लाखात व्हायचा तो काही हजार झाला
डोळे भरून आले, पहिला पगार झाला
=======================
हृदयासमीप आता कोणी न राहिलेले
काहीतरी उगाचच वरच्या खिश्यात ठेवू
=======================
स्वतःला ओळखाया फार तर ही शंभरी
तरीही भाजतो मी लष्कराच्या भाकरी
=========================
मोल आपले झाले केवढे कमी आता
जोकराविना त्यांची लागते रमी आता
======================
परकेपणाने वागणे जमलेच नाही
माझ्यामधे माझे हृदय रमलेच नाही
======================
थोडे जगून झाले, थोडे अजून आहे
मीही जगाप्रमाणे आहे म्हणून आहे
=====================
नव्या घराच्यासमोर माझा मुशायरा ठेवशील का
जुन्या जमीनीमधील गझला पुन्हा पुन्हा ऐकशील का
=====================
कशाला राबतो आहे मलासुद्धा कळेना
मला पैसा नको आहे तुला मुद्दा कळेना
=======================
इथे कदाचित असेनही मी नसायला
कुठेतरी पाहिजेच का मी असायला
=====================
पारवे झालेत सध्या केवढे
काय पण मी काढतो आहे विषय
====================
-'बेफिकीर'!
हृदयासमीप आता कोणी न
हृदयासमीप आता कोणी न राहिलेले
काहीतरी उगाचच वरच्या खिश्यात ठेवू
>>> हा शेर अप्रतिम आहे !!
(अवांतर : बाकी कथेची आतुरतेने वाट पहात आहे ! )
वाह, छानच!!!
वाह, छानच!!!
(अवांतर : बाकी कथेची आतुरतेने
(अवांतर : बाकी कथेची आतुरतेने वाट पहात आहे ! )<<< गिरीजा मॅडम, ह्या कथेची का?
धन्यवाद
फुटकळ पण खूप सुंदर शेर आहेत
फुटकळ पण खूप सुंदर शेर आहेत भूषण जी...
जवळजवळ सर्वच द्विपदी आवडल्यात..
धन्यवाद अरविंदराव
धन्यवाद अरविंदराव
सगळेच शेर आवडले.
सगळेच शेर आवडले.
तुम्ही शब्दांस लिहिता की
तुम्ही शब्दांस लिहिता की मिरविती शब्द तुम्हाला
असो फुटकळ असो मौलिक गझल धार्जिण तुम्हाला
प्रत्येक द्विपदीत एका गझलेची इमारत लपलेली, शेवटच्या द्विपदीबद्दल उत्सुकता.
धन्यवाद विदिपा व भारती
धन्यवाद विदिपा व भारती
वा वा ,,,सगळ्याच द्विपदी
वा वा ,,,सगळ्याच द्विपदी दिलखेचक..
कोणता कोट करावा ? सारेच शेर
कोणता कोट करावा ?
सारेच शेर काबिल-ए-तारीफ !!!
धन्यवाद!
लाखात व्हायचा तो काही हजार
लाखात व्हायचा तो काही हजार झाला
डोळे भरून आले, पहिला पगार झाला
=======================
हृदयासमीप आता कोणी न राहिलेले
काहीतरी उगाचच वरच्या खिश्यात ठेवू
=======================
स्वतःला ओळखाया फार तर ही शंभरी
तरीही भाजतो मी लष्कराच्या भाकरी
व्वा. एकाच धरतीचे शेर वाटले.
कशाला राबतो आहे मलासुद्धा कळेना
मला पैसा नको आहे तुला मुद्दा कळेना
=======================
पारवे झालेत सध्या केवढे
काय पण मी काढतो आहे विषय
====================
हे शेर फार आवडले.
धन्यवाद.
सर्व शेर छान वाटले पारवे
सर्व शेर छान वाटले
पारवे सर्वात विशेष वाटला
खिश्याचा सर्वोत्तम वाटला
काही हजार भिडला
नव्याजुन्या घरातला विरोधाभास खास बेफी स्टाईल
शंभरी भाकरी समजला नाही
थोडे जगून झाले वरून माझा एक सुटा शेर आठवला.......सहजच
मलाच ठेवायचे असावे....
म्हणून मी या जगात आहे
बाकी हे शेर ज्या गझलांमधून येतील त्यात्या गझल्स किती छान असतील? ...हा तर ट्रेलर झाला पिच्चर पहायला मजा येईल असे वाटले
सदैव तुमच्या गझलांच्या प्रतिक्षेत
वैवकु:)
परकेपणाने वागणे जमलेच
परकेपणाने वागणे जमलेच नाही
माझ्यामधे माझे हृदय रमलेच नाही
>> अप्रतिम
रच्याकने वरील रचनेत फुटकळ काहीच आढळले नाही
सर्वच शेर अप्रतिम आहेत
सर्वच शेर अप्रतिम आहेत !!
(अवांतर : बाकी कथेची आतुरतेने वाट पहात आहे ! )<<< गिरीजा मॅडम, ह्या कथेची का?
>>>>>>>>>>>>
मी तर सनम ची वाट बघतेय
कैलासराव, सुप्रिया, समीर,
कैलासराव, सुप्रिया, समीर, वैवकु, चिखल्याजी आणि मउ,
मनापासून आभारी आहे.
-'बेफिकीर'!
काही सुरेख आहेत, काही समजल्या
काही सुरेख आहेत, काही समजल्या नाहीत.
पगार , आहे म्हणून आहे , हृदय
पगार , आहे म्हणून आहे , हृदय रमलेच नाही , मुद्दा आणि पारव्यांचा विषय हे आवडले .
अतिशय छान.
अतिशय छान.
छान! <<परकेपणाने वागणे जमलेच
छान!
<<परकेपणाने वागणे जमलेच नाही
माझ्यामधे माझे हृदय रमलेच नाही >> आवडले!
धन्यवाद
धन्यवाद
पारव्याचा शेर खूप आवडला.
पारव्याचा शेर खूप आवडला.
लाखात व्हायचा तो काही हजार
लाखात व्हायचा तो काही हजार झाला
डोळे भरून आले, पहिला पगार झाला
मोल आपले झाले केवढे कमी आता
जोकराविना त्यांची लागते रमी आता
इथे कदाचित असेनही मी नसायला
कुठेतरी पाहिजेच का मी असायला
>> व्वाह्ह !!
लाखात व्हायचा तो काही हजार
लाखात व्हायचा तो काही हजार झाला
डोळे भरून आले, पहिला पगार झाला
थोडे जगून झाले, थोडे अजून आहे
मीही जगाप्रमाणे आहे म्हणून आहे
हे सर्वात छान वाटले.