कार सीएनजीवर करावी का?

Submitted by ferfatka on 26 July, 2013 - 10:32

माझ्या मित्राकडे नवीन मारुती आल्टो आहे. पेट्रोलवर गाडी असल्याने साहजिकच परवडत नाही. हिंडण्याकरिता गाडी वापरत आहे.
ही गाडी सीएनजीवर कार्न्व्हट करता येईल का?
गाडीचे इंजिन अजून वॉरंटी पिरीअडमध्ये आहे.
सीएनजी केल्याने एंजिनला काही प्रॉब्लेम येत नाही?
अंदाजे काय खर्च येतो?

यासाठी हा प्रश्न.

जाणकारांनी माहिती द्यावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सी एन जी वर कन्वर्ट केल्यास वॉरंटी संपते ..

२०-३० ,००० खर्च आहे ..
इंजिनचा पिक अप कमी होतो ..डिकी स्पेस पूर्णपणे जाते ..

अजुन बरेच काही आहे ...सवडीने टंकतो

हलकट रिस्पॉन्स सुरू/
महोदय,
आपणास परवडत नसताना चार चाकी पेट्रोल गाडी विकत घेण्याचा अट्टाहास का केलात?
सीएनजी म्हणजे ग्यास कीट बसवणे अन त्यात स्वयंपाकाचे ग्यास सिलिंडर वापरणे असा त्याचा सरळ सीधा अर्थ होतो. हे नस्ते उद्योग करत जाऊ नका हे नम्र विनंती. या असले धंदे करणार्‍या लोकांमुळेच सर्वसामान्यांना ६ सिलिंडरची सबसिडी इत्यादी प्रॉब्लेम उत्पन्न झालेले आहेत.
सीएनजी रिफिल सेंटर्स, टाकीत एकदा भरलेला सीएनजी, अन 'हिंडण्या'साठी वापरलेली गाडी याचा हिशोब कधीही सीएनजीपंप टू सीएनजी पंप असा होत नाही, हे मी पैज लावून सांगतो.
धन्यवाद.
/रिस्पॉन्स समाप्त.

फायदे : सीएनजी हे फ्युएल पेट्रोल आणि एलपीजी पेक्षा सुरक्षित आहे. मायलेज वाढतो. क्लीन आहे. भेसळीची शक्यता नाही. डिझेलपेक्षाही स्वस्त आहे.
तोटे : सीएनजीचे पंप कमी आहेत. इंजिनला हानी पोहोचते किंवा नाही याबद्दल संभ्रमात. डिकीची स्पेस जाते. गॅसकीट वरचा खर्च बराच आहे. मागणी वाढल्यास सीएनजीची किंमत काय असेल सांगता येत नाही.

श्री. इब्लिस
आपल्या हलकट रिस्पॉन्सबद्दल प्रथम धन्यवाद
Sad
कारमध्ये वापरण्यात येणाºया इंधनाच्या विषयी सीएनजीविषयी अधिक माहिती विशेष कष्ट न करता मायबोलीवर मिळेल असे वाटले होते. (व ती मिळतेही) परंतु आपण केलेल्या उत्तरामुळे गगुलवर शोधमोहीम घेणे भाग आहे. तरीही लवकरच या विषयी माहिती गोळा करून येथे टाकतो. आपण टंकीत केलेली भाषाशैली फारच ‘इब्लिस’ आहे. असो. अशा सरळ व चांगल्या प्रश्नांना आपण असे वेडेवाकडे वळण लावून उगाचच ‘हलकट रिस्पॉन्स सुरू’ म्हणून हिणवू नका आपल्याला असलेली माहिती दुसºयाला कळाल्यास वाईट नाही ना.
रिस्पॉन्स समाप्त.

Company Fitted option का नाही घेतला आधीच?
माझ्या माहितीप्रमाणे Engine Maintenance खूप वाढतो नंतर, एकतर Company Fitted नाहीतर सरळ डिझेल वाहन.

अरेच्या, गाडी घेतानाच कंपनी फिटेड घ्यायला हवा होता. मित्र मिस्स्ड द बस..
तसही नवीन आल्टो ही बेस्ट मायलेज देणारी गाडी आहे. (पेट्रोल वर १८-२० किमी प्रति लिटर)

आल्टो ८०० नवीन सीएनजी वर कंपनी ३२ किमी प्रति किलो गॅस क्लेम करतेय (अ‍ॅज गुड अ‍ॅज माझ्या पल्सर चालवण्याइतकाच खर्च असेल जर फक्त फ्युएलचा विचार केला तर)

सीएनजी किट बसवायला जास्तीत जास्त ३० हजार पर्यंत खर्च येइल.
वॉरन्टी जाइल कारण तुम्ही एन्जिनच्या फ्युएल सिस्टीम मध्येच फेरफार करताय.
त्यामुळे वॉरन्टी पिरियड मध्ये नकोच असा माझा सल्ला आहे.
तरिही गाडी जिथुन विकत घेतली तिथेच विचारा काहि काम होइल का असे.
असो.

आधीच आल्टॉ लहान गाडी. त्यात बुट स्पेस कमीच. सीएनजीचा टॅण्क टाकला की पुर्ण स्पेस गेली.
ह्यासाठी नवीन आल्टो ८०० सीएनजी किट फिट केलेली गाडी बघा शोरुम मध्ये.सीएनजी पम्प कमी आहेत. (मित्रही जर पिं ची निवासी असेल तर) भक्ती शक्ती चौकात आणि जाधववाडी, स्पाइन रोडला लागुन असे दोन पंप जवळ आहेत.
एक चिंचवड मध्ये आहे पण तिकडे नेहमी बरीच रांग असते.

आताच्या हिशेबात सीएनजी परवडतोयच.
पण त्याचेही रेट्स वाढत असतात. वाढत जातील जशी मागणी वाढेल.
आगे का किसने देखा हय??

आता वेगळे उपाय कार परवडण्यासाठी.
१) कार पुलिन्ग.
२) एकटाच कुठे जायचं असेल तर बाइकच वापरणे (विथ हेल्मेट)
३) चार/ पाच (नियमानुसार गाडीच्या सीटीन्ग कपॅसिटीला अनुसरुन) लोकं असतील तर बिन्धास्त कार वापरा.
४) मानसिक आहे पण रिक्शाशी कम्पेअर करा. म्हणजे मी निगडी ते वल्लभनगर स्पेशल रिक्शा करुन गेलो तर १२० रुप्ये घेइल. तेवढ्याच पैशात मी जाउन परत आलो असा. Wink Happy

सीएनजी म्हणजे ग्यास कीट बसवणे अन त्यात स्वयंपाकाचे ग्यास सिलिंडर वापरणे असा त्याचा सरळ सीधा अर्थ होतो. हे नस्ते उद्योग करत जाऊ नका हे नम्र विनंती.>>> इब्लिसराव Uhoh
सीएनजी मध्ये एलपीजी???? ही माहिती मलाही नवीन आहे.. आर यु श्युअर???

अवांतर : हे इब्लिसराव बी कधी कधी लै भारी माहितीपुर्ण प्रतिसाद देतय आणि कधी कधी असा फ्युज का उडवुन घेतय काय माहिती.. Sad

गुलमोहरात का आले हे?:अओ:

तसे करुच नका. इब्लिस यांचा प्रतीसाद १०० टक्के बरोबर आहे. आमच्या बिल्डिंगमधल्या एकाने आधी सेकंडहँड मारुती ८०० घेतली, अगदीच खटारा आहे ती घेतल्यापासुन.( वास्तवीक ७-८ लाखाची चांगली आरामदायक गाडी घेणे परवडत असतांना अशी खटारा का घेतली तेच जाणे.:फिदी:)

तर या बाबाजीने आता घरचे सिलेंडर त्या खटारात वापरायला सुरुवात केलीय. पण बिल्डींगमधल्या लोकांना १०० टक्के खात्री आहे की कधी ना कधी ती गाडी पार्किंगसहीत उडणार. कारण वरुन बसवलेले सिलेंडर अतीशय धोकादायक असते.:अरेरे: पण तो ऐकत नाही. तुम्ही तरी ऐका.:स्मित:

झकासराव कंपनीमध्ये जाऊन CNG किट बसवणे वेगळे आणी घरगुती सिलेंडर बसवणे वेगळे. काही लोक कंपनीतुन वेगळे किट बसवले तरी नंतर पंपावर न जाता घरगुती सिलेंडर वापरायला सुरुवात करतात. हे आमच्या इथलेच उदाहरण आहे.:अरेरे:

तुमची माहिती मस्त आहे, धन्यवाद.

रश्मीजी
घरातल्या सिलिंडर मध्ये जो गॅस असतो त्यास एलपीजी (लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस) म्हणत असावेत. सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) घरगुती कारणासाठी वापरत नाहीत असं मला वाटतं.

ही माहिती कदाचित उपयोगी पडेल.
http://www.cartoq.com/is-lpg-or-cng-better-for-a-small-petrol-car/
सीएनजी / एलपीजी च्या वापराने सेव्हिंग्ज.
http://www.cartoq.com/both-cng-and-lpg-deliver-savings-over-petrol-but-w...

इतर तांत्रिक माहिती - कुठलं कीट सर्वात जास्त चांगले राहील, सीव्ही (कॅलोरिफिक व्हॅल्यु) कमी असल्याने एमपीएफआय इंजिनाला सुट करणारे कीट कुठले याची माहिती कुणीतरी द्यावी. (सापडली तर याच धाग्यावर देईन).

ईब्लिस यांचा प्रतिसाद जरी बरोबर असला तरी तो इथे गैरलागू आहे, मुळात CNG किट वर LPG चालत नाही, हा जर प्रश्नकर्त्याने तो LPG चा प्रश्न विचारला असता तर गोष्ट वेगळी होती..

<<अशा सरळ व चांगल्या प्रश्नांना आपण असे वेडेवाकडे वळण लावून उगाचच ‘हलकट रिस्पॉन्स सुरू’ म्हणून हिणवू नका>> अगदी बरोबर
इब्लिस यांचा प्रतिसाद बरोबर असेल ही .पण भाषा त्यांनी जर जपून वापरली पाहिजे. सरळ साध उत्तर द्याव कि. <<आपणास परवडत नसताना चार चाकी पेट्रोल गाडी विकत घेण्याचा अट्टाहास का केलात?>> अशा गैरलागू
रिस्पोन्स ची जरुरी आहे का ? लोक मायबोलीवर नक्की एखाद्या प्रश्नाचे विविध अंगानी विचार करून मुद्देसूद उत्तर मिळेल अशा विचाराने प्रश्न विचारतात. तिथे अशा पद्धतीचा प्रतिसाद देऊन विचारणार्याचे खच्चीकरण करण्याची आवश्यकता नाही. जिथे तिथे ज्याच्यात त्याच्यात अशा हलकट रिस्पोन्स ची जरुरी आहे का ? Happy

झकासराव,

अहो, रागावू नका.
मी त्या प्रतिसादास मुद्दाम 'हलकट' प्रतिसाद म्हटले आहे.
आपल्या महान देशात रस्त्यावरून धावणार्‍या ग्यासच्या टँकरमधून गॅस चोरून त्याची सिलिंडरे भरण्याची, व असा गॅस 'गॅसोट्या' मारुत्यांत भरण्याची टेक्नॉलॉजी अ‍ॅवेलेबल आहे.

माझ्या माहितीत कंपनी फिटेड वा मॉडिफाईड ग्यास किट वाल्या जितक्या गाड्या आहेत, (रिक्षांसह) त्या सगळ्या सरसकट स्वयंपाकाच्या गॅसवर चालवल्या जातात. विशेषतः "कालीपीली मारूती व्हॅन" (गावा बाहेर एकमेव सीएनजी पंप आहे, जो कधी कधी चालू असतो)
घरच्या घरी पंप लावून गॅस भरून देण्याचा 'कुटिरोद्योग' करणारे काही लोकही माझ्या ओळखीचे आहेत. गॅसकिट बसवून देणारा माणूसच अशा 'घरगुती' ग्यासवाल्यांचे पत्ते तुम्हाला सांगत असतो.

सीएनजी व एलपीजी मधला टेक्निकल केमिकल फरक मला ठाऊक आहे, व त्या किट्स मधला देखिल. पण पेट्रोल वा डिझेल गाड्या रॉकेलवर चालवण्याची टेक्नॉलॉजी भारतात आहेच. Proud

शिवाय ही एक इंटरेस्टिंग माहिती.

***
भटकंतीसाठी मोठ्या शहराबाहेर नेलेल्या गाडीला सीएनजी पंप कुठे कुठे मिळणार व किती वेळा पेट्रोल्/सीएनजी स्विच करावे लागणार हा हिशोब केला तर एक एक्स्ट्रा एल्पीजी सिलिंडर सोबत नेणारे असंख्य लोक आहेत Wink

किरण मला काय म्हणायचे वा सांगायचे ते वरील पोस्टमध्ये इब्लिस यांनी मुद्देसुदपणे लिहील्याने, मी परत तेच लिहीत नाही.:स्मित:

आपल्या देशात माणसांचा जीव खूप स्वस्त झाल्याने धंदावाले लोक ( असे अनधिकृत गॅस वगैरे भरणारे लोक, लिगल कामे करणारे लोक नाही) कुठल्याही थराला जाऊन कुठलिही कामे करतात, म्हणून वरुन किट बसवण्याचा धोका फेरफटका यांच्या मित्राने पत्करु नये असे वाटते.

रश्मीजी

अनधिकृत एलपीजी किट आणि अधिकृत एलपीजी किट वेगळं असतं. अधिकृत एलपीजी किट आरटीओ मान्यताप्राप्त असतं. त्यात सुर्क्षाविषयक मानदंड पाळलेले असतात. गाडीत गॅस लीक होण्याचा धोका यात खूपच कमी असतो. घरगुती सिलिंडर मधे ऑडर असतो ज्यामुळं अनधिकृतपणे गॅस वापरलेला समजून येतो.

सीएनजी अधिकृत किट तर अतिशय सुरक्षित असतं आणि अनधिकृत सीएनजी सिलिंडर माझ्या माहितीप्रमाणे मिळतच नाही. असो. सीएनजी किट वापरणे हे कमी खर्चाचे आहे, अधिक मायलेज देणारे आहे. पण इंजिन पॉवर १० ते १५ % कमी होत असल्याने ते चालत असेल तर हरकत नसावी.

अहो, रागावू नका.>>> रागवलो नाय हो.
कन्फ्युज झालो एवढच.

पण पेट्रोल वा डिझेल गाड्या रॉकेलवर चालवण्याची टेक्नॉलॉजी भारतात आहेच>> एन्जीनची वाट लागते.
त्यांच्या मित्राची गाडी नवीन असल्याने तो असं काही करेलच असं वाटत नाही.
सीएनजीत एलपीजी भरतात हे मात्र मला नवीन होत.
देव त्यांच्या गाडीच्या इन्जीनच भलं करो..
त्यांच्या मागे आणि पुढे आजुबाला चालणार्‍या गाड्या, सायकली, बाइक्स, माणसे यांच रक्षण करो.

बा द वे, कोल्हापुरात आम्च्या घराजवळ एक रिक्शावाला राहतो.
तो आमच्या गल्लीत, रस्त्यावरच कित्येक वेळा त्याचा रिक्शात एलपीजी भरताना पाहिलाय मी.
हे कुटिरोद्योग माहितीये.

सीव्ही (कॅलोरिफिक व्हॅल्यु) कमी असल्याने एमपीएफआय इंजिनाला सुट करणारे कीट कुठले याची माहिती कुणीतरी द्यावी.>> कशाची सीव्ही कमी आहे?? Uhoh
सीएनजीची हाय आहे.

मी सी एन जी वापरतो,

काही ठ़ळक मुद्दे ,

सीएनजी वापरुन कुठलीही गाडी,अल्टो असली तरी २० ते २२ पेक्षा जास्त अ‍ॅवरेज देत नाही, पुण्यासारख्या खड्डे रोडवर तर नाहीचे नाही

अल्टोला सीएनजी लावून फारसा फरक पडणार नाही ,प्रति किमी खर्च फारसा कमी होत नाही,इतर गाड्या जसे इंडीका, वॅगन आर व त्या पुढच्यासाठी नक्क्कीच फायदेशीर ठरतो

सीएनजी गाडीतही पेट्रोल ठेवावेच लागते
Happy

किरण सॉरी माझ्याकडुन लिहीण्यात काही चूका झाल्या.:अरेरे: पण आमच्या शेजार्‍याने केलेले उद्योग पाहुन तणाव आला होता. आधी ते किट बाहेरुन कुठुन स्वस्तात बसवता येईल का? असा विचार करुन मग ते बसवल्यावर त्याचा खर्च पाहुन, ते बदलुन ( का माहीत नाही) परत तो घरचा गॅस बसवणे हे त्याचे उद्योग जबरी होते.

फेरफटक्या,
सीएनजी कीटचा खर्च अधिक सीएनजी ग्यास कॉस्ट धरुन मग मिळालेल्या अ‍ॅव्हरेजमधे पुढील ३ वर्षातील खरोखरच्या संभाव्य वापरामुळे पेट्रोल ऐवजी वाचू शकणारे पैशे यान्चा हिशेब घालुन बघितला पाहिजे.

माझ्या मते जर वापर नियमित व भरपुर नसेल, तर हे गणित तोट्यातच जाते. तेव्हा खरोखर कितीवेळा किती अंतराकर्ता वापरणार याचा विचार व्हावा.

एलपीजी असेल तर ओव्हरटेकला प्रॉब्लेम येतो, सीएनजीला तितकासा येत नाही.
माझ्या अल्प माहितीप्रमाणे "एलपीजी" पेट्रोल इंजिनकरता व सीएनजी डिझेल इंजिनाकरता वापरले जाते, जाणकाराकडून माहिती घ्यायला हवी.

जागा वाया जाणे, मागिल चाकांवर अनावश्यक जास्तीच्या वजनाचा भार पडणे, पर्यायाने टायरची झीज, मागून कुणी ठोकल्यास्ची कायमची धास्ती इत्यादी अनेक त्रासदायक प्रकार आहेत.

सबब, केवळ अन केवळ खरोखरच पैशे भरपुर वाचणार असतील, तेवढा वापर होणार असेल, तरच असले कीट बसवुन घ्यायच्या भानगडीत पडावे अन्यथा नको.

मी अनुभव/अनुभूती शिवाय एक अक्षरही बोलत नाही.
इथेही, स्वयंपाकाच्या ग्याससिलेन्डरपासून ते ऑथराईज्ड एलपीजी तसेच सीएनजीवरील गाड्या चालविल्या आहेत. त्याचे तोटे व धोके अतिशय जवळून अनुभवले आहेत.

त्यातुनही ग्यास कीट वगैरे बसवायचे झाल्यास एकदा माझ्याकडे "कुंडली" वगैरे दाखवुन घ्या म्हणतो! कस? Proud

मी अनुभव/अनुभूती शिवाय एक अक्षरही बोलत नाही.>> Lol

ओ कुंडलीवाले दादा, वर दिलेल्या लिंका घाला की डोळ्याखालून एकदा.

१. जर रोजचे रनिंग ४० कि.मी. च्या वर असेल तर CNG Kit चा विचार करावा.
२. मारुतीच्या ऑथोराईज डिलर कडून सिनजी किट बसवून घ्यायला रु. ४८,००० मोजावे लागतात.
३. बाहेरुन सिनजी कीट बसवलात तर रु.२५,००० लागतील... पण इंजिन वॉरंटी गमावून बसाल.
४. CNG ने Pcik up कमी होतो हे खरे आहे.
५. डिकीची जागा तर जातेच.. वर लिंब्याने सांगितल्या प्रमाणे अर्ध लक्ष मागे ठेवावे लागते.

सिनजीचा सगळ्यात जास्त फायदा ट्रान्सपोर्ट वाल्यांना होतो.. मी अडीच वर्षात २९,००० कि.मी. गाडी फक्त पेट्रोल वर पळवून सुद्धा समाधानी आहे. Happy

क्लोज लूप आणि सिक्वेन्शियल किट मधे काय फरक आहे ? क्लोज लूप २८००० रु. तर सिक्वेन्शियल दुप्पट किंमतीला आहे.

किरण अप्पा,
एक्झॉस्टमधे एक सेन्सर बसवून इनटेक वाल्या (कार्ब्युरेटर लेवल Wink हे परत थोडे मिसइन्फॉर्म स्टाईल, पण गल्लीतल्या ग्यारेजवाल्यास समजेल असे ) ऑक्सिजनचे रेग्युलेशन करणार्‍या किट्स आहेत, तशाच इतर देखिल आहेत.
सीएन्जी वाली टँक भलती जड असते. तो गॅस कितीही काँप्रेस केला तरी गॅसच रहातो. इत्यादि इत्यादी इत्यादि.. देवाने गूगल दिले आहे ना? Wink
*
वर लिंटींनी सीएन्जी डिझेल इंजिनासाठी असं लिहिलं आहे. तसं असेल तर अल्टो मधे अल्टरनेटींग सीएनजी अन पेट्रोल असे कसे काय करता येईल ब्वा?
)इंजिनियर नसलेला( इब्लिस.

साधे सोपे गणित म्हणजे, जर वर्षाला कमितकमी ४५००० किमी रनिंग असेल तर सि एन जी बसवण्याची काहीही गरज नाही.. कारण सि.एन जी मुळे वाढणारा मेंन्टेनन्स आणि इतक्या रनिंगसाठी लागणार्‍या पेट्रोल आणि रेग्युलर सर्व्हिसींगचा खर्च सारखाच होतो..
सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मग सिएनजी किट ते ही ऑथराईज्ड डिलर किंवा सर्व्हीससेंटरमधून बसवून घेणं योग्य..
यातही परत झकास म्हणतो तसा अल्टोला मुळातच अ‍ॅव्हरेज चांगला असल्यानं आणखी विचार करावा..

वर लिंटींनी सीएन्जी डिझेल इंजिनासाठी असं लिहिलं आहे. >>

वर सुरुवातीलाच दोन लिंक्स दिलेल्या आहेत. त्यात अल्टोचाच उल्लेख आहे. त्या लिंक्स न वाचताच डिझेल साठी सीएनजी सारखं विधान केलंय.

>>>>> माझ्या अल्प माहितीप्रमाणे "एलपीजी" पेट्रोल इंजिनकरता व सीएनजी डिझेल इंजिनाकरता वापरले जाते, जाणकाराकडून माहिती घ्यायला हवी. <<<<<

>>>> त्या लिंक्स न वाचताच डिझेल साठी सीएनजी सारखं विधान केलंय. <<<<<
अहो किरणू महाशय, इथे दिलेल्या लिन्क्स वाचल्याच पाहिजेत असे बन्धन नाही, तितका वेळ तर नाहीच नाही. त्यातुन वर पुन्हा दिलेल्या या वाक्यात "अल्प माहितीप्रमाणे" असे डिस्क्लेमर टाकलच आहे ना? ते कळ्ळ नाही तर "जाणकारांकडून माहिती घ्यायला हवी" हे देखिल लिहीलय ना?
(सीएनजी पेट्रोलऐवजी चालत असेलही-लॉजिकली चालल्लाच पाहिजे, पण डिझेल इंजिनकरता मात्र एल्पीजी नक्कीच चालत नाही, सीएनजी चालतो, असे माझे अल्प मत - हे चूकही असू शकेल)

मी लिन्का/गुगल वगैरे वर अवलम्बुन न रहाता, वा त्या वापरल्या तरीही अनुभव्/अनुभुतीच प्रमाण मानतो Proud
खूप पूर्वीच्या काळी (व अजुनही बर्‍याचदा) छापिल ते ते सर्व सत्य असा भाव असायचा, त्यापुढील पायरी म्हणजे हल्ली नेटवर दिस्ते ते ते सर्व सत्य असे चालते. Wink

मी लिन्का/गुगल वगैरे वर अवलम्बुन न रहाता, वा त्या वापरल्या तरीही अनुभव्/अनुभुतीच प्रमाण मानतो >> Proud Lol

या केसमध्ये, सीएनजी डिझेलसाठी वापरले तरी चालते यात काही गैर नाही, असंच ना Wink

इब्लीस यांना अनुमोदन !
एकदा सीएनजी केली की मग वेळीअवेळी जर आसपास सीएनजी नसेल तर मग घरचेच भरुन पाहु असेही विचार येतीलच. गॅस गाडीत भरणारे मी सुध्दा बघीतले आहेत.

<< एकदा सीएनजी केली की मग वेळीअवेळी जर आसपास सीएनजी नसेल तर मग घरचेच भरुन पाहु असेही विचार येतीलच. >>

विचार केला तरी तशी कृती शक्य नाही. सीएनजी किट बसविल्यावर त्यात एलपीजी भरता येत नाही. परंतु जर का एलपीजी किट बसविले असेल (जे आताच्या काळात पुणे/मुंबईत कोणी सहसा बसवत नाही) तर मात्र त्यात घरच्या गॅस सिलिंडर मधून पंपाच्या साहाय्याने एलपीजी भरणारे अनेक जण आहेत. सीएनजी किट असताना मात्र घरच्या सिलिंडरमधील एलपीजी भरण्याचा विचारही मनात कोणी आणेल अशी शक्यता शून्य आहे कारण घरचा एलपीजी साधारण ३५ रुपये प्रति किलो दराने मिळतो आणि पंपावरील सीएनजी ४८ रुपये प्रति किलो दराने मिळतो. हा दरातील फरक फारसा लक्षणीय नाही. शिवाय घरच्या एलपीजी पेक्षा पंपावरील सीएनजीची इंधन कार्यक्षमता प्रचंड जास्त आहे. उदाहरणादाखल मारुती ओम्नी सीनजी इंधन भरल्यास महामार्गावर २५ किमी प्रति किग्रॅ (आणि पुणे शहरात साधारण २० किमी प्रति किग्रॅ) इतकी इंधन कार्यक्षमता दर्शविते याउलट घरच्या एलपीजीवर महामार्गावर १४ किमी प्रति किग्रॅ (आणि पुणे शहरात साधारण १२ किमी प्रति किग्रॅ) इतकी इंधन कार्यक्षमता दर्शविते.

असे असतानाही घरचा एलपीजी वाहनात का वापरला जातो? नक्की कोण लोक वापरतात?

  1. ज्यांनी पूर्वीच्या काळी (जेव्हा सीएनजी किट / इंधन पंप प्रचलित नव्हते) एलपीजी किट्स वाहनात बसविली आहेत. ज्यांना आता पुन्हा जुने एलपीजी किट काढून सीएनजी किट बसविणे शक्य नाही. तसेच समान इंधन कार्यक्षमता असता घरच्या एलपीजीच्या (३५ रुपये प्रति किलो) तुलनेत प्रचंड महाग असलेला पंपावरचा एलपीजी (५४ रुपये प्रति किलो) ज्यांना परवडत नाहीपुणे, मुंबई व्यतिरिक्त इतर ठिकाणी वाहने वापरणारे, ज्यांच्या शहरात / गावात सीएनजी पंप उपलब्ध नाहीत त्यांना घरचा एलपीजी हा पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त पर्याय वाटतो.
  2. प्रत्येकच वाहनात अधिकृत सीएनजी किट बसविता येत नाही. म्हणजे समजा एखाद्याकडे मारूती बालेनो हे वाहन आहे व त्यास अधिकृत सीएनजी किट बसवायचे आहे तर शक्य नाही. त्या वाहनाच्या उत्पादकाने तशी परवानगी सरकारकडून घ्यावी लागते. वाहन उत्पादक तशी परवानगी तेव्हाच घेतो जेव्हा किमान लाखभर संख्येने ती वाहने रस्त्यावर असतील. अर्थात तरीही तो ती परवानगी घेईलच असे नाही कारण त्याकरिता त्याला मोठा (अधिकृत + अनधिकृत) खर्च येतो. त्यामुळेच आज बाजारात उपलब्ध असलेल्या बर्‍याच वाहनांपैकी अनेकांना अधिकृत सीएनजी किट बसविण्याची शासकीय अनुमती नाहीये.

असे असले तरीही घरचा एलपीजी वाहनात वापरणे अयोग्य आहे याची कारणे -

  1. हा अनुदानित वायू स्वयंपाकाकरिता कमी दरात उपलब्ध केलेला आहे. तो वाहनात वापरणे अनैतिक आहे.
  2. हा वायू वाहनाच्या इंधन टाकीत भरल्यास याच्या विशिष्ट गुणधर्मामुळे गळती होऊन अपघात होऊ शकतो त्यामुळे धोकादायक आहे.
  3. वाहनाने फार जास्त वेग घेतल्यास दाबाखाली टाकीत भरल्याने आधीच द्रवरूप असलेला हा वायू चक्क गोठतो, म्हणजे स्थायूरुप होतो आणि टाकीतून बाहेरच पडत नाही व इंधन पुरवठा न झाल्याने वाहन थांबते. अशा वेळी लोक चक्क टाकी गरम करतात. काही जण याकरिता इलेक्ट्रीक हीटिंग पॅड वापरतात. तर इतर काही जण यामुळे बॅटरीवर ताण पडत असल्याने चक्क ब्लो लँप वा तत्सम उपकरणाच्या साहाय्याने इंधन टाकीला आगीच्या झळा देऊन टाकी गरम करतात. हा अगदीच कल्पनातील भयावह प्रकार आहे.
  4. वाहनात हा वायू भरल्यास त्याच्या विशिष्ट वासामुळे चटकन ओळखला जातो. वाहतूक पोलिसांनी तपासणी केल्यास पकडले जाऊन या बेकायदेशीर कृत्याबद्दल कडक शिक्षा होऊ शकते. तसेही वाहतूक पोलिस तुम्ही एलपीजी पंपावर भरल्याचा दावा केल्यास पुरावा म्हणून इंधनाचे बिल मागतात.
  5. एलपीजी घरगुती सिलिंडर मधून वाहनाच्या इंधन टाकीत भरण्याकरिता तीन ते पाच हजार रुपये किंमतीचा पंप गरजेचा असतो. काही जण हा स्वतः खरेदी करतात तर इतर काही जण हा पन्नास रुपये भाड्याने दुसरीकडून आणतात. काहीही केले तरी इतरांना हा उद्योग समजतोच त्यामुळे बरेच जण हा प्रकार प्रचंड तणाव व भीतीखाली गुपचूप कुठेतरी लपून व घाईघाईत उरकतात. अशा वेळी स्फोट होऊन अपघात होण्याची शक्यता कैक पटीने वाढते.

पेट्रोल वाहनांकरिता एलपीजी आणि डिझेल वाहनांकरिता सीएनजी असा काही नियम नाही. तो एक व्यावहारिक निर्णय आहे. साधे कारण आहे जेव्हा बाजारात एलपीजी किट्स बसविण्याची पद्धत प्रचलित होती तेव्हा डिझेल इतके स्वस्त होते आणि डिझेलवर वाहनांची कार्यक्षमता इतकी जास्त आहे की पंपावरील एलपीजी त्या वाहनात भरून चालविणे जास्त महाग होणार. पेट्रोल वाहनांकरिता मात्र तेव्हा पंपावरचा एलपीजी परवडायचा.
तसेच त्याकाळी (२००२ मध्ये) दिल्लीसारख्या शहरांत व्यावसायिक वाहनांना सीएनजी सक्तीचा करण्यात आला तो प्रदुषण पातळी रोखण्याकरिता.
आता डिझेल बर्‍यापैकी महागले असले तरी आता एलपीजीचा पर्याय मागे पडत चालला असल्याने डिझेल वाहनांकरिताच काय परंतु पेट्रोल वाहनांकरिताही त्याचा फारसा विचार कोणी करीत नाही.
त्याचप्रमाणे डिझेलचे खासगी वाहन आपले आपण सीएनजीवर करू शकत नाही, कारण डिझेल वाहनांकरिता बाय-फ्यूएल सिस्टीमची परवानगी नाही. त्यामुळे आपल्याकडे असलेली डिझेलची कार / जीप आपण सीएनजीवर करायची ठरविल्यास त्यातली डिझेलची टाकी काढून टाकावी लागेल जे आपल्याला व्यावहारिक नाही.

चार वर्षांचा हमी कालावधी संपल्यावर मी ऑगस्ट २०१४ मध्ये माझ्या मारूती ओम्नी वाहनात अधिकृत सीएनजी किट बसवून घेतले आहे. सध्या वापर / निरीक्षण / अभ्यास चालु आहे. लवकरच एका विस्तृत लेखाद्वारे "कार सीएनजीवर करावी का?" या शीर्षकात विचारलेल्या मूळ प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल.

चेतन माहीतीपूर्ण पोस्ट.
माझ्यामते, कार सिएनजीवर करू नये. कंपनी फिटेड सिएनजी कारच घ्यावी सरळ. अगदीच लावायचा असेल तर ऑथोराईज्ड डिलरकडून, मान्यताप्राप्त किटच बसवावी. सदैव त्याचे कागदपत्रं सोबत ठेवावीत.

तसही, सिएनजी भरायला लागणारा वेळ, एकावेळेला भरल्या जाणारा गॅस (प्रेशर नसणे, संपलेला असणे, मग दुसरा पंप शोधणे इ) अन तुमची लांब वेटींग मध्ये होणारी खोटी, या गोश्टी विचारात घेतल्या तर पेट्रोल, डिझेल फार महाग नाही पडत.

प्युअर पेट्रोल, डिझेल यावर चालणार्‍या कार्स ला मेंटेनन्सही कमी असतो, सर्वीस इंटर्वल्सही जास्त असतात (काही केसेस मध्ये तर वर्षाला एकदा; हो, अग्दी डिझेल कारलाही); सो असाही एक विचार करून पाहा.

मला इब्लिस यांचा प्रतिसाद पटला नाही. फेरफटका हे घरातला गॅस वापरुनच गाडी चालवतील असा समज करुन तो प्रतिसाद लिहील्यासारखा वाटला.

माझ्या आधीच्या गाडीत (मारुत सुझीकी बालेनो) मी LPG कीट बसवला होता व अधिकृत पंपावरच गॅस भरत होतो. १६०० सीसी गाडी असुनही कधीही पॉवर कमी वाटली नाही. घरी मिळत असलेल्या गॅसच्या किंततीपेक्षा तो महाग असतो. (किमान १०-१५ रु) त्यामुळे सबसिडीवर परीणाम होतो वगैरे मुद्दाच चुकीचा आहे. त्यात CNG व LPG हे वेगळे असल्याने हा मुद्दाच येऊ नयेत. असो. तर मुळात सरकारमान्य (ARAI Approved) कीट असल्याने व सरकारमान्य पंप असल्याने अशा सल्ल्यांकडे दुर्लक्ष करुन तुम्हाला काय परवडते ते बघा. जोवर सरकारमान्य कीट आहेत व सरकारमान्य पंपावर तुम्ही गॅस भरत आहात तोवर तुम्ही करत आहात ते योग्यच आहे. आता गाडीचे नुकसान होते का व वॉरंटीचे काय ये प्रश्न. कीट बसवला की वॉरंटी खतम. तसेच एलपीजीने थोडेफार इंजीनचे नुकसान होते पण माझा अनुभव खुपचा चांगला आहे. मी जवळ जवळ ८ वर्ष LPG वर गाडी चालवली होती व काहीही नुकसान झाले नाही. CNG मुळी इंजिनला काही नुकसान होत नाही असे म्हणतात. यात फक्त एकच तोटा आहे की कीटमुळे जागा वाया जाते व गॅस फक्त ८-१० किलोच बसतो. (माझ्या गाडीत ४५ किलो LPG बसत होता व त्याचे पंप पण बर्‍यच ठिकाणी उपलब्ध होते त्यामुळे मला फारच क्वचित पेट्रोल भरायला लागायचे)

LPC/CNG कुठलेही कीट बसवल्यावर एक गोष्ट करा.
१. गाडीत स्मोकींग करु नका.
२. एक छोटा फायर एक्षींगव्हीशर ठेवा
३. मान्यताप्राप्त पंपावरच गॅस भरा
४. दर ६ महिन्यांनी गॅस लिक होत नाहीये ना हे चेक करुन घ्या.
५. किटची नोंद RCTC बुकावर करुन घ्या.

अपघातामुळे व निष्काळजीपणामुळेच फक्त टाकी फुटण्यासारख्या घटना घडतात. त्याचे प्रमाण खूपच कमी आहे.

शिवाय घरच्या एलपीजी पेक्षा पंपावरील सीएनजीची इंधन कार्यक्षमता प्रचंड जास्त आहे. >> हे विधान चूकिचे आहे (शास्त्रीय द्रूष्ट्या)

नवीन कार घ्यायची.
२-३ वर्षे थांबुन वॉरन्टी संपली की मग ऑथोराइज्ड किटे बसवुन घ्यायचं.
ही कल्पना कागदावर चांगली आहे. पण प्रेफरन्स द्या कंपनी फिटेड सीएनजीला.
असही दोन वर्षात पेट्रोलवर जाणारे जास्त पैसे वसुल होतील अधिकच्या किमतीत.

१) कंपनी फिटेड सीएनजी किट हे कडक सुरक्षा नियमातुन पास झालेले आहे.
२) कंपनीकडे त्याची जबाबदारी आहे. असे कंपनी फिटेड किट बसवलेले असतानाही मारुती सारखी कंपनी ठराविक पैसे भरुन ४ वर्षे अथवा ८० हजार किमीची एन्जिन वारन्टी देते. म्हणजेच ते एकदम श्युअर आहे कमी फेल्युअर साठी.
३) कंपनी फिटेड सीएनजी मध्ये कार एन्जिन ट्युनिन्ग (बाहेरुन केलेल नव्हे तर आर एन्ड डी मध्येच दोन्ही फ्युएल विचारात घेउन केलेल कॅलिब्रेशन आणि ट्युनिन्ग) त्याचा कॅलिब्रेटेड ईसीयु हे बेनेफिट आहेत.
४) कंपनी फिटेड सीनेजी युनिटला इन्स्युरन्स मध्ये हप्ता कमी आहे.

इथे कंपनी फिटेड म्हणजे मॅन्युफॅक्चरर ने बनवलेली कार. जी त्या ऑप्शन सहीत विकायला येते.

बाहेरुन बसवाल तर वरच्या चारही गोष्टीत जुगाड चलता है. ये भारत देश है हे लक्षात असु द्यावे.
अगदीच जुनी कार आहे आणि बसवत असाल काहि रिस्क घेउन तर बात अलग है.

सीएनजीचे काहि तोटे
१) सीएनजी पम्प्सची कमी उपलब्धता, त्यामुळे गर्दी
२) गाडीत सीएनजी किती बसेल ह्याच गणित कोणीच सांगु शकणार नाही. एवढ्या मोठ्या टाकीत फक्त ८ ते साडेआठ किलो गॅस. २० च एव्हरेज सिटी मध्ये पकडलं (विथ एसी) तर १६० ते १८० किमी झाले की जा परत रांगेत.
३) त्या टाकीमुळे नो बुट स्पेस. हॅचबॅक कार मध्ये हा त्रास जास्त आहे.४ -५ माणसे आणि त्यांच्या मोठ्या प्रवासाच्या बॅगा असतील तर बरीच अडचन होउ शकते. वर कॅरीयर बसवली की गाडी प्रवासी वाहतुक संघटनेची वाटते मला तरी. इव्हन भल्यामोठ्या अर्टिगा मध्ये ही तसेच. त्यात आधीच बुट स्पेस कमी होता.
४) बरेच सीएन्जी पम्प तुमच क्रेडिट कार्ड स्वीकारत नाहीत. ओन्ली कॅश.

जर रनिन्ग जास्त असेल तर बिन्धास्त डिजेल गाडी घ्यावी.

<< २-३ वर्षे थांबुन वॉरन्टी संपली की मग ऑथोराइज्ड किटे बसवुन घ्यायचं.
ही कल्पना कागदावर चांगली आहे. पण प्रेफरन्स द्या कंपनी फिटेड सीएनजीला. >>

प्रत्येक वेळी हे शक्य नसते कारण आपल्याला आवडणार्‍या आवृत्तीत हा पर्याय कंपनी उपलब्ध करून देईलच असे नाही. उदाहरणार्थ, मारूती ओम्नी. मी २०१० मध्ये विकत घेतली तेव्हा मारूती सुझूकी इंडिया लिमिटेड आठ आसनी वाहन फक्त पेट्रोल मध्ये आणि पाच आसनी वाहन पेट्रोल अथवा एलपीजी अशा दोन पर्यायात विकत होते म्हणजे सीएनजीचा पर्याय उपलब्धच नव्हता. शिवाय मला आठ आसनीच वाहन हवे होते त्यामुळे मी तेव्हा पेट्रोल वाहन विकत घेऊन हमी कालावधी संपल्यावरच सीएनजी किट बसविले. अर्थात ज्या प्रकारात कंपनी फिटेड किट विकत घेतानाच उपलब्ध आहे तिथे सरळ तेच विकत घ्यावे, मागाहून बसविण्याचे उपद्व्याप करू नयेत या तुमच्या मताशी सहमत.

ज्या प्रकारात कंपनी फिटेड किट विकत घेतानाच उपलब्ध आहे तिथे सरळ तेच विकत घ्यावे, मागाहून बसविण्याचे उपद्व्याप करू नयेत या तुमच्या मताशी सहमत>> हेच मत आहे.
आठ आसनी की सात आसनी मधे एको येत असावी आता सीएनजी मध्ये.
ओम्नीला तस अपग्रेड अजुनही नाहिये.

असे ऐकण्यात आहे की सीएन्जी टाकीचे वजन जवळपास शंभर किलोपर्यंत जाते, व गॅस केवळ ८/१० किलोच बसतो, तरीही, एकदोघेच प्रवासी असतानाही कायमकरता मागिल बाजुस १०० किलोचे वजन अधिक जास्तीचे पेट्रोल भरुन ठेवलेले असे वापरण्यामुळे टायर्सची झीज किती होते व सस्पेंशनला काय प्रॉब्लेम येऊ शकतात? कुणाचे काही अनुभव?

६० लिटर पाणी बसु शकेल इतकीच मोठी टाकी आहे ती लिम्बुशेठ.
वजन १०० किलो तर नक्कीच नाहिये. गॅस पुर्ण भरल्यावर ९ किलो गॅसच वजन अधिकच.
सीएनजी गाडीत फक्त स्टार्तिन्ग पुरत पेट्रोल वापरल जात. त्यामुळे फुल टाकी भरुन नेहमी ठेवायची गरज नाही.
एकदा दहा लिटर टाकल की बरेSSSSSSSSSSSSSच महिने जातं.
सस्पेन्शन डिजाइन त्या फुल लोडेड वजनाच्या हिशेबानेच होइल (कंपनी फिटेड मध्ये) त्यामुळे तसं टेन्शन नाहिये.

<< ६० लिटर पाणी बसु शकेल इतकीच मोठी टाकी आहे ती लिम्बुशेठ.
वजन १०० किलो तर नक्कीच नाहिये. गॅस पुर्ण भरल्यावर ९ किलो गॅसच वजन अधिकच. >>

माझ्या वाहनात १० किग्रॅ सीएनजी बसेल इतकी टाकी आहे व तिचे वजन ९० किग्रॅ आहे. हा अति दाबाखालील नैसर्गिक वायू असल्या कारणाने सुरक्षेच्या कारणास्तव जाड धातूचे कवच ह्या टाकीला आहे व त्यामुळेच ती इतकी अवजड आहे.

<< सीएनजी गाडीत फक्त स्टार्तिन्ग पुरत पेट्रोल वापरल जात. त्यामुळे फुल टाकी भरुन नेहमी ठेवायची गरज नाही. >>

घाटात / तीव्र चढावर वाहन नेहमीच पेट्रोलवर चालवावे तसेच आठवड्यातून किमान दोनदा तरी १० किमी पेट्रोलवर चालवावे अशी शिफारस केली जाते म्हणजे पेट्रोलचा मार्ग व इंजेक्टर्स विनाअडथळा राहून आणीबाणीच्या वेळी समस्या निर्माण होत नाही, त्यामुळे पेट्रोल किमान १० / १५ लिटर तरी असलेच पाहिजे. शिवाय पुणे / मुंबईतच फक्त सीएनजी पंप आहेत आणि एकदा पूर्ण टाकी भरली की सीएनजीवर वाहन शहरात २०० तर शहराबाहेर २५० किमीपेक्षा जास्त अंतर जाऊ शकत नाही. ज्यांना सतत पुणे / मुंबई बाहेर अहमदनगर, नाशिक, सातारा, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर किंवा इतर शहरांत जावे लागते त्यांना त्यामुळे पेट्रोलची टाकी पूर्ण भरलेली ठेवणे आवश्यक ठरते.

<< एकदा दहा लिटर टाकल की बरेSSSSSSSSSSSSSच महिने जातं. >>
बरेच महिने पेट्रोल तसेच राहिल्यास टाकिच्या तळाच्या भागावर त्याची प्रक्रिया होऊन टाकीच्या तळाकडील धातू खरवडला जातो व त्याचे काही कण पेट्रोलमध्ये मिसळले जातात. हे नंतर पेट्रोल मार्गात प्रवाहीत होऊन इंजेक्टर्स ब्लॉक होण्याची शक्यता असते. त्यामुळे तीन महिन्यांपेक्षा जास्त शिळे पेट्रोल टाकीत असू नये अशी शिफारस केली जाते. त्यामुळे जुने पेट्रोल वापरून पुन्हा नवे पेट्रोल भरणे जास्त संयुक्तिक आहे. ज्यांना असे शक्य नाही त्यांनी बरेच महिने पेट्रोल भरायचे नसल्यास सुमारे २५० मिली टूटी ऑईल (जे टू-स्ट्रोक इंजिनात पेट्रोल टाकीत मिसळले जाते) पेट्रोल टाकीत टाकावे. हे ऑईल टाकीच्या तळाशी जाऊन पेट्रोल व टाकीचा तळ यातली संभाव्य क्रिया टाळते व इंजेक्टर्स स्वच्छ राहतात.

<< सस्पेन्शन डिजाइन त्या फुल लोडेड वजनाच्या हिशेबानेच होइल (कंपनी फिटेड मध्ये) त्यामुळे तसं टेन्शन नाहिये. >>

सहमत.

<< पण ते ऑईल इंजिनमधे गेल्यास प्रॉब्लेम येत नाही का? >>

इतकी काळजी तर घ्यायला हवीच ना? टाकीत किमान दहा लिटर पेट्रोल नेहमी शिल्लक राहील हा हिशेब धरूनच २५० मिली ऑईल टाकायला सुचविले आहे. ऑईल जड असल्याने एकदम तळाशी जाऊन बसेल व संपूर्ण तळाच्या क्षेत्रात त्याचा एक अतिशय पातळ थर होईल. इतक्या तळाकडील द्रव टाकीच्या आत असलेल्या पंपाद्वारे उपसले जाऊन इंजिनात जाण्याची शक्यता अतिशय कमी. तरीही एखाद्या तांत्रिक चूकीमुळे, जसे की एखाद्याने जास्त ऑईल टाकले, टाकीत पेट्रोल कमी असले किंवा ते ऑईल हळूहळू तळाला जायच्या आतच वाहन सुरू करून जोरात अ‍ॅक्सिलिरेटर पेडल दाबला व ऑईल जर इंजिनात गेले तर मोठी समस्या उद्भवणारच. म्हणूनच कंपनी असले सल्ले देण्यापेक्षा सातत्याने जुने इंधन संपवित राहा व पुन्हा पुन्हा ताजे इंधन भरत राहा असा सल्ला देत असते. तसेही पेट्रोल वाहनापेक्षा ही समस्या (म्हणजे मूळात ज्या समस्येकरिता टूटी ऑईल मिसळण्याचा सल्ला दिला होता ती - बरेच महिने इंधन तसेच राहिल्यास टाकीच्या तळाच्या भागावर त्याची प्रक्रिया होऊन टाकीच्या तळाकडील धातू खरवडला जातो व त्याचे काही कण इंधनामध्ये मिसळले जातात.नंतर हे कण इंधन मार्गात प्रवाहीत होऊन इंजेक्टर्स ब्लॉक होण्याची शक्यता असते) डिझेल वाहनातच जास्त प्रमाणात येत असते व सहसा डिझेल वाहनात इतके शिळे इंधन शिल्लक राहत नाही कारण डिझेल वाहनांचा वापर सतत व मोठ्या प्रमाणावर होत असतो (म्हणजे असेच लोक डिझेल वाहने विकत घेतात). तरीही अपवादात्मक रीत्या एखाद्याचे डिझेल वाहन टाकीत इंधन भरलेल्या स्थितीत चार सहा महिने तसेच पडून असेल तर त्याने हा टूटी ऑईल टाकीत टाकण्याचा उपाय करावा.

ओ, ते फ्युलटँकमध्ये ऑईल टाकायचा उपद्व्याप प्लीजच कुणी करू नका. नसती एंजिन ब्लॉकची लफडी. Uhoh
त्यापेक्षा गाडी फिरवा. फार काही फ्यूल लागत नाही; पेट्रोल, गॅस, डिझेल काहीही असू देत.

<< ओ, ते फ्युलटँकमध्ये ऑईल टाकायचा उपद्व्याप प्लीजच कुणी करू नका. नसती एंजिन ब्लॉकची लफडी >>
माझ्या वरच्या सविस्तर प्रतिसादात मी जी लिहीलंय तितकी काळजी घेतली तर काही होत नाही.
<< त्यापेक्षा गाडी फिरवा. फार काही फ्यूल लागत नाही; पेट्रोल, गॅस, डिझेल काहीही असू देत. >>
बर्‍याच वर्षांपूर्वी माझ्याकडे एक टेम्पो ट्रॅक्स टाऊन अ‍ॅन्ड कन्ट्री नावाचे एक जुनाट वाहन होते. ते एक लिटर डिझेल मध्ये ८ किमीच चालायचे. ज्या कामाकरिता घेतले ते अचानकच बंद झाले. कामाशिवाय फिरविणे परवडत नसे. तेव्हा मी टू टी ऑईल टाकून ठेवण्याचा प्रयोग केला होता. ऑईल टाकल्यावर दिवसभर पुन्हा वाहन चालवायचे नाही इतके पथ्य मात्र पाळायचो. कधीही त्रास झाला नाही. २५० मिली पेक्षा अधिक ऑईल कधी टाकू नये.

ऑइल टाकणे ही माहिती नवीन आहे माझ्यासाठी.
हा प्रयोग कुणी करु नये हीच सदिच्छा...

ज्यांना सतत पुणे / मुंबई बाहेर अहमदनगर, नाशिक, सातारा, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर किंवा इतर शहरांत जावे लागते त्यांना त्यामुळे पेट्रोलची टाकी पूर्ण भरलेली ठेवणे आवश्यक ठरते>> ह्यासाठी डिझेल गाडीच उत्तम.

रोजच्या वापरात गाडी असेल तर ते पेट्रोल खाली तसच राहिल अस वाटत नाहि.
आपल्या पिंची मधील महान रस्त्यांवर गाडीत बसलेला माणुस हिन्दकळुन निघतो.

आपल्या पिंची मधील महान रस्त्यांवर गाडीत बसलेला माणुस हिन्दकळुन निघतो.

आणि पुण्यात स्पीड ब्रेकर्स आणि खड्ड्यामुळे

ferfatka आपल्या मित्राने गाडि cng केलि का ? ( धागा २०१३ चा आहे म्हणून विचारले)

performance कसा वाट्तो आहे.

Pages