटेक मॉनेस्ट्री...

गंगटोक शहर तसे खुपसे गजबजलेले आहे. सपाटी तशी इथे कमीच. शहराच्या मध्यभागात आणि आसपास असलेली डोंगर उतारावर असलेली घरे आणि इमारती सोडल्या तर इतरस्र तशी शांतता असते. गणेश टोक, मॅजेस्टिक व्ह्यु पॉईंट, रोप-वे, नामग्याल ईंस्टिट्युट ऑफ तिबेटोलॉजी (NIT) ही गंगटोकच्या आसपासची काही बघण्यासारखी ठिकाणे. एका दिवसात हे सर्व पाहून होते. इंदिरा बायपास रोड जवळच आमचे राहते घर होते. तिथून जरा वरच्या बाजुला गेले की मॅजेस्टिक व्ह्यु पॉईंट आहे. इथे जाण्याचे एकमेव कारण म्हणजे येथून कांचनजुंगा (तिथे लोक कांचनझोंगा असे म्हणतात) दिसते. जर आकाश साफ असेल तरच इथे जाण्यात अर्थ नाहीतर वेळ फुकट. तिथे वरती टोकाला एक छानसे दुकान आहे. काही शॉपिंग करायची असेल तर.... इथे मुळीच करू नका. Lol मार्केट मध्ये त्याच वस्तू अधिक स्वस्त आहेत..

प्रचि १: वेगवेगळ्या फ्लेव्हर्सचे लिकर्स.. अगदी कॉफी ते चेरीपासून सर्व..

प्रचि २: काही लाकडाचे मुखवटे..

२ वर्षापुर्वी लडाखला गेलो होतो तेंव्हा सर्वत्र फडकणारे प्रेअर फ्लॅग्स पाहिले होते. इथे मात्र जरा वेगळेच प्रेअर फ्लॅग्स बघायला मिळाले. आमचा ड्रायव्हर सत्याच्या मते एखाद्या विशिष्ट भागाच्या किंवा गावाच्या वेशीवर ते लावले जातात. रस्त्याला जिथे घातक वळणे असतात किंवा रस्ता खचून अपघत होण्याची चिन्हे असतात तिथे ते हमखास लावले जातात.

प्रचि ३:

प्रचि ४ :

गणेशटोक हे डोंगरच्या एका टोकावर वसलेले श्री गणेशाचे अष्टकोनी मंदिर आहे. गाभार्‍यात अष्टविनायकाचे दर्शनही घेता येते. खालच्या बाजुला थोड्या सपाटीवर एक छोटासा कॅफेटेरिया आहे. समोरच्या मोकळ्या जागेत पारंपारिक सिक्किमी आणि तिबेटी कपडे घालून फोटो काढता येतात. ३०-४० रुपये असा दर असतो. इथून गंगटोक शहराचा सुंदर नजारा दिसतो.

प्रचि ५:

प्रचि ६:

इथून थेट आम्ही गेलो गंगटोक रज्जुमार्ग उर्ग रोप-वे. रोप-वे जिथून सुरु होतो तिथे सिक्किम राज्याचे विधान भवन आहे. रोप-वे राईड तशी छोटी आहे आणि त्यासाठी बराच वेळ थांबावे लागते. त्यामुळे तिकिट काढुन अजुन किती वेळ लागेल याचा अंदाज घ्यावा आणि काहीतरी खायला / जेवायला जावे. नाहीतरी दुपार झालेली असतेच. Happy

प्रचि ७:

प्रचि ८:

रोप-वे राईड जिथे संपते तिथेच जवळ नामग्याल ईंस्टिट्युट ऑफ तिबेटोलॉजी (NIT) आहे. १९५८ साली तिबेट मधून सिक्किम मध्ये आलेल्या दलाई लामा यांनी या वास्तुचे उद्घाटन केले. त्या वेळचे राजे नामग्याल यांनी या वास्तुसाठी जागा आणि निधी उपलब्ध करून दिला. तिबेट्ची संस्कृती, सण-परंपरा आणि ईतिहास याची जपणुक, ठेवण आणि अभ्यास हे एन. आय.टी.चे धैय आहे. ही वास्तु तिबेटी वास्तुकलेचा एक उत्तम नमुना देखील आहे. आतमध्ये प्रवेश करण्याकरिता प्रत्येकी १० रुपये फक्त शुल्क भरावे लागते. प्रदर्शनातील गोष्टींचे विनापरवानगी फोटो घेणे प्रतिबंधित आहे. बाहेरून मात्र तुम्ही फोटो घेउ शकता.

प्रचि ९:

माझ्या आवडी-निवडी पाहता आजच्या दिवसातली ही मला आवडलेली सर्वात सुंदर इमारत होती. एकंदरित दिवस्भरात गंगटोक आणि परिसरातील महत्वाच्या स्थळांना भेट देउन झाली होती. आता घरी परतणे, खरेतर एम.जी. रोड वर परतणे गरजेचे होते. कशाला.. दिवसाभराची शॉपिंग करायला आणि गुलाबजाम खायला...

क्रमशः.....

उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग ७ : नथु-ला - ऐकत्या कानांची खिंड...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे किती वेळाने आला हा भाग ... आता जरा गडबडित आहे .. नंतर सावकाश वाचतो .. आणि परत येतोच प्रतिसाद द्यायला Happy

पाटील... त्या हॉटेल मध्ये गेलो नव्हतो रे.. Happy

बरं मे--फेअर म्हणे आधी सी..एम. चा जुना बंगलो होता. आता त्याचे हॉटेल झालयं. Happy