आज सकाळी फेसबुक वर चाळे करत असताना एक मालिकेचे पेज सापडले..त्या पेज चे नाव होते " GIANT ROBOT "
माझ्या लहानपणीचा पहिला सुपर हिरो.. जायंट रोबो..
त्यावेळेला ८८ -८९ च्या सुमारास ही मालिका लहान मुलांमधे प्रचंड गाजली. दर रविवारी सकाळी ९ / १० वाजता लागायची. फक्त त्याच्यासाठी मी सकाळी इतक्या लवकर उठायचो ते पण रविवारी..
सुरुवातीला दुरदर्शन सा सुप्रसिध्द लोगो त्याच्या साईंनिंग ट्युन सहित टिव्हीवर दिसायचा.
पॅ अॅअॅअॅआआ पेआ आ आआआआआअ
ट्न टनन टन्न टन्न ट न न
नंतर ५ मिनिट जाहिराती त्यात "गोल्ड स्पॉट" , "लिम्का", लिज्जत पापड वाला ससा आणि लिरिल....(लिरिल च्या वेळी डोळे झाकले जायचे, घरच्यांचा दमच तसा होता...;)
हे सगळ झाल्यावर पडद्यावर अवतार घ्यायचा ..........जायंट रोबोट.. आणि त्याचा लहान मालक "जॉनी सोको"
जो घड्याळात बघुन रोबोट शी संवाद साधायचा..मला फार अप्रुप होते त्याचे घडाळ्यात कसे बोलले जाते. मग आजोबा ऑफिस मधुन घरी आले की त्यांचे "घड्याळ" घेउन घरभर "कॉलिंग जायंट रोबोट" करत फिरत असायचो.. जायंट रोबोट चे कवायती बघुन काहीही घरच्यांनी काम सांगितले की आधी दोन्ही हात कवायत करत उठायचो.. हात इकडे तिकडे करुन झाल्यावर मग कामाला लागायचो..घरचे सुध्दा "रोबोट उठला ना आता सगळी काम कर.रोबोट थकत नाही काही. न सांगता सगळे काम करतो" इत्यादी बोलुन मला हरभर्याच्या झाडावर चढवुन सगळी काम करुन घेत ..:)
जायंट रॉबोट च्या चालु झाल्यावर अजुन एक मालिका काही महिन्यांनी चालु झाली " Fireball XL5 "
ही मालिका मुख्यतः अंतराळवीरांवर होती.. लहान बाहुल्यांप्रमाणे दिसणारी माणसे.. त्यांची मान सारखी "कठपुतली" च्या बाहुलीप्रमाणे सतत हलणारी होती. जायंट रॉबोट पेक्षा ही मालिका जरा जास्त सुटसुटीत होती..
यात देखील एक लांब बल्ब प्रमाणे दिसणारा लहानसा रोबोट होता... "वांय्य्य्यव , व्वाय्य्यांव" सारखा सतत आवाज करायचा..... बोलक्या बाहुल्यांसारखा प्रकार होता..पण तेव्हा हे पहायला मज्जा यायची
.
अजुन एक - दोन मालिका होत्या .. एक होती बाईक रेसर वर.. ती बहुदा अमेरिकन होती...नाव आता आठवत देखील नाही.. दुसरी मालिका होती.. चालत्याबोलत्या लहान गोळ्या ज्या परग्रहावरुन आलेल्या.. त्या गोळ्या वेफर्स आईस्क्रिम खायच्या..एकमेकांवर मनोरा रचुन काहीही करायच्या...
.
लहानपणी धम्माल मालिका होत्या....आजच्या मुलांना काय अप्रुप त्याचे....
.
आपल्याला सुध्दा काही आठवल्या तर नक्कीच लिहा.....:)
अमोल पालेकर ची एक सिरीयल
अमोल पालेकर ची एक सिरीयल होती. त्यात त्याच्या मुलाची (रॉबिन) टीचर आणि अ.पा. चं शेवटी जुळतं.
खानदान म्हणूनही एक सिरीयल होती. श्रीराम लागू, तनुजा, नीना गुप्ता होते त्यात.
भारत-एक खोजपण छान होती.
भारत-एक खोजपण छान होती. जेव्हा दूरदर्शन होते, खाजगी वाहिन्या आल्या नव्हत्या तेव्हा दुपारी तासभर बालचित्रवाणी लागायचे, आणि संध्याकाळी कार्यक्रम सुरु व्हायचे, तेव्हा आम्ही सगळेच prg. बघायचो, ओल्ड फॉक्स लागायची (त्यातलं काही कळायचे नाही, शाळेत होतोना मराठी medium), खूप आवडीने बघायचो.
त्यावेळी मालिकाच नाही इतर भाषेचे चित्रपटपण आवर्जून बघितले जायचे.
रामायण-महाभारत यांनीतर इतिहास घडवला.
किले का रहस्य आठवतेना max.
बालपणीच्या नाही पण ह्या
बालपणीच्या नाही पण ह्या मालेका आवडायच्या
Different Strokes
I dream of Jeannie
Silver Spoon
Who is the boss
सोनीवर दाखवायचे
किलबील हे एक हे दुरदर्शनवरच.
किलबील हे एक हे दुरदर्शनवरच. लहान मुलांसाठीच.
आणि एक किल बील टोरेन्टीनोचा पिक्चर ज्यातली मारधाड आणि कापाकापी बघुन मोठी माणसं बी घाबरत्यात..
प्रतिभा आणि प्रतिमा (बहुतेक मुलाखत असायची)
आमची माती आमची माणसं.
बातम्या
गोट्या सिरीयल
किले का रहस्य ऐकुन होतो.
कधीच पाहिल नाही. आमच्याकडे टिव्ही नव्हता आणि इतक्या उशीरा शेजार्यांच्याकडे जाउन टिव्ही बघणं शिष्टसंमत नसल्याने नाही पाहिलं.
अलिफ लैला पण असचं पहायला नाही मिळालं.
हो झकासराव आमच्याकडे टिव्ही
हो झकासराव आमच्याकडे टिव्ही नव्हता तेव्हा चाळसिस्टिम असूनही बाबा रात्रीचे पाठवायचे नाहीत टिव्ही बघायला दुसरीकडे पण आमच्याकडे टिव्ही घेतल्यानंतर आम्ही सर्वाना आवर्जून बोलवायचो रात्री, त्यामुळे ओल्ड फॉक्स, किलेका रहस्य सगळ्याबरोबर बघायला खूप मजा यायची.
<<क्विझ टाईम- सिद्धार्थ बसू
<<क्विझ टाईम- सिद्धार्थ बसू करायचा ना? त्यातच पहिल्यांदा राजदीप सरदेसाई यांना स्पर्धक म्हणून पहिले होते तेव्हा राजदीपची ओळख क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचा मुलगा म्हणून करून दिली होती, आता राजदीपचे स्वतःचे IBN हे news channel आहे.>>
@ अन्जू -- हो सिद्धार्थ बसू करायचा. लहान असल्यामूळे कळायचं नाही तेव्हा खूप पण सिद्धार्थ बसू खूप आवडायचा.
आणि एक आवर्जून सान्गावसं
आणि एक आवर्जून सान्गावसं वाटतं की या सगळ्या मालिकांची title songs खूप छान,अर्थपूर्ण असायची.
मिटि के
मिटि के रन्ग.............
दुनिया बदल गयी इन्सा बदल गये बद्ले नहि कभि मित्ति के रन्ग मिति के रन्ग......
प्रतेक एपिसोड मधे वेगळ्या स्टॉरीज असायच्या.
आणि राजु और उड्न तश्तरी..........आठवते का कोनाला?
एक शुन्य
एक शुन्य शुन्य
परमवीरचक्र
छायागीत
चित्रहार
अजुन एक सिरीयल होती ज्यात ३
अजुन एक सिरीयल होती ज्यात ३ वेगवेगळ्या वयोगटाच्या बायका घरं सोडून बाहेर पडतात. त्यातली वृद्ध स्त्री म्हणजे `फिअर्लेस नादिया' होती. सुरेख काम केलं होत.
<<<<< फीअरलेस नादिया नाही, त्यात 'नादिरा' होती. दीप्ती नवलची 'थोडा सा आसमान'.. नादिरा, दीप्ती नवल आणि तिसरी मोना आंबेगावकर होती.
एक विधाता म्हणून मालिका
एक विधाता म्हणून मालिका लागायची. बहुतेक विक्रम गोखलेची. तशीच एक प्रतिबिंब म्हणून. त्याचा ट्रॅक मस्त होता -
बिंबातून प्रतिबिंब जन्मले
प्रतिबिंबित हे बिंब जाहले
मोही गुंतून मृगजळा
कवटाळून बसले
रविवारी संध्याकाळी अशोक सराफची छोटी बडी बातें लागायची ती आठवते का?
अजून एक बहुतेक गिरीश कर्नाड,
अजून एक बहुतेक गिरीश कर्नाड, फिरदौस दादी ची सिरीयल होती. एक अनाथ मुलगा त्याने दत्तक घेतलेला असतो अशी काही तरी स्टोरी होती..आठवते का ती कोणाला?
शिवाय गुलमोहोर लेन..मिता वसिष्ठ ची आणि
फिरदौस दादी, माधवन, शेफाली छाया, इरफान ची बनेगी अपनी बात
आणि मोहन गोखले ची मि. योगी
त्या वेळच्या सगळ्या सिरियल
त्या वेळच्या सगळ्या सिरियल घरातल्या लहानांपासुन थोरांपर्यंत सगळ्यांनी एकत्र बसुन पहाव्या अशा होत्या... उगाच कोणाचे खून पाडण नाही, विबासं नाही, एका माणसाशी त्याच्या बायकोच अगणित वेळा लागलेलं आणि तितक्याच वेळा तुटलेलं लग्न नाही आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे एक मालिका युगे अठ्ठाविस चालणे नाही...
किलबिल मधुन मराठी इंडस्ट्रिला कितीतरी गुणी कलाकार मिळाले. अवधुत गुप्ते, बेला शेंडे त्यापैकीच बहुदा.... बेलाच माहित नाही, पण अवधुतच्या बोलण्यात एकदा किलबिलविषयी आल होतं.... आता म्हणजे आधिचा आयडॉल किंवा लिटिल चॅम्प लक्षात ठेवेस्तोवर दुसरा हजर....
जुनून नावाची एक मालिका
जुनून नावाची एक मालिका लागायची, छान होती.
वाकड्या तोंडाचा धीरजकुमार असलेली संसार नावाची मालिकापण लागायची.
एम्बी, त्या मालिकेचं नाव
एम्बी, त्या मालिकेचं नाव 'इंद्रधनुष'. Kenny G चं 'songbird' गाणं वापरलं होतं त्याचा टायटल ट्रॅक म्हणून. मला आवडायची ही सिरीअल. त्यात दीपा श्रीराम पण होती. कर्नाडची बहीण झाली होती.
करेक्ट रमड!! धन्यवाद. दीपा
करेक्ट रमड!! धन्यवाद. दीपा श्रीराम एकदम स्ट्रिक्ट असते
वाकड्या तोंडाचा धीरजकुमार
वाकड्या तोंडाचा धीरजकुमार असलेली संसार नावाची मालिकापण लागायची.>>>> हो हो आठवली. त्यात एक ढ्ब्बू हिरॉईन होती बहुतेक पण तिचा चेहेरा गोड होता.
आताच्या मालिकांबद्दल काही
आताच्या मालिकांबद्दल काही वर्षांनी असं भरभरून कोणी बोलेल असं वाटत नाही.
खरं आहे तुझे स्वप्ना.
खरं आहे तुझे स्वप्ना.
जलतरंग,' ताक धिना धिन' आदेश
जलतरंग,' ताक धिना धिन' आदेश बांदेकर यांनी केलेली पहिली मालिका, खूप छान होती. पण ती माझ्या बालपणीची नाही, माझे लग्न झाल्यानंतरची पण मला अतिशय जिव्हाळ्याची कारण माझा नवरा त्यात स्पर्धक होता.
पूर्वी 'गजरा' हि मालिका होती
पूर्वी 'गजरा' हि मालिका होती त्यात लक्ष्मीकांत बेर्डेला पहिल्यांदा बघितला, पाणीटंचाई आणि कागदटंचाई ह्या भागात तो होता. खूप मजा यायची.
कॅप्टन व्योम.... त्या
कॅप्टन व्योम.... त्या मालिकेच नाव 'सिग्मा' होत बहुतेक. ' अप्पू और पप्पू' नावाची एक असे रविवारी सकाळी......
'अप्पू और पप्पू की देखो यारी ...सबसे न्यारी सबसे प्यारी'
'कच्ची धूप' पण होती....त्यात भाग्यश्री ( मैने प्यार किया वाली) आणि आशुतोष गोवारीकर होते....
कोनाला डिस्ने चॅनेल वरची
कोनाला डिस्ने चॅनेल वरची "दॅटस सो रेवेन "ही सिरीयल माहीत आहे का ????
तिला भविष्यात काय होनार हे दिसत असायच .. मस्त्च होती..
मला जाम आवडायची
किलबील हे एक हे दुरदर्शनवरच.
किलबील हे एक हे दुरदर्शनवरच. लहान मुलांसाठीच.
>>>> झकास, काय आठवण काढलीस
एक ढ्ब्बू हिरॉईन होती बहुतेक पण तिचा चेहेरा गोड होता. >>>> श्रीपदा कि काय नाव होत. बी ग्रेड पिक्चर मध्ये काम केलीत तिने.
>>पूर्वी 'गजरा' हि मालिका
>>पूर्वी 'गजरा' हि मालिका होती त्यात लक्ष्मीकांत बेर्डेला पहिल्यांदा बघितला, पाणीटंचाई आणि कागदटंचाई ह्या भागात तो होता
हो....पाणीटंचाईच्या एपिसोडमध्ये तो वाटीतून पाणी घेऊन आंघोळ करत असतो
विक्रम वेताळ, करमचंद ह्यासारख्या मालिकांचं शीर्षकगीत तर फक्त एक-दोन शब्द घेऊन केलं होतं. 'विक्रम और वेताल...विक्रम और वेताल.....विक्रम विक्रम....वेताल वेताल.....विक्रम विक्रम....वेताल वेताल..." आणि 'करमचंद....करमचंद.....करमचंद....हूsssss'
तसंच सिंहासन बत्तिसी म्हणून एक मालिका होती त्यात विजयेन्द्र घाटगे राजा होता. सांझा चुल्हा म्हणून पंजाबच्या जीवनावर एक सिरियल होती.
किलबिलची एक आठवण अशी आहे कि
किलबिलची एक आठवण अशी आहे कि आमच्या शाळेच्या मुलांचा एक prg पूर्ण एपिसोड होता ८९ किंवा ९० सालची गोष्ट, त्याचे निवेदन आमच्या शाळेच्या 'पल्लवी आठल्ये' म्हणून एका मुलीने केले होते (जी आताची 'ऐश्वर्या नारकर' म्हणून ओळखली जाते). माझी बहिणपण एका नाचात होती.
श्रीपदा कि काय नाव होत.>>>>
श्रीपदा कि काय नाव होत.>>>> बरोबर.
अरे!!! बुनीयाद पुन्हा सुरू
अरे!!! बुनीयाद पुन्हा सुरू झालेय गुरूवारी दुरदर्शनवर.
कुणी पाहीलय का? किती वाजता असत ते?
विक्रम गोखलेची मालिका विधाता नाही द्विधाता. बिंबातून प्रतिबिंब जन्मले हे त्याच टायटल साँग. दुभंग व्यक्तीमत्वावर आधारीत होत.
प्रतिबिंब नावाची वेगळी सिरीयल होती.
गुगु, द्विधाता हे नाव बरोबर.
गुगु, द्विधाता हे नाव बरोबर. पण त्याचं टायटल साँग असं नव्हतंच हे नक्की. एकदाच 'द्विधाता ...' असं म्हटलं होतं आणि पुढे म्युझिक होतं. बिंबातून प्रतिबिंब जन्मले हे दुसर्या कशाचं तरी असेल मग ( जर प्रतिबिंब चं नसेल तर!)
रमद ते प्रतिबिंबचच टायटल साँग
रमद ते प्रतिबिंबचच टायटल साँग आहे.
Pages