सारणासाठी:
१. हिरवे मूग - दोन ते अडीच वाट्या
२. एक मध्यम बटाटा उकडून
३. आमचूर पावडर किंवा चाट मसाला - १ चमचा
४. बडिशेपेची पावडर - १ चमचा
५. गरम मसाला - १ चमचा
६. जिर्याची पूड- १ चमचा
७. आलं आणि मिरची वाटून - दोन चमचे
८. तिखट, मीठ, साखर - चवीनुसार
९. चिरलेली कोथिंबीर - १ वाटीभर
पारीसाठी: कणीक, मीठ, तेल, पाणी.
१. मूग भरपूर पाण्यात भिजत घालून, मग पाणी उपसून त्याला मोड येऊ द्यावेत. या प्रक्रियेला साधारण अठरा तास लागतात. तो वेळ पाककृतीच्या वेळेत गणलेला नाही.
२. मोड आलेले मूग कुकरच्या क्षमतेप्रमाणे एक किंवा दोन शिट्या देऊन शिजवून घ्यावेत. मी वरण भाताबरोबर शिजवून घेतले. मुगात अजिबात पाणी घातले नव्हते. अगदी मऊ लगदा होईपर्यंत मूग शिजवायचे नाहीत. दाणा किंचीत टसटशीत राहिला पाहिजे.
३. मूग थंड झाल्यावर मिक्सरमधे भरडसर वाटून घ्यावेत.
४. ते भरड वाटण एका भांड्यात घेऊन मग त्यात सारणासाठी असलेले सर्व घटक एकेक करून घालून पराठ्याचे सारण नीट तयार करून घ्यावे.
![moong paratha 1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u85/moong%20paratha%201.jpg)
५. स्टफ्ड पराठ्यांसाठी नेहमी भिजवतो तशी कणीक भिजवून घ्यावी.
६. तयार केलेलं सारण कणकेच्या पारीत भरून नेहमीसारखे पराठे लाटून, तव्यावर तेल सोडून भाजून घ्यावेत.
७. लोणी/ दही/ सॉस/ चटणीबरोबर गरमागरम गट्टम करावेत.
![moong paratha.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u85/moong%20paratha.jpg)
मस्त रेसिपि मंजु.... लेकाला
मस्त रेसिपि मंजु.... लेकाला डब्यात देईन.
मस्त उद्याच्या सानुच्या
मस्त उद्याच्या सानुच्या डब्याचा प्रश्न मिटला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच! सोप्पी आणि पौष्टिक!!
मस्तच! सोप्पी आणि पौष्टिक!! एकदम मम्मी भी खुश और टम्मी भी खुश स्टाईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच.
मस्तच.
मस्त आहेत
मस्त आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच दिसतेय. मटकी घालून करून
मस्तच दिसतेय.
मटकी घालून करून बघेन.
छान आहे. उसळ्या नावडणारी
छान आहे. उसळ्या नावडणारी मुले ज्या घरात आहे तिथे हा पर्याय बेस्ट आहे (उदा. माझे घर
)
मस्त! एकदम झक्कास!
मस्त! एकदम झक्कास!
आज केले होते!! मस्त झाले!!!
आज केले होते!! मस्त झाले!!!
फक्त मुगाच्याऐवजी मिक्स कडधान्यं घेतली, एवढाच बदल केला! बाकी सर्व सेम!!!
मस्त दिसत आहेत. फोटो एकदम
मस्त दिसत आहेत. फोटो एकदम भारी.
आज केलेत थोड्या प्रमाणात छान
आज केलेत थोड्या प्रमाणात छान झालेत
आज केलेत थोड्या प्रमाणात छान
आज केलेत थोड्या प्रमाणात छान झालेत>>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थोड्या प्रमाणात केलेत की थोड्या प्रमाणात छान झालेत?
, प्राची, थोड्या प्रमाणात
:फिदी:, प्राची, थोड्या प्रमाणात केलेत (मोजून ५). चवीला छान झालेत
विरामचिन्हांची काटकसर करू
मस्त नी सोप्पं...
मस्त नी सोप्पं...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी हरभर्याच्या डाळीचे करते
मी हरभर्याच्या डाळीचे करते आता असे करुन पाहीन.
मंजु, आज सकाळी केले पराठे,
मंजु, आज सकाळी केले पराठे, खुपच छान झाले. थँक्यु गं!
थोडेफार बदल केले म्हणजे मुग रात्रभर भिजवून सकाळी शिजवले. मोड आणले नाहीत. बटाटाही घातला नाही. फक्त चाट मसाला, धणे-जीरे पूड, तिखट-मीठ, लसुण आणि कोथिंबीर घालून किंचीत मळून एकजीव केलं मिश्रण आणि पुरणासारखं भरलं पारीत. लेकाला वरुन अमुल बटर थापून दिले. टिपीकल पंजाबी पराठे दिसत होते.
तू सांगितलंयस खरंतर की मुग टसटशीत हवेत, पण मला दुपारपर्यंत ते खुप कोरडे होतील की काय अशी शंका होती, म्हणुन मी माझ्या समाधानासाठी अंगाबरोबर पाणी ठेऊन मऊ शिजवले.
पाणी ठेऊन मऊ शिजवले.>> ओके!
पाणी ठेऊन मऊ शिजवले.>> ओके! पण लाटता आले ना?
मऊ शिजवले तर लाटायला नाजूक होतील असं वाटलं मला.. म्हणून मी टसटशीत ठेवले.
एकदम स्मूथ लाटले गेले.
एकदम स्मूथ लाटले गेले. लेकालाही आवडले.
छान आहे रेसिपी.. बडिशोपे मुळे
छान आहे रेसिपी.. बडिशोपे मुळे मस्त सुगंध येत असेल...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आजच करण्यात येईल ही पाकृ.
आजच करण्यात येईल ही पाकृ. फ्रिजमधे मोड आलेले मूग नेहमीच असतात. आज कुकर बरोबर ते ही लावून सारण करते. कणीक भिजवून गरम गरम पराठे आणि वरण्-भात असा रात्रीचा बेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काल रात्री केले होते हे
काल रात्री केले होते हे पराठे. मस्त झाले होते आणि करायला तसे बर्यापैकी सोपे आहेत. सुनिधीमुळे मी तिखट आय्टम्स वगळले होते. तरी चवीला छान झाले होते.
मी मूग पाणी घालून शिजवले आणि नंतर त्या पाण्याचं काढण केलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पाकृ मस्त! आज केले होते.मस्त
पाकृ मस्त! आज केले होते.मस्त झाले.
एकदम हटके रेसिपी
एकदम हटके रेसिपी !!!
धन्स
भन्नाट कल्पकता ...अगदी एखाद्या शेरात पुढेमागे मी वापरीन की काय अशी
आज केलाय हा पराठा. खरंच खस्ता
आज केलाय हा पराठा. खरंच खस्ता कचोरी आणि आलूपराठा ह्या दोन्हींतील सुवर्णमध्य. अतिशय सुंदर चव आणि थोडासा बटाटा + भरडलेले मूग ह्याचे मिश्रण इतके मस्त मिळून आलेय. ना चिकट, ना भरभरीत. इतक्या गुणी रेसिपीकडे माझे दुर्लक्ष झाले. आता ह्या पुढे नियमित करणार. धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages