मंडळी,
तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ट्रेक दरम्यान काही मजेशीर किस्से अनुभवायला मिळाले असतीलचं … जसे कि एखाद्या गावातल्या मामांनी टाकलेली सणसणीत थाप, किंवा एखाद्याचा झालेला पोपट (?), … गावातल्या मामाची जरा जास्तंच झालेली आणि त्यातून त्याने सांगितलेली उलट-सुलट माहिती … किंवा करायला गेलो एक आणि झाले भलतेच …वगैरे वगैरे …
जमल्यास असले अनुभव इथे सगळ्यांना Share करा …अशी विनंती
माझ्याकडून पहिला किस्सा :
खुटेदरा ट्रेक दरम्यान रामपूर गावातल्या तानाजी मामांनी दुर्ग किल्ल्यावर 'सिंह' सुद्धा आहेत असा ठणकावून सांगितलं होतं :
वाटेत जंगली प्राण्यांची चौकशी केल्यावर तानाजीमामांनी गडावरच्या जंगलात वाघ, अस्वल, हरीण, रानडुक्कर आणि 'सिंह' सुद्धा आहेत...!!!! असं सांगितलं ... मजबूत-पाट्या ने 'सिंह' फक्त भारतातल्या 'गिर' अभयारण्यातचं सापडतात असा स्पष्टोल्लेख केला... तरी पण तानाजीमामांनी वर 'सिंह' आहेतचं असं ठणकावुनच सांगितलं ...तत्त्व महत्त्वाची ....
http://www.bankapure.com/2012/12/Khutedhara-Durg-Trigundhara.html
DAMN IT! - आता आठवावे लागतील
DAMN IT! - आता आठवावे लागतील
विसापुरला घातलेली प्रदक्षिणा
विसापुरला घातलेली प्रदक्षिणा आठवतेय मला.
ओढ्याच्या वाटेने वर जायचं आहे. जिथे खुण म्हणून एक दगडी घोडा आहे.
हॅ असला रस्ता असतो व्हय, ह्यो तर वढा हाय अस खच्चुन म्हणुन पुढे गेलो. आणि मग काय राउन्डच की.
फिरुन पार गुहा आणि हनुमान मुर्ती लागतात तो रस्ता सापडला कसा बसा.
त्याने वर गेलो.
लै थकलेलो पायपीटीमुळे पण तरिही विसापुर उतरुन (त्याच ओढ्याच्या रस्त्याने जिथुन चढलो नाही) मग लोहगड देखील पुर्ण केलाच विन्चुकाट्यासहीत...
छान विषय काढलाय. यामुळे
छान विषय काढलाय. यामुळे जु्न्या आठवणी ताज्या होतील.
‘येळेला केळे अन् वनवासाला सिताफळ’
नुकतीच ट्रेकिंग व गड किल्यांची आवड निर्माण झाली होती. मी व माझे दोन मित्र मे महिन्यात लोणावळ्यातील ढाकचा बहिरी व राजमाची मार्गे कर्जत असा ३ दिवसांचा ट्रेकचा बेत आखला होता. जय्यत तयारी करून निघालो. जांभवलीमार्गे ढाकला गेलो. रात्री गुहेत मुक्कम केला. एव्हानापर्यंत सर्व ठिक चालले होते. जेवणाचे सामान व पाण्याच्या बाटल्यांमुळे माझी कॉलेजची वापरायची सॅक तुंडूब भरली होती. नवीनच ट्रेकिंगची आवड निर्माण झाल्याने साधनसामुग्रीची कमतरता होती.(सॅक, बुट). अशातच सकाळी राजमाचीला जायला निघालो. मी पुढे व दोन मित्र काही अंतरावर मागे चालत होतो. चालून चालून पाय चांगलेच दमले होते. सॅकच्या वजनाने खांदे दुखत होते. तरीही एक एक पाऊल पुढे टाकत राजमाचीकडे प्रस्थान ठेवत होतो. वरून घामाघूम करून टाकणारे व चटके देणारे ऊन लागत होते. अचानक मागून मित्रांचे ओरडणे ऐकू आले. थांबलो तर ते पळतच येत होते. त्यांच्या हातात मॅगीचे पुडे, पाण्याची रिकामी बाटली व अन्य सामान होते. सॅकमधून चाकू, मॅगीचे पुडे, कांदे, बटाटे आणि काही बारीक वस्तू रस्त्यावर पडलेल्या त्यांना मागून येताना दिसल्या. नशीब मागे असल्याने त्यांना त्या वस्तू मिळाल्या. अजून राजमाचीचे अंतर बरेच लांब होते. सॅकची अवस्था पाहून सगळ्यांनाच हसू आले. पोटभरून हसून झाल्यावर आता हे सामान कुठे ठेवयाचे याची चिंता होऊ लागली. ट्रेकिंग म्हणजे ऐनवेळचा जुगड करणे असे वाटू लागले. पांघरूणाच्या चादरीत सामान भरून गाठोडे खांद्यावर घेऊन आमचा पुढील प्रवास सुरू झाला. सॅक खालून चांगलीच फाटली होती. एव्हना दुपारचे २ वाजले होते. कसेबसे राजमाचीच्या पायथ्याच्या गावात पोहोचलो. तेथे कुठे शिवण्यासाठी काही मिळते का ते पाहू लागलो. एका गाववाल्याकडे सिमेंटचे रिकामे पोते मिळाले. आनंद वाटला ‘येळेला केळे अन् वनवासाला सिताफळ’ ही म्हण पटू लागली. पोते स्वच्छ होईस्तोवर झटकून नंतर पाण्याने धुतले. पुन्हा पंचायत नको म्हणून एक सोडून दोन पोती घेतली. पैसे देऊ केले तरी त्या गाववाल्याने पैसे घेतले नाही. दुसºया दिवशी सकाळी पुन्हा खांद्यावर पोते टाकून आम्ही कर्जतकडे रवाना झालो. वाटेत गावातील लोक हे नवीन काय? (पोते) म्हणून आमच्याकडे आश्चर्याने पाहत होती. कर्जतला गाडीत पोहचोस्तोवर काही लाज वाटली नाही. नंतर मात्र, जसे पुण्याकडे येऊ लागलो तेव्हा पोते घेऊन ट्रेकिंगला निघाला काय? असा प्रश्न सहप्रवाशांनी विचारल्यावर उगाचच
शरमल्यासारखे वाटले. तेथून घरी आल्यावर पुढील आठवड्यात ट्रेकिंगसाठी चांगली सॅक विकत घेतली. आजही पोते घेऊन केलेला हा राजमाचीचा ट्रेक आठवला की हसू आवरत नाही.
www.ferfatka.blogspot.in
फेरफटका.. छान अनुभव
फेरफटका.. छान अनुभव
फेरफटका, नशीब मे महिन्यात
फेरफटका,
नशीब मे महिन्यात ट्रेक केला होतात, डिसेंबरमध्ये केला असता तर मुले "सांताक्लॉज सांताक्लॉज" करत मागे लागली असती.
गमभन
गमभन
राजमाचीचा अनुभव..आठ दहा
राजमाचीचा अनुभव..आठ दहा वर्षांपूर्वीचा....
असेच सगळे सामान सुमान घेऊन जात असताना तिथली उघडी वागडी पोरे आम्हाला बघून लांबूनच खाऊ आला खाऊ आला असे ओरडायला लागली...
थोडे पुढे आलो तरी हाच प्रकार....सगळे जण आमच्याकडे बघून फक्त खाऊ आला खाऊ आला ओरडत होते...
आमच्याबरोबर एकजण पहिल्यांदाच ट्रेकला आला होता...त्याने घाबरत घाबरत एक भन्नाट थिअरी मांडली...
म्हणे हे अदिवासी लोकं आहेत. आणि त्यांच्या प्रमुखांना ओरडून सांगतायत की खाऊ आला म्हणून...आता आपल्याला पकडून ते खाणार....
मी म्हणजे हतबुद्ध होण्याच्या पलिकडे गेलो होतो
फेरफटका.. पोत्याचा अनुभव भारी
फेरफटका.. पोत्याचा अनुभव भारी !
गमभन, आशू
गमभन, आशू
गमभन, आशू ........
गमभन, आशू ........
पोत्याचा किस्सा मजेशीर
पोत्याचा किस्सा मजेशीर #ferfatka . >ढाकला गुहेत राहिलो < कोणती गुहा ?~~~~~~~~~~~~~~~~मी एकदा चौंढेमार्गे रतनगडला जातांना मे महिन्यात घाटात करवंदं खाण्याच्या नादात पाय घसरून चपलेचा पट्टाच तुटला .खालचे तळकट राहिले .ते पण अमुल्य होते .दोन दिवसांनी भंडारदऱ्याला पोहोचल्यावर चप्पल मिळणार होती .एका बारीक नायलानच्या दोरीने तळकट पायाला बांधले .दोन तासाने पायाला वळ उठला .मग त्यात रुमाल घातला .चांगलाच ट्रेक झाला .
पोतं खाउ
पोतं
खाउ
हा ट्रेक नाही म्हणता येणार
हा ट्रेक नाही म्हणता येणार पुर्णपणे.
एकदा आम्ही एक स्कूटर (२ माणसे) आणि एक लुना (१ हलका माणुस) चिखलदर्याला गेलो होतो. परत येतांना स्कूटर बंद पडली. काही अंतर उतारावर नेली तशीच. कीक मारुन थकलो तसं एका ठिकाणी थांबलो. भुक लागली म्हणुन उरलेला डबा वगैरे काढला, आणि हात धुवायला जरा इकडे तिकडे बघितलं. एक बोर्ड दिसला. तो कसला म्हणुन बघतो तर काय, त्यावर लिहिलं होत, "सावधान, इथे वाघ भटकतात".... डबा पॅक, आणि लगेच स्कूटर धकलत निघालो. पुढे ७-८ किमीवर एका गावात दुरुस्ती झाली अन रात्री ११-१२ लाअमरावतीत पोचलो.
फेरफटका, एक शंका.. ते पोतं
फेरफटका, एक शंका.. ते पोतं सॅकच्या आत टाकून त्यांत सामान कां नाही भरलं? सॅक खालून पूर्ण फाटली असेल तर वरून खालपर्यंत एका दोरीने बांधली असती तरी सॅक व्यवस्थित पाठीला राहिली असती..
आमची परिस्थिती वाचून मजा येत
आमची परिस्थिती वाचून मजा येत असेल. पण त्यावेळी चांगली तारांबळ उडाली होती. एकाच खांद्यावर पोते उचलल्यामुळे खांदे चांगलेच दुखत होते.
>ढाकला गुहेत राहिलो < कोणती गुहा ?.........>
कामशेतच्या आतमध्ये जांभवली म्हणून एक गाव आहे. तेथून पुढे पायी चालत कोंडेश्वर व तेथून पुढे ढाकचा बहिरी आहे. या ढाकच्या बहिरीच्या पोटात एक गुहा आहे. थोडे रॉक क्लायम्बिंग करावे लागते.
हेम
<फेरफटका, एक शंका.. >
ढाकच्या बहिरीवरून सकाळी निघालो व वाटेत आमची सॅकची दुरवस्था झाली. कॉलेजची सॅक होती. जास्त मोठी नव्हती. त्यात कोंबून सामान भरले होते. त्यात खालून अर्ध्याच्या वर सॅक फाटली होती. त्यात बांधायला दोरीही नव्हती. वरती उन एवढे होते की पांघरूणात सामान भरून राजमाचीला गेलो. तेथे सॅक शिवण्यासाठी विचारले परंतु काही लवकर उपलब्ध झाले नाही. असेही ते गाव लोणावळ्यापासून अंदाजे १९ ते २० किलोमीटर अंतरावर आहे.
परिस्थिती अशी होती की सॅकमध्ये पोते टाकून दोरी लावण्याचा विचार आला नाही. काम झाले हाच आनंद मानून पुढील ट्रेकिंग केले.
यापुढेही मित्रांबरोबर राजमीचीला अनेकवेळा गेलो. जेव्हा कधीही तेथून निघायचो तेव्हा आमच्याकडील उरलेले रॉकेल, काडेपेटी बॉक्स, मेणबत्ती, उरलेले तांदूळ, बटाटे असे गावातील काही गावकºयांना द्यायचो. कारण यावढ्या दूर अंतरावर या गोष्टी त्यांना सहजासहजी मिळणे फारच आनंददायक असते. सुई आणायला देखील गावकºयांना १८ किलोमीटर पायपीट करावे लागते. बिकट परिस्थिती आहे.
आम्ही २००९ साली १५ ऑगस्ट
आम्ही २००९ साली १५ ऑगस्ट साल्हेरवर साजरा केला होता. "भारताच्या तिरंग्याला महाराष्ट्राच्या सर्वोच्च किल्ल्यावरून मानवंदना द्या" अशी थीम असलेल्या त्या ट्रेकला प्रचंड प्रतिसाद मिळाला. साल्हेरच्या परशुराम शिखरावर मी साल्हेरचा इतिहास आणि त्याची लढाई पूर्ण वर्णन केली. नंतरच्या चर्चेत काही कारणाने पेशवाई आणि नाना फडणीस यांचाही विषय झाला. त्या ट्रेकला आलेल्या नॉन - महाराष्ट्रीयन तरुणांच्या ग्रुप पैकी एकाने सग्गळं सांगून झाल्यावर मला विचारलं "सर,ये सब तो ठीक है…लेकिन ये नाना फर्नांडीस कौन था ??? "
अजूनही नाना माझ्या स्वप्नात येउन मला त्याच्या धर्मांतराबद्दल छळत असतो !!!!
नाना फर्नांडीस
नाना फर्नांडीस
#ferfatka ,बहुतेक तुम्ही
#ferfatka ,बहुतेक तुम्ही चांगल्या अनुभवी ग्रुपबरोबर ढाकला गेला होतात .बहिरीच्या गुहेत मुक्काम करायला कोणी जात नाहीत .सांडशी गावातून ढाक ते जांभवली करताना मी तीन वेळा वाट चुकलो आहे .तिसऱ्या खेपेस कोंडेश्वरला गेलो .पण तिकडून राजमाची नाही केले .पोते नेताना कुत्री मागे मागे लागली नाहीत का ?
मस्त आहेत एकेक किस्से.
मस्त आहेत एकेक किस्से.
भारी किस्से. बंकापुरे शीर्षक
भारी किस्से.
बंकापुरे शीर्षक तेवढे दुरुस्त करा. आलेले मजेदार अनुभव किंवा घडलेले मजेदार किस्से. ़आलेले किस्से नव्हे.
माझ्याकडून अजून एक थोडा
माझ्याकडून अजून एक
थोडा वाह्यात आहे....
हरिश्चंद्रगडावरच्या अनेक भटकंतीपैकी एक...नक्की कुठली ते लक्षात नाही...तर त्यावेळी --- म्हणून एकजण आमच्याबरोबर होता...शनिवार रविवार असल्याने गडावर तुफान गर्दी होती...सकाळी डबे टाकायला गडबड होणार म्हणून आमच्यासारख्या अनुभवींनी पहाटेच उठून कार्यक्रम उरकून घेतला होता. पण ---च्या हे लक्षात आले नाही..
साहेब निवांत उठून गेले बाटली वगैरे घेऊन....थोड्या वेळाने आला ते पटापटा कपडे बदलून दुसरे घातले आणि बसून राहीला...
म्हणलं काय झालं रे....
तर म्हणे अरे राव कसली गर्दी...च्यायला तिकडे झाडीत गेलो होतो...जरा मोकळी जागा बघून बसलो...थोडा वेळाने तिकडून तीन चार पोरी यायला लागल्या रे...सॅक वगैरे घेऊन चालल्या होत्या...नेमक्या माझ्याच साईडने आणि झाडीत खाली बसल्याने मी लांबून दिसत नव्हतोच.एकदम जवळ आल्या आणि मला बघत लगेच तिकडे पळून गेल्या..च्यामायला
हे ऐकताच आम्ही प्रसंग इमॅजिन करून हसायला लागलो...मग त्याला विचारले मग केलेस काय तु...
काय करणार च्यामारी....शर्टात तोंड झाकून घेतले आणि त्यांच्याकडे पाठ केली....चेहरा दिसला असता तर फुल इज्जत का फालुदा....जो काय भाग दिसला त्यावरून काय मला ओळखणार नाही...आणि शर्ट बदलून टाकला....
आपला डोकंच भारी चालतं.....
अरे बापरे....आम्ही म्हणजे गडाबडा लोळण घेतली हे ऐकून...
सह्याद्रीमित्र.. शेवटचे
सह्याद्रीमित्र.. शेवटचे वाक्य म्हणजे
इतर किस्से पण मस्त आहेत.
आशु
आशु
गडावरून ‘परसागड’
गडावरून ‘परसागड’ वर
आशुचँप,
डबे टाकण्याचा किस्सा वाचून चांगलेच हासायला आले.
डोळ्यासमोर खरोखरीचे दृश्य साकारले. व्वा. शर्टात तोंड झाकून हा बाका प्रसंग चांगलाच निभावून नेलेला आहे.
असे प्रसंग ट्रेकिंग करते वेळी अनेक वेळा येतात. पण याबद्दल एवढे डिटेल कोणी बोलत (लिहित) नाही. मजा आली. गावा शेजारील रानात, नदीकाठी, गर्द झाडीत तेथील स्थानिक नागरिक अथवा पाळीव जनावरे (म्हैस, रेडा, बकरी, डुकरे) दिसल्यास चांगलीच पंचायत व्हायची. असे एखाद दोन प्रसंग आमच्यावरही आले. पण थोडक्यावर निभावून जायचे. नंतर एकाला पाळत ठेवायला सांगून कार्यक्रम आटपायचो. असो.
मी लहान असताना वडिलांची आजी आमच्याकडे यायची. आधे मधे ‘परसागड’ला जाऊन येते म्हणायची. तेव्हा न कळल्यामुळे कुठल्या ‘गडावर’असे विचारायचो. तेव्हा सगळे हसायचे.
बंकापुरेने सुरू केलेल्या विषयाला अचानक गडावरून परसागडाकडे कडेलोट करण्यात आले आहे.
हाहाहा...परसगडाचे भरपूर
हाहाहा...परसगडाचे भरपूर किस्से आहेत माझ्याकडे....
अजून एक...
तुफानी पावसात राजमाचीचा ट्रेक केला होता...मस्त कोरडे कपडे चढवून..पिठलं भाकरी हाणून सगळ्यांनी ताणून दिली होती. पण एकाला निसर्गाने जोरात हाकारले...आता त्याची झाली पंचाईत...एवढ्या रात्री एकट्याने जाऊन डबा टाकायची भिती वाटत होतीच पण त्यात काय चावलं बिवलं तर काय हे पण...मग त्याने हळूच सगळ्यांना उठवून सोबतीला चलण्याची विनंती सुरु केली...पण कुणी दाद देईना...
एवढी मस्त झोप सोडून पुन्हा तो ओला रेनकोट, ओले बूट घालून धोधो पावसात डबा टाकायला सोबत म्हणून जाणे ...अराररा...
मग त्याने अगदीच कळकळीची विनंती करायला सुरुवात केली आणखी वेळ काढला तर मग भलतीच पंचाईत होईल म्हणून मग तू जारे..तू जारे सुरु केले...त्याने पण निर्णय होईना म्हणून एवढ्या रात्री चक्क चिठ्ठ्या टाकल्या....आणि मग ज्याचे नाव आले त्याने चरफडत रेनकोट चढवायला घेतला..तो पर्यंत पहिला मित्र खोळंबलेलाच...
यावर कहर म्हणजे ही दुक्कल गेली आणि थोड्याच वेळात जोरजोराने ओरडायचा आवाज आला...ही काय आता भानगड म्हणून आम्ही दारातूनच डोकावलो...तर दुसरा मित्र पहिल्याच्या नावाने ठणाणा करत होता...शेवटी त्याला हाळी देऊन विचारले काय रे बाबा काय झाले...
तर म्हणे अरे एवढ्या रात्रीचे झोपमोड करून, पावसाचे बाहेर काढले आणि मोजून अर्धा मिनिट पण बसला नाही. याला काय अर्थ आहे का...आता मी सांगेपर्यंत बसून रहा साल्या...
आशुचँप >>
आशुचँप >>
जीवधन नाणेघाटला गेलो असतानाचा
जीवधन नाणेघाटला गेलो असतानाचा एक अनुभव. नाणेघाटाच्या गुहेत रात्री आमचा मुक्काम होता. आम्ही ४-५ जणं आरामात पथारी मारुन झोपतच होतो तितक्यात एक ८-१० जणांचा ग्रूप दाखल झाला. लहान शाळकरी पोरं पोरी आणि त्यांचे दोन "ट्रीप" लीडर्स.
आधीच ती गुहा बारीक, त्यात तिकडे छोट्या छोट्या किड्या-खेकड्यांचा सुळसुळाट!!
हसणं खिदळणं झाल्यावर कसे बसे सगळे झोपेत शिरत होते. इतक्यात शेजारी झोपलेल्या आमच्या रांगड्या मित्राच्या हातावरून खेकडा सदृश प्राणी कूच करत आला! "श्याss.." करून त्याने जोरात हात झटकला. तो खेकडा बहुधा पलीकडच्या ग्रुपच्या एका बाल कलाकारा च्या अंगावर पडला!!
तो जोरात किंचाळत उठला…. "आई…. उई"!!!
त्या ट्रिप लीडर भगिनी ला वाटलं त्याला "सपान" बिपान पडलं का काय!! तीने उठून त्याला थोपटंलं, "काही नाही हा…काही नाही …झोप झोप"!!
तेव्हड्यात आमच्या मित्रानं आवाज टाकला, "ओ…… काई नाई काय काइ नाई! खेकडा पडलेला दिसतोय त्याच्या आंगावर"!!!
झालं!!! सगळे ताडकन उठून मोबाइल च्या प्रकाशात खेकडा शोधायला सुरु……….
निम्म्या जणांना तर नंतर झोपच लागली नसावी!!
*****************************************************
"डब्याचा" प्रसंग माझ्या मित्राच्या बाबतीतही झाला आहे. फक्त त्याला शर्टात तोंड खूप्सायचाही वेळ मिळाला नाही. पाय वाटेवरून येण्यारया एक बाई समोर उभ्या ठाकून त्याला म्हणाल्या, "आता काय आमचे पाय भरवता का काय"!
चिमाजी < "आता काय आमचे पाय
चिमाजी
< "आता काय आमचे पाय भरवता का काय"!>
रूनी पॉटर | 2 August, 2013 -
रूनी पॉटर | 2 August, 2013 - 21:17
हाहा भारी किस्से.
बंकापुरे शीर्षक तेवढे दुरुस्त करा. आलेले मजेदार अनुभव किंवा घडलेले मजेदार किस्से. ़आलेले किस्से नव्हे.
@ रूनी पॉटर
शीर्षक बदलण्यात आलं आहे … चूक दाखवून दिल्याबद्दल ...मनापासून धन्यवाद
फर्नांडीस
फर्नांडीस
Pages