निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिल् मै,कर रही हूँ , कर रही हूँ , इग्नोर!!!!!!( इग्नोर्,सवय इ. शब्द सध्यातरी नवरोबाच्या डिकशनरीत नाहीयेत Wink } ...
शोभे होतेय सवय हळूहळू.... पुण्याला येईन तेंव्हा कळवीनच गं आधी...

साधना,जागु सही बोला!!!!
कालच एका मैत्रीणीशी बोलले, अनेकानेक वर्षं घाटकोपर मधे राहून नुक्तीच बोरिवली ला शिफ्ट झालीये..ती ही मना ने अ‍ॅडजस्ट होतच नाहीये तिथे अजून ...

मानुषी , तो कजरारे नैनोवाला ससा गोड आहे अगदी,,,,,
(असच आठवलं, चीन ला थंडीच्या दिवसात लहान लहान पिंजर्‍यात कोंबलेले छोट्टुले ,पांढरे,तपकिरी,काळे ससे विकायलाअसतात...पाळायलानैकै...साते करून खायला... Uhoh

गमभन एक तर तो पाळीव आहे. आणि वर्षू म्हणते तसं त्याला बांधून ठेवलेलं असण्याची शक्यता संभवते.
साधना.........मस्तच! नंतर आम्हाला फोटो दाखव हं! लेखही चालेल.

साधना... मस्त सफर कर ,मस्त मस्त फोटू टाक........

शशांक्,हो रे लौकरच भेट होईल आता तुम्हा सर्वांशी Happy

मी कसले फोटो दाखवतेय.. सोबत जिप्स्या आहे, त्याचेच फोटो बघत बसाल तुम्ही , माझ्या फोटोंकडे कोणी बघणारही नाही Happy

सावली, निशिगंधाचा एक बहर येऊन गेला कि सगळा कंद उपटायचा. त्यातले अंगठ्याएवढे कंद सुटे करुन परत लावायचे आणि त्यापेक्षा बारीक असतील ते काढून टाकायचे. शेतीत असे करतात.

आजूबाजूला माणसे असणे वगैरे सवयीचा भाग झाला. माझ्या आयूष्यात अनेक प्रसंग असे आले कि अफाट परीसरात केवळ मी एकटा होतो. आपलाच आपल्याशी संवाद घडतानाही मस्त वाटते.

शोभा, ते मसुंडाचं फूल, आपलं फुलाच्या बाहेरचं संदल आहे. Happy

काजळभरल्या डोळ्यांचा ससुला खूपच गोडू गोडू आहे हं Happy

थँक्यु जागू, दिनेश.
दिनेश ते रोपासहीत कंद आत्ताच महिन्या दिड महिन्यापूर्वी लावलेत. आणि सगळा बहर येऊन गेला ते कसं कळणार?

छान गरे देणार्‍या फणसाची आठळी माझ्या आईने पेरली होती.बरीच वर्षे झाली. झाड बरेच वाढून त्याला फणसही
भरपूर लागतात.पण एकही गरा नसतो.फक्त भाजीच्याच उपयोगाचा आहे.ज्या फणसाची आठळी लावली ,तो फणस दुसरीकडे फणस मात्र खूप गरे देतोय! असे का बरे? कोणी सांगू शकेल का?>>>>>>>>>>>>>>>>>माहीत आहे का?

माझ्या आयूष्यात अनेक प्रसंग असे आले कि अफाट परीसरात केवळ मी एकटा होतो. आपलाच आपल्याशी संवाद घडतानाही मस्त वाटते. >> दिनेश, अगदी. आधी त्या एकटेपणाचे खूप दडपण येते, भिती वाटते पण मग खूप मस्त वाटते. मला एकदाच अनुभवायला मिळाले ते.

ससुला मस्तच आहे.

सुप्रभात.

काल ७-८ ब्रम्हकमळे म्हणजे कॅकटस फुलली होती पण पहायची राहून गेली. :दु:ख: गडबडीत पाहायचेच विसरलो. सकाळी बाहेर गेल्यावर मावळलेली दिसली तेंव्हा हुरहुर वाटली.

माहेर मासिक मिळाले तर पहा त्यात माझा लेख आहे शेतावरचा.

सावली, एका कंदाला एकदाच एक काडी येईल. मग चहूबाजूने छोटे छोटे कंद तयार होतील.

जागू, पॉपीचे फुले कुठे दिसले ?

माधव, आता इथल्याच मंडळींची एवढी घट्ट मैत्री झालीय कि आता मामी असती तर हे म्हणाली असती, जिप्स्या असता तर हे म्हणाला असता.. असे वाटत राहते. त्या दृष्टीने सगळे सोबतच असतात.
पण तरी असा एकांत मात्र एकदा तरी अनुभवावाच असाच असतो.

सुदुपार,
सगळ्या गप्पा छान आणि फोटो देखील.

मानुषी,
ससा छान दिसतो..माणसाळलेला असेल.

दिनेशदा,
आम्हाला इकडे जिथे बघेल तिथे माणसांची गर्दी बघुन खरेच कुठेतरी (एकांत बेटावर) दुर पळुन जावंस वाटतं...

हो गं जागू.........सध्या सेलफोनच्या कॅमेर्‍यावरच काम चालू! म्हणून क्लॅरिटी नाही.

नमस्कार!! बरेच दिवसांनी काहितरी शेअर करायला....

मसिक: सुवासिनी, अंकः जुलै २०१३:
वनसप्तींचा महिमा:
टाकळा: (पान क्र.१०)
पावसाळ्यात येणारी ही भाजी आरोग्याच्या द्रुष्टीने महत्त्वाची आहे. त्वचा विकारात खाज, खरूज, कंड, गजकर्ण यासाठी टाकळ्याच्या पानांचा रस किंवा टाकळ्याच्या बीची पावडर तेलात लावल्यास हमखास गुण येतो. टाकळ्याच्या बीया भाजून त्यात साखर किंवा गुळ घालून लाडू केल्यास ते कंबर दुखीसाठी फारच उपयुक्त आहे. शरीरावर कुठेही लहान-मोठया गाठी आल्यास गाठीत वेदना, ठणका असल्यास टाकळ्याची पाने वाटून गरम करून बांधावीत आणि त्या पानांचा थोडा रस मधाबरोबर पोटातून घ्यावा. प्रमेह, लघवीच्या विकारांसाठी टाकळ्याचची फुले खडीसाखरेबरोबर खाल्ल्यास फारच उपयोग होतो. त्वचेवर येणारी ओली किंवा कोरडी खरूज टाकळ्याच्या बीया वाटून लेप लावल्यास बरी होते. तसेच ताकळ्याचे मूळ उगाळून त्यचे गंध लावल्यास फायदा होतो.

चाकवत (पान क्र. १२)
नेहमी मिळणारी ही भाजी भूक वाढवणारी, रुचकर व वातनाशक आहे. गॅसेस कमी होऊन पोट साफ होते. पोटान केस गेले असल्यास, क्रुमी झाले असल्यास ही भाजी खाल्ल्याने ते निघून जातात. चाकवताची भाजी भूक वाढविणारी, सारक, र्‍हुदयाला हितकर आहे. पित्त विकार, मुळ्व्याध, क्रुमी, ज्वर यांचा नाश करणारी आहे.

कुरडू (पान क्र. ३३)
ही पालेभाजी पावसाळ्यात येणारी आहे. रानात उगवते. मुत्रविकारात अतिशय उपयोगी पडणारी आहे. पांढर्‍या रंगाचे झुपके येतात त्यात काळे बी असते. लघवीच्या विकारात ब मुतखड्यात कुरडूच्या बीया कुटुन त्यात तेवढीच साखर घालून दुधातून घावी. ताबडतोब लघवी सुटते. मुतखड्याची लक्षणे दिसताच कुरडूचे पंचांग घेऊन त्याचा१/८ काढा करावा. तो दिवसातून दोन वेळा घ्यावा. लगेचच आराम मिळतो. मुतखडा विरघळण्यासाठी त्याचा अतिशय चांगला उप्योग होतो.

माहीती फक्त शेअर करण्यासाठी.... बाकी जाणकार सांगतीलच...

जागू, पॉपीचे फुले कुठे दिसले ?>>>> दिनेशदा ते मी टाकलंय ::(:

भिंगातून पाहिले तर मझे नाव पण टाकलेले दिसेल उजवीकडे ::फिदी::(नुकतीच शिकलेय नाव टाकायला)

मधु,छान मिळाली माहितीभाज्यांबद्दल !!!

मानुषी, मस्तचं गं ती लालचुटुक फळं Happy

Pages