Submitted by Kiran.. on 6 August, 2012 - 00:18
पुण्यातली चहाची प्रसिद्ध ठिकाणं कोणती ? त्या त्या ठिकाणच्या चहाचं आणि त्या दुकानाचं वैशिष्ट्य याबद्दलच्या चर्चेसाठी धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ज्ञानेश अभिनंदन
ज्ञानेश
अभिनंदन
अनुसया चीन कि जपान मधे चहा
अनुसया
चीन कि जपान मधे चहा म्हणजे एक सोहळाच असतो असं वाचलंय कुठेतरी. वर्षुतैच सांगेल याबाबतीत.
पुणे युनिव्हर्सिटी कॅन्टीन..
पुणे युनिव्हर्सिटी कॅन्टीन.. प्रत्येक कॅन्टीन मधला चहा वेगळाच असतो. पण मस्त असतो..
कमला नेहरु पार्कच्या बाहेरची टपरी.. ह्याचं नाव आठवत नाहीये..
कात्रजच्या चौकातली आज्जींची हातगाडी... शक्यतो अभ्यास करायचा कंटाळा आल्यावर रात्री जाऊन चहा प्यायचे ठिकाण...
जबरेश्वरचा पण चांगला असतो..
ग्राहकपेठेशेजारचे अमृततुल्य..
जरा वेगळे मत भारतात आता अगदी
जरा वेगळे मत
भारतात आता अगदी शुद्ध अशी चहाची पावडर मिळत नाही, चहाचे मळे हे बहुतेक ब्रिटिशांच्या काळातले. त्यानंतर ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढली त्या प्रमाणात लागवडीखालचे क्षेत्र वाढलेले नाही, त्यामूळे धोकादायक नाही आणि स्वादात फारसा फरक पडणार नाही, असे काही घटक त्यात मिसळले
जातात.
असम, दार्जिलिंग मधला जो अत्यंत महाग चहा असतो, तोच फक्त प्युअर असतो. चहाचा लिलाव असममधेच होतो.
त्यामानाने श्रीलंका, केनया इथे अजूनही शुद्ध चहा मिळतो. त्याची चव आपल्याला फारच वेगळी वाटते.
केनयात इन्टंट चहा मिळतो. (मारा मोजा) त्याची पावडर पाण्यात / दूधात विरघळते. त्याचीही चव
खास असते. भारतात नील या कंपनीचे असे चहा मिळतात. मी पाकिट आणलय, अजून उघडले नाहि.
इंग्लिशमधला टी म्हणजे फक्त चहाच असे नाही. सध्या बाजारात वेगवेगळ्या वनस्पतिंचे टी (म्हणजे काढे म्हणूया हवे तर ) उपलब्ध आहेत. त्यात आंबाडी, लेमन, दालचिनी, ग्रीन अॅपल, वाईल्ड बेरीज असे काही चहा, अगदी खास असतात. यात नुसते गरम पाणीच घालायचे असते. साखर पण नाही घातली तर चालते. पण सकाळचा पहिला कप जर या चहाचा घेतला, तर मूड एकदम छान बनतो. अर्थात प्रत्येकाला हे प्रकार आवडतीलच असे नाही.
मस्त पोस्ट दिनेशदा हिमस्कुल
मस्त पोस्ट दिनेशदा
हिमस्कुल >>>>>>> फक्त खड्ड्यातल्या कॅन्टीन चा म्ह्ण्जे ओपन कॅन्टीन चा चहा बरा आहे ...बाकीचे कॅन्टीन मधे कधीतरी चांगला चहा बनतो...आनि आदर्श मधे कधीतरीच
हिम्स्कूल, ती टपरी म्हणजे
हिम्स्कूल, ती टपरी म्हणजे सचिन टी स्टॉल
किरण, चहाचा सोहळा
किरण, चहाचा सोहळा जपानमध्ये.
चिनी चहा म्हणजे वेगळच प्रकर्ण आहे.
दिनेशदा अगदी अगदी. चहाची चव
दिनेशदा
अगदी अगदी. चहाची चव बदललिये यावर सगळेच बोलत असतात. तुम्ही त्याचे कारण अचूक सांगितलेत.
बाबु
चीनचं काय प्रकरण आहे ते ?
तो चहा विकत घ्यायला गेलो
तो चहा विकत घ्यायला गेलो तेव्हा नुस्ती सुकवलेली फुलं दिली.
(No subject)
किरण आणि जगभर चहा केवळ टी आणि
किरण आणि जगभर चहा केवळ टी आणि चहा या दोनच नावानी ओळखला जातो. भाषेत जर हि अक्षरे नसतील, तर त्या जवळपासचा शब्द वापरतात. उदा. फ्रेंचमधे थ, पोर्तुगीजमधे चाय आणि अरेबिकमधे शाय !
चीनमधे जाईची न उमललेली कळी, चहाच्या पानात गुंडाळून सुकवतात, किंवा पांढर्या शेवंतीची फुले सुकवतात. चहात उकडलेली अंडी पण लोकप्रिय आहेत (लाजोने लिहिली होती इथे )
अरेबिक लोकांमधे सुलेमानी चहा, म्हणजे चहात लिंबाचा रस पिळून पितात. छान लागतो तो.
(खरे तर त्यापेक्षा अख्खे लिंबू सुकवून त्याची पावडर करुन त्यावर पाणी घालून पितात, तो सोहारी चहा, जास्त चांगला लागतो.)
बापरे दिनेशदा.. ! मस्तच
बापरे दिनेशदा.. !
मस्तच माहिती आहे. रशियन चहा पण लिंबूवालाच असतो ना ? मी ग्रीन टी मधे लिंबू पिळून पितो. चव चांगली लागते. पण ग्रीन टी मधे लिंबू पिळावा का याचं उत्तर काही मिळालं नाही.
रशियन भाषेत चहाला चहा च
रशियन भाषेत चहाला चहा च म्हणतात आणि साखरेला, साखर च !
ग्रीन टि सहसा तसाच पितात. पण लिंबू पिळून आवडत असेल, तर तसा प्यायचा.
गौतम बुद्धाच्या पापण्यांपासून चहाची पाने निर्माण झाली, अशी एक चिनी लोककथा वाचली होती.
बाजीराव रोड्वर जिथे अक्शरधारा
बाजीराव रोड्वर जिथे अक्शरधारा बूक ग्यालरी आहे त्याच्या समोर एक छोटी टपरी आहे. लै भारी चहा मिळतो तिथे!
सहकारनगरमध्ये सारंगच्या
सहकारनगरमध्ये सारंगच्या पुढच्या चौकात भवानी टी म्हणून होते.... आताही असेल कदाचित.... अप्रतिम चहा मिळायचा तिथे.... कॉलेजच्या दिवसात आमच्या ३-४ चकरा व्हायच्या तिथे दिवसभरात.... आणि पीएलच्या रात्री जागवताना आम्ही थर्मास भरभरुन चहा न्यायचो तिथुन
बाकी तसा चहा नंतर कुठल्याच अमृततुल्यमध्ये मिळाला नाही!
बाजीराव रोड्वर जिथे अक्शरधारा
बाजीराव रोड्वर जिथे अक्शरधारा बूक ग्यालरी आहे त्याच्या समोर एक छोटी टपरी आहे. लै भारी चहा मिळतो तिथे
>>
हे खरे आहे पण तो लै थोडा देतो च्या....
प्रत्येक चहाप्रेमीने हा चहा
प्रत्येक चहाप्रेमीने हा चहा पहायलाच हवा !
फर्ग्युसनच्या मागचं पी.डी.
फर्ग्युसनच्या मागचं पी.डी. आता गेलं, पण सुंदर मिळायचा तिथे चहा...
बोहरी आळी चं कॅटीन नावाचा एक
बोहरी आळी चं कॅटीन नावाचा एक प्रकार आहे / होता. बोहरी आळीत एक कुठली तरी बँक (सारस्वत / युनायटेड तत्सम काहितरी). त्याच्या शेजारी मसाला चहा जबरी मिळतो. तिथला साबुदाणा-वडा, बटाटवडा पण खास.
बालगंधर्व चौकात, पण घोले रोड वर एक अमृततुल्य आहे/होतं, तिथला चहा पण मस्त.
सहकार-नगर ला गजानन महाराज चौकात मठासमोर चार पायर्या खाली उतरून गेल्यावर एक टपरी होती, तिथला चहा पण खास.
BMCC च्या बाहेर गाड्या लागायच्या, तिथला चहा - झकास.
मुंबई-पुणे हायवेवरून चिंचवड ल जो पूल उतरतो (चापेकर चौकाकडे जाणारा) त्या पूलाखाली एक टपरी आहे / होती - तिथला स्पेशल चहा - मस्त.
अमृततुल्यच्या चहामध्ये नक्की
अमृततुल्यच्या चहामध्ये नक्की काय मिसळतात ? त्यांच्या चहाची चव वेगळीच असते. त्या चवीचा चहा इतर टपरीवर नाही मिळत .
@Kiran.. <चीन कि जपान मधे चहा
@Kiran..
<चीन कि जपान मधे चहा म्हणजे एक सोहळाच असतो असं वाचलंय कुठेतरी.>
जपानमध्ये असतो, त्याला "सादो" असे म्हणतात. शेकडो वर्षांच्या परंपरेने तो चालात आला आहे. ह्या सोहळ्यात कोणी काय काम करायचे, कसे काय करायचे, त्या त्या वेळेला काय काय म्हणायचे असे सगळे नियमबध्द केले आहे आणि ते काटेकोरपणे पाळले जाते. सध्या मी याचे प्रशिक्षण घेत आहे. ह्याची एक झलक खालील चित्रफितीमध्ये आपल्याल बघायला मिळेल.
http://www.youtube.com/watch?v=LDfEFDDcWmo
जुन्या मुंबई-पुणे हायवेवर,
जुन्या मुंबई-पुणे हायवेवर, दापोडीला मेगामार्ट समोर 'हॉटेल अशोक' आहे, तिथला चहा मस्त आहे.
टिळक रोडवरचं बादशाही चौकातलं
टिळक रोडवरचं बादशाही चौकातलं अंबिका. मला चहा फारसा आवडत नाही, पण तिथला आवडतो. सोबत एक क्रिमरोल मस्ट!
आम्ही टिळक ऱोडजवळ पीजी म्हणुन रहायचो तेव्हा सकाळी थर्मास भरून आणायचो.
तूलसी !!!
तूलसी !!!
पावसात सिंहगडवर भिजत चहा आणि
पावसात सिंहगडवर भिजत चहा आणि भजी मिळवी असं वाटतंय..
आपल्याला तर पूण्याच्या
आपल्याला तर पूण्याच्या कोणत्याही ट्परीवरचा चहा अमृततुल्य वाटतो बाबा....
Pages